आजोबा - थोडा अपेक्षाभंग

Submitted by सावली on 10 May, 2014 - 13:21

आज 'आजोबा' पाहीला. सिनेमा अर्थातच आवडला. विषय खुपच मस्त. असा विषय निवडल्याबद्दल अभिनंदन. आपणही आजोबाच्या प्रवासात गुंतुन जातो.

मात्र इथे कुणीच फारसे काही निगेटीव लिहीले नाहीये पण मला काही गोष्टी खटकल्या.

सुरुवातीच्या नावांच्या वेळी जे अ‍ॅनिमेशन दाखवले आहे ते बघुन लहान मुलांचा अ‍ॅनिमेशनपट सुरु होणार की काय असे वाटले. बरोबर असलेल्या लेकीलाही तसेच वाटले. अनिमेशन यापेक्षा कितीतरी जास्त चांगले करता आले असते असे वाटले.

शिवाचा पहिलाच सिन अगदीच अनावश्यक वाटला. शिवा आणि सुषमा एकमेकात खुप गुंतले आहेत हे वेगळ्या प्रकारे दाखवता आले नसते का? ( नंतर आजोबाच्या मागावर असलेला शिवा सुषमाला फोन करु नकोस सांगतो तेव्हा तो सुषमात इतका गुंतला होता तरी त्याला आता हे काम महत्वाचे वाटतेय असे दाखवायचे होते, त्यासाठी तो पहिला सिन होता असे मलातरी वाटले)

पुर्वा गावात रहायला जाते तेव्हा ते घर बघुन , तिथे डास आहेत हे ऐकुन होणारी तिची रिअ‍ॅक्शन अगदीच अनपेक्षित. जी फॉरेस्ट ऑफिसर / संशोधक अनेक वर्षे त्याच फिल्डमधे जीव ओतुन काम करतेय तीला गावात डास आहेत, लोड शेडींग होतं हे ऐकुन कसेसेस्च होते? ती पहिल्यांदाच फिल्डवर गेल्यासारखी रिअ‍ॅक्शन वाटली. ( मात्र पुढे सिनेमात तसे वाटले नाही. )

नंतर एका सिनमधे रात्री ती गावातल्याच बार मधे जाऊन ड्रींक ऑर्डर करते आणि पिते. ते ही पटले नाही. एक फॉरेस्ट ऑफिसर / संशोधक जी बिबळ्याच्या मागावर आहे, जीला बिबळ्याची नोंद आली तर रात्रीही बाहेर पडावे लागु शकते ती ड्रींक करेल असे वाटत नाही. जंगली प्राण्यांची घ्राणेंद्रीये तिक्ष्ण असतात त्यांना पर्फ्युम, अल्कोहोल असले वास तीव्रतेने जाणवतात त्यामुळे जंगली प्राण्यांचा अभ्यास करायला जंगलात जाताना संशोधक या गोष्टी टाळतात.

नंतर अ‍ॅनिमेशनमधे आजोबा शिकार करताना किंवा खाडी पार करताना दाखवला आहे. त्यातले अ‍ॅनिमेशन अगदीच बाळबोध वाटले. ते अधिक चांगले करणे / अव्हॉईड करणे शक्य नसेल झाले का? एका रेल्वे जवळच्या सिनमधेही अ‍ॅनिमेशन आहे बहुतेक पण ते ओरिजिनलशी बर्‍यापैकी ब्लेंड होते.

मला जरी सिनेमाच्या चित्रीकरणाविषयी फारसे कळत नसले तरी मागच्या वर्षी आलेल्या ट्रेलरवरुन सिनेमात खुपच चांगली सिनेमॅटोग्राफी असेल अशी अपेक्षा होती. पण माझ्यातरी अपेक्षा पुर्ण झाल्या नाहीत. मुख्यत्वे वाईड अ‍ॅंगल शॉट्स खुपच आऊट ऑफ फोकस वाटले / हवे तितके शार्प वाटले नाहीत. बरेच क्लोजअपस खुपच टाईट वाटले. एरियल शॉट्स पण एक्च डोंगर दोनतीनदा दाखवलाय आणि तेही शार्प आणि क्रिएटीवही वाटले नाहीत ( आठवा चे.ए. मधला दुधसागरचा एरियल शॉट , क्रिएटीव आणि शार्प ).

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर ती व्यक्ती प्रशासनातील नाही, त्या व्यक्तीने प्रशासनाच्या वतीने फोन केलेला नाही आणि प्रशासनाने त्या व्यक्तीला अवलचा नंबर दिलेला नाही (प्रशासन असे कुणाचे नंबर कुणाला देत नाही याबद्दल खात्री आहे) तर त्या व्यक्तीने अवलला फोन करून झापले (किंवा जे काही केले) त्याबद्दल प्रशासन कसे काय समज देऊ शकेल? कोणत्या अधिकारात?

नीधप | 12 May, 2014 - 11:40<<<

त्यापेक्षाही हा प्रश्न पडला की मग अश्या व्यक्तीच्या दूरध्वनीला अवल ह्यांनी महत्व तरी का द्यावे!

संबंधित व्यक्तीने फोनवरून अवलची माफी मागितल्याने आणी अवलची पोष्ट आणी वेमाची विपू आल्याने आता माझ्याकडूनही
हा विषय बंद!
बेफिकीर आणि नीधप यांच्या प्रश्नाची उत्तरे माहिती असूनही देणार नाही.

फूलस्टॉप!

.

आपण विरंगुळा मध्ये "चला भांडूया आणि चला वाद वाढवूया" असा वाहता बीबी उघडूया का? म्हणजे जे वाद विवाद आहेत ते त्या बीबीवरच होऊ शकतील आणि इतर बीबी वादाशिवाय राहाण्याचे चान्सेस वाढतील?

वेमा - पोस्ट अप्रकाशित अप्रकाशित असे करण्यापेक्षा सरळ त्या व्यक्तीशी संपर्क साधून त्या व्यक्तीला मायबोलीच्या धोरणाविरुद्ध जातील असे वाटणारी वाक्ये किंवा मजकूर एडीट करण्यास का सांगू नये? हा वाद टळला असता.

बाकी झालेल्या मुद्द्यावर बोलण्याची इच्छा आहे पण सगळ्यांनी विषय बंद केल्यामुळे मीही काही बोलत नाही.

वेमा - पोस्ट अप्रकाशित अप्रकाशित असे करण्यापेक्षा सरळ त्या व्यक्तीशी संपर्क साधून त्या व्यक्तीला मायबोलीच्या धोरणाविरुद्ध जातील असे वाटणारी वाक्ये किंवा मजकूर एडीट करण्यास का सांगू नये? हा वाद टळला असता. <<< अनुमोदन. आणि त्याहीपेक्षा इथेच लिहिले असते तर 'अप्रकाशित/अप्रकाशित' मुळे जो गोंधळ झाला तो टळला असता, सर्वांनाच स्पष्टता आली असती, असे वाटले.

मायबोलीच्या धोरणाविरुद्ध जातील असे वाटणारी वाक्ये किंवा मजकूर एडीट करण्यास का सांगू नये? हा वाद टळला असता. <<<<<<मायबोलीची जी काही धोरण आहेत ती एकाच धाग्यात (लिंक देऊन) देता येतील का? बर्‍याच वेळा वाद, वैयक्तिक दोषारोप झाल्यानंतर धोरणं जाहिर होतात किंवा त्याबद्दल सांगितले जाते.

सध्यातरी (मला स्वतःला) प्रताधिकार आणि प्रकाशचित्र याबद्दलच माहिती आहे. जर अजुन काहि मायबोलीची धोरणं असतील तर कृपया मला लिंक द्यावी, जाणुन घ्यायला आवडेल.

बरेचसे प्रश्न आहेत, पण या धाग्यावर विचारणे योग्य नाही. कदाचित मायबोली प्रचि धोरणाच्या धाग्यावरच विचारेन. Happy

(विषयांतराबद्दल क्षमस्व)

जर अजुन काहि मायबोलीची धोरणं असतील तर कृपया मला लिंक द्यावी, जाणुन घ्यायला आवडेल. >>> जिप्सी, शोधबारमध्ये 'धोरण' टाईप कर.

धन्यवाद मंजूडी, पण शोधबार मध्ये धोरण टाईप केल्यावर "प्रचि धोरण" व्यतिरीक्त
अमेरिकेचे राजकीय धोरण
छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण..
महाराष्ट्र राज्याचे नवे सांस्कृतिक धोरण
हेच सगळं दिसतंय.
हां त्यातल्या त्यात "अमेरिकेचे राजकीय धोरण" मात्र दोनदा दिसत आहे. Happy

जोक्स अपार्ट, मायबोलीची सगळी धोरणं एका धाग्यात देता येणे शक्य आहे का?

भाऊकाका, _____/\_____ Happy

सुरुवातीच्या नावांच्या वेळी जे अॅनिमेशन दाखवले आहे ते बघुन लहान मुलांचा अॅनिमेशनपट सुरु होणार की काय असे वाटले. बरोबर असलेल्या लेकीलाही तसेच वाटले. अनिमेशन यापेक्षा कितीतरी जास्त चांगले करता आले असते असे वाटले. -> मला तरी असे नाही वाटले. कित्येक चित्रपटांच्या सुरुवातीला आनिमेशन दाखवतात. आणि आनिमेशन हे रुपक म्हणून वापरलेत असे वाटते ( खर्याखुर्या बिबट्याला वेठीस धरून शॉट घेण्यापेक्षा) म्हणून साधे सोपे ठेवलेत. जे काही बिबट्याचे शॉट्स आहेत ते सुद्धा प्रकाश आमटे यांच्या बिबट्याचे आहेत असे वाटते.

शिवाचा पहिलाच सिन अगदीच अनावश्यक वाटला. शिवा आणि सुषमा एकमेकात खुप गुंतले आहेत हे वेगळ्या प्रकारे दाखवता आले नसते का? -> +१

नंतर एका सिनमधे रात्री ती गावातल्याच बार मधे जाऊन ड्रींक ऑर्डर करते आणि पिते. ते ही पटले नाही. एक फॉरेस्ट ऑफिसर / संशोधक जी बिबळ्याच्या मागावर आहे, जीला बिबळ्याची नोंद आली तर रात्रीही बाहेर पडावे लागु शकते ती ड्रींक करेल असे वाटत नाही. जंगली प्राण्यांची घ्राणेंद्रीये तिक्ष्ण असतात त्यांना पर्फ्युम, अल्कोहोल असले वास तीव्रतेने जाणवतात त्यामुळे जंगली प्राण्यांचा अभ्यास करायला जंगलात जाताना संशोधक या गोष्टी टाळतात.-> थोडा सहमत. फील्ड वर असताना तिने ड्रिंक किंवा बीडी पिलेली दाखवलेली नाहीए. मला वाटत त्या गोष्टी ती स्ट्रेस ब्स्टर म्हणून वापरते. अर्थात सिनेमाचा प्रेक्षा वर्ग बघता त्याचा परिणाम नेगेटिव होऊ शकतो.
नंतर अॅनिमेशनमधे आजोबा शिकार करताना किंवा खाडी पार करताना दाखवला आहे. त्यातले अॅनिमेशन अगदीच बाळबोध वाटले. ते अधिक चांगले करणे / अव्हॉईड करणे शक्य नसेल झाले का? -> आनिमेशन हे रुपक म्हणून वापरलेत असे वाटते.

मुख्यत्वे वाईड अॅंगल शॉट्स खुपच आऊट ऑफ फोकस वाटले / हवे तितके शार्प वाटले नाहीत. बरेच क्लोजअपस खुपच टाईट वाटले->+1

कमी पैसा हे कारण च होऊ शकत नाही. तुमचे जेव्हडे बजेट असेल तशीच कथावस्तु निवडावी. ह्याच विषयावर सिनेमा काढा अशी सरकारनी जबरदस्ती केल्यासारखे हे कारण झाले.

तुमचे बजेट जर विषयाला न्याय देउ शकत असेल तर अशी चेष्टा तरी करु नये.

उगाच लॉग इन केलं....

हे नेहमीच आहे...यालाच म्हणतात मराठी माणूस...

विषय काय आणि चर्चा कुठली?

दंडवत आहे मराठी माणसांनो...!

"मायबोली धोरण" शोधताना अ‍ॅडमिन यांच्या रंगीबेरंगीत 'माध्यम प्रायोजक' म्हणजे काय? याबद्दल लिखाण सापडलं.

त्यातील हा परिच्छेद:

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या कुठल्याही चित्रपटाचं अनुकूल परीक्षण मायबोली प्रशासन अथवा माध्यम प्रायोजक लिहून घेत नाहीत. चित्रपटांना अनुकूल असं परीक्षण लिहिण्याचा आग्रह केला जात नाही. चित्रपटांच्या प्रीमियरला उपस्थित राहणार्‍यांना ’चित्रपटाची ओळख अगदी थोडक्यात करून द्या, चित्रपटाची कथा अजिबात लिहू नका’, हे मात्र आवर्जून सांगितलं जातं. चित्रपटाची कथा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लगेच लिहिल्याने प्रेक्षकांचा रसभंग होतो. शिवाय चित्रपटनिर्मितीमध्ये अनेकांची मेहनत असते. त्या चित्रपटातून मिळणार्‍या उत्पन्नावर अनेकांची घरं चालणार असतात. मराठी चित्रपटांचं अर्थकारण तर अतिशय नाजूक आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघावा, अशी चित्रपटाशी संबंधित सर्वांचीच इच्छा असते.

'माध्यम प्रायोजक' म्हणजे काय? च्या लिंकीबद्दल मंजूडी, जिप्सी, धन्यवाद.

चित्रपटांच्या प्रीमियरला उपस्थित राहणार्‍यांना ’चित्रपटाची ओळख अगदी थोडक्यात करून द्या, चित्रपटाची कथा अजिबात लिहू नका’, हे मात्र आवर्जून सांगितलं जातं. <<<

इथे मात्र माध्यम प्रायोजकांनी <<<या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहून नेहमीप्रमाणेच मायबोलीकर या खेळाबद्दल व चित्रपटाबद्दल भरभरून लिहितील, ही खात्री आहे. >>> असं लिहिलं आहे. Happy

अरे बापरे इथे बरेच काही झालेले दिसतेय. सकाळी मोबाईलबरुन चेक केलं होतं पण त्यावरुन रिप्लाय करायला जमत नाही.

अवल तुला वाईट वाटले असणे सहाजिक आहे पण कुणी काही बोललं म्हणुन आपण आपल्याला आवडती गोष्टं सोडून देण्यात अर्थ नाही. पाहिजे तर थोडा ब्रेक घेऊन मग परत इथे अ‍ॅक्टीव हो. Happy

धोरणांबद्दल माबो वेमा नी इथे आणि धोरणाच्या धाग्यावर सांगितले आहेच तरी त्याबद्दल काही प्रश्न असतील त्यांची धोरणांच्या धाग्यावर चर्चा करणे योग्य ठरेल. त्यामुळे इथे थांबुन बाकी आपण सर्वचजण मुळ विषयाकडे म्हणजे चित्रपटाच्या चर्चेकडे वळुयात.

सिनेमा एकदा बघण्यासारखा नक्कीच आहे.

प्लस :
१. विषय. ह्या विषयावर सिनेमा काढणं खूप कौतुकास्पद.
२. बरेचसे संवाद. चुरचुरीत आणि चपखल.
३. हृषिकेश जोशी. मस्त !

मायनस :
१. पिक्चराईझेशन/शूटिंग आवडले नाहे. काही दृष्यात कॅमेरा विनाकारण खूप हालतो. काही वेळा २ पात्रं बोलत असतात आणि कॅमेरा विनाकारण भलतीकडे भटकत असतो. आजूबाजूची माणसं, रिक्शा आणि काय वाट्टेल ते. आता ह्यात आर्टिस्टिक काही असेल तर मला कळलं नाही कारण मी सामान्य प्रेक्षक आहे. सह्याद्री पर्वतरांगांचे अवकाशातून घेतलेले शॉट्स पण आवडले नाहीत.
२. यशपाल चं पात्रं उगा भटकताना दाखवत बसण्यापेक्षा त्यांचा वाद-विवाद रंगवायला हवा होता.
३. त्या बिबट्याला आजोबा नाव देण्यामागचं कारण. काय तर म्हणे "माणसांच्या गर्दीत एकटाच माणसा सारखं वागतो म्हणून आजोबा". म्हणजे ? काका/मामा/बाबा इत्यादी लोक माणसांसारखे वागत नाहीत ? मी काही मिसलं की काय कुणास ठाऊक. कोणीतरी सांगा प्लीज.
४. शिवा चा पहिला सीन. अती अनावश्यक.
५. 2D आणि 3D अॅनिमेशन. दोन्ही सुमार. 3D बिबट्या खोटा आहे ते लगेच च कळतं. 2D कार्टून सारखं अॅनिमेशन कमी घेतलं असतं तरी चाललं असतं.

सिनेमा चांगला पण 'overhyped' आहे. एकदा नक्की बघा.

शकुन यांची पोस्ट आवडली.
<< त्या बिबट्याला आजोबा नाव देण्यामागचं कारण. काय तर म्हणे "माणसांच्या गर्दीत एकटाच माणसा सारखं वागतो म्हणून आजोबा". म्हणजे ? >> माझ्याही मनातला प्रश्न. "घराची ओढ म्हणून", " आपलं तें सोडत नाही म्हणून" तो आजोबा , असं कांहींही समजण्यासारखं; पण हें नाहीं रुचलं.

Pages