Submitted by सायु on 23 June, 2014 - 14:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मुळे = ४ (मध्यम)
हिरवी मिरची: १ बारिक चिरलेली...
धणे पुड = १ चमचा (चहाचा}
शोप = १/२ चमचा (चहाचा)
बेसन पीठ = २ चमचे (चहाचे)
लिंबु = १
कणिक = दिड ते दोन वाट्या
मिठ, जिरं,हळद्,ति़खट, तेल अंदाजे...
क्रमवार पाककृती:
प्रथम मुळा सोलुन किसुन घ्यायचा... कढईत दोन चमचे तेल घाला, तापले की,जिर घाला, आता १/२ चमचा शोप घाला, ह्ळद, ति़खट घालुन लगेच मुळ्याचा किस घाला . बारिक चिरलेली मिर्ची घाला. चांगले परतवुन घ्या.धणे पुड ,मिठ आणि लिंबाचा रस घाला. झाकण ठेवुन एक वाफ काढा... दोन चमचे डाळीचे पीठ पेरा, परत वाफ काढा..थंड झाले की लिंबा एवढे गोळे करायचे.
आता कणकेत मिठ घालुन पराठ्याला भिजवतो तशी भिजवायची. पुरणाच्या पोळ्या /आलु परठ्या प्रमाणेच
हे पराठे करायचे...
वाढणी/प्रमाण:
१० ते १२ पराठे होतात, ३. ४ जण
अधिक टिपा:
पराठे पुरी पेक्षा थोडे मोठे आणि चपाती पेक्षा लाहान करावेत. टमाटो च्या चटणी आणि गोड दह्या सोबत
मस्त लागतात...
माहितीचा स्रोत:
जिवलग मैत्रिण, नमिता व्यास
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिल्लीचा प्रकार ना हा, मी पण
दिल्लीचा प्रकार ना हा, मी पण ( मुळा इथे मिळाला तर ) असेच करतो. छानच लागतात.
वेगळी कृती. धणेपूड कधी
वेगळी कृती. धणेपूड कधी घालायची?
उत्तर भारतात जे मुळ्याचे
उत्तर भारतात जे मुळ्याचे पराठे करतात त्यात मुळा शिजवत नाहीत.
मुळा किसून मीठ घालून ठेवतात. मग 10 मिनिटाने पाणी सुटत. मुळा पिळून सगळं पाणी काढून टाकायच. (मुळ्यात पाणी असाल की लाटतांना त्रास्स होतो.) मग त्यात बारीक चिरलेली मिरची, बा. चि. कोथिंबीर, ओवा आणि आल्याचा कीस घालायचा. आणि हे मिश्रण कणकेच्या पारित घालून पराठे लाटायचे.
फक्त त्या दिवशी ऑफिसला जायचे नाही......
धन्यवाद सगळ्यांचे..दा,
धन्यवाद सगळ्यांचे..दा, दिल्लीत पराठा गली फेमस आहे ना!
अरुंधती, मुळ्याचा किस घातला धणे पुड घालायची...
सायली, फोटो सुंदर..
सायली, फोटो सुंदर..
सायली, मस्त वेगळी पा.कृ. फोटो
सायली, मस्त वेगळी पा.कृ. फोटो पण छान आहे.
सायली, पाकृ आणि फोटो दोन्ही
सायली, पाकृ आणि फोटो दोन्ही मस्त. करायला पाहिजेत ग !!
धन्यवाद, स्नू, आरती, हेमा
धन्यवाद, स्नू, आरती, हेमा ताई... नक्की करुन पहा....
apratim pak kruti....
apratim pak kruti....
सायली छान पाकृ.
सायली छान पाकृ.
धन्यवाद अंशा..
धन्यवाद अंशा..
सायलीताई, सॉल्लिड दिसतेय
सायलीताई, सॉल्लिड दिसतेय पा़ककृती. फोटोतील एक पराठा लगेच उचलुन खावासा वाटतोय.
धन्यवाद नरेश ...
धन्यवाद नरेश :)...