उपवासाची पावभाजी

Submitted by कवठीचाफा on 10 July, 2014 - 17:57

साहित्य :
साबुदाणा- १ वाटी ( हा ४८ तास आधी भिजत घालायचा आहे )
रताळी- २
बटाटे -२
दुध - १/२ लिटर
मिरच्या - ५-६
तिखट - रंगापुरते
तूप - २ मोठे चमचे
लिंबु - १
मिठ - चविपुरते

सर्वप्रथम साबुदाणे ४८ तास आधी भिजत घाला, २४ तासाने ते काढून स्वच्छ कपड्यात गुंडाळून टांगून ठेवा.
प्रत्येकी १ रताळे व बटाटा यांचा किस करून बाजूला ठेवा. एका भांड्यात दुध घेऊन त्यात लिंबु पिळा, त्यानंतर मिरच्या बारीक चिरून घ्या.
एका मोठ्या भांड्यात तूप घालुन ते मंद आचेवर ठेवा, तुप तापल्यानंतर त्यात हलक्या हाताने दुध घाला, त्यात मघाशी टांगून ठेवलेले साबुदाणे थेट कपड्यातूनच टाका. आता थोडावेळ वाट पहा.
मिश्रण उकळू लागले की त्यात रंगापुरते तिखट आणि बारिक चिरलेल्या मिरच्या घाला.
चविपुरते मिठ घालून मिश्रण ढवळा.
आता गॅस बंद करून भाजी थंड होण्याची वाट पहा,

तयार झालेली भाजी ही केवळ दिसण्यानेच नाही तर वासानेही महा भयानक असल्यानं ती खाण्याची इच्छा होणारच नाही.
अश्यावेळी मघाशी बाजूला किस करून बाजूला ठेवलेले एक रताळे आणि एक बटाटा यांना खाऊन आपली उपवासाची वेळ मारून न्या.
रताळे व बटाटा मिळून भाजीच्या २५ % म्हणजेच पाव भागाच्या आसपास होत असल्यानं या भाजीला पावभाजी असे म्हंटलेले आहे. उगीच उपवासाचे पाव पाककृतीत शोधू नका. Proud

माहितीचा स्त्रोत : कुणी विचारू नका
लागणारा वेळ : फुकट जातो Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रताळे व बटाटा मिळून भाजीच्या २५ % म्हणजेच पाव भागाच्या आसपास होत असल्यानं या भाजीला पावभाजी असे म्हंटलेले आहे. उगीच उपवासाचे पाव पाककृतीत शोधू नका. फिदीफिदी >>> !!! बेस्ट!!!

Proud Lol Wink
LOL

पाव भाजी Proud
मला वाटलं शिंगाड्याच्या पिठाचे पाव करायचेत की काय आता Biggrin

पाऊलखुणा भारीयेत Proud

Rofl कादंबरी Lol

भन्नाट पाकृ.. अजिबात करणार नाही.. टांगुन ठेवलेले (पर्यायाने मेलेले) साबुदाणे उपासाला चालणार नाही

Rofl

रताळे व बटाटा मिळून भाजीच्या २५ % म्हणजेच पाव भागाच्या आसपास होत असल्यानं या भाजीला पावभाजी असे म्हंटलेले आहे. उगीच उपवासाचे पाव पाककृतीत शोधू नका.>>> हे भारीये! Lol

कवठीचाफा, पाकृ, आणि कथा विभाग, ह्यावरुन काहीतरी धमाल असणार हा अंदाज आला होता.
कवठी एकदाशीला केली होतीस काय ही पाकृ?

Pages