गट्टे का साग (अगदी सोप्पा)

Submitted by सायु on 26 July, 2014 - 04:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बेसन पीठ = २ वाट्या
आंबट दही = पाऊण वाटी
लसुण = १ अख्खा / १५, २० पाकळ्या
हिरवी मिरची = २/३
धणे पुड = २ चमचे (चहाचे)
जिरे पुड = १/२ चमचा (चहाचा)
शोप = १/२ चमचा (चहाचा)
तेल = दिड पळी
हळद, तिखट, मिठ अंदाजे.

क्रमवार पाककृती: 

सगळ्यात आधी, २ वाटया बेसन पीठ एका लाहान परातीत किंवा टोपात घ्या. त्यात १/२ चमचा शोप( खलबत्यात जाडसर कुटुन), ८/१० पाकळ्या लसणु आणि १ मिरची (खलबत्यातुन जाडसर कुटलेली) घाला, हळद, तिखट , मिठ अंदाजेच घाला, २ चमचे कच्च गोडं तेल घाला. आणि पुर्‍यांसाठी भिजवतो तसेच भिजवुन घ्या. आता त्याचे पोळ्यांसाठी गोळे करतो तसेच गोळे करा. ( साधारण ३/ ४ होतात). पोळपाटा वर थोडे पीठ घालुन एक एक गोळा लांबोळका करुन जाड शेवे सारखे एक एक एंचाचे काप करुन घ्या. एका भांडयात गरम पाणी करायला ठेवा. उ़कळी आली की त्यात हे गट्टे (शेवेचे काप) टाका आणि १० मि. उकळुन घ्या, मधुन मधुन सुरीनी चहाळा द्या. काप तरंगु लागले की भांड खाली उरतवुन गट्टे निथळुन घ्या... (पाणी टाकुन देऊ नका) आता गट्टे तय्यार आहेत..

कढईत दिड पळी तेल घाला, पाव चमचा जीरे घाला, उरलेल्या १० पाकळ्या लसणाच्या आणि दोन मिरच्या ची खरड घाला,हळद, तिखट, धणे- जिरे पुड घाला, पाउण वाटी दही घाला(फेटलेलं). जे गट्टे उकळले त्याचे गरम पाणी अंदाजेच घाला ( साधारण १ ते दिड वाटी) मीठ घाला, कढीपत्ता पण घालु शकता. एक उकळी आली की निथळलेले गट्टे घाला आणि १० मि. झा़कण ठेवुन शिजु द्या. बारिक चिरलेली कोथिंबीर घालुन सर्व्ह करा..

झाली गट्टे की सब्जी तय्यार..:)

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जण
अधिक टिपा: 

पुरी किंवा पराठ्या बरोबर छानच लागतात..

माहितीचा स्रोत: 
मैत्रीणी ची राजेस्थानी टेनंन्ट.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायलीताई, फोटु कुठे आहेत?
ही भाजी माझा मारवाडी मित्र आणतो टिफिनमध्ये मस्त चव असते. पाक़कृती तर कळाली आता पाहू कारण प्रकरण माझ्या आवाक्याबाहेरचे आहे त्यामुळे आई किंवा बायकोने बनवली तर घरी खाणार. नाहीतरी ऑफिसमधला मित्र आहेच.:)

अरे वा! खरंच सोपी आहे कृती..करून बघेन एकदा Happy

एक एक गोळा लांबोळका करुन जाड शेवे सारखे एक एक एंचाचे काप करुन घ्या >>> म्हणजे नक्की काय हे फोटो पाहिल्यावर कळलं... Lol

माझी रिक्षा.

http://www.misalpav.com/node/9275

मायबोलीवरही हे होते. पण त्याची लिंक मिळत नाही आहे.

सायली, गट्टे ऊकडल्यावर डीप फ्राय केले तर चव अजून छान लागते.
मी ही भाजी कांदा टॉमेटो च्या ग्रेव्हीत करते. आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे करून बघेन.

ही भाजी सुंदर लागते.

पण ते दिड पळी तेल थोडे कमी केले तर सुंदरपणा कमी होईल का हा प्रश्न मनाला छळत राहतो. आज करुन पाहिन, दिड चमचा तेलात.. Happy

स्मितु, सामी, लक्ष्मी, साधना धन्यवाद...

गट्टे ऊकडल्यावर डीप फ्राय केले तर चव अजून छान लागते.+++ ट्राय करील बर.
ही भाजी घट्ट दही ताकात छान लागते+ अगदी बरोबर.
आज करुन पाहिन, दिड चमचा तेलात.. स्मित++++ नक्की करुन पहा आणि फोटो पण टाक.

मस्त प्रकार..
मुंबई भेटीत ताडदेवच्या स्वाती मधे खाल्ला होता.
मुंबईच्याच नव्या टर्मिनलवर ऊंधियू, तुरीया पात्रा, ढेबरा पण मिळायला लागले आहे आता.

मी ट्राय केलं हे साग आज. मस्त लागलं चवीला. डाळीचं पीठ भिजवताना पाणी जास्त झाल्याने जरा किचकट काम झालं पण अदरवाईज सोप्पी आहे रेसिपी. थॅन्क्स.

मस्तच गं सायली Happy
तु थोपु वर दिसली मला पण फ्रेंड रिक्वेस्ट नै पाठवता आली..तु डिसेबल करुन ठेवलेल दिसतय :|

Pages