वेज पुलाव

Submitted by kalpana manjrekar on 2 August, 2014 - 01:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : 3 वाटी तांदूळ, पाव किलो मिक्स भाज्या मटार,फारसबी,गाजर,फ्लॉवर,4 कांदे,2 बटाटे, 4टोमॅटो, 5हिरव्या मिरच्या,7-8 लसूण पाकळ्या, आल, 2काड्या दालचिनी, 5 लवंगा,2 मोठी वेलची,8-10 काळी मिरी, तेजपत्ता,कोथिब्बिर.

क्रमवार पाककृती: 

कृती : प्रथम हिरवी मिरची,आल,लसूण मिक्सर मधे वाटून घावे. नंतर मिरी,दालचिनी,मोठी वेलची,लवंग ची पूड करावी. नंतर पातेल्यत तेल आणि तूप सम प्रमाणात घालून तेजपत्ता,कांदे घालून लालसर परतावे, नंतर टोमॅटो टाकावे व नंतर आले,लसूण,मिरची पेस्ट टाकावी. मग मिक्स भाज्या टाकव्या व मग तांदूळ टाकावे व गरम पाणी टाकावे. व मंद गॅस वर भात शिजवून घ्यावा.

वाढणी/प्रमाण: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पाककृती. पण फक्त तुप किंवा तेलात सुध्दा बनवु शकतो आणि पुलावासोबत कोशींबीर आणि उसळ हवीच.

कल्पनाताई,
थोडे सविस्तर लिहावे लागेल इथे.. तशी पद्धत आहे इथली. इथल्या पाककृती अवश्य वाचा.
३ वाट्या तांदळाचा भात व त्यात इतर भाज्या... ४ जणांसाठी जास्त होणार नाही का ?