तूप १ चमचा
दलिया १ वाटी
मीठ , पाणी.
फोडणीसाठी : १ चमचा तेल, मोहरी, जिरे, १ मिरची , ४ पाकळ्या लसुण , ४ पाने कढीपत्ता.
इतर साहित्य : एक वाटी दही , बारीक चिरलेला कांदा, शिजवलेले मिश्र मोड
एक वाटी दलिया पाण्यात धुवुन निथळुन घ्यावा.
एक चमचा तूप घेऊन त्यात तो दलिया परतावा. त्याचा रंग बदलून सुगन्ध येईल इतपत परतावा.
मग त्यात लागेल तितके पाणी आणि मीठ घालून मऊसर शिजवुन घ्यावा.
मग फोडणीचे साहित्य वापरुन फोडणी करावी.
शिजलेला दलिया, दही , कांदा आणि फोडणी मिसळुन घ्यावे.
दही दलिया तयार.
सोबत शिजवलेले मिश्र मोड घेतले होते. मोड , एक चमचा तेल, मीठ आणि हळद इतकेच घालून थोड्याश्याच पाण्यात शिजवले होते.
दलिया दही मोड हे अगदी पूर्णान्न आहे. मधुमेही रुग्णाना अगदी योग्य आहे. हाय प्रोटीन हाय फायबर आहे. सध्या रात्री पोटभर दलियाच घेतो. दलिया खिचडी आणि दलिया खीर घेतो. हा प्रकार आजच केला. तीन वर्शाच्या माझ्या मुलीलाही हे सगळे प्रकार आवडले आहेत.
(No subject)
दलिया़ काय अहे
दलिया़ काय अहे
छान दिसतय!
छान दिसतय!
दलिया= गव्हाचा जाडा रवा
दलिया= गव्हाचा जाडा रवा
दलियाला अमेरिकेत ब्रोकन.
दलियाला अमेरिकेत ब्रोकन. व्हीट. म्हणतात.
ओ ़ के टेस्टी दिसतय करुन
ओ ़ के टेस्टी दिसतय करुन बघणार
ब्रोकन व्हीट मिळतं इथे. ट्राय
ब्रोकन व्हीट मिळतं इथे. ट्राय करून बघायला हवं. आणखीन जे काही प्रकार करत असाल त्या रेसिपीही द्या इथे प्लीज.
लगो रेसिपी आवडली, सहज करता
लगो रेसिपी आवडली, सहज करता येण्यासारखी आणि पौष्टिक
लई टेस्टी लागतय.
लई टेस्टी लागतय.
डाळ तांदळाची खिचडी करतो अगदी
डाळ तांदळाची खिचडी करतो अगदी तशीच डाळ दलिया खिचडी करता येत. आम्ही मुग डाळ दलिया सम प्रमाणात घेतो. दोन्ही भिजवुन तुपात भाजुन घ्यायचे. मग फोडणी करुन त्यात ते घालुन पाणी घालुन शिजवायचे.
दलिया खीर करतानाही आधी पाण्यात भिजवुन मग तुपात भाजुन घेतो. मग दुध साखर / गूळ घालुन शिजवायचे. गूळ अगदी कमी घातला तरी छान चव येते.
दलिया मीठ साखर मसाले वगैरे छान शोषुन घेतो. त्यामुळे गोड तिखट कसलाही पदार्थ केला तरीतो छान लागतो. पाणचट लागत नाही.
http://www.hindustantimes.com/brunch/brunch-stories/beat-diabetes-at-its...
दलिया आता एक वेळचं स्टॅपल डाएट बनवलं आहे. शुगर कंट्रोलमध्ये आहे.
मस्त! माझ्या कंफर्ट फूड आणि
मस्त! माझ्या कंफर्ट फूड आणि वन डीशमीलमध्ये मोडतं दलिया.
याचा लेमन पुलावही मस्त होतो.
छान वजन घटेल का या डिशने
छान वजन घटेल का या डिशने ? फोटोहि मस्त आलेत.
हो. गुगलवर पहा. रामदेवबाबानी
हो. गुगलवर पहा.
रामदेवबाबानी मिश्र धान्याचा दलिया सांगितला आहे.
http://www.bimbima.com/health/post/2012/01/03/homemade-natural-remedies-...
दलिया मेरा नाम दलिया मेरा नाम
हिंदु मुस्लिम सिख्ख इसाइ सबको मेरा सलाम.
चला, रामदेवबाबानी मिश्र
चला, रामदेवबाबानी मिश्र धान्याचा दलिया लक्ष्मी गोडबोले यांना चालतो हे वाचुन आनंद वाटला.
सध्या बार्ली दलिया, बाजरी
सध्या बार्ली दलिया, बाजरी दलिया आणलेले आहे. त्याचे प्रयोग चालू आहेत.
दोन्ही दलियाचा उपमा मस्त होतो (एकत्र किंवा वेगवेगळाही). मात्र शिजवायसाठी रव्यापेक्षा पाणी जास्त आणि कुकरला लावून २ शिट्ट्या मस्ट.
मात्र गरम गरम असतानाच खायला चांगला लागतो. गार झाल्यावर चव गायब होते असा अनुभव आहे.
लक्ष्मि गोडबोल फक्त त्यांच्या
लक्ष्मि गोडबोल फक्त त्यांच्या स्वता:च्या धाग्या पुरत्याच "गोड"बोले आहेत,
अन्यत्र त्यांच्या "कडू बोलां" चाच बोल बाला आहे.
छानच लागतो हा प्रकार...
छानच लागतो हा प्रकार... आठवड्यातुन ३, ४ वेळा रात्रीचे जेवण स्कीप करुन हेच करते सोबत काकडी/ किंवा मिक्स भाज्यांचे दही घालुन रायते...
पण गव्हाचा दलिया म्हणजे
पण गव्हाचा दलिया म्हणजे ब्राउन दिसायला हवा ना, लापशी आणि दलीयात फरक असतो का
++++हिंदु मुस्लिम सिख्ख इसाइ
++++हिंदु मुस्लिम सिख्ख इसाइ सबको मेरा सलाम.++++
काय लगो पार्टी बदलली काय,
हिंदुची कत्तल केलेल्या मुघलांचा विजयाचा आनंद मानणार्या माणसाने हिंदु ना सलाम ठोकावा,
कुछ हजम न ही हुआ !!
"दलिया" की रेसिपी द्यायच्या ऐवजी "बीफ हलीम" वैगेरे ची रेसीपी द्या ते तुमच्या तब्येतीला सुट होईल !!
दलियाला मराठीत आपण कण्या
दलियाला मराठीत आपण कण्या म्हणतो.उदा.ज्वारीच्या कण्या(ताक कण्या अहाहा ),गव्हाच्या कण्या,बाजरी वगैरे.जाते असेल घरी तर मस्त कण्या तयार करता येतात.सुजी गव्हाच्या कण्या ब्राऊनीश असतात.लापशी म्हणजे थेट गहूच असतो.तुकडे केलेला.
हायला, कत्तल केली म्हणुन
हायला, कत्तल केली म्हणुन करणार्याने शाकाहारी काही खाउच नये का?
तुमच्या महाभारत युद्धातही दोन्ही पक्षांनी एकमेकांची कत्तल केली होती.
युद्ध म्हटलं की कत्तल व्हायचीच की !
असो. रमजानच्या महिन्यात आमच्या धाग्यावर ब्राह्मण जेवायला आला, हे पाहुन आमचे मन उचंबळुन येत आहे. जोशीबुवा ! खुदा आपको खुश रखे.
हायला खरच की तुम्ही बायमाणुस
हायला खरच की तुम्ही बायमाणुस हाय ......
बायमाणुस? बृहन्नडे , माझा
बायमाणुस? बृहन्नडे , माझा प्रोफाइल नीट वाच .
प्रोफायल बघीतल .... तुला
प्रोफायल बघीतल .... तुला कोपरापासुन .....
आता कळलं फॅबइंडीयामधे मिश्र
आता कळलं फॅबइंडीयामधे मिश्र दलिया का मिळतो ते
वेगवेगळ्या डाळी आणि गव्हाचा असतो.
पण थंडीच्या दिवसांमधे मीही बरेच वेळा दुपारी जेवणात विविध भाज्या घालून शिजवलेला थोडा सरसरीत दलिया, वरून थोडीशी तूपजिर्याची फोडणी आणि लिंबू पिळून असं खाते.
पण अर्जुना, मला ही कुशंका
पण अर्जुना, मला ही कुशंका अद्यापही सतावत आहेच!! लगो हे भीम अथवा बल्लव असावेत
लगो, तुम्ही दलिया खिचडी करता
लगो, तुम्ही दलिया खिचडी करता तशी मी मिक्स डाळी (हिरवी, पिवळी मूगडाळ, मसूर डाळ) आणि किन्वा यांची खिचडी करते.
बाकीचे प्रकार ट्राय करेन. इथे मिक्स डाळींचा दलिया मिळतो का हे बघायला हवं.
सायो, मिक्स दलिया कुठल्याही
सायो, मिक्स दलिया कुठल्याही पतांजली मधे मिळते आणि अप्रतिम लागते....
लगो, पदार्थ एकदम झ्याक दिसतोय
लगो, पदार्थ एकदम झ्याक दिसतोय बघा.
शिजलेला दलिया, दही , कांदा आणि फोडणी मिसळुन घ्यावे.>>>> हे कस करायच म्हणजे फोडणी दही दलियावर टाकून वरून द्यायची कि कसे आणि कांदा कच्चाच ठेवायचा का?
माझा हा प्रॉब्लेम आहे, की
माझा हा प्रॉब्लेम आहे, की दलिया थंड झाला की चांगली चव लागत नाही. घरी वेगवेगळ्या आकारमानाचा लापशी रवा आहे. पण काही करायची हिंमतच होत नाही. नेहमी चव बिघडते.
दलियाच्या अजून काही चाम्गल्या रेसिपीज द्या ना.
Pages