केंद्रीय अर्थसंकल्प २०१४-१५

Submitted by भरत. on 10 July, 2014 - 02:25

Finance Minister asking for a break during the budget speech? Don't remember having seen that before.
Why is inclusion of gender sensitivity lessons in school curriculum part of budget speech?
Isn't there an honourable independent HRD Minister of cabinet rank? Or there isn't one?

http://www.firstpost.com/budget-2014/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गृहकर्जाची वजावट २ केली आहे?
कशाला?
अजुन घरं महाग व्हायला.

त्यापेक्षा लोकांना बचतीची सवय म्हणुन ८० सी ची मर्यादा १ लाखाची दिड केलेली तीच २ लाख केली असती तर जास्त बरं झालं असतं.

८० सी नुसार गुंतवणुकीवरील कर सवलत वाढवून दीड लाख केली

अडीच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त

आणी नवीन दर पाहण्यासाठी ही लिंक पहा

झकासराव, गृहक्षेत्रामध्ये मंदी आहे. त्यासाठी केलेली उपाययोजना आहे. घर स्वस्त होण्यासाठी बिल्डरांवर चाप लावावा लागेल Wink

विकसित गुजरात राज्याकडे २०० कोटी नाहीत पुतळा बांधण्यासाठी. केंद्राकडून कशाला चोरायचे. मोदीने स्वतःची जाहिरात तर खूप करून घेतली होती.

पुतळा बांधण्यासाठी>> हा मुद्दा मला पटला नाही. आय मीन पुतळा बांधण्याचा.
उद्या महाराष्ट्रात युती सरकार आलं की त्यांना अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायला पैसे द्यावे लागतील. (अर्थात आताच्या सरकारची देखील अशी पुतळा बांधण्याची योजना आहेच की. ते ही हात पसरतील)
मग हळुहळु सगळीच राज्ये आपापली अस्मिता घेवुन त्याचे पुतळे उभे करुयात म्हणतील.

झकासराव
मला म्हणायचं आहे कि एव्हढा मोठा विकास झालेल्या गुजरातकडे पैसे नाहीत.
जवळपास २००० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट आहे. म्हणजे चालू केला तेंव्हा मोदिनी पैसे कुठून येणार याचा नक्कीच विचार करून तेव्हढी तजवीज केली असणार. भविष्यात केंद्रामध्ये माझे सरकार येणार आणि नंतर तिथून पैश्यांची उसनवारी करू, अस म्हणून तर प्रोजेक्ट चालू केला नसणारच.

भविष्यात केंद्रामध्ये माझे सरकार येणार आणि नंतर तिथून पैश्यांची उसनवारी करू, अस म्हणून तर प्रोजेक्ट चालू केला नसणारच. >>सूटू, गुजराथी माणूस आपल्या पैश्यावर कधिच धंदा नाही करत. Happy

मुळात पुतळ्यांवर एवढे पैसे खर्च करणं योग्य आहे का हा मुद्दा आहे. का त्या स्मारकामुळे ते tourist attraction होईल आणि त्यातून रेव्हेन्यू जमेल हा गुजरात सरकारचा विचार आहे?

वर्षातून मी एकच पुस्तक वाचतो, ते म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प.
झलक पाहिली. फील गुड आहे.
फ्री झाल्यानंतर बारकावे पाहू.

८० वर्षांवरील नागरिकांसाठी करातील सूट पाच लाख ठेवली आहे का त्यात बदल आहेत ? वरच्या लिंकमधे तसा काही उल्लेख दिसला नाही.

जिथे काही म्हटले नाही तिथे बदल नाहीत असेच समजायचे.
गेल्या वर्षीपासून स्त्री-पुरुष दोघांसाठी आयकराचे दर व उत्पन्नमर्यादा समान आहेत.

नवीन १०० स्मार्ट शहरे ()वसवण्याच्या योजनेचा परिणाम तेवढा आजच्या सेन्सेक्सवर राहिलेला दिसतो.
निफ्टीमध्ये सर्वाधिक वधारलेला शेयर डीएलएफचा. (९ टक्क्यांनी). याचा अर्थ बिल्डरों के लिए तसेच राज्यांमध्ये नगरविकास खाते हाताळणार्‍या मंत्र्यांसाठी अच्छे दिन आ गए हैं| याला मोदींचा पेट प्रोजेक्ट म्हणायला हरकत नाही. त्यांचा टारगेट ऑडियन्स नवश्रीमंत आणि नवमध्यमवर्ग आहे.

अजून परिस्थितीचा पूर्ण अंदाज आलेला नसल्याने रिफॉर्म्स (नीतिविषयक सुधारणा) केल्या नाहीत असे टीव्ही चर्चेतले एक्स्पर्ट्स म्हणताहेत.
परदेशी गुंतवणुकदारांचे मार्ग सुकर करण्याची पावले उचलली आहेत.

चीकू | 10 July, 2014 - 18:47 नवीन

मुळात पुतळ्यांवर एवढे पैसे खर्च करणं योग्य आहे का हा मुद्दा आहे. का त्या स्मारकामुळे ते tourist attraction होईल आणि त्यातून रेव्हेन्यू जमेल हा गुजरात सरकारचा विचार आहे?
<<
माफ करा. एक शंका.

वल्लभभाई पटेलांचा पुतळा हे टूरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन होवून त्यास पहाण्यासाठी तिकीट ठेवून २०० कोटी रुपये कमवायला किती दिवस लागतील?

अजून एक,
हा अर्थसंकल्प गुजरात सरकारचा नसून, भारताच्या केंद्र सरकारचा आहे.

यावर्षाचं बजेट नक्कि काय आहे? सोगा म्हणतात युपीएच्या बजेटची कॉपी आहे तर रागा म्हणतात देशाचा विकास मंदावणारा अर्थसंकल्प...

म्हणजे गेल्या वर्षाचं युपीएचं बजेट विकास मंदावणारं होतं कि तेच बजेट आता एन्डिएने सादर केलंय म्हणुन विकास मंदावणारं झालंय? जाणकारांनी खुलासा करावा... Happy

रागा म्हणतात देशाचा विकास मंदावणारा अर्थसंकल्प... >>>> राज, अरे रागा स्वतःच्या मंदावलेल्या बुध्दीला अनुसरुन बोलला रे.

म्हणजे गेल्या वर्षाचं युपीएचं बजेट विकास मंदावणारं होतं कि तेच बजेट आता एन्डिएने सादर केलंय म्हणुन विकास मंदावणारं झालंय?
<<
यू मीन भाजपाने सेम टू सेम काँग्रेसचे बजेट मांडले?

अरेरे!

अन स्पार्टाकसांची टिप्पणी = इनमें वो राष्ट्रहित वाली बात न थी Wink

खिक्क!

अहो, आतातरी सोडा की त्याला बिचार्‍याला. आलंय मोदी सरकार. बजेट काय म्हणतंय त्याबद्दल बोलू आपण. राहुल गांधींना फाट्यावर मारा की!

८० वर्षांवरील नागरिकांसाठी करातील सूट पाच लाख ठेवली आहे का त्यात बदल आहेत ? वरच्या लिंकमधे तसा काही उल्लेख दिसला नाही.

नाही. ८० वर्षांवरील नागरिकांसाठी काही बदल नाही.

<<गृहकर्जाची वजावट २ केली आहे?
कशाला?
अजुन घरं महाग व्हायला.>>>

तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण २ लाख म्हणजे साधारणतः २० लाखाचे कर्ज. तितके असतेच.

गेल्या अर्थसंकल्पात २५ लाखाच्या आतल्या गृह कर्जावर १ लाखाची अधिक वजावट दिली होती. ती काढुन घेतली असेल तर २ लाखाच्या वजावटीच्या तरतुदिने फार फरक पडणार नाही.

मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली

लोकसभेतील 'डुलकी'मुळे सत्ताधाऱ्यांच्या हातात आयतं कोलीत देणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज मात्र सभागृहात ताजेतवाने दिसले. एरव्ही मागच्या बाकावर बसण्यात धन्यता मानणारे राहुलबाबा आज पुढच्या रांगेत सोनिया गांधी यांच्या बाजूला बसले होते. सोनियांच्या सांगण्यावरूनच राहुल यांनी आपली जागा बदलल्याचे सांगण्यात येत आहे.>>>

हि आई पण ना, नसती कटकटी लावते मागे. Happy

पण मुळात एवढा खर्च करून पुतळे बनवायची काय गरज? ज्यांच्या पुतळ्यावर एवढे खर्च करताय ते तुमच्याशी बोलू शकत असते तर त्यांनी ह्याला परवानगी दिली असती का?

पुतळे बनवण्यात पैसे वाया घालवणार्‍यांचा निषेध. पुतळा कोणाचाही असो.

पुतळ्याचे २०० कोटी सोडले तर ओव्हरऑल बजेट चांगले आहे असे दिसते ( प्रतिक्रियांवरुन ) दै. सकाळ ने सुध्दा चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉउन्सील नावाच मंडळ मनोहारी सिंगांच्या काळात स्थापन झाल होत. त्याला गेले जवळ जवळ ४-५ वर्षे १००० कोटी दरवर्शी पुरवण्यात आले. ( तरतुद होती )

याने किती ट्रेनिंग मिळाल याचा लेखा जोखा कुठे पहायला मिळेल ? याच भवितव्य आता काय असेल ?

विमा क्षेत्रातील एफडीआयची मर्यादा २६% वरून ४९% करण्याचे संकेत अर्थसंकल्पाने दिले आहेत.
२००४ साली याबद्दल भाजपची भूमिका काय होती? अर्थातच विरोध होता.

Pages