ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद दुसरा अपवाद वगळता इथे कुणीही श्वानद्वेष्टे नाही. त्यांच्या मालकांबद्दल प्रामुख्याने तक्रारी आहेत. तसेच त्यांना पोसणार्‍या लोकांना नसलेल्या मॅनर्सविषयी.

प्रकाश घाटपान्डे वर सर्वानी जे लिहीले आहे त्यात त्यान्चा श्वान द्वेष उफाळुन नाही आलेला, तर वस्तुस्थिती मान्डली आहे. कुत्रे चावणे किती वाईट असते हे तुम्ही मायबोलीकर नितीन चन्द्र यान्च्या लेखनात वाचा, म्हणजे कळेल. माझ्या तर अन्गावर शहाराच आलेला.

सॉरी नितीन तुम्हाला या वादात नाही ओढायचे, पण लेखाची लिन्क मात्र तुमच्या परवानगी शिवाय देत आहे, त्याबद्दल माफ करावे.

http://www.maayboli.com/node/18433

आमच्या एरियात पण भटक्या कुत्र्यान्चा धुमाकुळ चालू असतो, मात्र हाकलले की पळुन जातात, घाबरतात. पण तरीही आम्ही मुलाना दूर ठेवतो, कारण चावले-बिवले तर काय करणार?

मला कोणत्याही कुत्र्याची भीती वाटते. मग ते लहानसे पॉमेरियन का असेनात! (पॉमेरियन्स तर जिवाच्या आकांताने ओरडून अश्या आवेशात अंगावर येतात की जणू आता ह्याला गिळलाच मी)!

पूर्वी दुचाकीवरून रात्रीबेरात्री जाताना गल्ल्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचे तांडे उभे असायचे. ते भुंकत मागे लागायचे. त्यावर सर्वोत्तम व एकमेव उपाय म्हणजे ब्रेक दाबून आहोत तिथेच थांबायचे, ताबडतोब निघून जातात. चारचाकी आल्यापासून रात्रीबेरात्री तीच घेऊन जातो अजूनही.

अनेकांच्या प्रतिसादांशी बेंबीच्या देठापासून सहमत! कुत्र्यांना काय समजणार? पण माणसं?

'काही करत नाही, काही करत नाही' असे मालक म्हणेपर्यंत ते धूड पोटर्‍यांशी सलगी करू लागलेले असते. आपला अर्धा श्वास वर आणि अर्धा खाली अशी अवस्था होते! आणखीन एक उपाय मी शिकलो होतो पूर्वी, तोही जालीम होता. लांबून कुत्रे येताना दिसले की सरळ जमीनीवर वाकून दगड उचलल्याची अ‍ॅक्शन करायची. ते घाबरून उलटे पळू लागते. आणि ते पाळीव असले तर ती अ‍ॅक्शन आणखीनच जोरात करायची म्हणजे मग मालकाच्या डोस्क्यात घुसते की आपल्या पोटच्या पोराबद्दल समाजाच्या मनात नेमके काय विचार आहेत ते! तिच्यायला त्या कुत्रेवाल्यांच्या!

एक अत्यंत नवलाईजनक पण तितकाच वास्तव मुद्दा अजून! हा मी चक्क करून बघितलेला आहे आणि शंभर टक्के वेळा यशस्वी ठरलेलो आहे. कुत्रे आपल्याकडे पाहून भुंकू वगैरे लागले (बांधलेले असो वा मोकळे) की आपण नजरेत असे भाव आणायचे की 'च्यायला बरा सापडला कुत्रा, आता ह्याला फाडूनच खातो आणि पोट भरतो'! करून बघा एकदा, सिरियसली सांगत आहे. कुत्रे शेपूट घालून शेमळटासारखे खाली बसते. त्याला काय माहीत की हा एक माणसाळलेला माणूस असून ह्याला सुळे, नख्या वगैरे नाही आहेत? त्याला आपण एक तूल्यबळ हिंस्त्र पशू वाटू लागतो. हसू नका, हे मी स्वतः करून अनुभवलेले आहे. आपल्या मनात भीतीने बोबडी वळावी असे का विचार असेनात, पण चेहर्‍यावर असे भाव ठेवायचे जणू हा कुत्रा मिळाला की पोटच भरेल आपले.

चेहरा वेगळा, भावना वेगळ्या, हीच आहे यशाची खरी पायरी
जेवढा काळजीयुक्त तू तेवढा चेहरा 'बेफिकिर' भासला पाहिजे

-'बेफिकीर'!

मालक्/मालकिणींचे काय करायचे किंवा त्यांच्याकडे कसे बघायचे हे सांगाल का बेफिकीर ? कुत्री समजुतदार आहेत, दगड उचलला की भानावर येतात पण त्यांना गोंजारत बेंचवर बसणार्‍या मालकांचे/मालकिणींचे काय?

बेफि - प्रयत्न करून पाहायला हरकत नाही

आजवर कधी कुत्र्याने मला आणि मी कुत्र्याला त्रास दिला नाही आहे. भटकी कुत्री आजूबाजूला दिसली की मी एका जागी उभीच राहाते. आणि चालत असेन तर कुत्र्यांचा अंदाज घेऊन हळू हळू पुढे जाते. कदाचित सुदैवाने कोणी रेबिजग्रस्त कुत्रा माझ्या जवळ आला नाही आहे.

maalak ani malkiNinkade kase baghayache te sangal ka befikir?<<<

कुत्रे शेळपटासारखे बसले की मालक आणि मालकीण आपल्याला म्हणतातः

"तुम्ही ओळखीचे आहात म्हणून, नाहीतर असा अंगावर धावतो ना तो"

तेव्हा आपण म्हणायचे:

"तुम्ही ओळखीचे आहात म्हणून, नाहीतर ज्यांच्याकडे अशी शेळपट कुत्री असतात त्यांच्याकडे आम्ही जातही नाही"

आजवर कधी कुत्र्याने मला आणि मी कुत्र्याला त्रास दिला नाही आहे. भटकी कुत्री आजूबाजूला दिसली की मी एका जागी उभीच राहाते. आणि चालत असेन तर कुत्र्यांचा अंदाज घेऊन हळू हळू पुढे जाते. कदाचित सुदैवाने कोणी रेबिजग्रस्त कुत्रा माझ्या जवळ आला नाही आहे.<<<

डेंटिस्टला कोणीही घाबरतेच

Light 1

बेफिकिर अनुमोदन. लहानपणी घराजवळच्या असल्याच भटक्या कुत्र्यांना मी दगडांचा इतका प्रसाद दिला आहे की मी संध्याकाळी घरी येताना दिसताच तीन-चार कुत्री लांब पळून जात असत.

बेफिकीर.:फिदी: कुत्रे भुन्कत असताना दुर्लक्ष करणे आणी शान्तपणे निघुन जाणे हे उत्तम.

वैयक्तीक सान्गायचे तर लहानपणी कुत्र्या-मान्जरान्ची पिल्ले घेऊन खेळलेय. आता मुलीला खूळ भरलेय मान्जर पाळायचे.

पण बरेच किस्से ऐकल्याने/ वाचल्याने आता शेकडो मैल दूर रहाणार.

लिहीण्याचे धाडस होत नाहीये कारण आठवले तरी खूप वाईट वाटते. पण तरीही या श्वान प्रकरणाची तीव्रता समजावी म्हणून लिहीते.

मागच्याच वर्षी एक बातमी पेपरमध्ये पण वाचली आणी टिव्हीवर पण बातम्यात बघीतली. एक लहान अनाथ मुलगा ( अनाथ म्हणजे आई- वडील नसलेला, पण त्याला त्याचे मामा व आजी- आजोबा साम्भाळत होते. ठिकाण सातारा किन्वा सान्गली जवळ्चे गाव) फिरत फिरत जरा लाम्ब गेला. शेतावर ओसाड जागी त्याच्यावर भटक्या कुत्र्यानी हल्ला केला, व फाडले, एक माकड जवळच झाडावर बसले होते, त्या मुक्या प्राण्याने देखील कुत्र्याना हाकलण्याचा क्षीण पण धाडसी प्रयत्न केला. नेमके काही वेळात तिथुन जाणार्‍या एका गावकर्‍याने ते बघुन त्या कुत्र्याना हाकलुन लावले आणी मुलाला दवाखान्यात नेले ( इतर लोकाना बोलावुन ) पण मुलगा जागीच गेल होता. मुलगा साधरण ७ ते ८ वयाचा होता. ते बघीतल्यावर एवढा सन्ताप आला की असे वाटले की जागच्या जागी त्या कुत्र्यना गोळ्या घालुन तसेच तडफडवुन मारावे.:राग::अरेरे:

मला ते बघुनच जाम टेन्शन आले होते.

रश्मी, वाचली होती मी ती बातमी. Sad

आमच्या इथे (म्हणजे आमच्या परिसरात. घरी नव्हे. ) एक बाई आहे. सगळ्या कुत्र्यांना जवळ घेऊन कुरवाळत असते, पपी घेत असते. ती कुत्री हिला झोपून लाथा मारत असतात. ही त्यांना लहान मुलाला म्हणावं तसं " नको ना रे, अरे गप, काय झाल? अस म्हणून त्यांच्याशी मस्ती करत असते. बरोबर आणलेली बिस्कीटे खायला घालते. त्यांच्या डोक्यावर आपले डोके घासते, वगैरे वगैरे .... हे सर्व रस्त्यात फतकल मारून चालू असते. एकदा तर स्टॉप वर असलेल्या खूर्च्यांवर तिने कुत्र्यांना उभे केले होते. बस साठी थांबलेली माणसे बाजूला उभी होती. नंतर त्या खुर्च्यांवर बसणे शक्यच नव्हते. आणि हे नेहमी चालू असते.

मी तर कुत्रा मागे लागला असताना सरळ कुठे जागा नसल्याने इलेक्टीकच्या खांबावर चढलो होतो. मग मालक आल्यावर खाली आलो मालक जसाजसा जवळ येत होता तसे ते अजुन चेकाळुन वर चढण्याचा प्रयत्न करीत होते. मग मालकाच दम भरला . अहो आवरा त्याला !

लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांच्या कळपांनी हल्ला करण्याच्या अनेक घटना आहेत. असे का होत असेल? कुत्र्याचा अभ्यास करणार्‍यांनी जरा एक्स्पेन करा प्लीज,

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव मधे पण थोडीफार अशीच हकीकत घडली होती. मालेगावला मोमेडीयन लोक फार. एका मटणाच्या दुकानांच्या गल्लीतले दुकानदारांनी असच तिथल्या कुत्र्यांना कच्चं मांस खायला टाकुन लाडवुन ठेवलं होतं. एके दिवशी एक ५वी-६वीतला मुलगा त्याच्या वडीलांना डबा देण्यासाठी टळटळीत दुपारी त्या सुनसान गल्लीतुन जात असतांना त्या कच्च्या मांसाची चटक लागलेल्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. आणि अक्षरशः त्या एवढ्याशा जीवाचे लचके तोडले..! पेपरमधे आली होती ही बातमी. Sad

पाळीव कुत्र्याचीसुद्धा तशी काहीच गॅरंटी देता येत नाही. मी लहानपणापासुन कुत्रं पाळत आलेय. कुत्र्याला आम्ही सगळी रेग्युलर इंजेक्शनं देत होतो.इथे पुण्यात आल्यावर नविन घरात रहाय्ला गेल्यावर ४ दिवसातच माझ्या मुलाला (मुलगा ३वर्षाचा होता तेव्हा) आमचाच कुत्रा चावला होता. कुत्रा जिन्याखाली बसलेला असतांना माझा मुलगा त्याला जवळच पडलेली वाळु मुठीत घेउन त्याच्या तोंडाजवळ नेलं तर आमच्या कुत्र्याने त्याला खाली पाडुन त्याचा गळाच पकडला होता.
तरीही मुलाला डॉक्टरकडे नेलं तेव्हा त्याला ३ अँटीरेबिजची इंजेक्शनं पोटावर घ्यावी लागली होती. तेव्हापासुन तर माझा पाळीव कुत्र्यांवर पण विश्वास नाही.

रात्रीअपरात्री तालमी संपवून घरी परत जाताना स्कूटर चालवताना आपले पाय कुत्र्यांनी चावू नयेत म्हणून हॅण्डलच्या पातळीला आणायचा प्रयत्न करत जीव मुठीत धरून घरी यायचे ही कसरत इतके वेळेला केली आहे की कुठल्याही भटक्या कुत्र्याबद्दल कळवळा वाटत नाही.
दांडेकर पूल चौक ते ना सी फडके चौक रात्री दीडदोन वाजता स्कूटरने पार करा सगळा कळवळा पळून जाईल.

आमच्या बिल्डींगीत एकजण रहायचे सगळ्यात वरच्या मजल्यावर त्यांची डिंगी नावाची कुत्री होती. ब्रीड माहित नाही पण क्रॉस की मिक्स अशी काहीतरी होती. जिन्यातून कुणी जात येत असेल आणि तिला त्याच वेळेला खाली वा वरती नेत असतील तर समोरून येणार्‍या माणसाच्या पायात पायात लसालसा करत इतके हुकवायची की समोरचा माणूस घाबरून किंवा तोल जाऊन पडेल. आणि कुत्रे मालक मजा बघत उभे असायचे 'कै नै करत ती!' चा जप करत.

मी १२-१३ वर्षांची असताना एकदा त्यांच्याकडे गेले होते त्या मावशींनी बोलावले होते म्हणून. मी प्रचंड शूरता गोळा करून गेले होते. सुरूवातीचा एखादा तास ती डिंगी हॉलमधे सोफ्याखाली बसून होती आणि मी तिथून बरेचदा ये जा केली. थोड्यावेळाने त्या मावशींनी हॉलच्या पलिकडच्या रूममधून मला बोलावले. मी हॉल क्रॉस करून जात होते आणि मागून त्या डिंगीने झेप घेऊन मला पाडलं, फ्रॉक फाडला, ओचकारलं वगैरे... तेव्हापासून पाळीव कुत्रे बांधून ठेवत नाहीत त्या घरांमधे मी जात नाही.

रस्त्यावरची भटकी कुत्री आणि लाडावलेली कुत्री ह्यात रस्त्यावरची कुत्री बरी..दगड तरी मारायची सोय असते. ही असली श्रिमंती लाडावलेली फॉरेनची कुत्री आणि त्यांचे संवेदनशील पालक ह्यांचे काय करायचे हा मोठा प्रश्न आहे. रस्त्यावरच्या सावलीतल्या बेंचावर मालकांसाकट कुत्री बसायला लागली तर मग माणसांनी कुठे बसायचे? ह्याबाबत काही नियम असतील व ते समजले तर मालक लोकांशी भांडण करणे सोपे जाईल हा उद्देश. कारण बेंच आपल्या मालकीचा नाही हे खरेच...

एकदा सकाळी फिरायला गेले होते. बरोबर मैत्रिण होती. आम्ही जिथे फिरत होतो तो बंगलेवाल्यांचा परिसर आहे. एक ७-८ वर्षाची मुलगी एका कुत्र्याला घेऊन आली. त्या कुत्र्याने मला बघीतल्यावर त्याला काय प्रेमाच भरतं आलं काय माहित आला की धावत ओरडत. आणि त्या मुलीने घाबरून साखळी सोडून दिली. तिला ते अनपेक्षीत आणि अनावर होतं. मग काय तो माझ्या पायाला पकडणार इतक्यात पतिक्षीप्त क्रियेने माझा पाय मी मागे घेतला आणि मी ही जोरात ओरडले. मैत्रीणीने त्याला हाकलले. आणि मग त्याचा मालक येऊन शांत पणे त्याला घेऊन गेला. अस्सा राग आला होता त्याचा. Angry Angry Angry

कुत्रे आणि त्यावर एवढी चर्चा - ग्रेट

मी नुकतच सायकलिंग सुरु केल आहे, पहाटे ५ ते ५.३० च्या दरम्यान बाहेर पडलो कि पुढच्या सोसायटीचे ३-४ भटके कुत्रे रोज अंगावर यायचे. थोड्या अंतरानंतर परत निघून जायचे. पण मी जरा टरकायचो नक्की....
मग त्यावर उपाय म्हणून मी केलेला प्रयोग ........
मी एक रबरी बॉल विकत आणला जो स्पंज टाईप असतो आणि हाताने सहज दाबला जातो. हार्डवेअरमधून चूका घेतल्या ( बारीक टोक असलेले खिळे ) , हे खिळे त्या बॉलमध्ये असे घूसविले कि टोक वर राहील .त्यासाठी चूका गरम करुन रबरी बॉलमध्ये घुसविल्या ,साधारण २५ ते २८ खिळे बसले असावेत . आता तो खिळ्याचा तिक्ष्ण टोकाचा बॉल म्हणजे हत्यार तयार झाले.
त्याला मी साघारण ३ मी लांबीची दोरी बांधली आणि जेव्हा या कुत्र्यांच्या भागात प्रवेश करायचो तेव्हा तो बॉल सायकलला बांधून सरपटत ओढत न्यायचो. त्या बॉलला कुत्र्यांनी चावा घ्यावा असे माझ्या कठोर मनात नेहमीच असायचे. पुन्हा सायकलवर जाताना मी ३ दिवस हा प्रयोग केला , पण कुत्रे बॉल सोडून माझ्यावरच भूंकून परत जात होते. मग ४ थ्या दिवशी त्यातला एक गबरु कुत्रा त्या बॉलवर झपाटला आणि त्याने बॉलचा चावा घेतला........ बस .. मग काय..मी जोमात.... कुत्रा कोमात...............

आता कितीही रात्री गेलो तरी कोणतेच कुत्रे भूंकत नाही .पण त्या कुत्र्यांपायी माझा बॉल हरवला Happy

कुत्र्यांबद्दल असं बोलू नये,
पण आपण ह्या सर्व भट्क्या कुत्र्यांना पकडून, कोरीया, चिन, जापान ई. देशांना निर्यात केले तर बर्यापैकी परकिय चलन मिळू शकेल.

<<भटके कुत्रे आणि पाळीव कुत्रे हे दोन वेगवेगळे स्वतंत्र विषय आहेत. त्यांची सरमिसळ नको करायला>> पण आमच्या सोसायटीत भटक्या कुत्र्यांनाच पाळीव कुत्रांप्रमाणे प्रमाणे एक दोन कुटुंबांकडून वागणूक मिळते. ती त्यांच्या घरात राहत नाहीत. पण तरी त्यांनी त्यांच्या गळ्यात पट्टे बांधलेले आहेत.
सकाळ संध्याकाळ सोसायटीच्या आवारात त्यांना खायला घातले जाते. त्यांना कोणी दगड मारले तर लोकांनाच ओरडले जाते.
केराचा डबा घराच्या बाहेर ठेऊन मी ऑफिस ला जात असे ( कारण केर वाला दोन तीन तीन दिवस येत नसे आणि आला तर ११-११ वाजता ज्या वेळी आमच्या घरात कोणीच नाही ) तर त्या भटक्या कम पाळीव कुत्र्यांनी डबा पूर्ण उलटा पालटा करून ठेवला आणि आमच्या शेजार्यांनी माझा मुलगा दुपारी घरी आल्यावर त्याला तो केर केराच्या डब्यात भरून ठेवायला सांगितला होता. कारण केर वाला आलाच नाही .

सोसायटीच्या सेक्रेटरी ना जाऊन चागली बोलून आले आणि पत्र हि देऊन आले .एक तर केर्वाल्याला सकाळी लोक ऑफिस ला जायच्या आधी यायला सांगा नाहीतर त्या भटक्या कुत्रांचा तरी बंदोबस्त करा आणि जी कुटुंब त्या कुत्र्यांना पाळीव कुत्रांप्रमाणे वागवत असतील त्यांना आमचे केराचे डबे साफ करायला सांगा जर त्या भटक्या कुत्रांकडून डबा उलटा झाला तर Happy
एकदा हेच भटके कम पाळीव कुत्रे मुलाला चावले पण होते आत्ता दोन वर्षांपूर्वी आणि त्याला ताबडतोब इंजेक्शन्स घ्यायला लागली होती Sad

आमच्या बिल्डिंगमध्ये असे अनेक मूर्ख श्वानमालक आहेत.

मला कुत्रे आवडत नाहीत असं सांगितल्यामुळे एका बाईनं माझ्याशी बोलणं टाकलं.

एका महान स्त्रीनं तिच्या वाह्यात कुत्र्याला ट्रेन करण्याऐवजी आम्हाला तिच्या घरी बोलावून तिच्या कुत्र्याशी मैत्री करून घेण्याची सुसंधी देऊ केली.

एकीनं सांगितलं की कुत्र्यानं बागेत सुसू केली तरी काही बिघडत नाही. पण त्याच बागेत लहान लहान मुलं खेळतात. त्यांचा बॉल वगैरे तिथे गेला आणि त्यांनी तो तोंडात घातला वगैरे असे काही मुद्दे तिच्या मठ्ठ डोक्यात जाईनात. विशेषतः स्वतःची मुलं जर मोठी झाली असतील तर अशा श्वानप्रेमींना बागेत खेळणार्‍या इतरांच्या लहान मुलांशी काहीही देणंघेणं नसतं. कुत्र्याचे विधी इतके पवित्र वाटत असतील त्यांनी आपल्या स्वयंपाकघराच्या ओट्यावर ते साग्रसंगित होऊ द्यावे. इतरांच्या स्वच्छ परिसराच्या हक्कावर गदा आणू नये.

आमच्या गल्लीतही असच एक भटकं पण पाळीव कुत्रं जाणार्‍या येणार्यांवर सतत भुंकत रहातं. इतकं की आमच्याकडे नेहमी येणारे लोक आता वळसा घालुन दुसर्या गल्लीतुन येतात. अनोळखी राहु द्या पण आम्ही नेहमी जाणार्या येणार्यांवर पण भुंकतं...लहान मुलांवर विशेष!
आणि ते एका पोलिसाच्या घराच्या पायरीवर सतत बसलेलं दिसतं. त्यांना म्हट्लं,' त्याला आवरा, किंवा इंजेक्शन तरी देउन आणा तर म्हणतात, 'अहो ते आम्ही पाळलेलं नाहीये. असचं येत रहातं, आम्ही त्याला पोळी देतो नेहमी म्हणुन. !

सुमेधाव्ही,

बेंचवर कुत्र्यांना बसू देऊ नका हे खरंच ठामपणे सांगायला हवे अश्या लोकांना! दुसरे काय करणार? आपण अनेकदा भांडण नको म्हणून दुर्लक्ष करतो, त्यामुळेच हे लोक सोकावतात. काठीच घेऊन फिरायला पाहिजे खरे म्हणजे! सिरियसली!

Pages