अच्छे दिन आने वाले है!!!- चल रे बिबळ्या टुणुक टुणुक !!!!!

Submitted by घारुआण्णा on 7 May, 2014 - 00:28

"अच्छे दिन आने वाले है!!! " ajoba poster 1.jpg " धन्यवाद सुजय आणि अख्खी आजोबा टीम नवा प्रवास दाखवल्याबद्दल नाही तर घडवुन आणल्याबद्दल अन्न वस्त्र आणि निवारा या सगळ्याच प्राण्यांच्या मुलभुत गरजा...
त्यापैकी वस्त्र ही गरज फक्त माणुस याच प्राण्याची.....
पण बाकी अन्न आणि निवारा यासाठी प्रत्येक जिव हा संघर्ष कर असतो पण हे करताना तो कुठेही आपापली मर्यादा सोडत नाही, आणि निसर्गाच्या विरुध्दही जात नाही अपवाद, केवळ मनुष्याप्राण्याचा....
प्रचंड कुतुहल,आणि टोकाची भिती या मिश्रणातुन समोर येणारे भिषण वास्तव...... हे सगळ अतिशय सहज सोप्या आणि कोणताही आव न आणता समाजाला सांगण्याचा प्रयत्न.
अर्थात "आजोबा."
बिबळ्याला एका ठिकाणी पकडुन दुस-याठिकाणी सोडुन देणे हा सहज सरकारी खाक्या...... अर्थात हा नियम माणसांनाही लागु करतात आणि उभे करतात Transit CAMP...
पण बिबळ्या मात्र या Transit CAMPमध्ये राहात नाही तो करतो TRAVEL करतो त्याच्या मुळ स्थानाकडे जिथे अन्न आणि निवारा या गरजा सहजपणे भागु शकतील.
महिनाभर चालणारा हा त्या बिबळ्याची एकांगी प्रवास आणि त्यामुळे माणुस नावाच्या प्राण्याची होणारी धावपळ .....
फ्रेम टु फ्रेम सेट आणि सतत जंगलाचा आणि आजोबाचा वावर जाणवुन देणारं पार्श्वसंगीत...(साकेत कानिटकर खुपच छान !!!!)मराठीतच नव्हे तर एकुणच भारतिय सिनेमात अगदी वेगळा असा विषय.आणि हाताळणीही वेगळी..अगदी डिस्कव्हरी बघित्ल्या सारखा फील येत होता....
इतका सुंदर चित्रपट प्रायोजित केल्याबद्दल माप्र. चे अभिनंदन आणि अर्थात आम्हाला हे पाहाण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद
कलाकरांबद्दल:
शिंदेसाहेब: श्रीकांत यादव :उत्तम काम , सरकारी माणसं इच्छा असली तर किती चांगल्या गोष्टी करु शकतात याच उत्तम उदाहरण . कदाचित असे अनेक शिंदे फोरेस्टात काम करत असतील तर त्यांच्या प्रयंत हे पोहोचलं पाहीजे.
द्यानोबा : हृषिकेश जोशी आता hattrike ची तयारी करा भौ (येल्लो, आजोबा.....what next)
( सगळ्यात उत्तम संवाद इंदुमील चा "बाया म्हणतात ठेवल्यं द्यानोबाला" हसुन हसुन खुर्चीतुन पडलो )
(पुण्यातल्या मुलांबरोबरचे संवाद म्हंजे तर अति हुशार समाजाच्या बेगडी पणाला काढलेला तितकाच बेरकी चिमटा)सतत जमिनीवर आणणारे, सहज ,बेरकी वाटावं हे पात्र ....... शेवटच्या प्रसंगात "मी पाहिलाय आता परत नाही पाहाणार " हे सांगतानाही आजही गावखेड्याची निसर्गाजवळ राहायची मानसिकता दाखुन जातं.
जगवेगळ्या वेडगळपणात , लग्न , नोकरी अशा अडचणीच्या प्रश्नांना तोंड देत ....... तरीही आपलं काम मनापासुन केलेच पाहीजे आणि ते इतरांनाही समजावले पाहीजे, त्यांच्या पातळीवर उतरुन हे सांगणारी प्रभा राव. उर्मिला गूड वन ..... कदाचित भारतिय डिस्कवरीची Brand होउ शकेल अशी एनर्जी आणि अभिनय.
शिवा:( ओम भुतकर) अभिनयात ठीक ,पण या कडीचा एकंदर कथेतला संदर्भा नीटसा लागत नाही.
दिलिप प्रभावळकराचां आशावादी चेहरा आणि अर्थात सल्लाही लक्षात राहणारा, "प्रयत्न करत राहा कुठेतरी पोहेचणारच" ..
यशपाल शर्मा: आगदी थोड्या प्रसांगातुन विरोध दर्शवणारा, सर्वसामान्याचे प्रातिनिधिक..... हा संदर्भ अधिक अधिक गडद करता आला असता तर गैरसमज, सरकारी अनास्था अधिक उतरली असती.

सुजय , आधी शाळा आणि आता ही बिबळ्यांची शाळा इतक्या लहान वयातही हे करणं कहर है भौ.... प्रगतिपुस्तक असेच राहुद्या ....
सगळ्या टीम चे अगदी ..... ऒनिमेशन ते फोटोग्राफी , संगीत ते सहकलाकार,
विशेष धन्यवाद प्रोडुसर टीमचे कारण एक कॊलम बातमीची फिल्म करणार्यांवर विश्वास दाखवणं आणि कुठे ही निर्मितीमुल्यात कमीपणा न येउ देण ... इतकी रिस्क....
सगळ्यांचे अभिनंदन आणि प्रवासासाठी GOODLUCK
चित्रपटाला म्हणे स्टार द्यायची पध्दता आहे : मग १ * आजोबांना + १* सुजय ला + १ * कलाकरांना आणि १ * सगळ्या टीमला एकुण ****
वरचे चार यांनी त्याच्या कामाचे मिळवलेत आणि शेवटचा तुम्ही आम्ही मिळवुन द्यायचाय.

'आजोबा' प्रीमिअर - फोटो वृतांत http://www.maayboli.com/node/48848
आजोबा... माझा दोस्त आजोबांच्या छोट्याशा नातीचा वृतांत http://www.maayboli.com/node/48859?page=1

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीले आहे.

पुण्यातल्या मुलांबरोबरचे संवाद म्हंजे तर अति हुशार समाजाच्या बेगडी पणाला काढलेला तितकाच बेरकी चिमटा >> हे मात्र कळाले नाही काय आहे.

घारुअण्णा हे नाव २०१० च्या वर्षाविहार नंतर प्रथमच ऐकल. कुठे होतात महोदय ? लेख नाही कथा नाही प्रतिसाद नाही ?
एकदम अच्छे दिन आने वाले है ! अभिनंदन !

धन्यवाद लोक्स .
शिर्षका बद्द्ल थोडसं....
एक तर जिप्स्या ने दिलेली लिंक , माझ्या मुलीने ( नुपुर ने ) रंगवलेला हा बिबळ्या. आणि सध्याच्या साऱख्या निवड्णुकीच्या जाहीरतीचा मारा या मुळे घोष वाक्य हेच देउन टाकलं होते.
चित्रपटाच्या परिक्षणाला मात्र हेच नाव /वाक्य टाकलं , अर्थात "अच्छे दिन आनेवाले है" च हेतु ... नवीन प्रयत्न, नवीन विचार , आणि अशा पुर्ण कमर्शिल माध्यमातुन चक्क समाजाला दिलेला संदेश.....
अच्छे दिन = सुजय सारख्य सातत्याने नाविन्यपुर्ण देण्याचे रिस्क घेणार्यांसाठी, तुमच्य आमच्यासारख्या त्याला प्रतिसाद्देउन मराठी सिनेमाला नवीन उंची देणार्यांसाठी आणी अर्थातच सगळ्या पर्यावरण रक्षक /प्रेमींसाठीसुध्दा...
@लिंब्या आणि सर्व नमोप्रेमींना , थोडा पुढचा विचार करुया की...
@ नितिन, साधारण मे महीना आणि पावसाळा आला की बेडुक, चातक, आण्णा, आणि ववि या गोष्टी एकत्र दिसतात असे काही मुंबैकर म्हणतात..
@फारएंडा, चित्रपट खरच पहा, मजा येईल ते डायलोग ऐकताना....

आजोबा पाहील्यानंतर हे सगळं जाणवणार असं वाटलंच होतं.आणि पहिल्यांदा मायबोली ओपन केली,कारण शक्य तेवढ्या प्रतिक्रीय इकडेच पहायला मिळतील हे माहीत होतं.

फिल्म इतर बर्‍याच फिल्म्स सारखी इंटरव्हल नंतरच पकड घेते.तेंव्हा सुजयचा शाळा डोक्यात ठेऊन गेलात तर अपेक्षाभंग होणे शक्य आहे.

चित्रपट अजून थ्रील करता आला असता...पाठलाग दाखवून,थोडे ट्रेक अ‍ॅड केले असते,एखाद गाणं ही हवं होत...विशेषतः शेवटचे सीन्स...

सगळ्यांची कामे सुरेख...काही पात्रे अनावश्यक...काहींना आणखीन फूटेज देता आले असते...

बाकी चांगला आहे.पूर्वग्रह न ठेवता फिल्म बघावी लागते.विद्या अत्रेयंचं काम फिल्ममधून समजून येत.माझ्या मात्र जुन्नर 'Transit Camp'च्या आणि त्या ११ बिबट्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.
फिल्म मस्त आहे,जरूर बघा.फिल्म कन्सेप्ट लक्ष्यात घेऊन तो पहावा तर त्यात मजा येईल.

---------------------------------------------------
Wild Life Is Not An Entertainment...It's Real View Of Life And Facts.

एकीकडे हिचा नवरा त्याची सासू सारख्या विषयांवर येणाऱ्या तद्दन भंगार (व्यावसायिक सुद्धा नाही म्हणू शकणार) चित्रपटांच्या मांदियाळीत "आजोबा" चं कौतुक करावं तेव्हढं थोडंच.

दिलीपजी, यशपाल शर्मा, नसते तरी चाललं असतं. उर्मिला एक दोन प्रसंगात उत्तम अभिनयाची चुणूक दाखवते (संवादाला सलाम). तरीही असं वाटतं कि तिच्या ऐवजी एखादा शार्प अनोळखी चेहरा सुद्धा चालला असता.

पटकथेचा सावळा गोंधळ आहे. Continuity मधला घोळ अवाक् करतो.

शिवा झालेल्या कलाकाराने खरं तर अतिशय स्वाभाविक अभिनय केलाय मात्र पुन्हा एकदा... ते जोडपं नसतं तरी चाललं असतं.

हृषीकेश जोशी अधेमधे अभिनय केल्यासारखा अभिनय करतात.

छायांकन उत्कृष्ट म्हटलं पाहिजे. अनिमेशन अनावश्यक होतं असं म्हणणं चूक ठरेल. कारण दिग्दर्शकाला ते खाडी ओलांडणं वगैरे दाखवायचं असेल. लक्षात घ्या, सद्यस्थितीत प्राण्यांबाबतचे कायदे पहाता (जे योग्यच आहेत) खऱ्या बिबळ्याकडून काम करवून घेणं शक्य नाही. आणि लाईफ ऑफ पाय सारखी तांत्रिक झेप अजून आपण घेतली नाही त्यामुळे जे आहे त्यात सुजयचा हा प्रयत्न बावनकशी म्हटला पाहिजे.

शेवटच्या प्रसंगात आम्हा दोघांचाही कंठ दाटून आला, डोळे पाणावले... सिनेमा हॉल मधल्या माणसांना पडद्यावरच्या एका मुक्या जनावराने हलवून सोडावं.. हे सुजयचं यश.

सुजयला खूप शुभेच्छा आणि मराठी सिनेमालाही...

सद्यस्थितीत प्राण्यांबाबतचे कायदे पहाता (जे योग्यच आहेत) खऱ्या बिबळ्याकडून काम करवून घेणं शक्य नाही. आणि लाईफ ऑफ पाय सारखी तांत्रिक झेप अजून आपण घेतली नाही >>
लाइफ ऑफ पाय मध्ये खरा वाघ वापरलाय, बहुतेक तिकडे आपल्यासारखे प्राण्यांच्या वापराविषयीचे कायदे नसावेत.

Pages