ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुत्रे आवडत नाहीत असे सांगितल्यावर आपल्या माणूसपणावर शंका घेणे, सहृदय नसण्यावर शिक्कामोर्तब करणे आणि त्या संदर्भाने जाता येता टॉण्टस मारणे हे ही घडताना बघितले आहे. अगदी माबोवर सुद्धा.

कुत्रे आवडत नाहीत असे सांगितल्यावर आपल्या माणूसपणावर शंका घेणे, सहृदय नसण्यावर शिक्कामोर्तब करणे आणि त्या संदर्भाने जाता येता टॉण्टस मारणे हे ही घडताना बघितले आहे. अगदी माबोवर सुद्धा.

>>> नी + १०००००००००

अजूनही वेळ गेलेली नाही, नी. येतील.

सुजा - तुम्ही आणि एकाच सोसायटीत राहातो की काय?<<<

अधिक खोलात जाऊ नका, दोघी एकच आहात हेही लक्षात येईल चुकून Light 1

सर्व कुत्रे वाईट असतात आणि कुत्र्यांचा नायनाट करा असं कोण म्हणतंय का इथे घाटपांडे? उगाच कसल्या काड्या लावताय?

बेंचवर कुत्र्यांना बसू देऊ नका हे खरंच ठामपणे सांगायला हवे अश्या लोकांना!

>>> काय बोलताय हे बेफी? त्यांच्या शेपटीवाल्या चारपायांच्या मुलांनी बसावं कुठे मग? परमेश्वरानी बेंचची निर्मिती अशा लाडक्या मुलांकरताच केलीये.

.

मामी,

हे मालक आणि निष्पाप कुत्रे ह्यांच्यापैकी जनावर कोण आणि माणूस कोण हाच प्रश्न आहे खरे तर! कुत्रे खरंच इतके वाईट नसतातच. (प्रकाश घाटपांडे - प्लीज नोट Happy )

बरं, ही गोष्ट अशी आहे की कुत्र्यांशी तर भांडता येत नाही आणि मालक मठ्ठ आणि अडेलतट्टू! वर पुन्हा अ‍ॅरोगंटही!

किती वैताग आहे हा Sad

मी तर ज्यांच्या घरी कुत्रं आहे त्यांच्या घरी जातच नाही. मी घरी यावे असं वाटत असेल तर त्याला साखळीने दुर बांधुन ठेवा नाही तर मी घरी यावे अशी अपेक्षा करू नका अशी विनंती असते माझी Sad

@ प्रकाश घाटपांडे
धाग्याच्या विषयाबद्दल आणि प्रतिसादातील मुद्द्यांबद्दल गोंधळ झालाय का तुमचा?

सगळी माणस जशी सारखी नसतात तसे सगळे भुभु पण सारखे नसतात.

>>>>> बरोबर. पण कुत्र्यांचे मालक बहुतेक करून एक सारखे असतात. आणि इथे आदर्श कुत्रे कसे असावेत याबद्दल कोणी बोलत नाहीये. कुत्र्याच्या मालकांनी इतरांचा जरा विचार करावा आणि आपलं श्वानप्रेम आपल्यापुरतं ठेवावं इतपतच म्हणणं आहे.

मुक्तेश्वर,

तुम्हाला खरे वाटणार नाही, पण मी कुत्र्यांना घाबरतो आणि इतकेच नाही तर अनेक कुत्र्यांशी भूतदयेने वागतोही, पण कुत्र्यांच्या मालकांचे वर्तन अत्यंत अस्वीकारार्ह असते असाच माझा तरी अनुभव आहे आजवर!

पण मी कुत्र्यांना घाबरतो
>>>
मी पण

आणि इतकेच नाही तर अनेक कुत्र्यांशी भूतदयेने वागतोही
>>>

मी आजिबात नाही. मेरा बस चले तो मै सारे कुत्तोंको चुन चुन के मारू

अरे हात दुखेल आता, बास>> ती सुमेधाव्ही आहे धागा दमदार चालल्या बद्दल कुत्रे हातात हात घालत आहे

कुत्र्याच्या मालकांनी कसे वागायला हवे?

१. आपण श्वानप्रेमी आहोत म्हणजे सगळ्या जगाला कुत्री आवडतात असं नाही या सत्याचा स्विकार करायला हवा.
२. आपल्या लाडक्याला / लाडकीला आपली आणि आपल्याला आपल्या ला/लीची सवय आहे पण इतरांना तिचा लडिवाळपणा सहन होईलच असं नाही. त्यामुळे ला/लीला इतरांच्या अंगचटीस न जाण्याचे ट्रेनिंग देणे हे मालक म्हणून आपले कर्तव्य आहे याची जाणीव असायला हवी.
३. सार्वजनिक जागा ही आपल्या अथवा आपल्या ला/लीच्या तीर्थरूपांच्या मालकिची नसून इतरांकरता ती स्वच्छ ठेवणे हे जबाबदार नागरीक म्हणून आपले कर्तव्य आहे याची नोंद घ्यावी.
४. आपला ला/ली हे गुलाबाचं फूल नाही. त्याच्या/तिच्या अंगाला अत्यंत उग्र दर्प येऊ शकतो आणि त्यामुळे लिफ्टसारख्या छोट्या, बंदिस्त जागी इतर लोकांना त्यांच्या नाकावर रुमाल धरण्याचा हक्क आहे ही दाहक वास्तवता स्विकारावी.
५. कुत्रे आवडत नाहीत हा दुर्गुण नव्हे हे आपल्या डोक्यात ठसवून घ्यावे.

मंजुडी तुम्ही हसा जरुर हसण्यासारखाच किस्सा आहे , हे डोबरमॅन जातीचे कुत्रे धिप्पाड असतात ना त्यामूळे तर अंगाचे पाणिपाणी झाले होते.

डॉग डेझर / रिपेलन्ट अल्ट्रासॉनीक गॅजेट -
http://www.amazon.com/Pet-Parade-Dog-Repeller-Training/dp/B000E8O4UA/ref...

१००% खात्रीलायक उपाय नसला तरी बरेच वेळा काम होतं.
तिकडे भारतात असं काही उपलब्ध आहे का?

@मामी
>>धाग्याच्या विषयाबद्दल आणि प्रतिसादातील मुद्द्यांबद्दल गोंधळ झालाय का तुमचा? <<
नाही. माझी प्रतिक्रिया ही उस्फुर्त व आनुषंगीक होती. पण अगदी शब्दातच खेळायचे/पकडायचे झाले तर तुमचे म्हणणे बरोबर आहे.
>इथे आदर्श कुत्रे कसे असावेत याबद्दल कोणी बोलत नाहीये. कुत्र्याच्या मालकांनी इतरांचा जरा विचार करावा आणि आपलं श्वानप्रेम आपल्यापुरतं ठेवावं इतपतच म्हणणं आहे.<
हे ही मान्य
तुमचे पुढील ५ ही मुद्दे मान्य आहेत.
अवांतर- प्रत्येकवेळी मुद्देसुदच बोलायचे झाले तर माबो ची बँडविड्थ बरीच कमी होईल ना Happy Happy :

सायकलबाबत जे लिहीले आहे त्याबाबत प्रचंड सहमत...
मी देखील ऑफीसला सायकलने जाणे सोडून दिले ते केवळ रात्री येताना ७-८ भटक्या कुत्र्यांच्या कळपाने केलेले जीवघेणे पाठलाग अनुभवल्यानंतर...

कित्येक वेळेला मी त्यांच्या गल्लीतून जावे लागू नये म्हणून रात्री लांब लांबचे वळसे घेत घरी आलोय. अशा वेळी सगळ्या भटक्या कुत्र्यांचा नायनाट करून टाकावा असे खुनशी विचार मनात येत.

खरोखर या भटक्या कुत्र्यांचे काहीतरी केले पाहिजे.

ठाण्याला ब्रम्हांड काँप्लेक्स फेज-३ हा भु भुं चा फार मोठा अड्डा आहे. रात्री कीवा दुपारी कमी वर्दळ असताना बाईक वर कीवा पायी त्या रस्त्यावरून जाण्याची सोयच नाही. अक्षरश: ५०-६० कुत्री मागे लागतात..
ठाणे म.पा. चे कर्मचार्‍यांनी बरेच वेळेस त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला आहे.. डॉग वॅन आली की बरोबर कुठे गायब होतात कुणास ठाऊक. एखाद दुसरा भू-भू कसा बसा पकडल्या जातो. एकदा तर या कर्मचार्‍यांवरच हल्ला केला होता. Sad

Pages