गट्टे का साग (अगदी सोप्पा)

Submitted by सायु on 26 July, 2014 - 04:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बेसन पीठ = २ वाट्या
आंबट दही = पाऊण वाटी
लसुण = १ अख्खा / १५, २० पाकळ्या
हिरवी मिरची = २/३
धणे पुड = २ चमचे (चहाचे)
जिरे पुड = १/२ चमचा (चहाचा)
शोप = १/२ चमचा (चहाचा)
तेल = दिड पळी
हळद, तिखट, मिठ अंदाजे.

क्रमवार पाककृती: 

सगळ्यात आधी, २ वाटया बेसन पीठ एका लाहान परातीत किंवा टोपात घ्या. त्यात १/२ चमचा शोप( खलबत्यात जाडसर कुटुन), ८/१० पाकळ्या लसणु आणि १ मिरची (खलबत्यातुन जाडसर कुटलेली) घाला, हळद, तिखट , मिठ अंदाजेच घाला, २ चमचे कच्च गोडं तेल घाला. आणि पुर्‍यांसाठी भिजवतो तसेच भिजवुन घ्या. आता त्याचे पोळ्यांसाठी गोळे करतो तसेच गोळे करा. ( साधारण ३/ ४ होतात). पोळपाटा वर थोडे पीठ घालुन एक एक गोळा लांबोळका करुन जाड शेवे सारखे एक एक एंचाचे काप करुन घ्या. एका भांडयात गरम पाणी करायला ठेवा. उ़कळी आली की त्यात हे गट्टे (शेवेचे काप) टाका आणि १० मि. उकळुन घ्या, मधुन मधुन सुरीनी चहाळा द्या. काप तरंगु लागले की भांड खाली उरतवुन गट्टे निथळुन घ्या... (पाणी टाकुन देऊ नका) आता गट्टे तय्यार आहेत..

कढईत दिड पळी तेल घाला, पाव चमचा जीरे घाला, उरलेल्या १० पाकळ्या लसणाच्या आणि दोन मिरच्या ची खरड घाला,हळद, तिखट, धणे- जिरे पुड घाला, पाउण वाटी दही घाला(फेटलेलं). जे गट्टे उकळले त्याचे गरम पाणी अंदाजेच घाला ( साधारण १ ते दिड वाटी) मीठ घाला, कढीपत्ता पण घालु शकता. एक उकळी आली की निथळलेले गट्टे घाला आणि १० मि. झा़कण ठेवुन शिजु द्या. बारिक चिरलेली कोथिंबीर घालुन सर्व्ह करा..

झाली गट्टे की सब्जी तय्यार..:)

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जण
अधिक टिपा: 

पुरी किंवा पराठ्या बरोबर छानच लागतात..

माहितीचा स्रोत: 
मैत्रीणी ची राजेस्थानी टेनंन्ट.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages