अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपवर लोक चिडले होते (अजूनही बरेच लोक विरोधात आहेत) हे खरं आहे. पण जसजसा भाजपा फेरनिवडणूकीला उशिर करतोय तसतसा लोक परत आपला समर्थन द्यायला सुरवात करत आहेत. त्यात महागाई तितकीच आहे अजून. केंद्रात सरकार बदललं की लगेच किमती कमी होतिल / महागाई कमी होईल असं नाही हे जरी खरं असलं तरी निवडणूकीमध्ये महागाईचा मुद्दा होता. गेल्या महिन्याभरात भाज्या कै च्या कै महागल्यात. बहूतांशी भाज्या ६० रु किलो किंवा जास्त किमतीने विकल्या जात आहेत. (खरंतर दरवर्षी उन्हाळ्यात /जुन-जुलै मध्ये भाज्या बर्‍यापैकी महाग होतच असतात. पण लोकांना सामान्य लोकांना ते आठवत नसतं ना.) Happy

गेल्या निवडणूकीच्या (विधानसभेच्या) वेळी आपला एखादं-दुसरी सीट्च मिळेल असं वाटलं होतं मला. पण अंदाज सपशेल चुकला.लोकसभेत मात्र त्यांना सिट मिळणार नाही याची खात्री होती. आता परत लगेच निवडणूका झाल्या तर आपला बहूमत मिळणार नाही. त्याचप्रमाणे भाजपाला ही बहूमत मिळायची खात्री नाहीये.

त्रांगडं झालंय दिल्लीचं अगदी. Happy

अल्पना, तुझ्या एखाद्या पोस्टची वाट पहात होते. पण तुझी पोस्ट येईलच अशी खात्रीही नव्हती. आली तरी सेन्सिबल असेल ही खात्री होतीच Happy

इकडे मुंबईत २० रुपये पाव किलो अश्या भाज्या आहेत Sad

Happy

अगं इथे हल्ली सगळे (आपसमर्थक, काँग्रेस समर्थक आणि भाजपा समर्थक सगळेच) खूप जास्त चिखलफेक करतात. त्यामूळे शक्यतो प्रतिक्रिया द्यायची इच्छा होत नाही.

<<बरोबर आहे. हे म्हणजे आमच्या लोकांनी चोरी केली तरी अंतर्गत लोकपाल, अंतर्गत चौ़कशी - जज, वकील, पट्टेवाला सगळंच आपचं. मग असली वाक्य उगम पावतात.>>

लुक हु इज टॉकिंग ! मुकुल रोहतगी, अमित शहा, उदय ललित हे ज्यांनी नेमलेत त्यांच्या समर्थकांना असं बोलायचा हक्क आहे?

<<केंद्रात सरकार बदललं की लगेच किमती कमी होतिल / महागाई कमी होईल असं नाही हे जरी खरं असलं तरी निवडणूकीमध्ये महागाईचा मुद्दा होता. गेल्या महिन्याभरात भाज्या कै च्या कै महागल्यात..>>

महागाई एका महिन्यात आटोक्यात येणं शक्य नाही. तशी अपेक्षा करणं पण व्यर्थ आहे. पण सरकारकडून काहीतरी पावलं तरी उचलली जायला हवी होती.

<<अल्पना, तुझ्या एखाद्या पोस्टची वाट पहात होते. पण तुझी पोस्ट येईलच अशी खात्रीही नव्हती. आली तरी सेन्सिबल असेल ही खात्री होतीच>> +१००

अमित शहांच्या जागी मला एम बी शहा म्हणायचं होतं.....काळा पैसा समितीचे अध्यक्ष.

>>>

होतं असं. कावीळीची तपासणी करुन घ्या. Wink

अगं इथे हल्ली सगळे (आपसमर्थक, काँग्रेस समर्थक आणि भाजपा समर्थक सगळेच) खूप जास्त चिखलफेक करतात. त्यामूळे शक्यतो प्रतिक्रिया द्यायची इच्छा होत नाही.>>> हो. भाषाही खूप खालावू लागली आहे. त्या लेव्हलचा द्वेष किंवा भाषा वापरणं किंवा मनातही आणणं आणि तशीच उत्तरं देणं केवळ अशक्य आहे. निवडणुकांच्यावेळी मी कुठल्याच राजकिय पक्षाच्या पुर्ण फॉर किंवा अगेन्स्ट नव्हते कारण कुठलाही पक्ष काळा किंवा पांढरा म्हणता येणार नाही, हजारो लाखो कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येक जण ग्रे स्केलवरच कुठे ना कुठे असणार हे आपण जाणून असतो/असलं पाहिजे. मतदान तर करता येणारच नव्हतं. आता जो वैताग येतोय तो अ‍ॅटिट्युडचा आणि ब्लेमगेमचा येतोय. पण आता कळून चुकलंय की हे थांबवणं लिहिणार्‍यांच्या स्वतःच्याही हातात आता राहिलं नाही इतके सगळे त्यात खेचले गेलेत. जे कुणी प्रयासाने ह्यातून बाहेर पडून व्यवस्थित लिहितील त्यांना मी मनातल्यामनात शाब्बासकी देईन.

राजकारणासारख्या बुजबुजाटी करियरमध्येही खानदानीपणा वेगळा उठून दिसू शकतो हे मनात येऊन येऊनच तुझी आठवण होत होती. मीही इकडे किंवा तिकडेही लिहिणं बंद केलंय. तुझ्या पोस्टसाठी केवळ लिहिलं.

पण आता कळून चुकलंय की हे थांबवणं लिहिणार्‍यांच्या स्वतःच्याही हातात आता राहिलं नाही इतके सगळे त्यात खेचले गेलेत. >>>> +१ हा धागा आणि जागता पहारा याचे उत्तम उदाहारण आहे.

पण आता कळून चुकलंय की हे थांबवणं लिहिणार्‍यांच्या स्वतःच्याही हातात आता राहिलं नाही इतके सगळे त्यात खेचले गेलेत. जे कुणी प्रयासाने ह्यातून बाहेर पडून व्यवस्थित लिहितील त्यांना मी मनातल्यामनात शाब्बासकी देईन.
>>>>>>>>>

+100000000000000000000000000000

मीही इकडे किंवा तिकडेही लिहिणं बंद केलंय>>>>>>>>. +10000000000

>>पण आता कळून चुकलंय की हे थांबवणं लिहिणार्‍यांच्या स्वतःच्याही हातात आता राहिलं नाही इतके सगळे त्यात खेचले गेलेत.

अहो, पंचाईत अशी आहे की जगामधे कोणत्याही चर्चेचे वादविवादात (प्रसंगी हिंसेत) रूपांतर का होते, कारण इगो, समोरचा मी सांगतो ते ऐकत नाही म्हणजे काय ? (ऐकत नाही = अ‍ॅग्री/सहमत होणे)

आणि मग अशावेळी काही लोक संयमाने म्हणतात की तुमचे मत ठीक आहे पण माझे तसे नाही (अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री)
पण आजकाल (सगळीकडेच) असे लोक कमी होऊ लागले आहेत आणि वर उल्लेख केलेले लोक वाढू लागले आहेत.

महिमा कलयुग का, और क्या !

एकंदरित इथे (आणि एकंदर आंतरजालावर सगळीकडेच) बोकाळलेली पद्धत अशी की एखाद्याने मत व्यक्त केले तर ते मत खोडून काढण्यात इथल्या सदस्त्यांत अहमहमिका लागते. मग वैय्यतिक हल्ले, समोरच्याची अक्कल काढणे अशा प्रकारे एक एक पातळी ओलांडणे सुरू होते. ठीक आहे ना, तुम्हाला समजा एखादी कविता आवडते, मला ती टुकार वाटते ही आपापली मते आहेत. पण कुणी हा विचार करुन शांत बसेल तर शप्पथ.

काही गप्पांची वाहती पाने तर याची राखीव कुरणे आहेत. आपल्याला न आवडणार्‍या सदस्यांना त्रास देण्याची ती हक्काची स्थाने झालेली आहेत. त्यात ते सदस्य तिथे नियमित येत असतील तर विचारूच नका. एरवी शांत आणि समतोल चर्चा करायचा आव आणणारे आणि आवाहन करणारे आयडी गप्पांच्या पानावर जाऊन काय गरळ ओकत असतात ते पाहीले तर याचा प्रत्यय येईल.

बाकी महेश यांच्याशी सहमत.

अगं इथे हल्ली सगळे (आपसमर्थक, काँग्रेस समर्थक आणि भाजपा समर्थक सगळेच) खूप जास्त चिखलफेक करतात. त्यामूळे शक्यतो प्रतिक्रिया द्यायची इच्छा होत नाही. >>> Uhoh

असो.

जे कुणी प्रयासाने ह्यातून बाहेर पडून व्यवस्थित लिहितील त्यांना मी मनातल्यामनात शाब्बासकी देईन. >>>> हे असं हल्लीच लिहावंसं वाटू लागलंय का ?
मौनी मनमोहन, रॉल गांधी , पप्पू आणि काय काय... गेल्या सात आठ वर्षातली ही भाषा सोबर काय ?
असेल पण बाबा. आपल्याला काय कळतंय म्हणा. आपण थोडीच ना न्यायाधीश आहोत ?

काही गप्पांची वाहती पाने तर याची राखीव कुरणे आहेत. आपल्याला न आवडणार्‍या सदस्यांना त्रास देण्याची ती हक्काची स्थाने झालेली आहेत. त्यात ते सदस्य तिथे नियमित येत असतील तर विचारूच नका. एरवी शांत आणि समतोल चर्चा करायचा आव आणणारे आणि आवाहन करणारे आयडी गप्पांच्या पानावर जाऊन काय गरळ ओकत असतात ते पाहीले तर याचा प्रत्यय येईल.
<<

शब्दाशब्दाशी सहमत.

+१०००००००

उदा. गगोवर एक व्यक्ती (यांची सध्याची आयडी झोपाळू) मला उद्देशून काय काय बोलतात ते कुणी पाहिलं असेल, तर तुमच्या विधानाची सत्यता त्यांना नक्कीच पटेल.

मी तर म्हणेन, वाहती पाने जाऊ द्या, व्हॉट्सॅप अन इन्व्हाईट ओन्ली फेसबुक ग्रूप्स जास्त मज्जेचे असतात. कधी पहिलेय का तुम्ही? कसं प्ल्यानिंग करून एकेक आयडी येऊन धाग्यावर पिंगा घालतात ते?

प्रत्येकाने आरसा पहावा हे उत्तम Happy (यामधे मी पण आलो)

असो, तर मुळ विषयाकडे वळू Lol
कालच चर्चा पहात होतो एनडीटीव्हीवर, केजरीवालांनी एक ऑडिओ क्लिप रेडिओवर प्रसारित केली आहे ज्यामधे भाजपच्या विरोधात २० २० कोटीची ऑफर आआपच्या आमदारांना केल्याबद्दल सांगत आहेत.

कालच्या एका चर्चेत प्रशांत भुषण (इंग्रजी) आणि दुसर्‍या चर्चेत संजयसिंग (हिंदी) होते.
दोन्ही चर्चेमधे आआपची बाजू अगदीच हास्यास्पद वाटत होती.
कारण हे आरोप म्हणजे नुसती रिकामी बंदुक दाखवून समोरच्याला घाबरविण्यासारखे वाटत होते.

ती निधी की कोण अँकर आहे ती म्हणाली पण की गडकरी आरोप प्रकरणात काय झाले माहिती आहे ना ?
यावर आआपवाले म्हणत होते की हो तरी सुद्धा आमचा तोच स्टँड आहे.

आआपचे म्हणत होते की आमच्या पक्षामधे जर काही चुकीचे असेल तर तुम्ही आमची बदनामी करू शकता, नव्हे अनेक वेळा केली गेलेली आहे तरी आम्ही कुठे केसेस केल्या आहेत कोणावर ??
यावर भाजपच्या साईडने कोण होते नाव नाही कळाले, पण तो म्हणाला ते फार भारी होते.
"जिनका नाम होता है, उनको बदनामी का डर होता हैं, जिनका नामही नही उनको कैसा डर ?"

विकांताला जरा वेळ काढून उपाध्याय मुलाखतीतले मुद्दे लिहावे म्हणतो.

अगं इथे हल्ली सगळे (आपसमर्थक, काँग्रेस समर्थक आणि भाजपा समर्थक सगळेच) खूप जास्त चिखलफेक करतात. त्यामूळे शक्यतो प्रतिक्रिया द्यायची इच्छा होत नाही.
---- सहमत... प्रत्येक मायबोलीकराच्या मनातले लिहीले :स्मित:.

मिर्ची ताई तुम्ही दिल्ली च्या विज दरां बद्द्ल लिहीणार होतात. अर्थेसंकल्पा च्या धाग्यावरचा कोणत्ता तरी रिप्लाय इथे पोस्ट करणार होतात.

Admin हा धागा पण वाहते पान करा.>>>> मंदार देशपांडे आपण अशी विनंती अ‍ॅडमिनला का केलीत कळेल का?

काही आयडी कित्येक धाग्यावर नुसता धुमाकुळ घालत असतात, त्यामुळे साती यांचा धागा वाहून गेला. मिर्ची यांच्या ह्या धाग्यावर पण त्यांचा तो प्रयत्न चालु असतो, पण इथे कित्येक जण जबाबदारीने चर्चासुध्दा करतात आणि धागाकर्ती कितीही आक्रस्ताळेपणे विचारलेल्या प्रश्नांना अत्यंत संयत उत्तरे देत असते. त्यामुळे हा धागा त्या धुमाकुळ घालणार्‍या आयडींमुळे वाहून जाऊ नये असे मला वाटते.

सातीचा धागा उडवल्यापासून खरंच काही लिहायची इच्छा होईना. विरोधात असेल, चुकीचं असेल, हास्यास्पद असेल, बिनबुडाचं असेल पण वेळ घालवून त्रास घेऊन लिहिलं जात होतं.

आपचे नेते दिलीप पांडेय ह्यांना दंगा भडकावणारी पोस्टर्स लावण्यावरून आत्ताच दिल्ली पोलिसांनी अटक केलं आहे. लाखो रूपयांची परदेशातील नोकरी सोडून देशसेवा करायला आलेला तुरुंगात आणि भडकवणारी विधाने करूनही अनेक नेते बाहेर.....मस्त चाललंय आमचं Sad

चिडचिड होतेय. Angry

आपचे नेते दिलीप पांडेय ह्यांना दंगा भडकावणारी पोस्टर्स लावण्यावरून आत्ताच दिल्ली पोलिसांनी अटक केलं आहे.
>>> जसं तुम्ही लिहिलय "दंगा भडकावणारी पोस्टर्स लावण्यावरून" तर मग
अशी पोस्टर्स लावायची गरजच काय?

लाखो रूपयांची परदेशातील नोकरी सोडून देशसेवा करायला आलेला तुरुंगात आणि भडकवणारी विधाने करूनही अनेक नेते बाहेर.
>>> दंगा भडकावणारी पोस्टर्स लावून नक्की कोणत्या देशाची सेवा करत होते?

दिलीप पाण्डेय दंगा भडकावणार? Lol
हे बघा दंगा भडकावणार्‍या अतिरेक्याचं चित्र.

ओखला मधल्या रहिवाशांनी काँग्रेस आमदारांच्या विरुद्ध पोस्टर्स लावले आहेत. त्यांनी तसं पोलिसांना लिहून दिलंय. एका आप स्वयंसेवकाने ह्या पोस्टरचा फोटो मेलमधून पाठवला. cc मध्ये पाण्डेयच नाव होतं, म्हणून त्यांना अटक.
"A senior police officer at the Jamia Nagar police station said, “It was Javed who had sent the mail and Dilip was tagged in it. We made the arrests solely on the basis of the names tagged in the e-mail. This is all we can say as of now.”
छान छान.

"सिंघल बोले, मुस्लिम छोड़ दें अयोध्या मंदिर पर दावा, वर्ना"
हे महाशय विश्वबंधुत्व वाढवण्याचं काम करत आहेत. म्हणून त्यांना अटक नाही करायचं, हो ना?
"सिंघल ने कहा कि मुसलमानों को अयोध्‍या, काशी और मथुरा के मंदिरों पर अपना दावा छोड़ देना चाहिए और यूनिफॉर्म सि‍व‍िल कोड स्‍वीकार कर लेना चाहिए। अगर ऐसा होता है तो हम उन्‍हें प्‍यार देंगे और किसी अन्‍य मस्जिद पर दावा नहीं करेंगे जबकि हजारों मस्जिद मंदिरों को तोड़कर बनाए गए हैं।
सिंघल ने कहा कि अगर मुसलमान इसे स्‍वीकार नहीं करते हैं तो उन्‍हें हिंदुओं की एकजुटता का सामना करने के लिए तैयार रहना होगा।"

दिलीप पाण्डेय ह्यांच्या मला आवडलेल्या काही ओळी -

"कंधे पर पोटली लेकर जो ख्वाब बेचने का दावा करते हैं,
कभी कभी फ़रिश्ते नही, बहरूपिये भी होते हैं।
आँखें देकर ख्वाब खरीद बैठे हैं कुछ लोग।"

"ये ग़लत सोच है कि मुझको केवल सुन्दर दिखने से मतलब,
क्यूँ न युद्ध लडूँ, आकाश चढ़ूँ, पर्वत से बढूँ इस दुनिया में
मेरे चलने, सोचने और पहनने के ढंग मुझको ही चुनने दो,
मेरी आज़ादी की सीमा मुझको ही तय करने दो इस दुनिया में "

"जिसको समझ के बैठे थे अंजाम तुम हमारा,
हम जैसे दीवानों का वो शुरुआत-ए-सफ़र था
"

दिलीप देहलीज पर दिल ह्या पुस्तकाचे लेखक आहेत.

<<दंगा भडकावणारी पोस्टर्स लावून नक्की कोणत्या देशाची सेवा करत होते?>>

तोच देश जिथले रहिवासी अजून गाढ झोपेत आहेत....

<<मिर्ची यांच्या ह्या धाग्यावर पण त्यांचा तो प्रयत्न चालु असतो, पण इथे कित्येक जण जबाबदारीने चर्चासुध्दा करतात आणि धागाकर्ती कितीही आक्रस्ताळेपणे विचारलेल्या प्रश्नांना अत्यंत संयत उत्तरे देत असते. त्यामुळे हा धागा त्या धुमाकुळ घालणार्‍या आयडींमुळे वाहून जाऊ नये असे मला वाटते.>>

नरेश माने,
मतभेद असूनही तुम्ही हे लिहिलंत त्यासाठी धन्यवाद Happy
तिरकस मोडातून बाहेर यायचं मात्र अवघड जातंय मला.

<<मिर्ची ताई तुम्ही दिल्ली च्या विज दरां बद्द्ल लिहीणार होतात. अर्थेसंकल्पा च्या धाग्यावरचा कोणत्ता तरी रिप्लाय इथे पोस्ट करणार होतात.>>

यूरो,
<<आआप चे समर्थक सगळ्या थरातुन येत असतिल. ते या सगळ्या सिस्टीम्चा भाग की नाहित? की फ़कत राजकारणीच भ्रष्टाचारी आहेत?>>
अर्थसंकल्पाच्या धाग्यावर तुम्ही हा प्रश्न विचारला होता.
निश्चितच. आपचे समर्थक वेगवेगळ्या थरातून आले आहेत. तेसुद्धा ह्या सिस्टीमचा भाग असणार. मागे एक किस्सा ऐकला होता.
सरकारी इस्पितळांना औषधे पुरवणार्‍या एका कंपनीचा मालक. त्याने सांगितलं -
"मी दरमहिन्याला औषधे पुरवण्यासाठी इस्पितळात जातो. तिथले अधिकारी औषधे नको म्हणतात. त्याऐवजी औषधे दिल्याची नुसती सही करायला सांगतात. टक्केवारी विभागून. ह्या सगळ्या प्रकाराची किळस आली आहे. मला प्रामाणिकपणे व्यवसाय करायचाय. माफक नफा मिळवून औषधे विकायची आहेत. पण आत्ता जे चालू आहे ते मी नाकारलं तर माझ्यावरच खोटे आळ आणले जातील आणि माझ्याजागी दुसर्‍या कंपनीला नेमलं जाईल. त्यांचा धंदा चालू राहील पण माझं घर बंद पडेल. नाईलाजाने करावं लागतंय."
वेगवेगळ्या क्षेत्रातील असे अनेक लोक माझ्या स्वतःच्या माहितीत सुद्धा आहेत.

आपचे स्वयंसेवक, इतकंच काय लोकसभा निवडणूकीतले उमेदवार ह्यापैकी कुणाच्याच प्रामाणिकपणाची गॅरंटी नाही देऊ शकत मी. कोणीच नाही देऊ शकणार. विशेषतः दिल्लीतल्या यशानंतर जे जॉइन झालेत. तिथल्या यशाने हुरळून जाऊनही त्यातले बरेच आपमध्ये आले असतील. संघर्ष आहे असं दिसलं की त्यातले काही हळूहळू गळतील.
पण अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आणि कुमार विश्वास ह्या तीन व्यक्तींच्या प्रामाणिकपणाविषयी १००% खात्री आहे. बाकीचेही आहेत. उदा. - मनिष सिसोदिया, संजय सिंग, गोपाल राय वगैरे. पण ह्या मंडळींना मी फार ऐकलेलं नाही.

वीजदरांबाबत लिहिते आज-उद्या.

<<यावर भाजपच्या साईडने कोण होते नाव नाही कळाले, पण तो म्हणाला ते फार भारी होते.
"जिनका नाम होता है, उनको बदनामी का डर होता हैं, जिनका नामही नही उनको कैसा डर ?">>

खरंय. खूप भारी वाक्य आहे हे.

AK.JPG

हॅ....हे तर काय कुणी सोम्या-गोम्याही करू शकतो.

Times100.png

Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll
असेल, पण सर्वात जास्त नकारार्थी मतं मिळाली आहेत का केजरीवालांना? मग उपयोग नाही. आम्ही जगातील 'सर्वात नावडती व्यक्ती' असा शिक्का असणार्‍यांना आमच्या देशाचे पंप्र बनवतो. आमच्या वर्तमानपत्रांमध्ये तसं लिहीत मात्र नाही. Modi, Kejriwal on Time's 100 most influential people list असा दिशाभूल करणारा मथळा असतो आमच्याकडे.
किंवा मग कोण टाइम्स, कुठलं टाइम्स, दै.संध्यानंदच्याच योग्यतेचं असणार ते किंवा भारतविरोधी,देशद्रोही असणार असं म्हणायला सुरूवात करतो.

ते अ‍ॅवॉर्डस् नक्की कशासाठी आहेत ? विशेषतः मॅगसेसे ??
त्या कुमारला बाजूला केले आहे. प्रशांत भुषणना पण कमी महत्व आहे.
फक्त ४ लोकांच्या डोक्याने चालले आहे सगळे, एके, योगेन्द्र, मनिष आणि संजय.
पक्षात लोकशाही नाहीये. यांना फक्त देशात कायम अस्थिरता ठेवायची आहे.
असे आणि अजुनही काही मुद्दे आहेत लिन्कमधे.

भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सत्ता हा सोपा उपाय नाही तर जनजागृती करणे हा प्रभावी उपाय आहे असे वाटते.
लोकांना खडसावून सांगायला हवे होते की मैं आमच नाही तर शुद्ध आदमी भी हूँ. पण तसे न करता प्रस्थापित राजकारणी कसे चांगले नाहीत एवढेच म्हणत राहीले तर फार फरक पडणार नाही. सोचो !

मिर्ची तुम्हाला आप मधली विसंगती दाखवून दिली तर तुम्ही म्हणणार भाजपा, काँग्रेस पण वाईट. दिलीप पांडेंच्या या पोस्टरला तुमचं समर्थन आहे का?
1405788468331.jpg

आणि आता यावरही तुम्ही सरळ उत्तर देण्याऐवजी भाजपा, काँग्रेस विषयी लिहिणार, दिलीप पांडेंचा बायोडाटा देणार आणि मूळ मुद्द्याला बगल देणार.
तुमचे चालू द्या.
आणि हो तुमचा कप थोडा रिकामा करा.

<<ते अ‍ॅवॉर्डस् नक्की कशासाठी आहेत ? विशेषतः मॅगसेसे ??>>

माहितीच्या अधिकाराचा वापर करून स्वतःचे हक्क मागण्यासाठी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी जनजागृती केल्याबद्दल. सविस्तर इथे वाचा.

<<भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सत्ता हा सोपा उपाय नाही तर जनजागृती करणे हा प्रभावी उपाय आहे असे वाटते.>>

अहो, तेच तर करत आहेत ते २००० सालापासून. आपल्याला वाटतंय हा कोण उपटसुंभ आलाय अण्णा आंदोलनाची मलई खायला. पण खरी हकीकत तशी नाहीये.

<<दिलीप पांडेंच्या या पोस्टरला तुमचं समर्थन आहे का?>>

अजिबात नाही. जातीयवाद पसरवणारं पोस्टर कुणीही लावलं असलं तरी त्याचा माझ्याकडून निषेधच. पण हे पोस्टर दिलीप पांडेंचं आहे हे कशावरून म्हणताय तुम्ही??

<<आणि हो तुमचा कप थोडा रिकामा करा.>>

जौद्याहो, लोक कशाकशाचे फॅनक्लब काढतात. मला जेन्युइनली वाटतंय केजरीवाल देशभक्त आहेत आणि म्हणून मी त्यांचा आदर करते, त्यांच्या कामात हातभार लावायचा प्रयत्न करतेय तर कुठे बिघडलं? Happy

ज्यांना आवडत नाही, हास्यास्पद वाटतं, केजरीवालांच्या नावाने शिसारी येते त्यांच्यावर सक्ती थोडीच आहे वाचायची? कित्तीतरी निरर्थक धागे आहेतच की माबोवर, त्यातलाच हा एक समजायचा आणि इग्नोअर मारायचा. हाकानाका.

मिर्ची,

आप आणि केजरीवाल विषयी पडलेले काही प्रश्न:-

१. काश्मिरच्या विशेष दर्जाविषयी केजरीवाल यांचं काय मत आहे?
२. रामजन्मभूमीच्या वादावर भूमिका काय आहे ?
३. समान नागरी कायदा लागू करण्याविषयी आपची भूमिका काय आहे?
४. १९८४ च्या दंगलीतील आरोपींवर आपच्या सरकारने नव्याने चौकशी का सुरू केली नाही? बंगालमध्ये झालेल्या सैनबारी हत्याकांडाची ममता बॅनर्जींनी तब्बल ४० वर्षांनी पुन्हा चौकशी सुरू केली आहे. का १९८४ च्या दंगलींला केजरीवालांचं समर्थन आहे?
५. उत्तर प्रदेशातील दंगलींबाबत बोलताना मुलायम आणि अखिलेश यांचा पुसटता उल्लेख करुन मोदी आणि अमित शहांवर सगळा रोख का? काँग्रेसच्या २ माजी खासदारांवर आणि सपा-बसपा खासदारांवर दंगली भडकवल्याचा आरोप असतानाही त्याकडे सोईस्कर दुर्लक्षं का?
६. इमाम बुखारींच्या गळ्यात गळा घालणारे केजरीवाल इतर पक्षांवर जातीयवादाचा आरोप कोणत्या आधारावर करतात?
७. अशोक खेमकांना आपने कधीही समर्थन का दिलेलं नाही? दुर्गा शक्ती नायपालना निलंबीत केल्यावरही आप्/केजरीवाल यांनी साधा निषेधही का व्यक्त केला नाही?
८. खाप पंचायत, शरियत नुसार निघणारे फतवे याला आपचं समर्थन आहे का? असल्यास का?
९. इशरत जहां निर्दोष होती असा दावा केजरीवालनी बुखारीला लिहीलेल्या पत्रात कशाच्या आधारावर केला आहे?
१०. बेल बाँड विषयी आप पक्षाची भूमिका कोणती? बेल न घेणे ही पक्षाची भूमिका असेल तर योगेंद्र यादवांनी बेल कसा घेतला? त्याबद्दल त्यांच्यावर काय कारवाई केली? का पक्षाला काही भूमिकाच नाही ?

आणि सर्वात शेवटी -

तुमच्या म्हणण्याप्रमाणे अरविंदबाबू १२ वर्षांपासून भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करत आहेत. मात्रं अण्णा हजारेंच्या जंतर-मंतर शो पूर्वी त्यांचं नाव तरी कोणाला (तुम्हां-आम्हांसह) माहीत होतं का ?

याचा सरळ अर्थ अण्णांना मिळालेला गर्दीचा प्रतिसाद पाहून त्यांनी त्यावर आपली पोळी भाजून घेतली आणि गरज सरो वैद्य मरो अशा न्यायाने नंतर अण्णांना बाजूला केलं असा होत नाही का?

या मुद्द्यांच्या उत्तरार्थ प्रतिसाद अपेक्षीत आहेत. परंतु जास्तं शक्यता असंबध्द लिंक्स आणि पास मिळण्याचीच वाटते.

Pages