बदललेली मायबोली

Submitted by अग्निपंख on 26 May, 2014 - 00:44

मायबोलीचा सदस्य होउन आता पाच वर्ष होतील. सुरुवात झाली होती बर्मिंगहम विद्यापिठात प्रकल्पाच्या कामासाठी असताना, एकदा सहज काही मराठी वाचायला मिळतय का हे अंतरजालावर शोधताना मायबोलीची लिंक मिळाली (गुगलचे ऋण फेडने अशक्य आहे Wink ). विनोदी कथा, रहस्यमय कथा वाचताना वेळ कसा जायचा हे कळायचदेखिल नाही. बेफि, कौतुक शिरोडकर, चाफ्फा (कवठीचाफा ?), विशाल कुलकर्णी आणखी बर्‍याच लेखक मंडळींची धमाल असायची माबोवर. हळुहळु माबोकरांच्या ओळखी व्हायला लागल्या. कट्ट्यावर रोज गप्पांची मैफिल जमवता आली.थोडी हिंमत करुन मी पण एक-दोन लेख लिहिले, थोडीफार जमलेली चित्र पोस्टली. एकंदरीत सब कुछ अच्छा चल रहा था..
पण काही दिवसांपासुन काहीतरी बिनसलय, विनोदी कथा फारशा कोणी लिहित नाही, इतर प्रकारच्या कथाही जास्त येत नाहित. गेले काही दिवस ईतर प्रकार मात्र खुप जोरात चालु आहेत. जात, धर्म, राजकारण यावरुन गटबाजी, जहरी टिका, भांडणं, भांडणात एकमेकांवर शिव्यांची बरसात. ह्याशिवाय अजुन एक म्हणजे माबोवर ड्युआयडींचा फारच सुळसुळाट झालेला आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट, बहुतेक ड्युआय येतात ते एकतर काहीतरी आचरट किंवा न पटणारं लिहिण्यासाठी किंवा एखाद्याची टर उडवण्यासाठी. काही नविन लेखक पदार्पणातच वादग्रस्त विषय (प्रचंड अशुद्ध लेखनासहित) घेउन येतात, आणि त्यावर तिखट प्रतिक्रिया आल्या की मग व्यक्तिगत टिका करणे, असभ्य भाषेचा वापर आणि नंतर अ‍ॅडमिनने येउन धागा बंद करणे इथपर्यंत हा प्रवास चालतो. काही धागा लेखकांना (नाव लिहिण्याची गरज नाही, माबोकर सुज्ञ आहेत, समजुन घेतिल) तर खरच मानसिक उपचारांची गरज आहे हे लिखान वाचुन लक्षात येतं (घातक वाक्य.. आता ह्यावर जबरी प्रतिक्रिया येणार)..
तर असो, माबो परत चांगल व्हावं अस वाटलं म्हणुन हा लेख.
तुम्हाला काय वाटत, होउ शकतं मायबोली पहिल्यासारखं चांगलं? काय कराव लागेल त्यासाठी? लेख सर्वांसाठी प्रसिद्ध करण्याअगोदर काहीतरी चाळणी असावी का?
टिप : कोणाही व्यक्तीविरुद्ध हा लेख नाही, भावना दुखावण्याचा उद्देश नाही, तसं वाटल्यास कळवा, धागा खोडून टाकता येइल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, श्वानप्रेमी आणि श्वानद्वेष्टे यांच्यामधलेही लोक असू शकतात. कुत्र्यांची भीती वाटणे किंवा जवळीक न आवडणे, त्यांचे (खरंतर मालकांचे) सार्वजनिक ठिकाणचे वर्तन न आवडणे म्हणजे कुत्र्यांचा द्वेष करणे नव्हे.

असो. अवांतर प्रतिसाद Happy

३-४ मोबा नंबर...३-४ डुआय...एवढेही पुष्कळ आहेत त्रास द्यायला.लॉग इन चार्जेस व्यतिरीक्त काही व्यक्तिगत परंतु युनिक माहीती मागायला हवी.कोणती ते ठरवा.उदा.एखाद्याचा मोबा.नंबर.तर मग तो त्याच्या नावाशी पडताळून बघता येईल अशी सिस्टम हवी.एकापेक्षा अधिक सारख्या नावांची पडताळणी हवी.तशी अकौंटस असतील तर त्यातही व्हेरीफिकेशन ठेवायला हवं.अ‍ॅड्रेस व्हेरीफिकेशन ठेवता येईल का? किंवा युनिक मायबोली मेंबरशीप कार्ड्?एक स्टँडर्ड सिस्टम.थोड्या खर्चाची तयारी ठेवायला हवी एवढंच.

फोनवर बोलून व्हेरीफिकेशन करण्याचा पर्याय वेळखाऊ ठरेल व खात्री किती देता येईल त्याची?

नवर्याकडे फोन आहे. बाय़्ओकडे आइकडे मुलाकडे फोन नाही. म फोन नम्बर लोगोन ने लोगिन करायचे म्हटले तर कसे करणार? का निस्त्या मायबोलिसाठ घरात चार लोक असतील तर चार सिम कनेक्श्न घ्यायची का?

लगो, आय अ‍ॅम कन्फ्युज्ड... नवर्याकडे फोन आहे>>तुम्ही एक जनरल उदाहरण देताय की तुमच्याबद्द्ल सांगताय?

मायबोलीसाठी लगोसर एक नवं सीम आपण घेऊ शकतोच ना? बरोबर ना? आणि तेही स्वस्तात मिळतं आजकाल...बघा म्हणजे पटतय का...

काय चाल्लंय काय? अ‍ॅडमिननी हेच करत बसायचं का? ज्याला त्याला जबाबदारीने वागता आलं पाहिजे ना? त्यापेक्षा ड्यु आय वापरायचेच असतील तर चांगल्या गोष्टीसाठी वापरा (जसं पराग स्पोर्ट्सवरचे कुठले धागे उघडायचे झाले तर adm ह्या आयडीने उघडतो आणि दोही आयडी त्याचेच आहेत हे लपवायची त्याला गरज भासत नाही). एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी ड्यु. आय. कशाला? मतभिन्नता असली आणि कन्स्ट्रक्टिव्ह वादविवाद घालायचे असतील तर लपून छपून कशाला? हे म्हणजे आण्विक उर्जा विकासासाठी न वापरता मास डिस्ट्रक्शनसाठी वापरली जाते तसंच वाटतंय कारण कुठल्याही विभागातला धागा असो, हे विद्वेषाने भरलेले/भारलेले ड्यु.आय. जिथे जिथे एकमेकांसमोर येतील तिथे त्या धाग्याचं, धाग्याच्या प्रयोजनाचं डिस्ट्रक्शन आहेच.

आणि एखादी व्यक्ती ड्यु.आय. सक्सेसफुली हेवेदावे निभावण्यासाठी, निव्वळ न पकडले जाता वापरण्यासाठी इतके सिम्स घेऊ लागली तर ती व्यक्तीला मॅनिया आहे असंच म्हणावं लागेल दुर्दैवाने.

आजकाल नुसते सिम घेउन चालत नाही. महिन्याला किमान रिचार्ज किंवा एखादा कॉल असावा लागतो

लगो, तेच तर! चुकीच्या हेतूसाठी माणूस वाट्टेल ते करु लागला तर नुकसान त्या माणसाचंच आहे. नुसतं रिचार्जच्या पैश्यांच नाही, एकंदरच मानसिक अवस्थेचंही.

जेव्हा दोन डु आयडी एकमेकांना "तू अमक्याचा डु आयडी" आहेस म्हणत भाम्डतात, मग तिसराच डु आयडी येऊन त्या दोघांना डु आयडी म्हणतो. मग चौथा एकमेव आयडी येऊन काही म्हणाला की, "म्हाइइताय तुझा अमुक तमुक डु आयडी आहे" हे आधीचे तिघेही ठणकावून सांगतात...
अशावेळेला समजावं की त्या तीन आयडींकडे करण्यासारखी काहीही नाही. म्हणून आयुष्यातला इतका वेळ ते मायबोलीवर घालवू शकतात. आणि मग आपण दुर्लक्ष करावं.

ज्यांचे डुआय नाहीत त्यांना याचा त्रास होत असेल याचं काय्?
आणि अश्विनीके चुकीच्या हेतूसाठी कुठे करतोय हे...? लगोंनी घरातल्या माणसांसाठी म्हटले ना...म्हणून सांगितला सीम खरेदीचा पर्याय...
आणि एकजण चांगल्या गोष्टीसाठी वापरत असेल तर बाकीचे त्यासाठीच वापरतील कशावरून्?

विज्ञानदास, ड्यु.आय. शोधून काढून त्यांच्यावर लगाम घालण्यासाठी इथे अ‍ॅडमिनला उपाय सुचवले जात आहेत त्यात त्या उपायांवर मात कशी करायची ह्यासंबंधात जे अनेक सिम्स वापरले जातील, त्याबद्दल बोलतेय मी.

तेच तर सांगतोय.बाकी उपाय तर बरेच सांगून झाले आहेत.इथल्या 'बहुतांश' चर्चांसारखी ही चर्चा फ्रूटलेस व्हावी म्हणजे झाले... Sad .....

दुका....

दुका
जस ड्युआयडी म्हणजे एक माणूस दोन ओळखी, तसं डमी म्हणजे एक ओळख आणि दोन माणसं. थोडक्यात एक मनुष्य डमी.

एका कम्युनिटीवर तिथल्या बाईने तिच्या ईमेलवर फोन नंबर, नाव दिल्याशिवाय प्रवेश नाही असा नियम काढला. मग ज्यांच्याकडे फोन नंबर आहे (असतोच) पण या कम्युनिटीत काही इंटरेस्ट नाही अशां कॉलेजकुमारांचे, मित्रांचे, मैत्रिणींचे फोन नंबर्स, नाव, पत्ते दिले जायचे. कॉलेजचीच पोरं ती, फोन आला की व्यवस्थित उत्तरं द्यायची आणि इकडे त्यांचा पासवर्ड वापरून खातं जुनेच लोक चालवायचे. मग १८-१९ वर्षाची मुलं भगवद्गीतेवर विद्वत्तापूर्ण भाषणं ठोकताहेत, कुणी उच्च कोटीचं साहीत्यिक लिहीतंय, कुणी कवितेवर अभिप्राय देताना वृत्त, मात्रा, रसग्रहण याबद्दल बोलतंय असं चित्र दिसायचं. शिवाय वयाच्या मानाने उपदेशपर भाषा, वादविवादातलं कौशल्य, कम्युनिटीच्या इतिहासाची माहीती हे थक्क करणारं असायचं.

ता.क. : काही आयपी अ‍ॅड्रेसवरून सदस्यत्व घेता येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

चर्चा ड्युआयडी वर आली की मग तिथेच थांबली, मूळ विषय काहीही असो तो भरकटतोच. लोकांना या प्रकाराचे खूप आकर्षण असते. अगदी जे ड्युआयडी बनवत नाहीत अश्याही बरेच जणांना कोणाचा कोणता आहे या भानगडीत रस असतो. त्यामुळे या प्रकाराला कधी मरण नाही. उलट जितके दाबायला बघाल तेवढे हे आव्हानात्मक होऊन ते बनवण्यातील, वापरण्यातील, लपवण्यातील रंगत वाढत जाते. बाकी ड्यूआयडी हि संकल्पना उगाचच बदनाम आहे, ती वाईट नसून त्यामागची माणसे चांगली किंवा वाईट असतात.

हे कुठेतरी वाचलं होतं-

Two bulls always fight in your mind...
Negative thinking and positive thinking

Do you know which one wins in the end?
.
.
.
.

The one you feed the most.

------------------------------------------

तुम्हाला नको असलेले लेखन दिसायला नको असेल तर प्रतिक्रिया वाचायला देखील तो बाफ उघडू नका. हवे असलेले चांगले बाफ, चांगले लेखन चर्चेत आणा. ते खोदून वर काढा. तुम्हीही चांगले लिहा.

(हे इथे आधीच 'क्ष' लोकांनी 'य' वेळा लिहून झालं आहे. मी य+१ व्यांदा लिहिलंय.)

गजानन, असं नसतं रे... कविता, गझला फारशा आवडत नाहीत तर त्या टाळून जाता येतं.
पण राजकारण, अर्थकारण अशा गोष्टींवर बर्‍याच जणांना मनापासून कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा करायला, वाचायला हवी असते. तिथे नेहेमीचे यशस्वी ४-५ जण येऊन मासळीबाजार बरा अशी अवस्था करतात. म्हणजे यांना भांडायला मजा येते, तेवढा रिकामेपणा असतो म्हणून त्यांच्या उपद्रवाला कंटाळून बाकीच्या सिन्सिअर लोकांनी या बाफांना कायमच टाळायचं का? बरं तिथे येऊन मुद्देसूद वाद बाजूला राहिले तर एकमेकांची वैयक्तिक उणीदुणी काढणं, काहीही भाषा वापरणं अगदी सर्रास करतात... नको नको होतं अगदी. त्यांच्या पोस्ट्समधे बहुतेक माबोकरांना काडीचाही रस नाही हे त्यांना कळत नाही का काय देव जाणे. अ‍ॅडमिनने हाकलेले आयडीजसुद्धा नव्याने येऊन जास्तच उच्छाद मांडतात..

अ‍ॅडमिनला स्वतःचे उद्योगधंदे असतात, चोवीस तास यांचीच घाण साफ करणं हे त्यांच्याही आवाक्याबाहेरचं आहे. डिसगस्टिंग!!

हे वेग वेगळे प्रोब्लेम्स आहेत.
- डू आय
- फालतू किंवा कुचकामी लेख
- चांगल्या लेखावरची फालतू प्रतिक्रिया
- चांगल्या लेखावरील चर्चा नि मग मारामार्या
पैकि पहिल्या ३ वर मी एक उपाय सांगितलेला आहे. पण चांगल्या लेखावर आधी चर्चा सुरु होऊन मग मारामार्या होण हे प्रकार प्रत्येकाला जबाबदारीनेच थांबवावे लागतील. प्रत्येक प्रोब्ल्मे ला उपाय योजण अव्ह्घड आहे नि ते अपेक्षित सुद्धा नाही.

चला 'गुलमोहर' ला बहर आला थोडा तरी.. Happy
ललिता-प्रीति, अमोल परब, गंधा, तुमचा अभिषेक,विज्ञानदास, फूल सर्वांना धन्यवाद...
नविन कथा आल्या आहेत, अजुन वाचल्या नाही वेळ मिळाला की वाचेनच..

वरदा +1

राजकारण चालू घडामोडिचे बाफ इतके प्रेडिक्टेबल झालेत की विचारता सोय नाही
तेच ते मुद्दे घेऊन बोलत राहतात
काही जण इतक्या शेलक्या भाषेत बोलतात की नक्की खरच शिक्षण घेतलेले आहेत का हां प्रश्न पडतो

ब्रह्मांड आठवले | 29 May, 2014 - 15:55 नवीन
ता.क. : काही आयपी अ‍ॅड्रेसवरून सदस्यत्व घेता येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

<<
म्हणजे?

वरदाशी सहमत. ज्या विषयांत इंटरेस्ट नाही ते टाळता येतात. पण राजकीय, सामाजिक गप्पांमधे पहिल्या काही पोस्ट्स नंतर मुद्दे बाजूला राहून नुसती शिवीगाळ शिल्लक राहते. त्यात अशा पोस्ट दिसल्या की बाफला टाळे तरी लागणार नाहीतर उडवला जाणार हे माहीत होते त्यामुळेही तेथे काही लिहिण्यात इंटरेस्ट राहात नाही.

चला 'गुलमोहर' ला बहर आला थोडा तरी..>>> सगळ्या मुद्यांना बगल मारूनही ? मग तर खरंच बहर आला !!
(या मुद्यांवर कुणी काही विचार करावा अशी अपेक्षा नाही हे आधीच स्पष्ट केलं होतं म्हणा)

सगळिच चुक डु आयडी किव्वा डमी आयडी यान्ची नाहिय. मायबोलीवरील काहि जुने आयडी 'मी पणा' करन्यात पुढे आहेत. मी जुना आयडी, तो नवीन, तो महिन्याचा असा भेदभाव करण्यात ते पुढे असतात. कोणती पोस्ट चान्गली आणि कोणती चुकिची हे ते स्वताच ठरवतात. दुसर्याच्या पोस्टवर लिहिण्याआधी विचार करावा हे हि त्यान्ना समजत नाहि. बाकिच्या टिकान्च सोडाच पण दुसर्याच्या पोस्टवर 'ईग्नोर करा' असे लिहितानाहि काहिच वाटत नाहि. दुसर्याच्या पोस्टवर असे लिहिणे म्ह्नजेच त्यावर टिका करणे, टर उडवणे नाहि का? तुम्हाला नाहि पटत, मग नका देऊ प्रतिसाद आणि द्यायचाच असेल तर टिंगलटवाळी न करता हि देता येतो कि. पण नाहि एकत्र येऊन टिका करायची असते. यालाच म्हणतात गटबाजी.
शिवाय या पोस्टला एवढे प्रतिसाद का? हे काहि त्या दर्जाच लिखान नाहि म्हणुन आकांडतांडव करणार्यान्ची हि काहि कमी नाहि.

मग हे व्यक्तिगत टिका करतात, असभ्य भाषेचा वापर करतात. मग कुणाला आजोबा म्हणतात, डोक्यावर पडलेले म्हणतात, अजुन खुप काहि असत पण ति त्यान्ना टिका वाट्त नाहि कारण ते जुने आयडी असतात. खुप लिखान केलेले असत. चान्गल म्हणाच माझ्या लिखानाला अशी सक्ती असते नाहितर तु गटात नाहिस.चान्गल लिहायच, चान्गल खायच. गटात राहायच. आक्षेप घ्यायचा नाहि, घ्यायचा असला तरी.
मग ह्यानच्या टिकेला जशास तसा प्रतिसाद आला कि भांडणं सुरु करतात. त्यानन्तर हे अ‍ॅडमिनला धागा बंद करण्यासाठी साकड घालतात.

जुन्या आयडीन्च लिखान प्रग्ल्भ असत, चान्गल असत मान्य पण म्हणुन त्यान्नी काहिहि बोलाव अस होत नाहि. दुसर्याच्या पोस्टवर 'तु डु आयडी आहेस कारण तु वादग्रस्त विषय घेऊन आलास' अस म्हणने म्हणजे आचरट बोलने नाहि का ? शेवटि विषय हे वादग्रस्त नसतातच. तुम्हि त्याला वादग्रस्त बनवता. प्रतेकाची मत वेगळि, विचार वेगळे, अनुभव वेगळे म्हणुन लिखानातहि वेगळे विषय असनारच.

बघा. तुम्हि सान्गितलेल्या सगळ्या गोष्टी कोन करतायत ते.

Pages