माझी जमीन कसण्या घेऊन प्रोफ गेले!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

'जमीनी सुरक्षीत नाहीत' अशी सर्वत्र बोंबाबोंब आहे. त्यामुळे जमिनीचा नाद सोडून गाळा डायरेक्ट इथून उचलला आहे.

माझी जमीन कसण्या घेऊन प्रोफ गेले!
सैपाक* मीच केला, जेवून प्रोफ गेले!

'प्याले हलाहलाचे रिचवेन मीच' म्हणुनी....
कोन्याक हाय माझी सेवून प्रोफ गेले!

'माझ्या घरी बरा मी' ठसक्यात सांगताना....
दारात वाकुल्यांना दावून प्रोफ गेले!

'पाडेन काव्यचकल्या, सोर्‍या तुटो बेहेत्तर'....
झेंडा बगावतीचा रोवून प्रोफ गेले!

मृण धन्यवाद देई विचक्या न टाकल्याचे....
मातब्बरांस इथल्या भोवून प्रोफ गेले!

* 'आर्ती'च्या चालीवर वाचावे.
** प्राध्यापकांनी (हे चुकूनमाकून वाचलंच तर) उदार मनानं माफ करावं ही विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 

प्रोफेंच्या गझलांवर तिकडे प्रतिसाद पडताएत... ते कधी थांबवणार..काल दोन दिवस कसं बरं वाटलं...परत चालू झालं ते Sad

या गझलेवर्चे प्रतिसाद मात्र वाढू देत... Lol

Proud

मृण्मयी, जब्बरदस्त! Rofl

वाजवू पाहू जाता, पुंगी जरा गाजराची
आयत्या बिळी नागोबा होवून प्रॉफ गेले

आ.न.,
-गा.पै.

"आर्ती" माहित नाही पण आरती च्या चालीवर म्हणून पाहिलं. एकदम जबरी....

आता एखाद्या "गटगं"ला याचं सादरीकरण्पण कुणीतरी करून टाका म्हणजे झालं. Wink

>>पाडेन काव्यचकल्या, सोर्‍या तुटो बेहेत्तर'.... हे महाप्रचंड आहे Rofl

मन:पूर्वक धन्यवाद!

मायबोलीत प्रोफेसर दुसर्‍या कुणाचं काही वाचत नाहीत असा अंदाज आल्यामुळे हिंमत वाढली. Proud

कोन्याक वरून मला ऋ आणि श्री चा चांदनी चित्रपट आठवला. स्विझर्लंडमध्ये सगळ्यात उंच शिखरावर भारतीय रेस्टॉरंट आहे. तिथल्या ग्लॅशियर मात्र आपल्या हिमालयातल्या ग्लॅशियरच्या मानाने काहीच नाहीत. भारतीय संस्कृतीची तोड सगळ्या जगात नाही. अमेरिकन लोकांना काय कळणार आईचे प्रेम.

मस्त च मृण्मयी.

प्रोफेसर दुसर्‍या कोणाचे वाचत नाहीत आणि कोणी काहीही सांगीतले तरी ऐकत नाहीत.
स्वमग्नता म्हणतात ते हेच का?

कोन्याक वरून ............काय कळणार आईचे प्रेम.
हेच जरा शब्द उलटे पालटे करून, मधे मधे उर्दू शब्द घालून लिहा. एकदम माशाल्ला गझल!!
कुण्णालाच कळणार नाही कोणत्या विषयावर आहे. म्हणजे लोक तुम्हाला एकदम बाईंपेक्षा चांगल्या गझलाकार म्हणतील. मला स्वतःला गझल कळत नाही, म्हणून मी मात्र तसे म्हणणार नाही!!
अरे हो, मधेच जिंदगीचे वाट्टोळे झाले असले टाहो फेडा. जिंदगी हृदय या सगळ्याची तोडफोड, चक्काचूर झाल्याशिवाय गझल कसली?

Pages