कैरी मार्गारिटा व कैरी आंबा मार्गारिटा

Submitted by नीधप on 10 May, 2014 - 12:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बर्फ
कैरीचा रस
पिकलेल्या आंब्याचे तुकडे वा रस (ऑप्शनल)
मीठ
मिक्सर

दारवा
व्हाइट/ सिल्व्हर टकिला
कुठलीही ऑरेंज लिक्यॉर - ट्रिपल सेक(Triple Seq) किंवा कॉनत्रॉ/ कॉनत्रु/ कॉन्ट्रो(Cointreau)

क्रमवार पाककृती: 

लागणारा वेळ हा कैरीचा रस काढायला लागणारा वेळ न लक्षात घेता दिलेला आहे. कैरीचा रस ही पूर्वतयारी आहे. तो विकतचा असल्यास (असतो का हे माहित नाही) त्याचे प्रमाण चव घेऊन मग ठरवावे. शक्यतो स्वतःच करावा. Happy
कैरीचा रस काढायची पद्धत -
कैरीची साले काढून तुकडे करायचे. ते तुकडे मिक्सरमधून अगदी गंधासारखे बारीक वाटण होईल एवढे फिरवायचे. यासाठी थोडे पाणी घालावेच लागेल. पण गरजेपेक्षा जास्त पाणी घालू नये.
हे वाटण कापडातून गाळून घ्यावे. पटकन सगळे गाळले जाणार नाही तर सरळ कापडात पुरचुंडी करून चक्क्यासारखे टांगून खाली पातेले ठेवायचे. तास दीड तास ठेवून द्या आणि कंटाळा आला की शेवटी ती पुरचुंडी पिळून घ्या.
हा रस बाटलीत/ डब्यात भरून फ्रिजात (त्याच दिवशी बनवायची असेल तर) किंवा डिप फ्रिजात (दोन तीन दिवसांनी करायची असेल तर) ठेवून द्या.

आंबा फ्लेवरही आणायचा असेल तर आपल्या आवडीप्रमाणे हापूस/ पायरीच्या व्यवस्थित पिकलेल्या आंब्याचे तुकडे वा रस करून ठेवावे. हे मात्र आयत्यावेळेलाच कारण पिकलेल्या आंब्याची चव कापून ठेवल्यावर उतरते हे आपल्याला माहित आहेच.

शक्य झाल्यास प्रत्यक्ष सर्व्ह करायच्या तासभर आधी मार्गारिटाच्या ग्लासांच्या कडा कैरी रसाने किंचित ओल्या करून त्यावर मीठ लावून ते ग्लासेस फ्रीजमधे ठेवून द्यावे.

आता प्रत्यक्ष सर्व्ह करायच्या वेळेस करायच्या गोष्टी

एरवी मार्गारिटामधे लिंबाचा रस असतो. इथे आपण कैरीचा रस हा लिंबाच्या रसाऐवजी वापरत आहोत. लिंबापेक्षा कैरीचा रस आंबट जास्त असतो त्यामुळे आपण काढलेल्या रसाची चव घेऊन मग पाणी घालून थोडा डायल्युट करावा. मात्र डायल्युट करून स्टोर करू नये. ते आयत्या वेळेलाच करावे.

टकिला (२ भाग) + ऑरेंज लिक्योर(१ भाग) + कैरीचा डायल्युटेड रस(दीड भाग) + बर्फ (१ भाग) असे मिक्सरात घालावे एकदा फिरवावे. बर्फाचा चुरा होणे गरजेचे. हेच हॅण्ड ब्लेण्डरनेही करता येऊ शकते.
मग फ्रिजातले फ्रॉस्ट केलेले ग्लासेस काढून त्यात हे मिश्रण ओतावे. एका ग्लासामधे साधारण ७५ मिली एवढे मिश्रण ओतावे.
बर्फाऐवजी बर्फचुरा असेल तर तो १ भाग बर्फचुरा आधीच प्रत्येक ग्लासात भरावा. मग मिक्सरात/ ब्लेंडरमधे वेगळा बर्फ घालू नये.

असे गारेगार झालेले ग्लास लग्गेच लोकांना प्यायला द्यावे.

आंबा फ्लेवर मार्गारिटा करायची असेल तर वरच्या सगळ्या मिश्रणात अर्धा भाग एवढे आंब्याचे तुकडे/ रस घालावे. मिक्सरमधून फिरवताना तुकडे/ रस अगदी एकजीव व्हायची गरज नाही. पण पिताना मोठे मोठे तुकडे किंवा रसाच्या गुठळ्याही यायला नकोत मधे मधे एवढेच फिरवावे.

चीअर्स!!!

वाढणी/प्रमाण: 
अंदाजपंचे दाहोदरसे!
अधिक टिपा: 

ओरिजिनल मार्गारिटामधे टकिला : ऑरेंज लिक्योर : लिंबाचा रस : फ्लेवर याचे प्रमाण थोडे वेगळे असते. हे प्रमाण आपण आपल्या टॉलरन्स आणि चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. कैरी-आंबा मार्गारिटा साठी मी वर दिलेले प्रमाण माझ्यासाठी आणि माझ्या मित्रमंडळींच्यात आवडलेले आहे. तुम्ही प्रयोग करून टकिला वाढवू शकता Happy

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट, विविध ठिकाणी घेतलेली मार्गारिटाची चव, प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे रेसिपी :).
अलीकडे एका देशी रॉयल वेडींग एक्स्पो ला मँगो -सॅफ्रॉन-कारडमम थोडक्यत पन्हं स्टाइल कॉकटेल होतं त्याची आठवण आली Happy , गार्निश करताना केशराच्या काड्या , तुझ्या रेसिपितही छान लागेल असं वाटतय !

नाही. पन्ह्यामधे कुठलंही अल्कोहोल बकाल लागतं.
कच्च्या कैरीच्या रसाऐवजी शिजवलेली कैरी वापरून पाह्यली होती. वा-ई-ट लागलं. Happy

रेसिपी माहित नाही पण तिथे जे प्यायलं ते आवडलं होतं , पन्ह्याइतकं गोड मिट्ट नवह्तं पण केशर -वेलदोडा स्वाद सही होता.

मस्तच !
<<पन्ह्यामधे कुठलंही अल्कोहोल बकाल लागतं.>> सहमत. मी ब्राऊन बकार्डी, मलिबु, ग्रे गूज व्होड्का, सिक्किम लिकर सगळे प्रयोग केलेत पक्के (पिणारे) मित्र नुसते पन्हे प्यायला तयारच व्हायचे नाहीत म्हणून. ऑल फ्लॉप.

यम्मी यम्मी. नक्की करून बघणार. यावर्षी इकडे हापूस मिळणार नाहीये म्हणून मग कैरीच वापरेन Happy

कॅन्ड आमरस मिळतो , तो वापरून बघावा का ? ( विचारमग्न ) . ब्राझिलियन आंबे सुद्धा मिळतात ते सुद्धा वापरून बघते आणि कंपेअर करते Happy .