अच्छे दिन आने वाले है!!!- चल रे बिबळ्या टुणुक टुणुक !!!!!

Submitted by घारुआण्णा on 7 May, 2014 - 00:28

"अच्छे दिन आने वाले है!!! " ajoba poster 1.jpg " धन्यवाद सुजय आणि अख्खी आजोबा टीम नवा प्रवास दाखवल्याबद्दल नाही तर घडवुन आणल्याबद्दल अन्न वस्त्र आणि निवारा या सगळ्याच प्राण्यांच्या मुलभुत गरजा...
त्यापैकी वस्त्र ही गरज फक्त माणुस याच प्राण्याची.....
पण बाकी अन्न आणि निवारा यासाठी प्रत्येक जिव हा संघर्ष कर असतो पण हे करताना तो कुठेही आपापली मर्यादा सोडत नाही, आणि निसर्गाच्या विरुध्दही जात नाही अपवाद, केवळ मनुष्याप्राण्याचा....
प्रचंड कुतुहल,आणि टोकाची भिती या मिश्रणातुन समोर येणारे भिषण वास्तव...... हे सगळ अतिशय सहज सोप्या आणि कोणताही आव न आणता समाजाला सांगण्याचा प्रयत्न.
अर्थात "आजोबा."
बिबळ्याला एका ठिकाणी पकडुन दुस-याठिकाणी सोडुन देणे हा सहज सरकारी खाक्या...... अर्थात हा नियम माणसांनाही लागु करतात आणि उभे करतात Transit CAMP...
पण बिबळ्या मात्र या Transit CAMPमध्ये राहात नाही तो करतो TRAVEL करतो त्याच्या मुळ स्थानाकडे जिथे अन्न आणि निवारा या गरजा सहजपणे भागु शकतील.
महिनाभर चालणारा हा त्या बिबळ्याची एकांगी प्रवास आणि त्यामुळे माणुस नावाच्या प्राण्याची होणारी धावपळ .....
फ्रेम टु फ्रेम सेट आणि सतत जंगलाचा आणि आजोबाचा वावर जाणवुन देणारं पार्श्वसंगीत...(साकेत कानिटकर खुपच छान !!!!)मराठीतच नव्हे तर एकुणच भारतिय सिनेमात अगदी वेगळा असा विषय.आणि हाताळणीही वेगळी..अगदी डिस्कव्हरी बघित्ल्या सारखा फील येत होता....
इतका सुंदर चित्रपट प्रायोजित केल्याबद्दल माप्र. चे अभिनंदन आणि अर्थात आम्हाला हे पाहाण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद
कलाकरांबद्दल:
शिंदेसाहेब: श्रीकांत यादव :उत्तम काम , सरकारी माणसं इच्छा असली तर किती चांगल्या गोष्टी करु शकतात याच उत्तम उदाहरण . कदाचित असे अनेक शिंदे फोरेस्टात काम करत असतील तर त्यांच्या प्रयंत हे पोहोचलं पाहीजे.
द्यानोबा : हृषिकेश जोशी आता hattrike ची तयारी करा भौ (येल्लो, आजोबा.....what next)
( सगळ्यात उत्तम संवाद इंदुमील चा "बाया म्हणतात ठेवल्यं द्यानोबाला" हसुन हसुन खुर्चीतुन पडलो )
(पुण्यातल्या मुलांबरोबरचे संवाद म्हंजे तर अति हुशार समाजाच्या बेगडी पणाला काढलेला तितकाच बेरकी चिमटा)सतत जमिनीवर आणणारे, सहज ,बेरकी वाटावं हे पात्र ....... शेवटच्या प्रसंगात "मी पाहिलाय आता परत नाही पाहाणार " हे सांगतानाही आजही गावखेड्याची निसर्गाजवळ राहायची मानसिकता दाखुन जातं.
जगवेगळ्या वेडगळपणात , लग्न , नोकरी अशा अडचणीच्या प्रश्नांना तोंड देत ....... तरीही आपलं काम मनापासुन केलेच पाहीजे आणि ते इतरांनाही समजावले पाहीजे, त्यांच्या पातळीवर उतरुन हे सांगणारी प्रभा राव. उर्मिला गूड वन ..... कदाचित भारतिय डिस्कवरीची Brand होउ शकेल अशी एनर्जी आणि अभिनय.
शिवा:( ओम भुतकर) अभिनयात ठीक ,पण या कडीचा एकंदर कथेतला संदर्भा नीटसा लागत नाही.
दिलिप प्रभावळकराचां आशावादी चेहरा आणि अर्थात सल्लाही लक्षात राहणारा, "प्रयत्न करत राहा कुठेतरी पोहेचणारच" ..
यशपाल शर्मा: आगदी थोड्या प्रसांगातुन विरोध दर्शवणारा, सर्वसामान्याचे प्रातिनिधिक..... हा संदर्भ अधिक अधिक गडद करता आला असता तर गैरसमज, सरकारी अनास्था अधिक उतरली असती.

सुजय , आधी शाळा आणि आता ही बिबळ्यांची शाळा इतक्या लहान वयातही हे करणं कहर है भौ.... प्रगतिपुस्तक असेच राहुद्या ....
सगळ्या टीम चे अगदी ..... ऒनिमेशन ते फोटोग्राफी , संगीत ते सहकलाकार,
विशेष धन्यवाद प्रोडुसर टीमचे कारण एक कॊलम बातमीची फिल्म करणार्यांवर विश्वास दाखवणं आणि कुठे ही निर्मितीमुल्यात कमीपणा न येउ देण ... इतकी रिस्क....
सगळ्यांचे अभिनंदन आणि प्रवासासाठी GOODLUCK
चित्रपटाला म्हणे स्टार द्यायची पध्दता आहे : मग १ * आजोबांना + १* सुजय ला + १ * कलाकरांना आणि १ * सगळ्या टीमला एकुण ****
वरचे चार यांनी त्याच्या कामाचे मिळवलेत आणि शेवटचा तुम्ही आम्ही मिळवुन द्यायचाय.

'आजोबा' प्रीमिअर - फोटो वृतांत http://www.maayboli.com/node/48848
आजोबा... माझा दोस्त आजोबांच्या छोट्याशा नातीचा वृतांत http://www.maayboli.com/node/48859?page=1

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक्स धन्यवाद.... जिप्स्याच्या फोटो ची वाट पहात आहे ... लवकर टाका ....

भाऊ नमस्कार : आपले व्यन्गचित्र नेहमिप्रमाणेच मस्त.

घारुअण्णा : खूप छान अवलोकन .
चित्रपट बघायचि वेळ झाली Happy

घारु मस्त लिहीलं आहेस.

भाऊकाका नेहमीप्रमाणेच मार्मिक व्यंगचित्र

भाऊ Lol

>>>> अच्छे दिन आने वाले है!!!- <<<< हे शि र्षक वाचले अन वाटले की हे नमोनमः असेल,
पण बिबळ्याची अन नमोनमःची संगती लागत नव्हती!

घारूआण्णा, एकदम सह्ही लिहिलंय. बोले तो झक्कास Happy

हे शि र्षक वाचले अन वाटले की हे नमोनमः असेल,
पण बिबळ्याची अन नमोनमःची संगती लागत नव्हती!>>>>त्यासाठी
हि लिंक पहा.

मस्त परिक्षण .. !
भाउ काका .. Happy

पोस्टर बघितल्यावरच सिनेमा पहायचाच असं ठरवलं होत पण आता उसगावातुन परतल्यावरच बघता येईल Sad

Pages