कणिक =१ वाटी
गुऴ = १/२ वाटी (किसलेला)
साजुक तुप = अंदाजे
रविवारी, जास्तीचे कामे करुन, दुपार च्या तास भराच्या झोपे नंतर जी काय सणसणुन भुक लागते,
तेव्हा हे थालीपीठ बरं पडतं...
किंवा पोरं शिकवणी वरुन आली की आई जोरात भुक लागली म्हणुन काही सुचू देत नाही... मग एक गुळाचं
थालीपीठ दिलं तरी शांत बसतात.. शिवाय गोडाने भुक ही शमते आणि ३,४ तास तरी पोटाला आधार होतो...
तर वर दिल्याप्रमाणे एकवाटी कणिक त्यात १/२ वाटी किसलेला गुळ घालुन नेहमीच्या थालीपीठा सारखेच भिजवावे.(कीचीत सैलसर) आणि तव्यावर एक चमचा साजुक तुप घालुन थालीपीठ हातानेच थापावे. मध्य भागी
एक आणि आजुबाजुला ४ भोकं पा़डुन तुप सोडुन, झा़कण घालुन मंद आचेवर पाच मिनीटं होऊ द्यावे, नंतर सराट्याने उलथवुन असेच तुप सोडुन दुसर्या बाजुने पण खमंग करुन सर्व्ह करा.
एक थालीपीठ जरी खाल्ले तरी पोट भरते.. बाजारचे वेफ्रस, कुरकुरे या पेक्षा हे घरचे पौष्टीक थालीपीठ
केव्हाही चांगले...
मस्तच. मला स्वतःला कणिकेचे
मस्तच. मला स्वतःला कणिकेचे गोड प्रकार आवडतात. यातच लाल भोपळा शिजवून घातला तर अधिकच चविष्ट लागतात.
कणिक, साखर, दुधात सैलसर भिजवून धिरडीही करता येतात. जरा घट्ट भिजवलं तर पॅनकेक!
छान प्रकार. मला लाल भोपळा /
छान प्रकार. मला लाल भोपळा / रताळे वापरून करता येईल.
धन्यवाद मामी, दिनेश दा...
धन्यवाद मामी, दिनेश दा... तुम्ही दोघे सांगताय ते वेरीएशन्स पण छानच आहेत..
अरे भारीच! थालीपीठ मुलांना
अरे भारीच!
थालीपीठ मुलांना खुप आवडतात, नक्की करुन बघेन.
तिकडे वजन कमी करुया हा केदार
तिकडे वजन कमी करुया हा केदार जाधवांचा धागा जोरात चाललाय आणि इकडे अशी तोंडपासु डिश .
सायली, मस्त रेसिपी.
दुपार च्या तास भराच्या झोपे नंतर जी काय सणसणुन भुक लागते,>>>>.अशावेळी हमखास गोडच आवडतं.
सायली, मस्त रेसिपी. मला पण
सायली, मस्त रेसिपी. मला पण आवडत कणकेच गोड थलिपीठ.
सायली, मस्त रेसिपी. मामीने
सायली, मस्त रेसिपी.
मामीने सुचवल्याप्रमाणे आज धिरडे करून खाल्ले. त्यात दालचिनी पावडर आणि जरासे मिठ घातले. धिरडे करतानाच वर खोबर्याची चटणी घातली. परतून भाजताना खोबरे, गुळ, दालचिनीच्या खमंग वासाने, आगंतूक आलेल्या पाहुण्यांना पण हे धिरडे चाखावेसे वाटले.
प्रिती, देवकी, हेमाताई,
प्रिती, देवकी, हेमाताई, नलिनी, मना पासुन धन्यवाद...
करणारच
करणारच
मस्त मस्त
मस्त मस्त
मी लाल भोपला घालून करते.
मी लाल भोपला घालून करते.
मस्त पाककृती त्यामुळे करून
मस्त पाककृती त्यामुळे करून खाणारच.:)
लक्ष्मी, मन्जु ताई,सई, नरेश
लक्ष्मी, मन्जु ताई,सई, नरेश धन्यवाद...
थालिपिठाऐवजी चपातीसारखे केले.
यातच थोडं बेसनपीठ घालुन
यातच थोडं बेसनपीठ घालुन थापण्यापेक्षा पसरवण्याजोगी कंसिस्टंसी केली तरी मस्त होतं
अरे व्वा लक्ष्मी.. केलत
अरे व्वा लक्ष्मी.. केलत पण.छानच आलाय फोटो,
चिमुरी सांगते आहे तो प्रकार पण छानच..
त्यात लाल भोपळाही किसुन घातला
त्यात लाल भोपळाही किसुन घातला होता.
छान
छान
लहानपणी एका मुस्लिम मैत्रीणी
लहानपणी एका मुस्लिम मैत्रीणी कडे ह्याच पिठाचे गुलगुले( तळून गोड भजी) रमजान ला करायचे
माझी आई ह्यात खसखस आणि थोडी खारीक पूड पण घालायची
ह्यात थोडे केळे कुसकरून घातले
ह्यात थोडे केळे कुसकरून घातले तरी छान लागते.