जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोगा एक प्रश्न पण ती मेघना तुमची सून होईल ना. तिचे सासरचे आडनाव देसाई आहे. मग तुम्ही तिचे काका कसे? का तुम्ही कुडाळचे म्हणून कुडाळकर (तिचे माहेरचं आडनाव).

मी कुडाळकर म्हणून काका, देसाई म्हणून सासरा, देसाई म्हणून आत्याचा नवरा इत्यादी काहीही होऊ शकतो...
Proud

अजून मालिका बघताहात? नाही हो.. पण १५ दिवसानी एकदा चौकशी करतो चिपो ची,, Proud
घरची मालिका आहे ना?

जाऊदे गोगा तुमच्या घरच्या बऱ्याच मालिका आहेत. वेगवेगळ्या channel वर देसाई आहेत. मी एकच बघते पण ती तुमच्या चिपोची नाही, ती मला आवडत नाही. चला पळा Lol

संवादात पाणी म्हणजे पाणी म्हणजे पाणी किती घालावं ......

मेदे : ही घे . बडीशेप !
आदे : ए नको ! वास येतो तिचा. आणि मला अजिबात आवडत नाही तो वास .
मेदे : काय ? अरे ,त्यादिवशी तर खाल्ली होतीस .
आदे : हो ! पण त्यादिवशी का खाल्ली होती मी ?
मेदे : का?

( आईबाबा , साईबाबा शप्पथ ! मला वाटलं आता आदे काहीतरी रोम्यान्टिक कारण देणार Blush ! कसचं काय !!!!)

आदे : कारण ... त्यादिवशी ती तव्यावर मस्त खमंग भाजली होती . Uhoh
मेदे : अछ्छा .. म्हणजे ती भाजलेली असली तर तू खाणार नाहीतर नाही !

मी काही ही सिरियल बघत नाही . परवा माहेरी आउसाहेबांच्या क्रुपेने बघणे झाले .
या अगोदरही असे अनेक असतील , मी पहिल्यांदाच बघितलं !

संवादात पाणी म्हणजे पाणी म्हणजे पाणी किती घालावं ......

मेदे : ही घे . बडीशेप !
आदे : ए नको ! वास येतो तिचा. आणि मला अजिबात आवडत नाही तो वास .
मेदे : काय ? अरे ,त्यादिवशी तर खाल्ली होतीस .
आदे : हो ! पण त्यादिवशी का खाल्ली होती मी ?
मेदे : का?

( आईबाबा , साईबाबा शप्पथ ! मला वाटलं आता आदे काहीतरी रोम्यान्टिक कारण देणार ! कसचं काय !!!!)

आदे : कारण ... त्यादिवशी ती तव्यावर मस्त खमंग भाजली होती .
मेदे : अछ्छा .. म्हणजे ती भाजलेली असली तर तू खाणार नाहीतर नाही ! >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Rofl

स्वस्ति Lol

खवय्ये आहेत देसाईवाडीतले... आता भाजक्या बडीशेपच्या रेसिप्या पण सुरू झाल्या का? पुढील पात्र प्रशांत दामलेचे का आणत नाहीत! म्हणजे आम्ही सारे खवय्ये आणि जुयेरेगा चा महाएपिसोड त्या हिंदी वाहीन्यांवर असतो तसा...
माईंच्या रेसिपींना एक धष्टपुष्ट भरवश्याचा गिनीपिग मिळेल, दामल्यांच्या अविरत चालू तोंडाला दाणे-चणे-फुटाणे-झालंच तर भाज्यांचे तुकडे,शेंगदाण्याचे कूट,ओल्या नारळाच्या चवाचा बोकाणा,उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, वर शेवटी खमंग भाजलेली बडीशेप इ. इ. सामग्री मिळेल.... दोन्ही सुनांना नव्या रेसीपीज शिकायला (प्लीज नोट हं फक्त शिकायला)मिळतील... कारण एक आदित्य मध्ये दंग आणि एक आपल्याच (ओढवून घेतलेल्या किंवा पाचवीला पुजलेल्या) दु:खात मग्न! बाकी नानांचे नाना विषयांवर न्यानामृत असेलच कसला बोकाणा भरला तर ठसका लागू शकेल... पण आपले प्रदा त्याकडे सवयीनुसार काणाडोळा करतीलच!!

माबोवर इतर बरेच 'मामा' आहेत..(भाच्याही बर्‍याच आहेत) तेव्हा अजून मामांची गरज नसावी...

आणि 'गोगा' कसे सिनेमात असल्यासारखे वाटते.. (क्राईम मास्तर गोगो, नायतर गोगा कपूर इत्यादी)..

तेव्हा गोगा म्हटले तरी चालेल.. ( 'परदेसाई' चे 'पदे' होण्यापेक्षा हे बरे)... Proud

बडिशेप रोमांस... फिदीफिदी >>> की रोमॅंटिक बडीशेप. ??? Happy

खवय्ये आहेत देसाईवाडीतले...>>> ड्री , हे लाखमोलाचं ! परवाचाच एपिसोड आठवतेय मी .

मेदे सांगते , "सकाळी विजयाताई नेहमीप्रमाणे कीचनमध्ये आल्या .... "
नंतर नाना माईना सन्गतात , एक वाजला , जेवायच नाही का ?
नंतर नाना आणि माई आश्रमात जाण्याबद्दल बोलतात तेव्हा माई म्हणतात " कोकणातून मुलांसाठी जो खाउ आणला आहे , तो त्याना द्यायचा आहे "
मेदे विजयाला मुलांसाठी आणलेले मटार (?) आणि स्त्रॉबेरीज देते
मेदे आणि आदे यान्चा बडीशेप संवाद
मग अमित , आदे आणि माई ब्रेक्फास्ट टेबल्वर - नाश्ता आणि चहा घेताना , विजया त्याना आणून देतेय .
..........

अग्ग्गाआईईई !!!! हो गं ! खाण्याशिवाय काही सुचतत नाही या लोकांना Sad

आत मला कळलं माझे बाबा सारखे व्हॉट्सप मध्ये डोक घालून का बसलेले असतात.
या देकु( देसाई कुटुम्ब) आणि जानी पेक्शा फॉरवर्डस परवडले !!!

नंदिनी देसाई आहे माहेरची म्हणून म्हणाली ती. <<< म्हणून म्हणाली काय? बरं तर हुशार भाचीचे स्वागत.. गोगामा च्या घरी Proud

हायला काल fb वर सहज दिसलं त्या मेघनाला २३००० च्या वर likes आहेत.

डोळे मोठे करून कपाळाला हात लावलेली बाहुली, assume करा.

नाष्टा /चहा/विविध रेसिप्या/पुडिंग . खाऊ -पिऊ ची चंगळ आहे मालिकेत.
नुसताच रेसिप्यांचा अभिनय. प्रत्यक्षात ? माहित नाही Happy

नुसताच रेसिप्यांचा अभिनय. प्रत्यक्षात ? माहित नाही >> अभिनयच! त्यादिवशीचा (वि)चित्राने खास आदित्य साठी करून आणलेला उंधियो नामक चिखल भाजीचा भला मोठा चमचा घशात घालतानाचा आणि रिकामे तोंड हलवण्याचा सुमो चा अभिनय स्पष्ट कळत होता! वर चिंचेचं बुटुक चोखल्यासारखं डोळे घट्ट मिटून आंबट तोंडपण केलेलं. पण ती बिचारी तरी काय करेल, कोण रिस्क घेईल ते खरंच खायची. आणि अर्चू बर्‍याचदा गोड खाताना/चहा पिताना अभिनय करते ते समजतं! सिरीयल मध्ये खादाड दाखवली असेल तरी प्रत्यक्षात डाएटवर असेल Proud

ए अरे मेदे आदे चिपो काय, शॉर्टफॉर्म्स नका ना वापरू.. काहीच कळत नाही मग.
मेदे / आदे म्हणजे काय?

Pages