ओल्या हळदीचे कैरी घालुन लोणचे [फोटोसहित]

Submitted by प्रभा on 9 June, 2014 - 09:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओल्या हळदीचे काप १ वाटी, कैरीच्या फोडी १ वाटी,आल्याचे [कोवळ असल्यास चांगल ]काप अर्धी वाटी, मिरचिचे तुकडे अर्धी वाटी, मिठ, लोणच्याचा मसाला, तेल, मोहरी, हिंग.

क्रमवार पाककृती: 

प्रथम कैरी, आले, ओली हळद व मिरचीचे तुकडे एका पसरट भांड्यात घेउन त्यात मीठ व लोणच्याचा तयार मसाला घालुन मिक्स करुन घ्यावे. हिंग व मोहरीची फोडणी करावी. २ मिनिटांनी ती लोणच्यात घालुन मिसळावी. थोडे थंड झाल्यावर बरणीत भरावे. दुसरे दिवशी चांगले पाणी सुटते. मुरल्यावर खुपच छान लागते.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

मध्यंतरी दिनेशदांची या लोणच्याची रेसिपी वाचण्यात आली. ती किसुन लिंबाचा रस घालुन केलेली होती. तिची चव पण छान लागते. मी अस बनवते.

माहितीचा स्रोत: 
आई, काकु
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. मी पण घरच्या बागेतलीच घेतली हळद.हे लोणच मागल्या वर्षीच आहे, खायला घेण्यापुर्वी यावर थोड लाल तिखट व हिंगाची फोडणी घालते. फारच मस्त चव येते. आता नविन हळद काढेल. त्यातलेच १ -२ तुकडे [थोडे मुळ असलेले] जमिनीत पेरते परत. हळदीचे पानहि थालिपिठ व वडे करायला वापरते अधुनमधुन . आता किसाच लिंबाचा रस घालुन करुन बघेल थोड. बाकी कैरी घालुन.
घन्यवाद देवकी, सायली, दिनेशदा