मायबोलीचा सदस्य होउन आता पाच वर्ष होतील. सुरुवात झाली होती बर्मिंगहम विद्यापिठात प्रकल्पाच्या कामासाठी असताना, एकदा सहज काही मराठी वाचायला मिळतय का हे अंतरजालावर शोधताना मायबोलीची लिंक मिळाली (गुगलचे ऋण फेडने अशक्य आहे ). विनोदी कथा, रहस्यमय कथा वाचताना वेळ कसा जायचा हे कळायचदेखिल नाही. बेफि, कौतुक शिरोडकर, चाफ्फा (कवठीचाफा ?), विशाल कुलकर्णी आणखी बर्याच लेखक मंडळींची धमाल असायची माबोवर. हळुहळु माबोकरांच्या ओळखी व्हायला लागल्या. कट्ट्यावर रोज गप्पांची मैफिल जमवता आली.थोडी हिंमत करुन मी पण एक-दोन लेख लिहिले, थोडीफार जमलेली चित्र पोस्टली. एकंदरीत सब कुछ अच्छा चल रहा था..
पण काही दिवसांपासुन काहीतरी बिनसलय, विनोदी कथा फारशा कोणी लिहित नाही, इतर प्रकारच्या कथाही जास्त येत नाहित. गेले काही दिवस ईतर प्रकार मात्र खुप जोरात चालु आहेत. जात, धर्म, राजकारण यावरुन गटबाजी, जहरी टिका, भांडणं, भांडणात एकमेकांवर शिव्यांची बरसात. ह्याशिवाय अजुन एक म्हणजे माबोवर ड्युआयडींचा फारच सुळसुळाट झालेला आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट, बहुतेक ड्युआय येतात ते एकतर काहीतरी आचरट किंवा न पटणारं लिहिण्यासाठी किंवा एखाद्याची टर उडवण्यासाठी. काही नविन लेखक पदार्पणातच वादग्रस्त विषय (प्रचंड अशुद्ध लेखनासहित) घेउन येतात, आणि त्यावर तिखट प्रतिक्रिया आल्या की मग व्यक्तिगत टिका करणे, असभ्य भाषेचा वापर आणि नंतर अॅडमिनने येउन धागा बंद करणे इथपर्यंत हा प्रवास चालतो. काही धागा लेखकांना (नाव लिहिण्याची गरज नाही, माबोकर सुज्ञ आहेत, समजुन घेतिल) तर खरच मानसिक उपचारांची गरज आहे हे लिखान वाचुन लक्षात येतं (घातक वाक्य.. आता ह्यावर जबरी प्रतिक्रिया येणार)..
तर असो, माबो परत चांगल व्हावं अस वाटलं म्हणुन हा लेख.
तुम्हाला काय वाटत, होउ शकतं मायबोली पहिल्यासारखं चांगलं? काय कराव लागेल त्यासाठी? लेख सर्वांसाठी प्रसिद्ध करण्याअगोदर काहीतरी चाळणी असावी का?
टिप : कोणाही व्यक्तीविरुद्ध हा लेख नाही, भावना दुखावण्याचा उद्देश नाही, तसं वाटल्यास कळवा, धागा खोडून टाकता येइल.
बदललेली मायबोली
Submitted by अग्निपंख on 26 May, 2014 - 00:44
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळ्या मुद्यांना बगल मारूनही
सगळ्या मुद्यांना बगल मारूनही ? मग तर खरंच बहर आला !!
(या मुद्यांवर कुणी काही विचार करावा अशी अपेक्षा नाही हे आधीच स्पष्ट केलं होतं म्हणा) >>>>>> ब्रह्मांड आठवले, हो. खरच आहे. ते कसा विचार करणार. ते जुने आयडि आहेत ना?
इथला सर्वात तिटकारा येणारा
इथला सर्वात तिटकारा येणारा भाग म्हणजे ग्रूपीझम अर्थात गटबाजी आणि प्रचंड अहंगंड असलेली लेखकू मंडळी.
अनेक लेखकांच्या दीड्-दमडीच्या कथांवर आणि त्यांनीच काढलेल्या फडतूस धाग्यांवर खोर्याने प्रतिक्रीया देणार्या परंतु इतरांच्या चांगल्या आणि सकस लेखनावर केवळ ते यांच्या पुख्ख्यातील लेखकांनी न लिहील्यामुळे अनाठायी टिका करणार्या आणि दुर्लक्षं करणार्यांची कीव करावीशी वाटते. तसेच केवळ काही कथा लिहील्यावर सर्वज्ञाचा आव आणणारी लेखक्-पत्रकार-कवी मंडळी.. त्यांच्याविषयी न बोलणेच श्रेयस्कर.
मराठी भाषेची एक चांगली वेबसाईट म्हणून मायबोलीचं महत्वं निश्चित आहे, परंतु या मंडळींनी मांडलेला उच्छाद पाहून इथे येणं नकोसं वाटू लागलं आहे.
इथला सर्वात तिटकारा येणारा
इथला सर्वात तिटकारा येणारा भाग म्हणजे ग्रूपीझम अर्थात गटबाजी >> ही गोष्ट अस्तित्वात आहेच. पण गटबाजी करणा-यांना आपण ते करतोय हे लक्षात येत नाही. एखाद्या गटात गेल्यानंतर या गटाला काय आवडेल ते ओळखून नकळत आपले प्रतिसाद बदलणारे त्या गटात सामावून घेणं याला गटबाजी म्हणतात. तसच सतत न आवडणारे प्रतिसाद देना-यांना जागा दाखवून देने यालाही गटबाजीच म्हणतात. आपला प्रतिसाद गटातल्यांना आवडेल हे ध्यानात ठेवून मी काय प्रतिसाद दिला हे गप्पांच्या धाग्यावर डिस्कस करणारे आहेत की. त्याबद्दल शाबासकी किंवा कान टुचुस्की पण होते. एखाद्या कथेबद्दल अशा गप्पाष्टकांवर आधीच चांगला वाईट सूर उमटतो आणि मग त्याप्रमाने टिंगल टवाळी किंवा उचलून धरणे होते. गप्पाष्टकावर जर हे लिखाण टिंगलमंगलटाईप आहे असा शिक्का बसला की मग लेखकाने स्पष्टीकरण देऊन उपयोग नसतो. उलट त्याने आपली बाजू मांडणे हे कसं उद्धटपणाचं आहे हे त्याला दाखवून दिलं जातं. त्यावेळची भाषा सभ्य असते असं आपलं म्हणायचं. त्याला इतर कुणी आक्रस्ताळेपणा म्हणू शकत नाही. उलट लेखकाचीच उर्मटपणाबद्दल तक्रार केली जाते. कधी उघड कधी पडद्यामागून. मग त्याचं लिखाण आलं रे आलं की मग घोस्ट ऑफ जॉर्जिया क्लबकडून हाँटिंग इन कनेक्टीकटचे प्रयोग सुरू होतात. कधी कधी त्यातून लेखकाचा आयडी ब्लॉक देखील होतो. असो.
कृपया इथे दोन ड्युआयच्या वैयक्तिक भांडणांबद्दल, धमक्यांबद्दल काही लिहू नये याला अनुमोदन. त्यांनी ते एखादी जागा ठरवून आपसात करावं. अशांची बाजू घेऊनही कुणी इथे उगाच असंबद्ध प्रतिसाद देऊ नये. अॅडमिनची विपू अशा प्रकारच्या तक्रारींनी भरून गेलेली आहे. त्यांच्या ते आवाक्याबाहेरचं काम आहे.
वरदा, फारेण्ड, हो बरोबर आहे
वरदा, फारेण्ड, हो बरोबर आहे तुमचंही. पटतंय. आपल्या इंटरेस्टच्या बाफांवर भरीव चर्चा चालू असताना आपल्या नियंत्रणात नसलेली नुसतीच चिखलफेक सुरू झाल्यावर वैताग येतो.
मायबोलीवर कंपूबाजी आहे हे
मायबोलीवर कंपूबाजी आहे हे मानणार्यांचा आणि त्या कंपूबाजीला जोरदार विरोध करणार्यांचा एक मोठा कंपू आहे इथं.
मामी
मामी
सारख रामदास हे नाव आथवतय.
सारख रामदास हे नाव आथवतय.
ठ
ठ
उलट त्याने आपली बाजू मांडणे
उलट त्याने आपली बाजू मांडणे हे कसं उद्धटपणाचं आहे हे त्याला दाखवून दिलं जातं.<<< बरोबर...
ग्रुपीझम मराठी माणसाचा श्वास आहे हो.बेटं करून राहणे हे आमच्या मराठी माणसाच्या उत्क्रांतीमधून निर्माण झालेले अॅडाप्टेशन आहे असा मराठी लोकांचा हेका असतो.त्याला कोणी आव्हान दिल्यास त्याचीच टर उडवली जाते असे दिसून येते.
विज्ञानदास.. आभार
विज्ञानदास.. आभार आपले.
मामीसा
हत्याकांड आनि कंपूकांड घडवनारे ते कधीच कबूल करत नाहीत आणि माफीही मागत नाहीत. अॅट लिस्ट पहिलेवाले खेद तरी व्यक्त करतात.
विनोदाच्या आधारे समस्या सुटत
विनोदाच्या आधारे समस्या सुटत असत्या तर आज रामदेवबाबा पीएम असते.
माझ्या स्वप्नआत देव आले होते.
माझ्या स्वप्नआत देव आले होते. म्हनाले कि गझलवर रिप्लाय देनारे मला आवडतात. त्यान्ना मी लौकरच स्वत:कडे बोलवुन घेनार आहे.
मला जेव्हडं कळाल त्यावरुन इथ
मला जेव्हडं कळाल त्यावरुन इथ नविन आलेले आनि जुने अस भान्डन आहे. जुने लोक बोलत नाहित अस पन नवीन लोकान्च म्हननं आहे. माज्या समजुतीप्रमाने काय केल पाहिजे ते आपल्यापुडहं मान्डतो.
१. आमच्या वेळि अस्म होत अस सारख म्हनत बसु नये. आता दिलिपकुमार, राजकपुरचे पिक्चर चालतिल का ? आता रनबीर कपुर, दीपिका हेच आवडनार. जुनी गानी कुनी बनवनार आहे का ? आता यो यो हनिसिन्ग चालनार. त्याला नाक मुरडुन काय होनार ? त्यापेक्शा धामीक पुस्तक वाचा. आध्ध्यात्म वाचा. चान्गला गुरु गाठा. देवदर्शन, मनशान्ती यात वेळ घालवा. अस्म मला वाट्त.
२. जे कुनी बोलत नाहित त्याना जबरदस्ति करन्यात अर्थ नाहि. त्यान्ना वाटतय त्यान्च्या पद्धतिच काहि राहिल नाही. आता त्याला काय करनार ? तरुणानी मायबोलि हातात घेतलि तर काय करनार ? पन म्हाता-य मानसान्वर पन एकदमच अन्याय नको. जे मायबोलीत बोलत नाहित त्या जुन्यासाठि अबोली काढुन द्यावि आनि तरुनांसाठि मायबोलि रहावी. अबोलीतल्या लोकान्ना मायबोलीत बोलावं वाटलं तर तरुणाना आनन्द होईल. झाला नाहित तर हिडीसफिडिस करुन तिच चुक करु नये.
असम केल तर सगल्यांच समाधान होईल.
"एवधे बोलून मी माझे दोन शबद्
"एवधे बोलून मी माझे दोन शबद् सम्पवतो"
हे राहिलं टंकायचं.
इथला सर्वात तिटकारा येणारा
इथला सर्वात तिटकारा येणारा भाग म्हणजे ग्रूपीझम अर्थात गटबाजी >> ही गोष्ट अस्तित्वात आहेच. पण गटबाजी करणा-यांना आपण ते करतोय हे लक्षात येत नाही. एखाद्या गटात गेल्यानंतर या गटाला काय आवडेल ते ओळखून नकळत आपले प्रतिसाद बदलणारे त्या गटात सामावून घेणं याला गटबाजी म्हणतात. तसच सतत न आवडणारे प्रतिसाद देना-यांना जागा दाखवून देने यालाही गटबाजीच म्हणतात. आपला प्रतिसाद गटातल्यांना आवडेल हे ध्यानात ठेवून मी काय प्रतिसाद दिला हे गप्पांच्या धाग्यावर डिस्कस करणारे आहेत की. त्याबद्दल शाबासकी किंवा कान टुचुस्की पण होते. एखाद्या कथेबद्दल अशा गप्पाष्टकांवर आधीच चांगला वाईट सूर उमटतो आणि मग त्याप्रमाने टिंगल टवाळी किंवा उचलून धरणे होते. गप्पाष्टकावर जर हे लिखाण टिंगलमंगलटाईप आहे असा शिक्का बसला की मग लेखकाने स्पष्टीकरण देऊन उपयोग नसतो. उलट त्याने आपली बाजू मांडणे हे कसं उद्धटपणाचं आहे हे त्याला दाखवून दिलं जातं. त्यावेळची भाषा सभ्य असते असं आपलं म्हणायचं. त्याला इतर कुणी आक्रस्ताळेपणा म्हणू शकत नाही. उलट लेखकाचीच उर्मटपणाबद्दल तक्रार केली जाते. कधी उघड कधी पडद्यामागून. मग त्याचं लिखाण आलं रे आलं की मग घोस्ट ऑफ जॉर्जिया क्लबकडून हाँटिंग इन कनेक्टीकटचे प्रयोग सुरू होतात. कधी कधी त्यातून लेखकाचा आयडी ब्लॉक देखील होतो + "बरोबर २" correct and agree
ऑनलाईन येऊन ग्रुपिझम करणं,
ऑनलाईन येऊन ग्रुपिझम करणं, नवीन सदस्य मायबोलीवरुन घालवण्याचा प्रयत्न करणं असं कुठलाही नॉर्मल माणूस तरी करणार नाही. कोणी असं करत असेल तर प्रत्यक्ष आयुष्यात काहीतरी lacking वा missing असणं, दुसरं काही ऑफ-लाईन सोशल नेटवर्क नसणं, व त्यामुळे माबोवरच्या आपल्या कंपूच्या बाबतीत पझेसिव्ह व इनसिक्युअर वाटणं असं होत असावं. आपण या मेम्बर्सची मानसिकता समजून घेऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं.
हेच attention seeking आयडीज बद्दलही म्हणता येईल. इग्नोअर मारणे इतकंच पुरेसं असतं instigate करणाऱ्यांची हवा काढायला.
यांच्यामुळे जे चांगलं आहे त्यावरुन नजर हटवू नका!
ऑनलाईन येऊन ग्रुपिझम करणं,
ऑनलाईन येऊन ग्रुपिझम करणं, नवीन सदस्य मायबोलीवरुन घालवण्याचा प्रयत्न करणं असं कुठलाही नॉर्मल माणूस तरी करणार नाही. >> हे करणार माणसं नॉर्मल आहेत की नाही हे त्याच लोकांना ठाऊक पण हे सातत्यानी मी स्वतः अनुभवतीय.
मी काहीही चुकीचे लिहिले नसताना काही "जुन्या जाणत्या "आयडी नी मला मानसिक त्रास देण्यात धन्यता मानली.
बर असाही नाही की मी त्या लोकांच्या धाग्यांवर किंवा प्रतिक्रियांवर कधी नेगेटिव्ह प्रतिक्रिया दिलीय. तरीही हे लोक मला विनाकारण त्रास देतायेत.
नवीन आयडी ना त्रास देण्यात ह्या सगळ्यांना काय आनंद मिळतं असेल???
की मी कोणत्याही कंपूचा भाग
की मी कोणत्याही कंपूचा भाग नाहीय हा माझा दोष आहे.??
दुर्लक्ष दुर्लक्ष तरी किती दुर्लक्ष करणार??
आता का बर त्या आयडी पैकी
आता का बर त्या आयडी पैकी कोणीच प्रतिक्रिया देत नाहीय?
त्या पैकी कोणी माझी ही प्रतिक्रिया वाचली नाही असे तर होणे अशक्यातली बाब आहे.
"वाचू आनंदे " वर मी एक वाक्य काय लिहिले विनाकारण सगळे. मला टार्गेट करायला लागले बर मी तसं का लिहिलं हयाच कॅलरीफिकेशन देऊनही परत तोच तोच मुद्दा घेऊन बसले...
मग आता इकडे का नाही कोणी फिरकतंय??
तान्हाजी च्या धाग्यावरही असाच अनुभव आला.
नवीन आयडी ना लिहू न देणे ही काय मानसिकता आहे???
I mean seriously..
मी डाएट करीत आहे त्यामुळे मी
मी डाएट करीत आहे त्यामुळे मी कॅलरी conscious झालो आहे.
Pages