ववि२०१४-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 27 July, 2014 - 13:05

वविकर्स्,धम्माल आली ना वविला. मग ववि२०१४ बद्द्लचे तुमचे वॄत्तांत आणि प्रतिक्रिया इथे लिहा पाहु.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा माझी आठवण काढली तर >>> केप्या, मी वविला न जाता आठवण काढलीय. ववित कुणी काढली का माहित नाही. तो प्रकार संस्मरणीयच आहे. बघ, नंदिनीच्याही लक्षात आहे Happy मावळ सृष्टीची वाट आणि धबधबाही असाच लक्षात राहण्याजोगा.

मया, तुमचे फोटोही येऊद्यात.

गुब्बे, कुलकर्णी कुल-वृत्तांतासारखे ह्यापुढे कुलकर्णी ववि-वृत्तांत येणार? Proud

अरे सविस्तर व्रुतांत लिहा जरा. खूप मिस केला या वेळचा ववि. काल पाऊस पण मस्तच होता.
मस्त धमाल केलेली दिसतेय.

सविस्तर मेनू, प्रसंग, घटना इतर नव-वविकर लिहितीलच! हे माझे दोन पैसे:

आमच्या पुणे बशीत बरीच भावी माबोकर बच्चा कंपनी होती. एक से एक. एकदम गोड, गुणी मुलं. त्यांचा आनंद, उत्साह आणि ऊर्जा अफाटच!
त्यांचे डायलॉग्ज पण अफाट!
बरं आता खादाडी वर्णन:
जाताना आम्ही गुलगुलीत डोनट्स व चहा यांचा आधार पोटाला दिला होताच वाटेत. पण एस पी फार्मला पोहोचेस्तोवर भूक चांगलीच खवळली होती. एक इरादा मुंबईकर येईपर्यंत त्यांच्यासाठी नाश्त्याला थांबावे का, असा होता. पण एकंदर गर्दी, पावसाची रिमझिम आणि भुकेची तीव्रता इत्यादी समीकरणे ध्यानात घेऊन भूक जिंकली. नाश्त्याला इडली-चटणी, तर्रीदार तिखट मिसळ-पाव आणि पोहे होते. सोबत गर्रम गर्रम चहा.
दुपारी जेवणातील शाकाहारी मेनूत दोन प्रकारच्या पोळ्या, बटाटा भाजी, छोले, डाळ, भात, तळलेले पापड, गुलाबजाम इत्यादी होते. डाळीचा स्वाद मस्त होता. जेवण तसे ओके होते. पण गरमागरम जेवणाचा पावसाळी गारगार हवेतला आनंद औरच असतो. एवढे दोन शब्द बोलून आटोपते घेते. अस्मादिकांस सौंशय आहे की एस पी फार्मवाल्यांनी ओव्हरबुकिंग घेतल्यामुळे जेवणातल्या भाज्या दर राऊन्डला बदलत गेल्या असणार आहेत. माझी फेरी पहिलीच होती. नंतर आलेल्यांच्या पानांत कोणती भाजी पडली हे माहित नाही.
सायंकाळी नाश्त्यास कांदा - बटाटा भजी व पाव, सोबत दमदार चहा.
बसमध्ये खाऊचंगळीत वेफर्स (बुधानी), चिक्की, भडंग, गुंडाळी केलेले पराठे, मठरी आणि असा बराच चटरपटर खाऊ....

इति दिवसभराची खादाडी संपूर्णम् |

जिप्स्या, माझा फोटु न काढल्याबद्दल प्रचंड निषेध. Proud

बाकी फोटोज आणि वृत्तांत येउद्यात की

अकु. तुल दोन्ही पोळ्याच वाटल्या का? एक पोळी होती गव्हाची आणि दुसरी भाकरी होती तांदळाची...

अकु आणि तू वालाचं बिरडं विसरलीस Uhoh आम्ही तांदळाची भाकरी आणि बिरड्यावर ताव मारला.

गोपनिय सुत्रांकडुन असेही कळले की शेवटी आलेल्या लोकांना जेवण सांस्कृतिक भवनात दिल्यामुळे तिकडे त्यांनी सामिष भोजनासह तळलेल्या सुरमईवर, श्रावणावर मात करुन ताव मारला Wink

शु,शेवटी आलेल्यांसाठी नव्हे तर आधीपासुनच सामिष भोजनाची सोय सांस्कृतिक भवनात केलेली होती गं. कालच श्रावण चालू झाला ना म्हणुन वेज जेवणापासुन लांब सोय करण्यात आली होती.. Wink

लोकांना जेवण सांस्कृतिक भवनात दिल्यामुळे तिकडे त्यांनी सामिष भोजनासह तळलेल्या सुरमईवर, श्रावणावर मात करुन ताव मारला >>> श्रावणात मासे चालतात असं मायबोली धर्मग्रंथात वाचलंय नुकतंच Wink

वविटांगारूंनीच स्टेजसमोर एवढी गर्दी केली आहे की वविकरांना माईकपर्यंत यायला जागाच राहिली नाहीये.

चला, बाजूला व्हा सगळ्या टांगारूंनी...

आशु, आय मिस्ड यू...!
बसमधे जेवढा कल्ला केला ना आम्ही तो पुर्ण वविवर हवी होऊ शकला असता Wink
आज मी पुर्णपणे रिफ्रेश आहे Happy

जिप्स्याने येऊन, मला भेटुन सुद्धा]माझा फोटो न काढल्याबद्दल त्याचा णिशेध Proud
पण मी भेटले जिप्स्याला Happy

नव्या लोकांचे वृत्तांत येईपर्यंत माझा रुमाल Happy

नेहा, वर्षा, आदिती, जम्बो कुठे आहात? या पटकन पटकन.

हिम्याच्या सायलीने आपण सगळे मिळुन लवकरच पुढची ट्रिप ठरवुया असं सुद्धा सांगितलंय इतके बेस्ट आहोत आम्ही पुणे बस वाले Wink

पण मी भेटले जिप्स्याला>>>>हुश्श...... म्हणजे आता लोकांना पटेल कि मी डुआयडी नाही म्हणुन. Proud

ववि २०१४ ची वैशिष्टे - निसर्गरम्य ठिकाण, पावसाची संततधार आणि धम्माल वॉटर राईडस

सकाळी सानपाड्याला Saj2020, प्रितीभूषण आणि आम्ही बसमध्ये बसलो. बसमध्ये सगळेच खाण्यात आणि गाण्यात गर्क होते. बस NH 17 वरुन निघाली आणि आजुबाजूला हिरवेगार डोंगर, भातशेती आणि पाण्याचे ओहळ दिसत होते. बस SP Farmला पोहचली. चिंब वातावरणात तिखट मिसळपाव आणि मसाला चहा पियाला मज्जा आली. SP Farmवाल्यांनी आमच्यासाठी एक गमतीदार कार्यक्रम - रुम्स शोधण्याचा ठेवला होता. त्यामुळे दिवसभर पूर्ण SP Farmची परिक्रमा झाली पण जेवण ताजे आणि गरम होते. नंतर तीन तास पूल्सम्ध्ये रेन डॉन्स, वॉटर राईडस आणि व्हॉलीबॉल खेळलो. लहान-मोठे सगळ्यांनी मज्जा केली. जेवल्यानंतर मस्त सांस्कृतिक कार्यक्रम झाले.संध्याकाळी चहा आणि गरमागरम भजीपाव. नवीन ओळखी झाल्यात. येताना परत धो धो पाऊस.

ववि संयोजकाचे आणि पावसाचे मनापासून आभार!

Pages