माझी जमीन कसण्या घेऊन प्रोफ गेले!
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
82
'जमीनी सुरक्षीत नाहीत' अशी सर्वत्र बोंबाबोंब आहे. त्यामुळे जमिनीचा नाद सोडून गाळा डायरेक्ट इथून उचलला आहे.
माझी जमीन कसण्या घेऊन प्रोफ गेले!
सैपाक* मीच केला, जेवून प्रोफ गेले!
'प्याले हलाहलाचे रिचवेन मीच' म्हणुनी....
कोन्याक हाय माझी सेवून प्रोफ गेले!
'माझ्या घरी बरा मी' ठसक्यात सांगताना....
दारात वाकुल्यांना दावून प्रोफ गेले!
'पाडेन काव्यचकल्या, सोर्या तुटो बेहेत्तर'....
झेंडा बगावतीचा रोवून प्रोफ गेले!
मृण धन्यवाद देई विचक्या न टाकल्याचे....
मातब्बरांस इथल्या भोवून प्रोफ गेले!
* 'आर्ती'च्या चालीवर वाचावे.
** प्राध्यापकांनी (हे चुकूनमाकून वाचलंच तर) उदार मनानं माफ करावं ही विनंती.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
<<<<तिसरा आणी चौथा शेर आवडला.
<<<<तिसरा आणी चौथा शेर आवडला. पहिल्यात बिलामत बिघडली आहे.>>>>
बिलामत म्हणजे काय? समजले नाही.
मृण्मयी, पहिल्या द्वीपदीवरून
मृण्मयी,
पहिल्या द्वीपदीवरून ते गाणं आठवलं. रंग बरसे...
बेस्ट
बेस्ट
हे हे... सही
हे हे... सही
प्रोफेंच्या गझलांवर तिकडे
प्रोफेंच्या गझलांवर तिकडे प्रतिसाद पडताएत... ते कधी थांबवणार..काल दोन दिवस कसं बरं वाटलं...परत चालू झालं ते
या गझलेवर्चे प्रतिसाद मात्र वाढू देत...
yaa gajhalechi link tyaaMchya
yaa gajhalechi link tyaaMchya pratyek dhagyavar dakavali kaa kuni?
मृण कमाल !! कोन्याक चा शेर
मृण
कमाल !! कोन्याक चा शेर 
मस्त जमली आहे. मला पहिला,
(No subject)
(No subject)
(No subject)
मृण्मयी, जब्बरदस्त! वाजवू
मृण्मयी, जब्बरदस्त!
वाजवू पाहू जाता, पुंगी जरा गाजराची
आयत्या बिळी नागोबा होवून प्रॉफ गेले
आ.न.,
-गा.पै.
जियो मृ !
जियो मृ !
लय भारी..
लय भारी..
सध्या वावर कमी झाल्याने सगळे
सध्या वावर कमी झाल्याने सगळे संदर्भ समजले नाहीत पण लेखिका कंपुभगिनी असल्याने हसून घेते
"आर्ती" माहित नाही पण आरती
"आर्ती" माहित नाही पण आरती च्या चालीवर म्हणून पाहिलं. एकदम जबरी....
आता एखाद्या "गटगं"ला याचं सादरीकरण्पण कुणीतरी करून टाका म्हणजे झालं.
>>पाडेन काव्यचकल्या, सोर्या तुटो बेहेत्तर'.... हे महाप्रचंड आहे
बाकी गझल इग्नोर होतात.. पण
बाकी गझल इग्नोर होतात.. पण याच नाव लईच इंटरेस्टिंग आहे म्हणुन आले.. एकदम सहीय
मन:पूर्वक धन्यवाद! मायबोलीत
मन:पूर्वक धन्यवाद!
मायबोलीत प्रोफेसर दुसर्या कुणाचं काही वाचत नाहीत असा अंदाज आल्यामुळे हिंमत वाढली.
गझल भन्नाट आहेच, पण इथले काही
गझल भन्नाट आहेच, पण इथले काही अभिप्राय पाहून विशेष मजा वाटली.
मृ, कोन्याक हाsssय माझी असं
मृ, कोन्याक हाsssय माझी असं म्हणायला हवं होतंस असं वाटतंय.
(No subject)
भन्नाट!
भन्नाट!
कोन्याक वरून मला ऋ आणि श्री
कोन्याक वरून मला ऋ आणि श्री चा चांदनी चित्रपट आठवला. स्विझर्लंडमध्ये सगळ्यात उंच शिखरावर भारतीय रेस्टॉरंट आहे. तिथल्या ग्लॅशियर मात्र आपल्या हिमालयातल्या ग्लॅशियरच्या मानाने काहीच नाहीत. भारतीय संस्कृतीची तोड सगळ्या जगात नाही. अमेरिकन लोकांना काय कळणार आईचे प्रेम.
(No subject)
(No subject)
मस्त च मृण्मयी. प्रोफेसर
मस्त च मृण्मयी.
प्रोफेसर दुसर्या कोणाचे वाचत नाहीत आणि कोणी काहीही सांगीतले तरी ऐकत नाहीत.
स्वमग्नता म्हणतात ते हेच का?
कोन्याक वरून ............काय
कोन्याक वरून ............काय कळणार आईचे प्रेम.
हेच जरा शब्द उलटे पालटे करून, मधे मधे उर्दू शब्द घालून लिहा. एकदम माशाल्ला गझल!!
कुण्णालाच कळणार नाही कोणत्या विषयावर आहे. म्हणजे लोक तुम्हाला एकदम बाईंपेक्षा चांगल्या गझलाकार म्हणतील. मला स्वतःला गझल कळत नाही, म्हणून मी मात्र तसे म्हणणार नाही!!
अरे हो, मधेच जिंदगीचे वाट्टोळे झाले असले टाहो फेडा. जिंदगी हृदय या सगळ्याची तोडफोड, चक्काचूर झाल्याशिवाय गझल कसली?
>> वाट्टोळे , तोडफोड,
>> वाट्टोळे , तोडफोड, चक्काचूर
ट्च् ट्च्! फना म्हणायचं फना!
जबरी गझलशेवयी पाडलीस आक्का!
लाहौल बिलाकुवत! (हे मूळ
लाहौल बिलाकुवत!
(हे मूळ गझलेसाठी)
माशाल्ला! सुभानल्ला! ( हे या विडंबनासाठी)
Pages