आजोबा - थोडा अपेक्षाभंग

Submitted by सावली on 10 May, 2014 - 13:21

आज 'आजोबा' पाहीला. सिनेमा अर्थातच आवडला. विषय खुपच मस्त. असा विषय निवडल्याबद्दल अभिनंदन. आपणही आजोबाच्या प्रवासात गुंतुन जातो.

मात्र इथे कुणीच फारसे काही निगेटीव लिहीले नाहीये पण मला काही गोष्टी खटकल्या.

सुरुवातीच्या नावांच्या वेळी जे अ‍ॅनिमेशन दाखवले आहे ते बघुन लहान मुलांचा अ‍ॅनिमेशनपट सुरु होणार की काय असे वाटले. बरोबर असलेल्या लेकीलाही तसेच वाटले. अनिमेशन यापेक्षा कितीतरी जास्त चांगले करता आले असते असे वाटले.

शिवाचा पहिलाच सिन अगदीच अनावश्यक वाटला. शिवा आणि सुषमा एकमेकात खुप गुंतले आहेत हे वेगळ्या प्रकारे दाखवता आले नसते का? ( नंतर आजोबाच्या मागावर असलेला शिवा सुषमाला फोन करु नकोस सांगतो तेव्हा तो सुषमात इतका गुंतला होता तरी त्याला आता हे काम महत्वाचे वाटतेय असे दाखवायचे होते, त्यासाठी तो पहिला सिन होता असे मलातरी वाटले)

पुर्वा गावात रहायला जाते तेव्हा ते घर बघुन , तिथे डास आहेत हे ऐकुन होणारी तिची रिअ‍ॅक्शन अगदीच अनपेक्षित. जी फॉरेस्ट ऑफिसर / संशोधक अनेक वर्षे त्याच फिल्डमधे जीव ओतुन काम करतेय तीला गावात डास आहेत, लोड शेडींग होतं हे ऐकुन कसेसेस्च होते? ती पहिल्यांदाच फिल्डवर गेल्यासारखी रिअ‍ॅक्शन वाटली. ( मात्र पुढे सिनेमात तसे वाटले नाही. )

नंतर एका सिनमधे रात्री ती गावातल्याच बार मधे जाऊन ड्रींक ऑर्डर करते आणि पिते. ते ही पटले नाही. एक फॉरेस्ट ऑफिसर / संशोधक जी बिबळ्याच्या मागावर आहे, जीला बिबळ्याची नोंद आली तर रात्रीही बाहेर पडावे लागु शकते ती ड्रींक करेल असे वाटत नाही. जंगली प्राण्यांची घ्राणेंद्रीये तिक्ष्ण असतात त्यांना पर्फ्युम, अल्कोहोल असले वास तीव्रतेने जाणवतात त्यामुळे जंगली प्राण्यांचा अभ्यास करायला जंगलात जाताना संशोधक या गोष्टी टाळतात.

नंतर अ‍ॅनिमेशनमधे आजोबा शिकार करताना किंवा खाडी पार करताना दाखवला आहे. त्यातले अ‍ॅनिमेशन अगदीच बाळबोध वाटले. ते अधिक चांगले करणे / अव्हॉईड करणे शक्य नसेल झाले का? एका रेल्वे जवळच्या सिनमधेही अ‍ॅनिमेशन आहे बहुतेक पण ते ओरिजिनलशी बर्‍यापैकी ब्लेंड होते.

मला जरी सिनेमाच्या चित्रीकरणाविषयी फारसे कळत नसले तरी मागच्या वर्षी आलेल्या ट्रेलरवरुन सिनेमात खुपच चांगली सिनेमॅटोग्राफी असेल अशी अपेक्षा होती. पण माझ्यातरी अपेक्षा पुर्ण झाल्या नाहीत. मुख्यत्वे वाईड अ‍ॅंगल शॉट्स खुपच आऊट ऑफ फोकस वाटले / हवे तितके शार्प वाटले नाहीत. बरेच क्लोजअपस खुपच टाईट वाटले. एरियल शॉट्स पण एक्च डोंगर दोनतीनदा दाखवलाय आणि तेही शार्प आणि क्रिएटीवही वाटले नाहीत ( आठवा चे.ए. मधला दुधसागरचा एरियल शॉट , क्रिएटीव आणि शार्प ).

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहज कल्पना मनात आली.. हा चित्रपट त्या बिबळ्याच्या नजरेतून टिपला असता तर !!
त्याचा प्रवास, त्याचे विचार त्याच्याच नजरेतून. असा प्रयोग झालाय असे आठवत नाही. तसे केले असते तर बाकीची पात्र दुय्यम ठरली असते. कॅमेराचा वापर जरा कल्पकपणे केला असता तर अ‍ॅनिमेशनचीही गरज नव्हती.

अनेक चित्रपटात मुख्य पात्र न दाखवताही योग्य तो परिणाम साधलेला आहे. ( उदा. किलबिल भाग १ मधे बिल नाही, कोहरा आणि ऊंचे लोग मधे मुख्य अभिनेत्रीचा चेहरा दिसत नाही, खामोशी मधे धर्मेंद्रचा चेहरा दिसत नाही.
मला आठवत असेल तर अ‍ॅपोकॅलिप्स नाऊ मधे ब्रँडोचा चेहरा क्षणभरच दिसतो. अशी अनेक उदाहरणे असतील. )

एक अपडेट.

रेडिओ ट्रान्स्मिशन कॉलरमुळे लेसरेशन जखम होउन दोन वाघ त्यातील एक वाघीण मृत्युमुखी पडली आहे. जे लोक वाघांवर संशोधन करत आहेत त्यांनी ह्या प्राण्यांना वाचवण्याच्या नादात असे का होत आहे याचाही शोध घेउन चांगली कॉलर किंवा चिप बसवावी तेणेकरून जीव जाणार नाही. त्या मॅडम ना कळवा.

http://www.hindustantimes.com/india-news/sunderbans-tigress-dies-of-infe...

Pages