साहित्य :
साबुदाणा- १ वाटी ( हा ४८ तास आधी भिजत घालायचा आहे )
रताळी- २
बटाटे -२
दुध - १/२ लिटर
मिरच्या - ५-६
तिखट - रंगापुरते
तूप - २ मोठे चमचे
लिंबु - १
मिठ - चविपुरते
सर्वप्रथम साबुदाणे ४८ तास आधी भिजत घाला, २४ तासाने ते काढून स्वच्छ कपड्यात गुंडाळून टांगून ठेवा.
प्रत्येकी १ रताळे व बटाटा यांचा किस करून बाजूला ठेवा. एका भांड्यात दुध घेऊन त्यात लिंबु पिळा, त्यानंतर मिरच्या बारीक चिरून घ्या.
एका मोठ्या भांड्यात तूप घालुन ते मंद आचेवर ठेवा, तुप तापल्यानंतर त्यात हलक्या हाताने दुध घाला, त्यात मघाशी टांगून ठेवलेले साबुदाणे थेट कपड्यातूनच टाका. आता थोडावेळ वाट पहा.
मिश्रण उकळू लागले की त्यात रंगापुरते तिखट आणि बारिक चिरलेल्या मिरच्या घाला.
चविपुरते मिठ घालून मिश्रण ढवळा.
आता गॅस बंद करून भाजी थंड होण्याची वाट पहा,
तयार झालेली भाजी ही केवळ दिसण्यानेच नाही तर वासानेही महा भयानक असल्यानं ती खाण्याची इच्छा होणारच नाही.
अश्यावेळी मघाशी बाजूला किस करून बाजूला ठेवलेले एक रताळे आणि एक बटाटा यांना खाऊन आपली उपवासाची वेळ मारून न्या.
रताळे व बटाटा मिळून भाजीच्या २५ % म्हणजेच पाव भागाच्या आसपास होत असल्यानं या भाजीला पावभाजी असे म्हंटलेले आहे. उगीच उपवासाचे पाव पाककृतीत शोधू नका.
माहितीचा स्त्रोत : कुणी विचारू नका
लागणारा वेळ : फुकट जातो
पाकक्रूती आवडली. करुन
पाकक्रूती आवडली. करुन पहाण्यात येइल. फोटोपण टाकायचे ना?
कच्या मी खूर्चीतुन खाली पडले
कच्या
मी खूर्चीतुन खाली पडले हसुन हसुन
अश्यावेळी मघाशी बाजूला किस
अश्यावेळी मघाशी बाजूला किस करून बाजूला ठेवलेले एक रताळे आणि एक बटाटा यांना खाऊन आपली उपवासाची वेळ मारून न्या.>>
लागणारा वेळः फुकट जातो>>
धन्यवाद आपापल्या जबाबदारीवर
धन्यवाद
आपापल्या जबाबदारीवर पाकृ करून पहावी, बटाटे धुतल्याशिवाय किस करू नका.. माती लागते
शी बाबा किती seriously वाचत
शी बाबा किती seriously वाचत होते मी .......काहीपण .....
लागणारा वेळ : फुकट जातो >>>
लागणारा वेळ : फुकट जातो >>>
बटाटे धुतल्याशिवाय किस करू नका.. माती लागते >>>
एकादशीच्या दिवशी खाल्लेली
एकादशीच्या दिवशी खाल्लेली पावभाजीवर लेख पाडलास की काय असे वाटले होते मला आधी. पण आल्यावर कळले 'लेख वाचायला लागणारा वेळ - फुकट जातो.'
कवठीचाफा आणि कथा विभाग इतकं
कवठीचाफा आणि कथा विभाग इतकं पाहून इथे आले आणि फसले! >>>>> सेम हिअर....
बाकी रेसिपी
'दुधात लिंबू पिळा'पर्यंत
'दुधात लिंबू पिळा'पर्यंत इमानदारीत वाचत होते. तिथे प्रथम शंका आली.
ह्या पा. कृ. ने केलेली
ह्या पा. कृ. ने केलेली साबूदाणा भाजी पायाखाली तुडवली तर चांगली "पाव"भाजी होईल
आणि तसे करणार्यास मात्र चांगला उपास घडेल आणि उगाच रताळी, बटाटे अश्या वीद्रूप भाज्यांना किस पण करायची गरज नाही 
मस्तच :D:D!!!
मस्तच :D:D:D!!!
सह्हिए!!!
सह्हिए!!!
(No subject)
<<<<सर्वप्रथम साबुदाणे ४८ तास
<<<<सर्वप्रथम साबुदाणे ४८ तास आधी भिजत घाला, २४ तासाने ते काढून स्वच्छ कपड्यात गुंडाळून टांगून ठेवा.>>>>
तेव्हाच वाटलं काहीतरी गडबड आहे.
दाण्याचं अर्धी वाटी कूट
दाण्याचं अर्धी वाटी कूट भांडंभर पाण्यात भिजवावं. त्यात काकडी किसून ते तुपावर परतून घ्यावं आणि पावभाजी तयार झाल्यावर त्यावर पेरावं. जमल्यास एरंडेलाचे चार-पाच थेंब सोडावे.
अश्या भन्नाट रेसिपीचे फोटो
अश्या भन्नाट रेसिपीचे फोटो मस्ट.... पाकॄचे आणि पाकॄ बघणार्याचे
अरारारा!
अरारारा!
जबरदस्त
जबरदस्त
साबुदाणा- १ वाटी ( हा ४८ तास
साबुदाणा- १ वाटी ( हा ४८ तास आधी भिजत घालायचा आहे )
हे वाक्य वाचून घाईघाईत साबुदाणा भिजत घातला. आता माझे नुकसान कोण भरून देणार?
४८ तास वाट बघा.
४८ तास वाट बघा.:खोखो:
गूढ आहे. वाचताना भय वाटले.
गूढ आहे. वाचताना भय वाटले. अतिशय भयानक कथा आहे. उपवासाचे पाव वाचताना पाय लटलट कापत होते.
ही पावभाजी व्हॉट्सॅप वरही
ही पावभाजी व्हॉट्सॅप वरही गाजते आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
:
:P:
(No subject)
मेल्या, किती आशेने आले होते
मेल्या, किती आशेने आले होते कृती वाचयला.
आज संकष्टी म्हणून कृती वाचली
आज संकष्टी म्हणून कृती वाचली तर......
आणि मी धागा आत्ता पाहिला तर
आणि मी धागा आत्ता पाहिला तर म्हटलं पुढच्या उपवासाला उपयोग होईल तर..
(No subject)
Pages