बदललेली मायबोली

Submitted by अग्निपंख on 26 May, 2014 - 00:44

मायबोलीचा सदस्य होउन आता पाच वर्ष होतील. सुरुवात झाली होती बर्मिंगहम विद्यापिठात प्रकल्पाच्या कामासाठी असताना, एकदा सहज काही मराठी वाचायला मिळतय का हे अंतरजालावर शोधताना मायबोलीची लिंक मिळाली (गुगलचे ऋण फेडने अशक्य आहे Wink ). विनोदी कथा, रहस्यमय कथा वाचताना वेळ कसा जायचा हे कळायचदेखिल नाही. बेफि, कौतुक शिरोडकर, चाफ्फा (कवठीचाफा ?), विशाल कुलकर्णी आणखी बर्‍याच लेखक मंडळींची धमाल असायची माबोवर. हळुहळु माबोकरांच्या ओळखी व्हायला लागल्या. कट्ट्यावर रोज गप्पांची मैफिल जमवता आली.थोडी हिंमत करुन मी पण एक-दोन लेख लिहिले, थोडीफार जमलेली चित्र पोस्टली. एकंदरीत सब कुछ अच्छा चल रहा था..
पण काही दिवसांपासुन काहीतरी बिनसलय, विनोदी कथा फारशा कोणी लिहित नाही, इतर प्रकारच्या कथाही जास्त येत नाहित. गेले काही दिवस ईतर प्रकार मात्र खुप जोरात चालु आहेत. जात, धर्म, राजकारण यावरुन गटबाजी, जहरी टिका, भांडणं, भांडणात एकमेकांवर शिव्यांची बरसात. ह्याशिवाय अजुन एक म्हणजे माबोवर ड्युआयडींचा फारच सुळसुळाट झालेला आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट, बहुतेक ड्युआय येतात ते एकतर काहीतरी आचरट किंवा न पटणारं लिहिण्यासाठी किंवा एखाद्याची टर उडवण्यासाठी. काही नविन लेखक पदार्पणातच वादग्रस्त विषय (प्रचंड अशुद्ध लेखनासहित) घेउन येतात, आणि त्यावर तिखट प्रतिक्रिया आल्या की मग व्यक्तिगत टिका करणे, असभ्य भाषेचा वापर आणि नंतर अ‍ॅडमिनने येउन धागा बंद करणे इथपर्यंत हा प्रवास चालतो. काही धागा लेखकांना (नाव लिहिण्याची गरज नाही, माबोकर सुज्ञ आहेत, समजुन घेतिल) तर खरच मानसिक उपचारांची गरज आहे हे लिखान वाचुन लक्षात येतं (घातक वाक्य.. आता ह्यावर जबरी प्रतिक्रिया येणार)..
तर असो, माबो परत चांगल व्हावं अस वाटलं म्हणुन हा लेख.
तुम्हाला काय वाटत, होउ शकतं मायबोली पहिल्यासारखं चांगलं? काय कराव लागेल त्यासाठी? लेख सर्वांसाठी प्रसिद्ध करण्याअगोदर काहीतरी चाळणी असावी का?
टिप : कोणाही व्यक्तीविरुद्ध हा लेख नाही, भावना दुखावण्याचा उद्देश नाही, तसं वाटल्यास कळवा, धागा खोडून टाकता येइल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मान्य आहे काही जण घरात शिरलेल्या भिजलेल्या उंदरासारखे आहेत पण ते तुमच्या पुस्तकांच्या उबेच्या आशेने आत येतात .एक दोन पडलेले कागद खराब करतील एवढेच .जाऊ द्या .

अग्निपन्ख सहमति बद्दल धन्यवाद.

>>>>अमित म - तुम्ही म्हणताय तसे केले तर काही आयडी स्वतः अत्यंत बाष्कळ लिखाण करून त्यावर इतरांनी दिलेले चांगले प्रतिसाद काढून टाकतील.इग्नोरास्त्र वापरणे हेच चांगले

@वेल You need to decide whether you want to be a part of problem or a part of solution. अहो आत्तातरी फुटकळ लेखनाला आळा कोणीच घालू शकत नाही. आत्तादेखील तद्दन फालतू वाटणारे लेख प्रकाशित होत आहेतच ना आणि इग्नोरस्त्राचा वापर आपण जेव्हा गरज पडेल तेव्हा करतोच. पण डु आय वापरून सुंदर लेखांवर देखील फालतू commnets मारणार्यांच काय. फालतू लेखावर टीकात्मक comments नसण्यपेक्षा चांगल्या लेखांवर अत्यंत वाईट comments असणे अधिक घातक नाही का!

म्हणन आधी सुचवल्याप्रमाणे आपल्या लेखावरील प्रतिसाद प्रकाशित करण्याचे स्वातंत्र्य लेखकाला देण हा पर्याय practical वाटतो. तसच फुकटात हि साईट वापरायला मिळते तेव्हा लेखक म्हणून प्रत्येकावर स्वत:च्या लेखांवरील प्रतिक्रिया तपासून पब्लिश करण्याची जबाबदारीही असेलच Happy आणि मला खात्री आहे कि लेखक ती नक्की पार पाडतील.

दुसरा फायदा असा कि प्रत्येक जण ठरवून वाईट लेख लिहित नाही पण तो हळू हळू शिकत जातो. तेव्हा जर का त्याच्या पहिल्याच लेखनावर कोणी जहरी टीका केलीच तर तो एकदम खचून जाऊन लिखाण बंद करतो. हा धोकापण आपोआप कमी होइल.

यात काय ते नविन? नेहेमीच होते असे. जुन्या माबोवर एक V&C होता तो बेष्ट होता. अ‍ॅडमीन परत आणा. त्यावर अशा वादाच्या चर्चा चालत असत. एक सोप्पे होते तो अक्खा V&C इग्न्रोर करता येत असे. Proud

जे चांगले लिहितात तेही पहिल्यांदा 'अनोळखी'च होते इतर आयडींसाठी. >> हे वाक्य अर्धवट आहे असं समजून ते पूर्ण करुयात.

"जे चांगले लिहितात तेही पहिल्यांदा 'अनोळखी'च होते इतर आयडींसाठी. त्या वेळी जर त्यांचं लिखाण चांगलं असेल तर भरपूर प्रतिसाद मिळतो. पण जसजसा हा आयडी रुळायला लागतो, तसं त्याला इथल्या संभाषणात, गप्पांच्या धाग्यात सहभाग नोंदवावासा वाटतो. एकदा त्याची मतं कळाली, त्याने आपल्याशी वाद घातला ,त्याने विरुद्ध कंपू जॉईन केला कि मग तो आयडी मनातून खर्रकन उतरतो. मग त्याच्या लिखाणाला प्रतिसाद द्यावासा वाटत नाही. कालपर्यंत आवडणारं त्याचं लिखाण आज अचानक आवडेनासं होतं."

बरोबर.

त्यामळे , प्रत्येक आय डीच्या प्रोफाइलवर खालील गोश्टी लिहिणे सक्तीचेकरावे.

गान्धीवादी / द्वेश्टा
सावरकरवादी / द्वेश्तआ
निवासी / अनिवासी
पुरुशवादी / स्त्रीवादी
ब्राह्मण / अब्राह्मण
हिन्दु / इतर

हे वाचुन म योग्य तो कम्पु प्रतिसाद देउ शकेल. लिम्ब्याला विचारुन ब्रिगेडी / नक्षली /अनिस / सनातन / बुप्रा असे अनेक ऑप्शन अजुन घेता येतील

त्यामळे , प्रत्येक आय डीच्या प्रोफाइलवर खालील गोश्टी लिहिणे सक्तीचेकरावे.
<<
जामोप्या,
प्रोफाइलातल्या देशात भारत ऐवजी हिंदुस्तान दिसलं, की पाकिस्तानात जाऊन यावं एकदा. बाकी फाफटपसार्‍याची गरज नसते. या कोणताहीस्तानवाल्यांचं काय करावं ते समजेल त्यादिवशी मला मोक्षप्राप्ती होईल Wink
असो.
*
दुकानभौ,
Do I = कर मी.
इथे मी करतो ते मी केलेच नाही असे भासवण्यासाठी जे मी करतो, त्या कर्मविपाकाला कर्मी उर्फ डूआय असे म्हणतात. हे असे करण्यासाठी सुरुवातीच्या काळात लोक प्रॉक्षी वगैरे वापरतात. अन विंग्रजी टाईप करतात. असो. माबोवरच्या शॉर्टफॉर्मचा एक धागा होता कुठेतरी. धोब्रि, लुब्रि असे शब्द त्यात होते. पण तो जुना इतिहास आहे. आजकालच्या क्रांसकाच मधे मी बराच पुढे आहे हे नमूद करतो. Wink

लक्श्मीकांत दा आभार.

हे इब्लिस काय च्या कायच डायलॉग हाणतं आर्टफिल्मसारख. प्रोक्सी घेउन बसलय काय कळत नाहि. डोक्टर पण कोंग्रेस अधिकारी पन. पन बगाव तेव्हा इथच दिसतय. कधि येवडी काम करत असल काय माहित.

सातीची पहिल्या पानावरची पोस्ट जवळपास सगळी पटली. व्हॉलंटरी संपादक ही कल्पना तितकीशी पटली नाही. कारणं दोन -
१. हे संपादक आपल्या मर्जीतल्या लोकांना फेवर करतात ही चिखलफेक सतत होत राहील. मग भले ते खरे असो किंवा नसो. आणि त्यामुळे कालांतराने ते संपादक पळून जातील.
२. ते खरोखरच आपल्या मर्जीतल्या लोकांना फेवर करतीलही आणि मग आत्ताचे प्रश्न जास्त उग्र रूप घेतील.

पूर्वीच्या मॉड्सनी पण कमी वाग्बाण झेलले नसतील याची पूर्ण खात्री आहे.

काहीतरी IP tracking ठेवता आलं तर सभासदत्व देण्याच्या वेळीच डुआयडीज फिल्टर करता येतील. किंवा नवीन मेंबर्सना सभासदत्व घेतेवेळी आपापली ओळख देणं अपरिहार्य करावं. सध्यातरी दुसरा काही मार्ग सुचत नाहीये.

मायबोली पूर्वीसारखी व्हावी असं खरंच मनापासून वाटतं. त्यासाठी ट्री व्ह्यू च करायला हवा असं काही नाही. प्रत्येकाने इथे लिहीताना थोडंसं तारतम्य बाळगलं तरी ती चांगली होऊ शकेल. बरेचजणं मायबोलीवर सूड काढायला आल्यासारखे लिहीत राहतात असंच वाटतं आजकाल.

आय पी अ‍ॅड्रेसवरुन डु आय डी कसा शोधनार? एकाच घरातील ३ लोक एकच काम्प्युट्र किन्वा एकाच नेट क्याफेतुन काही लोक वापरत असतील तर...

इथं जाणून बुजून खोडसाळपणा करणार्‍यांबाबत 'इग्नोरास्त्र' व जोडीला ' खळांची व्यंकटी सांडो ' ही प्रार्थना
यापलिकडे मला तरी कांहीं उपाय दिसत नाहीं.

>>>> लिम्ब्याला विचारुन ब्रिगेडी / नक्षली /अनिस / सनातन / बुप्रा असे अनेक ऑप्शन अजुन घेता येतील <<<<
च्यामारि मला कशाला मध्यात ओढताय? Wink
तृतियपन्थियान्चाही एक ऑप्शन विचारार्थ घ्या तुम्ही, हल्ली त्यान्नाही कायद्याने ओळख आहे, कसे? Proud

ट्री व्ह्यू हवाच्च हवा.
त्यामुळे......
ठराविक विषयात झटदिशी जाता येत असे
ठराविक आयडीन्चे लिखाण सहजगत्या एका नजरेत दिसत असे व फॉलो करता येत असे
विशिष्ट आयडी/विषय टाळता येत असत
चालू रन्गलेल्या चर्चा ठळकपणे सहज दिसुन येत (व नेमके तिथेच जाऊन नाक खुपसता येत असे)
कोणत्याही आयडीला ठरवुन फॉलो करता येत असे.

मायबोलीच्या मेंबर लोकांचे सॉर्टींग करणे हा एक पर्याय आहे...बंद असलेली,बरेच दिवस्/महिने कोणतेही अ‍ॅक्टिव्हीटीज नसणारी अकौंटस उडवली पाहीजेत.तुम्ही थोडे चार्जेस आकारू शकता (हे वरही कुणी सांगीतले आहे.)त्यामुळे लेखांना आणि प्रतिक्रिया देणार्‍यांना,दोघांचे मूल्य जपले जाईल.त्याची किंमत राहील.तसेच एक सेन्सॉर बोर्डासारखे काही नेमून लक्ष्य ठेवता येण्यासारखे आहे.

प्रतिक्रीया खोडण्याची सुविधा दिली तर लेखकाला न पटणारे चांगले वाचणीय प्रतिसाद सुद्धा डीलीटले जातील.

अ‍ॅक्टिविटी नसणे हे गैर नाही. त्या कारणाने आय डी का बन्द का करायचा? मला अपघात झाला तेण्व्हा दीड वर्श मी मायबोलिवर नवतो

पेड सर्विस आणि सभासदत्त्व देताना प्रत्यक्ष बोलून खात्री करून नंबर घेऊन मग सभासदत्त्व द्यावे.
ह्याने बराच त्रास कमी होईल हे नक्की

वेल ते प्रत्येकालाफोन करुन खात्री करुन घेणं प्रॅक्टीकली तितकंस पॉसिबल असेल असं वाटत नाही Uhoh

फोन नंबर कंपलसरी करावा आणि फोन नंबरनेच लॉगिन करता यावं असं काहीसं केलं तर फरक पडू शकेल का?
म्हणजे-
यामुळे आपलं सभासदस्यत्व स्थगित करण्याची 'भिती' (जी आत्ता नाहीये.. मेलेलं कोंबडं आगीला घाबरत नाही म्हणूनाणखी डु आय काढुन सेम वर्तन ठेवणारे कित्येक आहेत माबोवर) राहील लोकांना आणि डु आय जरी घेऊन यायचं म्हणलं तरी एखाद्याकडे ३-४च फोन नंबर असतात मॅक्स टू मॅक्स.... आणि फक्त डुआय काढायचा म्हणून कोणी नवे नवे नंबर घेत बसणार नाही (अनेक ईमेल अकाऊंट काढु शकतात). राहिला प्रश्न अतिशय वाईट वर्तनाचा तर एखादा आयडी धमक्या वगैरे देत असेल तर मोबाईल नंबरवरुन डिटेल मिळून पोलिस कारवाई होऊ शकते आणि त्यासाठी माबो प्रशासन मदत करेल याची त्याला जाणिव असेल तेंव्हा तो आधीच नीट राहील (अतिशय वाईट केसमध्ये म्हणतेय हे मी)

आता कोणाला वाटत असेल की मी का देऊ तर आपण रिचार्ज साईट वर किंवा बूक माय शो सारख्या साईट्स वर स्वतःचे नंबर देतोच की. तसच हे!

त्यामळे , प्रत्येक आय डीच्या प्रोफाइलवर खालील गोश्टी लिहिणे सक्तीचेकरावे.

गान्धीवादी / द्वेश्टा
सावरकरवादी / द्वेश्तआ
निवासी / अनिवासी
पुरुशवादी / स्त्रीवादी
ब्राह्मण / अब्राह्मण
हिन्दु / इतर>> shwan premi/shwan dweshi pan add kara.

त्यामळे , प्रत्येक आय डीच्या प्रोफाइलवर खालील गोश्टी लिहिणे सक्तीचेकरावे.
गान्धीवादी / द्वेश्टा
सावरकरवादी / द्वेश्तआ
निवासी / अनिवासी
पुरुशवादी / स्त्रीवादी
ब्राह्मण / अब्राह्मण
हिन्दु / इतर >>>>>>> बरोबर आहे. लक्ष्मीला अनुमोदन.

Pages