उपवासाची पावभाजी

Submitted by कवठीचाफा on 10 July, 2014 - 17:57

साहित्य :
साबुदाणा- १ वाटी ( हा ४८ तास आधी भिजत घालायचा आहे )
रताळी- २
बटाटे -२
दुध - १/२ लिटर
मिरच्या - ५-६
तिखट - रंगापुरते
तूप - २ मोठे चमचे
लिंबु - १
मिठ - चविपुरते

सर्वप्रथम साबुदाणे ४८ तास आधी भिजत घाला, २४ तासाने ते काढून स्वच्छ कपड्यात गुंडाळून टांगून ठेवा.
प्रत्येकी १ रताळे व बटाटा यांचा किस करून बाजूला ठेवा. एका भांड्यात दुध घेऊन त्यात लिंबु पिळा, त्यानंतर मिरच्या बारीक चिरून घ्या.
एका मोठ्या भांड्यात तूप घालुन ते मंद आचेवर ठेवा, तुप तापल्यानंतर त्यात हलक्या हाताने दुध घाला, त्यात मघाशी टांगून ठेवलेले साबुदाणे थेट कपड्यातूनच टाका. आता थोडावेळ वाट पहा.
मिश्रण उकळू लागले की त्यात रंगापुरते तिखट आणि बारिक चिरलेल्या मिरच्या घाला.
चविपुरते मिठ घालून मिश्रण ढवळा.
आता गॅस बंद करून भाजी थंड होण्याची वाट पहा,

तयार झालेली भाजी ही केवळ दिसण्यानेच नाही तर वासानेही महा भयानक असल्यानं ती खाण्याची इच्छा होणारच नाही.
अश्यावेळी मघाशी बाजूला किस करून बाजूला ठेवलेले एक रताळे आणि एक बटाटा यांना खाऊन आपली उपवासाची वेळ मारून न्या.
रताळे व बटाटा मिळून भाजीच्या २५ % म्हणजेच पाव भागाच्या आसपास होत असल्यानं या भाजीला पावभाजी असे म्हंटलेले आहे. उगीच उपवासाचे पाव पाककृतीत शोधू नका. Proud

माहितीचा स्त्रोत : कुणी विचारू नका
लागणारा वेळ : फुकट जातो Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्यावेळी मघाशी बाजूला किस करून बाजूला ठेवलेले एक रताळे आणि एक बटाटा यांना खाऊन आपली उपवासाची वेळ मारून न्या.>>

लागणारा वेळः फुकट जातो>>

Rofl Rofl Rofl Rofl

एकादशीच्या दिवशी खाल्लेली पावभाजीवर लेख पाडलास की काय असे वाटले होते मला आधी. पण आल्यावर कळले 'लेख वाचायला लागणारा वेळ - फुकट जातो.' Wink

ह्या पा. कृ. ने केलेली साबूदाणा भाजी पायाखाली तुडवली तर चांगली "पाव"भाजी होईल Light 1 आणि तसे करणार्‍यास मात्र चांगला उपास घडेल आणि उगाच रताळी, बटाटे अश्या वीद्रूप भाज्यांना किस पण करायची गरज नाही Uhoh

<<<<सर्वप्रथम साबुदाणे ४८ तास आधी भिजत घाला, २४ तासाने ते काढून स्वच्छ कपड्यात गुंडाळून टांगून ठेवा.>>>>

तेव्हाच वाटलं काहीतरी गडबड आहे. Lol

दाण्याचं अर्धी वाटी कूट भांडंभर पाण्यात भिजवावं. त्यात काकडी किसून ते तुपावर परतून घ्यावं आणि पावभाजी तयार झाल्यावर त्यावर पेरावं. जमल्यास एरंडेलाचे चार-पाच थेंब सोडावे.

साबुदाणा- १ वाटी ( हा ४८ तास आधी भिजत घालायचा आहे )
हे वाक्य वाचून घाईघाईत साबुदाणा भिजत घातला. आता माझे नुकसान कोण भरून देणार?

:P:

Pages