मुली की पुडी (मुळ्याचे पराठे, फोटो सहित)

Submitted by सायु on 23 June, 2014 - 14:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मुळे = ४ (मध्यम)
हिरवी मिरची: १ बारिक चिरलेली...
धणे पुड = १ चमचा (चहाचा}
शोप = १/२ चमचा (चहाचा)
बेसन पीठ = २ चमचे (चहाचे)
लिंबु = १
कणिक = दिड ते दोन वाट्या
मिठ, जिरं,हळद्,ति़खट, तेल अंदाजे...

क्रमवार पाककृती: 

प्रथम मुळा सोलुन किसुन घ्यायचा... कढईत दोन चमचे तेल घाला, तापले की,जिर घाला, आता १/२ चमचा शोप घाला, ह्ळद, ति़खट घालुन लगेच मुळ्याचा किस घाला . बारिक चिरलेली मिर्ची घाला. चांगले परतवुन घ्या.धणे पुड ,मिठ आणि लिंबाचा रस घाला. झाकण ठेवुन एक वाफ काढा... दोन चमचे डाळीचे पीठ पेरा, परत वाफ काढा..थंड झाले की लिंबा एवढे गोळे करायचे.

आता कणकेत मिठ घालुन पराठ्याला भिजवतो तशी भिजवायची. पुरणाच्या पोळ्या /आलु परठ्या प्रमाणेच
हे पराठे करायचे...

वाढणी/प्रमाण: 
१० ते १२ पराठे होतात, ३. ४ जण
अधिक टिपा: 

पराठे पुरी पेक्षा थोडे मोठे आणि चपाती पेक्षा लाहान करावेत. टमाटो च्या चटणी आणि गोड दह्या सोबत
मस्त लागतात...

माहितीचा स्रोत: 
जिवलग मैत्रिण, नमिता व्यास
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तर भारतात जे मुळ्याचे पराठे करतात त्यात मुळा शिजवत नाहीत.
मुळा किसून मीठ घालून ठेवतात. मग 10 मिनिटाने पाणी सुटत. मुळा पिळून सगळं पाणी काढून टाकायच. (मुळ्यात पाणी असाल की लाटतांना त्रास्स होतो.) मग त्यात बारीक चिरलेली मिरची, बा. चि. कोथिंबीर, ओवा आणि आल्याचा कीस घालायचा. आणि हे मिश्रण कणकेच्या पारित घालून पराठे लाटायचे.

फक्त त्या दिवशी ऑफिसला जायचे नाही...... Biggrin

sayali_0.jpg

धन्यवाद सगळ्यांचे..दा, दिल्लीत पराठा गली फेमस आहे ना!
अरुंधती, मुळ्याचा किस घातला धणे पुड घालायची...