ववि२०१४-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 27 July, 2014 - 13:05

वविकर्स्,धम्माल आली ना वविला. मग ववि२०१४ बद्द्लचे तुमचे वॄत्तांत आणि प्रतिक्रिया इथे लिहा पाहु.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या ज्या लोकांनी वविला फोटो काढले आहेत त्या त्या लोकांनी ऑनलाईन फोटो अल्बम बनवुन संयोजकांपैकी कोणा एकाशी लिंक शेयर करा, संयोजक सर्व वविकरांना ती लिंक पाठवुन देतील.

सर्व वविकरांना ती लिंक पाठवुन देतील.>>>>मलासुद्धा. मी पण आलेलो.
तुला थोडेच मिळतील. तु थोड्या वेळा पुरताच, थोड्याच लोकांना भेटुन, थोडेच फोटो काढलेलेस ना. Proud

जिप्स्या "बेटा" झाला ठीक आहे पण म्हंजे रिया "आजी"पदाला पोहोचली Wink

लोक्स एंजॉय केलेलं दिसतंय मस्त. संयोजकांचं कौतुक.

Happy

धन्स लोकहो! बाकीचे वृत्तांत का लिहिनात देव जाणे Uhoh

माझे फोटो ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत (देवकाका, बागुलबुवा, योकु, श्यामली (थोपुवर्टाक :)), जम्बो एकच फोटो असेल बहुदा) इत्तकेच आठवतायेत ) त्यांनी त्यांनी मला प्लिज सांगा मग मी संपर्कातुन ईमेल पाठवेन Happy आणि तुम्ही मला माझे सगळे फूज द्या Happy प्लिज प्लिज प्लिज

हहमोडॉन: स्मायली स्टॆटिस्टिक्स
रीया यांच्या वृत्तांतात एकूण 68 स्मायली आहेत. पैकी 26 Proud व 24 Happy आहेत. त्यांना 'स्मायलीदार पोस्ट' पुरस्कार देण्यात येत आहे.
हहमोडॉफ.

प्रिया, तुझे छाचि मी तुला थोपुच्या निरोपातून पाठवलंय...इतरांचीही वैयक्तिक छाचि त्यांना तशीच पाठवलीत...थोपुच्या निरोप्यात ’अदर’ असा एक कप्पा असतो...त्यात त्यांनीही पाहावे.

ज्यांनी फोटो काढलेत त्यांनी कृपया संयोजकांना फोटो पाठवा तरच सगळ्या वविकरांपर्यंत फोटो पोचतील.

इथे फोटो देताना सर्वजण फोटोतल्या व्यक्तींच्या वैयक्तित संमतीचा विचार करतीलच. Happy

ज्यांनी फोटो काढलेत त्यांनी कृपया संयोजकांना फोटो पाठवा तरच सगळ्या वविकरांपर्यंत फोटो पोचतील. >> फोटो लिंक संयोजकांना शेअर केली आहे.

वल्लरी, मी जास्त छाचि काढलीच नाहीत...बस आणि त्यावर लावलेला मायबोलीचा बॅनर...ह्याची तीन छाचि काढली..जी मी ह्याच धाग्यावर टाकलेत...आणि अगदी थोडी, जी पूर्णपणे वैयक्तिक छाचि काढलेत..ती त्यांनाच त्यांच्या त्यांच्या थोपुच्या(फेसबुकच्या) निरोप्यात पाठवलेत.
संयोजकांना पाठवावीत अशी कोणतीही छाचि माझ्याकडे नाहीयेत.

vavi cha jasa pahilach anubhav hota tasa marathi typnyachahi pahilach anubhav ahe tyamule chukbhul dene ghene.. Happy
punyacha bus madhli dhamal mast hoti .. gani ganyanvarche dance khupch chan. ase vatlech nahi ki ya saglyansathi amhi navin aho kinva he amchasathi navin ahet.. tyanche kahi vinod purnpane kalat hote kahi ardhvat kalat hote ani kahi agadi samantar jat hote. Wink tyapaiki ardhavat kalaalela ani lakshat rahilela vinod mhnaje riyabaddal.. kahitari .. tiche bhaavv bhavv ase suru hote.. nitse zeple nahi te.. ulgadel pudhchya vaviparyant ..mallya madat karel.. :))
bus madhil lakshat rahilela arohicha dance( arthat tyat ticha aaichi chhabi disat hotich) ani shri va sau mallya yancha dance.. ek numberch hota to. .. sp la pochlyavar amcha grp thoda vegla zala pan rooms cha gamtimule connected hotoch Wink kahi karnane games madhe purn vel navte pan tari amcha kavla grp sarvat adhi banla hota bare ka.. :))
nantr mallya ne vavi cha prastavnet mhtle tase jad antakarnane sp sodla ani parat dhamal karat punyala pochlot ..

अक्षता, री ही मायबोलीची सार्वजनीक बहीण आहे. इथले सगळे तिचे 'भाव' (भाऊ) आहेत. दिसेल त्याला ती भाऊ करते.
ती जेव्हा ववीला येणार आहे असं कळले, नोंदणी झालेले काहीजण आलेच नाहीत. Proud

हॅलो ऑल... माझे ववि चे दुसरे वर्ष Happy
पहिल्य वर्षी अगदिच नविन असल्याने काहि विशेष लिहिता आले नाही.. यावर्षी मात्र संयोजनात असल्याने अगदी ठरवुन लिहायला घेतले आहे.. (त्यात माझा वादि Happy )
तर माझा ववि ज्या दिवशी मी संयोजनात सामील झाले त्याच दिवशी सुरु झाला.. अगदी काय कामे करायची, कशी करायची, नवीन असल्याने हजार शंका आणि त्या पुर्ण करणारे इतर संयोजक सर्वांबरोबर खुप धमाल आली..
आदल्या दिवशी सर्व पॅकिंग झाल्यावर झोपायला घेणार इतक्यात आठवल अरे खेळांच्या चिठ्या बनवल्याच नाहीत मग काय रात्री ११.३० ला उठुन त्या कामाला लागले.. सर्व बक्षीसे आणि चिठ्या व्यवस्थित बनवुन, लेबल लावुन झोपे पर्यंत १ वाजला. मधेच १२ वाजल्याने (घड्याळात :फिदी:) शुभेच्छांचे फोन येवु लागले. ते घेताना आणि बक्षीसे लावताना दमझाक झाली. मनात म्हटल उद्या वेळेवर जाग येवु दे रे देवा.. पण असं कुठे जायच असलं की झोप थोडी लागते..
एकदाची पहाट झाली आणि मी तयारीला लागले. सर्व आवरेपर्यंत ६ वाजले. मग विचार केला की वेळे आधी पोहोचलेलं बरं म्हणुन (उगाचच) लवकर निघाले. माझ्या थांब्यापर्यंत ( यासाठी मी जराशी फुरगुटुन बसले होते कारण माझ्या घराजवळुन मला न घेता मला पार मुलुंड पर्यंत बोलवले गेले. साभार संयोजक :डोंमा: ) पोहोचायला मला अर्धा तास लागला.. सर्वप्रथम आल्याचा मान माझा बरं का.. रिक्शातुन उतरताच प्रसन्न सकाळ ची अनुभुती आली. कानावर हे ईश्वरा, सर्वांना सुखी ठेव... पडलं.. आणि मन अगदी फ्रेश झालं.. फोना फोनी केल्यावर कळलं बस लेट येत आहे हो.... झालं तिथल्या बस स्टॉप वर एकट बसायचा कंटाळा आला. मग काय काढले हेड्फोन्स आणि एफ एम १०७.१० लावला. मस्त पावसाची गाणी एकली तेवढ्यात एक बाईक वाल्याने हात केला. (बापरे कोण आहे हा) पण हेल्मेट काढल्यावर अरे हे तर घारुअण्णा.. Happy असे एक एक करत सर्व माबोकर आपल्या फॅमिली बरोबर येऊन पोहोचले. कविन पहिल्यावर अगदी गळाभेट घेऊ कि काय असे झाले होते पण आवरते घेतले Proud
बसचा ऊशीर लक्षात घेता मुग्धा, कविन नी ठरवलं की आपण हायवे वर उभं राहणं जास्त सोईच होईल, आणि तेच उत्तम झाले.
आली एकदाची बस...
चला चला अरे चला आता....
बसमधे एक एक थांबा करीत शेवटचा थांबा झाल्यानंतर मी केक वाटायला घेत ला.. का???? अहो माझा वादि नाही का.. पहिला मान नील ला मिळाला.. पण हाय राम त्याने विचारले देखिल नाही की कशाबद्द्ल म्हणुन.. मग काय मीच जाहीर केलं अरे माझा वादि आहे Happy मग सगळ्यांच्या शुभेच्छा घेत केक वाटप झाले. (यासाठी काही पुणेकर माझ्यावर रागावले देखील आहेत चुभुद्याघ्या).
गाणी, गप्पा करत फार्म वर पोहोचलो.. फार्म वरच्या गमती तर सर्वांनी सांगितल्याच आहेत, रुम शोधा खेळ, रुममधले स्वीमिंग पुल्स फारच धमाल..
नाश्ता आणि जेवण पण ठिकठाक च होतं. असो..
या सर्वांची उणीव भरुन काढली ती सांस कार्यक्रमांनी.. Happy
मुलांना चॉकलेट्स देउन देउन मी पार हैराण करुन सोडल.. त्यात एका लहानगी चे रिर्ट्न गिफ्ट हरवल्याने आणि एक्स्ट्रा नसल्याने पंचाईत झाली .. पण एका माबोकराला रिक्वेस्ट केली (खुप खुप आभार त्यांचे Happy ) त्या लहानगी ला त्यांनी त्यांच्याकडचे एक गिफ्ट दिले...
भजी आणि चहाचा मस्त आस्वाद घेताना निरोपाची वेळ जवळ आली हे लक्षात आले.. Sad
पुणेकरांना हसत खेळत निरोप देत, लवकरच पुन्हा भेटु अशी आश्वासनं देत आपपल्या बस मधे बसलो..
परतीचा प्रवास ही खुप छान झाला वेळेत घरी पोहोचलो.. Happy
आणि अशा प्रकारे माझा ववि आणि वादि पार पडला.. Happy
काही ठळक आठवणी:
रिया ला अगदी दोन वर्षां नंतर भेटुन ही अगदी काल परवाच भेटल्यासारखं वाटत होत.. Happy
कविन ने केलेल्या कौतुकासाठी धन्स...
एस पी फार्म चे लोकेशन खुपच मस्त होते अगदी मी हिरव्या गालिच्यात असल्या सारखे वाटत होत.
एवढ्या गोंधळा नंतर ही माबोकरांना त्याची झळ लागु न देता ववि यशस्वीरित्या पार पाडल्याबद्द्ल संयोजकांचे खुप खुप आभार..
बस मधे गायलेले बार बार दिन आये, माझ्या वादि निमित्त गाणे.. थँक्यु सो मच..

सर्वांचे वृ मस्त!
रूममधील स्विमिंग पूल >> Lol राखी! वृत्तांत झकास. तुला उशीराने वादिहाशु!

राखी...
मला अगोदर कल्पना तरी द्यायची... इतर चिट्ठ्यां सोबत आणखी एक चिट्ठी (हार्दीक शुभेच्छा वाली) बनवली असती...
Proud
असो... उशीराने 'वाढ-दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा'...

मस्त वृत्तांत सगळ्यांचे...
राखी केक माझ्यापर्यंतही न पोहोचल्याबद्दल जाहिर णिशेद...

असो... उशीराने 'वाढ-दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा'... >>> धन्यवाद, विवेक.. Happy
@हिम्स आणि मया, केक होता पण घाई गडबडीत राहुन गेलं.. सॉरी... नेक्स्ट टाईम पक्का.. किंवा एखाद गटग करा आणेन तुमच्यासाठी.. हाकानाका

Pages