गुरगुट्या भातु....

Submitted by पुरंदरे शशांक on 16 June, 2014 - 23:17

गुरगुट्या भातु....

गर्रम गर्रम
गुरगुट्या भातु
त्यावर थोडी
आमटीऽ ओतू

लोणकढं तूप
पहा तुम्चं रुप

लोणच्याचा खार
जिभलुला धार

खातंय कोण मुटुमुटु
पाऽर सगळं चाटु पुसु

डोळे आता मिटुमिटु
खेळु नंतर लुटुपुटु ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ! मस्त! आम्हाला या वयात पण आवडतो बरका गुरगुट्या भातु आणी त्याच्यावर मेतकुट आणी साजूक तुप.:फिदी:

शशान्क कविता तुफान आवडली.:स्मित:

कित्ती गोडु गोडु.... Happy आमच्याकडेही एक अगदी गोडुलं बाळ आहे.... आता आम्हीपण गाणार Happy