ववि२०१४-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 27 July, 2014 - 13:05

वविकर्स्,धम्माल आली ना वविला. मग ववि२०१४ बद्द्लचे तुमचे वॄत्तांत आणि प्रतिक्रिया इथे लिहा पाहु.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनय,रंपाचा ग्लास हातात घेतल्याच्या आविर्भावात उभा राहिलाय फिदीफिदी
अरे आणि तो किती साजुक दिसतोय...

SP
Farmवाल्यांनी आमच्यासाठी
एक गमतीदार कार्यक्रम - रुम्स
शोधण्याचा ठेवला होता.
त्यामुळे दिवसभर पूर्ण SP
Farmची परिक्रमा झाली >>>>>>> this is altimate punch !
good one Raju Lol Proud Wink

मला इश्यू आहे जिप्सी.. आमचे प्रचि न टाकल्याबद्दल.... तुझा निषेध
>>>>
माझा तर आमचे फोटो न काढल्याबद्दल निषॅढ निषेढ निषेढ :नाक मुरडणारी बाहुली >>

+ १०१

SP
Farmवाल्यांनी आमच्यासाठी
एक गमतीदार कार्यक्रम - रुम्स
शोधण्याचा ठेवला होता.
त्यामुळे दिवसभर पूर्ण SP
Farmची परिक्रमा झाली >>>>>>> Rofl

आला आला म्हणेतो कल्ला करत ववि झाला पण.
मुंबईची बस मस्तच (:डोमा:) लेट आली. डिस्टंस + रोडचे खड्डे + गटारी हँगओव्हर + पाऊस हा हिशोब पाहता बोरिवली ते मुलुंड हे अंतर चालक काकांनी अपेक्षीत वेळेपेक्षा फारच कमी वेळात पार पाडले. नाहितर मी वेळेत होते बरे का :):):).
असो. पण बसमधला गोंधळ / दंगा / टोमणे / बजावणे / बडवणे / विडंबन ई. व्यवस्थीत पार पडत असताना मुग्धानंदचा पनवेल पासुन ती वाट पहात असलेला अपेक्षीत लेफ्ट टर्न आला व आत्ता येईल, लगेच येईल असे म्हणत ती सांगत असलेले एस पी यांचे फार्म आले. पहाताक्षणी आनंद दिघे यांची आठवण होईल असा दिसणार त्यांचा मालक बघताच मुग्धा सवाल जवाब करण्याकरता पुढे गेली व आम्ही सगळे ब्रे.फा. पाशी जमलो. रुम मधे सामान टाकुन मग पोहे, मिसळ पाव, ईडली चटणी यांचा पोटाला आधार देत आम्ही जरा गप्पा मारतो न मारतो तोच स्वि. पुल, पाऊस, घसरगुंड्या यांनी खुणावले व आम्ही खेळात रमलो.
आल्यावर जेवणे झाली. त्यात छोले, दाल, बिरडं, ब. भाजी, पोळी, भाकरी, भात, पापड, गुलाबजाम असा बेत होता.
मग माबोकरांना शोभेल असा गोंधळ घालत, सर्व ववीकरांनी सां.सनी घेतलेल्या स्पर्धेत भाग घेतला. आमच्या ग्रुपाला आलेल्या 'कर्माची फळे' चे डंब शेअर करताना मी कपाळावर इतक्यांदा हात मारला की माझे डोके दुखायला लागले, पण 'कर्म माझ' असे मी सांगतेय हे कोणाला कळेचना. :(. तिकडे हयग्रिव्ह चे पण बहुदा तेच झालेले.
असो पण दंगामस्तीत, गोंधळात, पावसात, पाण्यात, रुम बदलण्यात, Wink इ.इ.इ.इ.इ ववि मस्त झाला.
परतीच्या प्रवासात पण गाणी झालीच. फक्त जरा शांतपणे.
वेल, मुग्धा व अजुन एका दोघांची पिल्ले न थकता येतानाहि खेळत होती. त्यांच्या शांत बसण्याची वाट पहात शेवटी आई लोक्सनीच जरा जरा डुलक्या कढल्या बहुदा. माझ्या लहानाने जराही त्रास न देता, घरी आम्ही ज्या शहाण्या बाळाच्या गुणांची वाट पहातो ते गुण तिथे दाखवले. त्याच्या खाण्याच्या वेळेमुळे मी सांसच्या कार्यक्रमांची सुरुवात मिसली त्यामुळे बर्‍याच जणांचे आयडी कळाले नाहीत. पण तरिही लोक्स आपण परत परत भेटणार आहोत, सो पुढच्या वेळी ओळख होईलच. Happy

तो रुम शोधणे / बदलणे हा सॉल्लीड वैताग होता. नंतर दिलेला तो बंगला इतका ओला होता की त्यापुढे स्वि. पुलाने झक मारावी. वरच्या ओपन टेरेसवरुन पाऊस खालच्या हॉलमधे आलेला. सगळीकडे ओलं. त्या जिन्याचा प्रसाद पण घेतला काहिंनी. Sad
परिसर मस्त होता पण रुमची सोय गंडलेली. खुपच क्राऊड होता.

सगळ्यांचेच वृ मस्त

SP
Farmवाल्यांनी आमच्यासाठी
एक गमतीदार कार्यक्रम - रुम्स
शोधण्याचा ठेवला होता.
त्यामुळे दिवसभर पूर्ण SP
Farmची परिक्रमा झाली >>>>>>> this is altimate punch>>+१

मुंबै बसवाल्याने जेरीस आणणं, "आमी नाय जा तुमच्या ठरवलेल्या थांब्याला येणार. आमाला आहे तितुन्नच उच्चून घ्या असा काही लहान मुलांचा हट्ट, आणि आपल्या बूक केलेल्या रुम्स परस्पर दुसर्‍यांना देऊन डोक्याचं तापमान वाढवणारे मालक (सपचे मालक) वगळता बाकी समदं झ्याक झालं की नाई? पावसाच्या सरींनी सगळे ताप विसरायला लावले आणि माबोकरांच्या आपुलकीने त्यावर चारचांद लावले.

"तंटा नाही तर घंटा नाही.."
असं आपल्या एका जाहीरातीतच होतं ना? म्हणून ह्या तंटासिच्युएशन्स झाल्या असाव्यात. नियती बघतेय संयोजक (माझ्यासकट सगळेच संयोजक) पुढच्या वेळी जाहीरातीत "नो तंटा बाबा" Proud

धन्यवाद वविकर्स, रुम्स आणि बस प्रकरणात संयोजकांना समजून घेऊन साथ दिल्याबद्दल Happy

संयोजकांमधे "राखी" ह्या नवीन संयोजक माबोकरणीने सांसची सगळी जबाबदारी उत्तम पेलली ह्यावेळी. तिचा उत्साह आणि सहभाग मस्तच.

राजु७६ हे ही रोमातले माबोकर पहील्यांदाच संयोजनात उतरले होते. त्यांचं योगदान इथे मात्र "रोमात" नव्हतं Proud

गृप बनवा हा खेळ घेताना अकुच्या कल्पकतेमुळे ह्यावेळी प्राण्यांच्या नावांचे गृप केले होते. प्रत्येकाने चिठ्ठी निवडून आपला आपला गृप त्या त्या प्राण्याची अ‍ॅक्टींग करत, आवाज काढत एकत्र जमवायचा होता. सगळीकडून मॅव मॅव, कुकुच कू वगैरे एकताना धमाल येत होती

मॅड अ‍ॅड हा सगळ्यांना आवडलेला खेळ - हा मल्लीच्या सुपीक डोक्यातून निघाला होता तर पदार्थांचं डम्बशेराड्स खेळू ही कल्पना कार्याध्यक्ष मयुरेशची.

कर्माची फळं, हयग्रीव, बाळ बटाट्याची भाजी हे काय पदार्थ आहेत काय? असा पब्लीकने धोशा लावला पण हे पदार्थ सचित्र कृतीसहीत माबोवर आहेत असं त्यांना ठणकावून सांगत संयोजकांनी धोशा मोडून काढला

परेश लिमयेंनी बाळ बटाट्याची भाजी हा पदार्थ "लाल बटाट्याची भाजी" असा वाचला आणि तशी अ‍ॅक्टींग केली Proud पण संदीप एस ह्यांनी त्या लालवरुन नंतर बाल हा शब्द ओळखून पदार्थ ओळखला म्हणून ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल म्हणत त्यांच्या बोका गृपने परेश लिमयेंना माफ करुन टाकलं.

हे खेळ भरभर आटपतायत असं वाटल्यामुळे आयत्यावेळचा प्रश्न आमचे उत्तर तुमचे हा खेळ घेतला गेला. त्यावेळी एका प्रश्न असाही होता की "आत्ता एकाच गृप मधे असलेले नवर बायको/ बीएफ जीएफ जोड्या कोण?" त्यावर परेश लिमयेंनी हायकाय्नायकाय म्हणत मार्कांपुरत्या तात्पुरत्या जोड्या जमवूया असा एक मुद्दा मांडून बघीतला पण समस्त माबोकरणींनी एकमताने त्याकडे तु.क. टाकून आपले माबोपण सिद्ध केले Proud

अजून एक निरिक्षणः कोणाच्या वॉलेट मधे नवरा/बायको/बीएफ्/जीएफ (स्वतःचे) फोटो आहेत ह्या प्रश्नावर आलेल्या उत्तरांमधे बायकोचा फोटो असलेले माबोकर नवर्‍याचा फोटो असलेल्या माबोकरणींपेक्षा जास्त निघाले

@लले, ह्यावर्षी बसमधली तुझी जागा मी चालवली येताजाताना (प्रवासी गोळी विसरले घ्यायला) Sad Proud

गृप पोटो राहीला ही एकच चुटपूट लागून राहिली ह्यावेळी

साजिर्‍या, ह्यावर्षी तुझी आठवण म्हणून मी चहा सांडला Proud संयोजनाचा हिशोब चालू असताना योकूने मला चहा आणून दिला तेव्हा मुग्धाने अशा नजरेने बघीतलं माझ्याकडे की चहा सांड्लाच शेवटी Wink

मलाही भेटला जिप्सी!

राजू७६, मस्त फोटो. एसपी फार्मला सांस ट्रेजर हंट ठेवावा का या विचारांत असल्याचा सुगावा अगोदरच लागला असणार आहे... म्हणून त्यांनी रूम हंट खेळ ठेवला होता. त्यामुळे माबो मंडळी बोचकी बाचकी घेऊन गोमू संगतीनं माझ्या तू येशील का, करत एसपी फार्मच्या वाटांत एकमेकांना विचारत दिवसभर फिरत होती!! Rofl

तांदळाच्या भाकऱ्या.... च्च्च... मी त्या खाल्ल्या नाहीत त्यामुळे मला त्या वरवरच्या रूपावरून मैद्याच्या पोळ्या / रोट्यांसारख्या वाटल्या. खूप पातळ, तलम दिसत होत्या. वालाचं बिरडं बहुतेक मी जेवण वाढून घेतले तेव्हा मेन्यूत नव्हतं. Biggrin

मी खरवस हे बरोबर आणि सर्वात पहिल उत्तर दिल ते विसरलीस की का कवे ??
Happy Wink

बाकी केदार यांच्या वजन घटवा बाफचा उपयोग झाला जाहिरात करताना
मला वाटत वास्तवदर्शी जाहिरात केल्याने आम्ही कोंबडे जिंकलो Light 1 Lol Proud Wink

कामाचा लोड इतका होता कि ववि बद्दल काहीच कळालं नाही. आत्ता इथे रिसॉर्टचं नाव आणि ठिकाण कुठलं या उत्सुकतेने पाहीलं पण कुणी लिहीलेलंच नाही ते. Proud
जे आले नाहीत त्यांना कसं कळणार हो ?

@उपास, वर जिप्स्याने टाकलेल्या प्रचिंमधे चार संयोजक आहेतच. पैकी मल्ली तुम्हाला भेटलाच असेल पुण्याच्या बस मधे. त्याव्यतिरीक्त पुण्यातल्या इतर संयोजकांना म्हणजे मयुरेश, हिम्या, अकु ह्यांचीही भेट बसमधे झालीच असेल. तुमच्या सोबत जी बस मधे नव्हती पण जिची कार तुमच्या सोबत चालली होती ती गुब्बी

मुंबईकरांमधले नील, मुग्धानंद, आनंदमैत्री वरच्या फोटोत आहेत आपापल्या मुलांसोबत.

राहिलेले संयोजक म्हणजे योकु, राखी आणि मी. तर जिला तुम्ही आता तरी संयोजकांची ओळख होऊन जाऊदे असं म्हणलात तिच ती मी Proud

भाकरीत भाकरी तांदळाची... हो गं जाई... तू घेतली होतीस की तांदळाची भाकरी!! विसरले बघ मी!
चिकवडी म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या सदृश पदार्थ असावा याचा शोध कविनमुळे म्यां पामराला लागला! Proud

यंदा खुर्ची मोडणे कार्यक्रम पण मस्त पार पडला... हेमंत बसले होते ती खुर्ची काडकन मोडली.. त्यांना फार लागले नसावे..

बाकी बच्चे कंपनीने लई धमाल केली...
आमचे चिरंजीव ववित फार उत्साही नव्हते पण परत येताना गाडीत जामच फॉर्मात आले होते..

देसाईंचा आबा केला होता त्यानी.. देसाई बस मधून उतरल्यावर मजबूत भोकाड पसरले.. त्यांच्या बरोबरच जायचे होते त्याला.

आणि उतरणार्‍या प्रत्येकाला टाटा करत होता...

देसाईंचा आबा केला होता त्यानी.. देसाई बस मधून उतरल्यावर मजबूत भोकाड पसरले.. त्यांच्या बरोबरच जायचे होते त्याला.
Lol देसाईंनी सगळ्या बच्चे कंपनींना आळीपाळीने मांडिवर बसवुन घेऊन सगळ्यांची पुढे बसुन रोड पाहण्याची हौस फिटवली.

त्यांना फार लागले नसावे.. >>> आता लागले असले तरी 'नाही' असंच म्हणतील Proud

@कविता, टीशर्ट संयोजकांना विसरल्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे.

ती खुर्ची मोडताना झालेला कडाऽडकड् आवाज आणि त्यानंतर माबोकरांनी राखलेली काही क्षणांची अवाक् शांतता पाहून शिवधनुष्य मोडल्यावर जनकाच्या दरबारात कसे वातावरण झाले असेल त्याची कल्पना आली.
हेमंत यांना होपफुली जास्त लागले नसेल.

अगं तिथे कार्यक्रम कंडक्ट करणा-या संयोजकांची ओळख करून द्या असं म्हणत होते ते म्हणून तुमची नावं नाहीत तिथे

Pages