जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाहीच गेली.. चिवट कुठली..>>>>>> +११ तेच ना. मारे अगदी फार्स केला सगळा.

अर्चू अगदी सगळ्यांना तोंडावर बोलणार (माईंच्या मते माझं कोकरू मनात एक ओठावर एक असं नाही हो... जे आहे ते लगेच तिथल्या तिथे सांगून मोकळी) आणि या कोकराला तिच्या कोकरू बंधूंनी जरा काही खरं बोलून दाखवलं की चालली लगेच. (जसे स्वयंपाक येत नाही, चहा जेवणाला खालीच असते)
जे लोकं स्वतः फाडफाड बोलतात त्यांनाही कोणीतरी असं बोलून दाखवू शकतंच की. फुका एपिसोड्स खाल्ले सगळ्या कोकरांनी :रागः

आपल्यासाठी हि मालिका केव्हाच संपली आहे. जोपर्यंत झी मराठी वाल्यांना या मालिकेच्या जागी यापेक्षा बेकार मालिका मिळत नाही तोपर्यंत हे दळण चालू राहील. काहीही (सुयोग्य!) शेवट न दाखवता अचानक हि मालिका बंद झाली तरी कोणालाही वाईट वाटणार नाही.

हो ना, केवढं बोलते ती अर्चु... माहेरी आहे म्हणून ऐकताहेत सगळे. सासरी राडा झाला असता...

काल काहीतरी स्पर्धेबद्दल आणि त्यात अर्चूला बक्षीस मिळतं आणि विजयाला मिळत नाही, मग ती विजया रडत बसते, असा सीन दिसला. मेघना माईंना फोन करते. तर माई म्हणतात, काही काळ जाऊ दे, ती तिचं दु:ख विसरेल.
दु:ख ???
वाईट वाटलं, अपेक्षाभंग झालं इतपत ठीक आहे. पण कुठल्याशा स्पर्धेत बक्षीस नाही मिळालं म्हणून ओक्साबोक्शी रडायचं???
कै च्या कै

अगं ललिता, विजयाला वाटतं होतं की त्या स्पर्धेतून बक्षिस मिळालं की ऑर्डर मिळेलं आणि ती त्या अमितला बिझनेससाठी पैसे देऊ शकेलं.

हो, पण अश्या स्पर्धांमधून लगेच बिझनेससाठी भांडवल उभं करण्याएवढा पैसा मिळतो का? काहीही काय!
आणि बाकी इतकी मॅच्युअर्ड वगैरे दाखवली आहे, तर मग या एकाच स्पर्धेवर आशा लावून कशाला बसली?

पण अश्या स्पर्धांमधून लगेच बिझनेससाठी भांडवल उभं करण्याएवढा पैसा मिळतो का? >> लले, Lol तुला खोटं वाटेल पण मिळतो.
लाडला सिनेमात अनिल कपूर ला सोने की चेन मिळते बक्षिस म्हणून. ती विकून तो चक्क यामाहा ची मोटर सायकल विकत घेतो. आहेस कुठे? Proud

अश्या स्पर्धांमधून लगेच बिझनेससाठी भांडवल उभं करण्याएवढा पैसा मिळतो का? काहीही काय!>> पैसा नाही, ऑर्डर्स!! जिंकल्यावर अर्चूला मिळालीये ना आता २०० ट्रे बनवायची ऑर्डर, तश्या..

हि सिरियल अजून चालूय्य्य्य्य्य्य्य्य. आई गग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग!!!

त्या चित्राचा सुकलेला चेहरा दिसतो का? अर्चू म्हणून जे काही पात्र उभं केलय ते खरेच "पात्र" आहे. अक्कल कमी, बडबड ज्यास्त.

दिवसेंदिवस मेघनाताई बाळसे धरतायेत....

(देवा, वाचव ह्या सर्वांना.) Proud

शुक्रवारी एक भाग एवढूसाच पाहिला....बाबाजी बायकोला हेल्थ चेकअप साठी घेवून जाण्याचा आग्रह करीत होते आणि ती तोंडपाडी त्याची बायको काय हो नको वैगरे करत होति मग ते धमकी देतात कि मेघांना फोन करू का आणि नेमका त्या सपाटीचा फोन येतो. Uhoh

अर्चू म्हणून जे काही पात्र उभं केलय ते खरेच "पात्र" आहे. अक्कल कमी, बडबड ज्यास्त.>> तो एक कॉमेडी सीन पाहिला होता .
त्या दोघे जणी मेदेला विचारत असतात , तुझ्या आइला जेवणात काय आवडत ?
किती ती ओढाताण

...

गोगा रागवले चिपोका ला काही म्हटले तर.

<<<<<< झंपी, करेक्शन प्लीझ. चिपोका रागावले चिपोला सपाटी म्हटले म्हणुन... Lol

काल अगदीच अति गोग्गोड चाललं होतं - काय तर आदित्य माईला म्हणे "पगार मिळाला की ते पैसे तुझ्याकडे दिल्याशिवाय आम्हाला चैनच पडत नाही." Uhoh
एकत्र कुटुंबाची इतकी महति गातायत, पण घरच्या महत्त्वाच्या जबाबदार्‍या आईबापावर सोडल्याने तरूण पिढी कधीच पूर्णपणे इण्डिपेन्डण्ट होऊ शकत नाही - हे कुणालाच दाखवावंसं वाटत नाही Angry (यातल्या तरूण पिढीलाही लागतातच हा.पा. नाना-माई)

काय तर आदित्य माईला म्हणे "पगार मिळाला की ते पैसे तुझ्याकडे दिल्याशिवाय आम्हाला चैनच पडत नाही." >>>> अजून पगार डायरेक्ट डिपॉसिट टू बँक नाहीये का ??! Wink

यातल्या तरूण पिढीलाही लागतातच हा.पा. नाना-माई >>> Proud

सध्या चालू काय आहे ? दाखवण्यासारखं सगळं दाखवून झालं ना आधीच ?

बहुदा हे दोघेही रोजंदारीवर काम करत असावेत. हल्ली फक्त तिकडेच दिवसाअखेरीस पगार रोख रकमेत दिला जातो.

Pages