आजोबा - थोडा अपेक्षाभंग

Submitted by सावली on 10 May, 2014 - 13:21

आज 'आजोबा' पाहीला. सिनेमा अर्थातच आवडला. विषय खुपच मस्त. असा विषय निवडल्याबद्दल अभिनंदन. आपणही आजोबाच्या प्रवासात गुंतुन जातो.

मात्र इथे कुणीच फारसे काही निगेटीव लिहीले नाहीये पण मला काही गोष्टी खटकल्या.

सुरुवातीच्या नावांच्या वेळी जे अ‍ॅनिमेशन दाखवले आहे ते बघुन लहान मुलांचा अ‍ॅनिमेशनपट सुरु होणार की काय असे वाटले. बरोबर असलेल्या लेकीलाही तसेच वाटले. अनिमेशन यापेक्षा कितीतरी जास्त चांगले करता आले असते असे वाटले.

शिवाचा पहिलाच सिन अगदीच अनावश्यक वाटला. शिवा आणि सुषमा एकमेकात खुप गुंतले आहेत हे वेगळ्या प्रकारे दाखवता आले नसते का? ( नंतर आजोबाच्या मागावर असलेला शिवा सुषमाला फोन करु नकोस सांगतो तेव्हा तो सुषमात इतका गुंतला होता तरी त्याला आता हे काम महत्वाचे वाटतेय असे दाखवायचे होते, त्यासाठी तो पहिला सिन होता असे मलातरी वाटले)

पुर्वा गावात रहायला जाते तेव्हा ते घर बघुन , तिथे डास आहेत हे ऐकुन होणारी तिची रिअ‍ॅक्शन अगदीच अनपेक्षित. जी फॉरेस्ट ऑफिसर / संशोधक अनेक वर्षे त्याच फिल्डमधे जीव ओतुन काम करतेय तीला गावात डास आहेत, लोड शेडींग होतं हे ऐकुन कसेसेस्च होते? ती पहिल्यांदाच फिल्डवर गेल्यासारखी रिअ‍ॅक्शन वाटली. ( मात्र पुढे सिनेमात तसे वाटले नाही. )

नंतर एका सिनमधे रात्री ती गावातल्याच बार मधे जाऊन ड्रींक ऑर्डर करते आणि पिते. ते ही पटले नाही. एक फॉरेस्ट ऑफिसर / संशोधक जी बिबळ्याच्या मागावर आहे, जीला बिबळ्याची नोंद आली तर रात्रीही बाहेर पडावे लागु शकते ती ड्रींक करेल असे वाटत नाही. जंगली प्राण्यांची घ्राणेंद्रीये तिक्ष्ण असतात त्यांना पर्फ्युम, अल्कोहोल असले वास तीव्रतेने जाणवतात त्यामुळे जंगली प्राण्यांचा अभ्यास करायला जंगलात जाताना संशोधक या गोष्टी टाळतात.

नंतर अ‍ॅनिमेशनमधे आजोबा शिकार करताना किंवा खाडी पार करताना दाखवला आहे. त्यातले अ‍ॅनिमेशन अगदीच बाळबोध वाटले. ते अधिक चांगले करणे / अव्हॉईड करणे शक्य नसेल झाले का? एका रेल्वे जवळच्या सिनमधेही अ‍ॅनिमेशन आहे बहुतेक पण ते ओरिजिनलशी बर्‍यापैकी ब्लेंड होते.

मला जरी सिनेमाच्या चित्रीकरणाविषयी फारसे कळत नसले तरी मागच्या वर्षी आलेल्या ट्रेलरवरुन सिनेमात खुपच चांगली सिनेमॅटोग्राफी असेल अशी अपेक्षा होती. पण माझ्यातरी अपेक्षा पुर्ण झाल्या नाहीत. मुख्यत्वे वाईड अ‍ॅंगल शॉट्स खुपच आऊट ऑफ फोकस वाटले / हवे तितके शार्प वाटले नाहीत. बरेच क्लोजअपस खुपच टाईट वाटले. एरियल शॉट्स पण एक्च डोंगर दोनतीनदा दाखवलाय आणि तेही शार्प आणि क्रिएटीवही वाटले नाहीत ( आठवा चे.ए. मधला दुधसागरचा एरियल शॉट , क्रिएटीव आणि शार्प ).

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माध्यम प्रायोजक या आयडीने कुठे प्रतिसाद दिला गेला आहे? मला चिनूक्स चे प्रतिसाद दिसताहेत फक्त. तो माध्यम प्रायोजक टीममधे काम करत असला तरी इथे तर वैयक्तिक आयडीखालीच प्रतिसाद दिलेत की... Uhoh

थोडाफार अपेक्षाभंग वगैरे होणार असेल/नसेल तरी मला पण बघायचा आहे हा सिनेमा, पण बाजारात सीडी आल्याशिवाय किंवा कुठल्यातरी चॅनलवर दाखवल्याशिवाय योग येणार नाही. Sad

माध्यम प्रायोजक या आयडीने कुठे प्रतिसाद दिला गेला आहे? मला चिनूक्स चे प्रतिसाद दिसताहेत फक्त. तो माध्यम प्रायोजक टीममधे काम करत असला तरी इथे तर वैयक्तिक आयडीखालीच प्रतिसाद दिलेत की.<<<

हा प्रश्न माझ्या प्रतिसादावर असल्यास त्याचे उत्तर असे की जर 'अधिकृत मायबोली उत्तरे' द्यायची असली तर ती माध्यम प्रायोजक ह्या आय डी तर्फे दिली जावीत व एखाद्या व्यक्तीने उत्तरे दिल्यास (व ती व्यक्ती माध्यम प्रायोजक ह्या ग्रूपची / प्रशासनाची सदस्यही असल्यास) त्या व्यक्तीने सुरुवातीला डिस्क्लेमर द्यावा की ही त्या व्यक्तीची वैयक्तीक मते असून मायबोलीची अधिकृत मते नाहीत.

'माध्यम प्रायोजक ह्या आय डी ने प्रतिसाद दिलेला आहे' असे मी म्हंटलेलो नाही. ('द्यावा' असे म्हणत आहे मी, जर 'अधिकृत मायबोली उत्तरे' द्यायची असली तर)

येथे प्रश्न (बहुतेक) अश्यामुळे निर्माण झाला आहे की चिनूक्स हे प्रशासकही आहेत आणि चित्रपटाच्या बाजूनेही बोलत आहेत त्यामुळे 'प्रशासन डिफेंड करत आहे' असा समज होणे सहज शक्य आहे. त्यावर वेमांनी जे लिहिले, त्यावर मी माझा प्रतिसाद दिला होता.

वेल , अवल पोस्ट आवडल्या आणि पटल्या.
मी ही पहील्या वाक्यातच लिहीलेय की आजोबाचा प्रवास गुंतवुन ठेवतो.
वेल, तु म्हणालीस तो वाईट वाटण्याचा इफेक्ट मात्र शेवटचा सिन पाहिल्यावर निघुन जातो असे मला वाटले.

वे.मा. स्पष्टीकरणाबद्दल आभार.
भाऊ, भारीच.

आजोबा पाहील्यानंतर हे सगळं जाणवणार असं वाटलंच होतं.आणि पहिल्यांदा मायबोली ओपन केली,कारण शक्य तेवढ्या प्रतिक्रीय इकडेच पहायला मिळतील हे माहीत होतं.

फिल्म इतर बर्‍याच फिल्म्स सारखी इंटरव्हल नंतरच पकड घेते.तेंव्हा सुजयचा शाळा डोक्यात ठेऊन गेलात तर अपेक्षाभंग होणे शक्य आहे.

बजेटचा विचार करता अनिमेशन जरी उरकलेले असले तरी अजुन 'to the point' करता येणे शक्य होते.सुजय याची काळजी पुढे नक्की घेईल.

वाईल्ड लाईफ फिल्म मेकरची मदत कितपत घेतली होती कोणाला माहीत.पण आपल्याकडे जंगल शॉट्स दाखवतान तेवढी प्रगल्भता दाखविअली जात नाही.

बरेच शॉट्स मिक्सींग केलेले आणि गुगल अर्थ वरून घेतलेले वा बेतलेले.

प्रभा राव फिल्ड्मधे काम करूनसुद्धा उन्हाने रापलेली नाहीय...नेहमी मेक-अप चेहरा आहे.

ओम भूतकर सारखी नवशीकी मुलं मी पाहिलेली आहेत्,जी सरकारी ऑफीसात gf सोबत बोलत असतात् वगैरे,तेच दाखवण्याचा अनावश्यक प्रयत्न किंवा वेगळ्या प्रकारे ते दाखवता आलं असतंच की?...

चित्रपट अजून थ्रील करता आला असता...पाठलाग दाखवून,थोडे ट्रेक अ‍ॅड केले असते,एखाद गाणं ही हवं होत...विशेषतः शेवटचे सीन्स...

बाकी चांगला आहे.पूर्वग्रह न ठेवता फिल्म बघावी लागते.विद्या अत्रेयंचं काम फिल्ममधून समजून येत.माझ्या मात्र जुन्नर 'Transit Camp'च्या आणि त्या ११ बिबट्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.
फिल्म मस्त आहे,जरूर बघा.

कालच पाहिला,
मला स्वतःला तरी डॉक्युमेनट्री बघतोय असच वाटत होते असो, प्रतिक्रीया आवड्ल्या,

वेबमास्तर,
होतं असं की मायबोलीच्या इतर बर्‍याच उपक्रमांबद्दल लोकं बर्‍या वाईट प्रतिक्रिया देत असतात. अगदी 'प्रचंड आवडलं' ह्यापासून 'अजिबात आवडलं नाही!' अश्या सर्व प्रकारच्या टोकाच्या प्रतिक्रिया गणेशोत्सव, दिवाळी अंक, मभादि वगैरे उपक्रमांवर गेल्या काही वर्षात आलेल्या आहे. परंतु त्या कुठल्याही संदर्भात मायबोली प्रशासनातल्या कोणीही स्वतःच्या आयडीने किंवा अ‍ॅडमीन/वेमा आयडीने कुठल्याही बाजूने प्रतिक्रिया दिल्याचं आठवत नाही. इतकच काय त्या त्या मंडळांमधलं कोणीही (काही अपवाद वगळता) वैयक्तिक आयडीने किंवा संयोजक/संपादक आयडीने त्या ठिकाणी किंवा माबोवर इतरत्र प्रतिक्रिया साधारणपणे देत नाही.
माप्रा उपक्रमामध्ये मात्र काही ठिकाणी मायबोली प्रशासनाचा भाग असलेल्या चिन्मयने चर्चेत सक्रिय भाग घेतल्याचं दिसतं आणि मुख्य म्हणजे निगेटिव्ह मतं खोडल्याचं दिसतं. त्यामुळे त्याची वैयक्तिक मतं असूनही मायबोली प्रशासन दिग्दर्शक, निर्माते ह्यांना डिफेंड करते आहे हा समज होणं स्वाभाविक आहे.

बाकी उपक्रमांच्या बाबतीत जो एक अलिखित नियम पाळला जातो तोच इथे पाळला तर हा प्रश्न येणार नाही ना ? (म्हणजे माप्रा टिममधल्या कोणी त्या चर्चेत स्वतःच्या किंवा माप्रा आयडीने भाग न घेणे)... (हा प्रश्न आहे.. उपाय सुचवलेला नाही...)
आता माप्रा उपक्रम आणि मायबोलीवरचे बाकीचे उपक्रम एकाच पारड्यात तोलता येतील का ते मात्र माहित नाही. (हा ही प्रश्नच आहे).

तसेच, मी ह्या संदर्भात लिहिलेली पोस्ट (जर तुम्ही वाचली असलीतच तर) वाचल्यानंतर तुम्हाला तशीच एक पोस्ट स्वतंत्रपणे का लिहावीशी वाटली हेही समजले नाही.

भाऊ Lol

बेफिकीर, तुमची आणि माझी पोस्ट वेगळी आहे. Happy
तुम्ही आधिकृत उत्तरे माप्रा आयडीने द्यावी अन्यथा डिस्क्लेमर टाकावा असं म्हणत आहात. मी टीममधल्या कोणी चर्चेत भाग घेऊच नये असे म्हणत आहे (कुठल्याच आयडीने).

पराग, नाही वेमा यांच्या उत्तरानंतर-मुळे माझी पोस्ट एडिट केलेली नाही. माझी पोस्ट लिहिल्या नंतर काही वेळात आलेल्या एका फोन वर माझा प्रतिसाद " खोडसाळ्पणाचा" आहे अशी प्रतिक्रिया दिली गेली. मला ते फारच धक्कादायक आणि दु:खकारक होते. माझ्या इंटेन्शनचा हा अर्थ मला फार लागला. फोन चालू असतानाच मी माझी पोस्ट संपादित केली. दरम्यान वेमांचे उत्तर आले होते. म्हणुन मी दुसरा प्रतिसाद लिहिते ज्यामुळे (आता झाला तसा) गैरसमज होणार नाही असेही मी नमूद केले. परंतु आता मी इथे काहीच लिहू नये असे मत त्यांनी मांडले. मी त्यांच्या मताचा आदर केला. झाल्या प्रकारबद्दल संबंधित व्यक्तीची क्षमा मागून तो विषय मी संपवला. ( कोणताही वाद घालून सुटत नाही, तो सोडवावा लागतो. आपली चूक असो-नसो, समोरच्याची माफी मागून तो लवकर सुटतो असा माझा अनुभव आहे- मतही आहे )
अशीच इमेल, संपर्कातून वेमांनाही लिहिली, त्यांचीही क्षमा मागितली. (ती त्यांना मिळाली की नाही माहिती नाही, कारण "स्वतःसाठी एक प्रत " यावर टिक करूनही मला ती मेल आलेली नाही )
मायबोलीने मला अगणित आनंद दिला आहे. वेळोवेळी मी ते नमूदही केले आहे. त्यामुळे माझ्या कोणत्याही कृतीचा त्रास मायबोलीला होऊ नये हीच नेहमी इच्छा होती, आहे, राहिल.
हे माझे या धाग्यावर आणि मायबोलीवरही शेवटचे पोस्ट
मायबोली अन मायबोलीकर सर्वांचे मनापासून आभार !
(सावली क्षमस्व तुझ्या धाग्यावर हे सगळे लिहावे लागले )

अवलची दुसरी पोस्ट उडाली का?
छान!
आता एकेका सदस्याला दुखावून मस्तं कमर्शियलायजेशन होतंय मायबोलीचं .
अभिनंदन.

अरे हां... इथे सकाळी वाचली होती. त्यावर प्रतिसाद पण द्यायचा विचार केला होता. आता देवुयात म्हटले तर ती गायब.

मला वाटते कि फोन वगैरे करुन सांगणे म्हणजे खुपच घसटीतील / परस्पर ओळखिच असणार. मग त्यांनी चुक झाली सांगितल्यावर त्यांची माफी मागुन इथे कधीच काही न लिहणे हा अवलजींचा निर्णय चुकिचा आहे असे वाटतेय.

आता प्रत्येकान काय लिहाव / कुठपत लिहाव / काय लिहु नये असे दंडक निर्माण होतील का?
जसं सदस्यांना मुभा आहे तस संचालकांना का असु नये ?
चिनुक्स ने जर केले डीफेंड तर काय बिघडले? सदस्य म्हणुन अथवा संचालक म्हणुन ?
कमर्शियल गोष्टींचा त्याच पध्हतीने विचार केला जावा. आपण आपल्या क्षेत्रात करतोच ना?
आता माध्यम प्रायोजक व्हायचे आणि त्याची चांगली पब्लिसिटी होते कि नाही हे पहायचे नाही म्हणजे काय? उदा. लक्सची अ‍ॅड करणार्‍याच्या घरातील कोणितरी लक्स चांगला आहे पण थोडा कमी चांगला आहे म्हणण्या सारखे आहे.

मायबोली प्रशासन पहिल्यांदा पहाते काय कि चित्रपट कसा आहे ? काही चुका राहिल्यात काय? मग त्याचा माध्यम प्रायोजक बनते काय?

जर आवडलाच नाही तर 'माध्यम प्रायोजक' या सर्कलच्या बाहेर जाउन लिहले तर 'कमशिअल' पॉइंटने काय बिघडले. इतर चित्रपटांची चिरफाड सुरु असतेच कि. कि आपण माध्यम प्रायोजक आहोत तर तसे होउ द्यायचे नाही असा अलिखित करार आहे.?

इतके सारे प्रश्न डोक्यात पिंगा घालु लागलेत.
आणि पोष्ट उडवता येते हे इतक्या वर्षात आजच मला समजले. Happy

अवलची पोस्ट का उडवली? Uhoh
आधी असं कधीच नाही झालं मायबोलीवर!

पुन्हा एकदा अवलची पोस्ट प्रकाशित केली हे योग्य झाले. धन्यवाद.

जीडी, अवलची प्रतिसाद एडिटण्याबद्दलची जी पोस्ट आहे (हेमाशेपो वाली) , ती टाकल्यानंतर काही वेळात दिसेनाशी झाली होती व आता काही सेकंदांपूर्वी पुन्हा दृश्यमान झाली आहे.

मायबोलीवरच्या प्रेमामुळे सांगावसं वाटतं की कृपया असे प्रकार मायबोलीवर होताना पाहणं हे अत्यंत क्लेशदायक आणि अनपेक्षित आहे, तरी असे होऊ नये.

आणि पोष्ट उडवता येते हे इतक्या वर्षात आजच मला समजले. स्मित>>>>

आणि हाइट म्हणजे ती 'काळ वेळ सापेक्ष' पुन्हा चिटकवता येते हे देखिल पहिल्यांदाच समजले. पण बाकि आता स्क्रिन शॉट वगैरे घेउन तावातावाने भांडणार्‍या लोकांची किव वाटु लागलेय. Wink

वादावादी हा देखील हल्लीं सिनेमाच्या 'प्रोमो'चा महत्वाचा भाग असतो; उर्मिला 'आजोबा'च्या प्रिमीयर्सना येत नाही यावरही जोरात 'कन्ट्रोव्हर्सी' निर्माण केली जात आहेच !! 'आजोबा' हंसतच असतील मिशितल्या मिशीत !! Wink

मायबोलीवरच्या प्रेमामुळे सांगावसं वाटतं की कृपया असे प्रकार मायबोलीवर होताना पाहणं हे अत्यंत क्लेशदायक आणि अनपेक्षित आहे, तरी असे होऊ नये.
+१

साती - तुम्ही अ‍ॅडमिनांना विपू करण्याआधी ती विशिष्ट अ‍ॅक्शन त्यांनी स्वतः घेतली होती हे नक्की केलेले होतेत का? मला तरी तसे वाटत नाही Happy

ही जी काय घट्ना घडल्याचे सगळे सांगत आहेत त्यावरील चर्चा आपण आता थांबवूयात का? Happy

"....हे माझे या धाग्यावर आणि मायबोलीवरही शेवटचे पोस्ट...."

~ अवल यांच्या या वाक्याने धक्का बसला आहे. एका ज्येष्ठ आणि अभ्यासू सदस्येवर असे काही लिहिण्याची वेळ येते ही मायबोली परंपरेला निश्चित्तच शोभादायक नाही.

अवल तुम्ही इथे असावे या मताचा आहे मी.....पुनर्विचार करावा निर्णयाचा इतपतच विनंती करीत आहे.

विशिष्टं घटना म्हणजे फोनबद्दल म्हणत असाल तर तो वैतक्तिक स्वरूपाचा असून माबो किंवा अ‍ॅडमिनतर्फे नाही हे मी अवलशी बोलून खात्री करूण लिहीत आहे.
मी इथे मुख्यतः असे झाले होते हे लिहिलेली अवलची पोष्ट उडवल्याबद्दल आहे.
पोष्ट उडवायचा अधिकार अ‍ॅडमिनकडे आहे असा माझा आत्तापर्यंत समज आहे.

चर्चा माझ्याकडून अजून काहीवेळ चालूच राहिल.
Wink

मी माध्यम प्रायोजक सिनेमा(हा व अधीचेहे सिनेमे) बद्दल वाचलेल्या प्रतिक्रिया पाहूनतेव्हा माझाही असा समज झालेला की मायबोली प्रायोजक असल्याने आपल्याला खरोखर किती आवडला/नावडला ते लिहिले तर बरोबर ठरणर नाही.(प्रायोजकलाच दोष दिल्यासारखे होइल वगैरे माझे समज झाले). कारण तेव्हाही काही प्रतिक्रिया वाचून असेच वाटलेले.
चिनूक्स ह्यांच्या प्रतिक्रिया वाचून आताही असाच समज होतोय की , ते प्रायोजकाच्या मंडळातील असावेत म्हणून त्यांना 'बाजू'(चित्रपटाची बाजू) माहितीय म्हणून डीफेंड करताहेत. असो.

मूवी पहाणर आहे एकदा पण...........

>विशिष्टं घटना म्हणजे फोनबद्दल म्हणत असाल तर तो वैतक्तिक स्वरूपाचा असून माबो किंवा अ‍ॅडमिनतर्फे नाही >हे मी अवलशी बोलून खात्री करूण लिहीत आहे.

साती हे स्पष्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वेबमास्तर, अ‍ॅडमीन आणि अवल यांंच्याशी वैयक्तीकरित्या फोनवर बोललेली व्यक्ती या पूर्ण भिन्न आहेत. पण अवल यांच्या पोस्ट मधल्या वाक्यरचनेवरून त्यात सरळमिसळ झाल्यासारखी वाटते म्हणून आणखी गोंधळ होऊ नये म्हणून ती पोस्ट तात्पुरती अप्रकाशीत केली होती.

> दरम्यान वेमांचे उत्तर आले होते. म्हणुन मी दुसरा प्रतिसाद लिहिते ज्यामुळे (आता झाला तसा) गैरसमज होणार नाही असेही मी नमूद केले. परंतु आता मी इथे काहीच लिहू नये असे मत त्यांनी मांडले.

मी (वेमा) मायबोलीवरती जाहीर धोरण पोस्ट केले होते. अवल यांना थेट उत्तर दिले नव्हते. अजूनही ती पोस्ट तशीच्या तशी या धाग्याच्या पहिल्या पानावर आहे. पण अवल यांनी काहीच लिहू नये असे मत कुठेच लिहले नाही. त्यांचा आणि माझा कुठल्याच माध्यमात संपर्क झाला नाही. त्यामुळे वर म्हटलेली "त्यांनी" हे वेमा नाही.

>अशीच इमेल, संपर्कातून वेमांनाही लिहिली,
सर्वरचे लॉग पाहता अवल यांनी अ‍ॅडमीनना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो (वेमा ना नाही) पण काही कारणांमुळे त्यांनाही ती ईमेल मिळालेली नाही. ती पोहोचली असती तर त्याची प्रत अवल यांना तरी यायला हवी.

पोस्ट तात्पुरती अप्रकाशित करण्याचा उद्देश अवल यांचे म्हणणे बाहेर येऊ नये असा कधीच नव्हता.

Pages