उन्हाळी निसर्ग

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 May, 2014 - 07:03

उन्हाळा म्हटला की डोळ्यासमोर निसर्गात रणरणते उन, सुकलेले गवत, पाण्याचे प्रवाह आटलेले असे सगळे डोळ्यासमोर येते. पण ह्याच कडाक्याच्या उन्हात डोळे थंड गार करण्यासाठी निसर्गाने काही झाडांना बहरण्याचे वरदान दिले आहे. पक्षांना घरटी बांधून आपआपली कुटूंब व्यवस्था चालवण्याची मुभा दिली आहे. रानमेव्याचा आस्वादही आपल्याला ह्याच दिवसात भरभरून घेता येतो.

१) दुपार नंतरचा चंद्र पालवी नसलेल्या झाडाचे सौंदर्य वाढवत आहे.

२) जोडीदाराच्या प्रतिक्षेत

३) संपुष्टात आलेली प्रतिक्षा

४) किती वाट पाहू ?

५) स्पॅथेडीया

६) बहावा

७) सुरणाचे फुल

८) आमची कोवळी पालवीही किती नयनरम्य.

९) फुलांना नुकतेच धरत असलेले जांभूळ

१०) जामच्या फुलांना लागत असलेले जाम

११) जाम

१२) कुंभाची फुले

१३) कुंभाची फळे

१४) वारूळ

१५) पर्यन्य फुले

१६) कावळ्याचे निवासस्थान

१७) ताडगोळे

१८) तिथे दिसतोय मासा

१९) गाण्याचा रियाझ चालू आहे.

२०) कर्त्या करवित्याला विसरून कसे चालेल? ह्याचे रुपही पहा किती तेजोमय आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्या, असामी धन्स.

तो किंगफिशर माश्याला हसुन म्हणतोय. अब कहा जाएगा बच्चू Lol

जागू मस्त फोटोज. कैर्या विसरलीस.

अय्या, आर्या तुला खरंच ताडगोळे माहित नाहीत? अरेरे Wink निदान त्यासाठी जरा मुंबईच्या बाजुला येच. माझ्या सासुबाई म्हणतात की एक तरी ताडगोळा सिझनमध्ये खावाच. पोटाची उष्णता कमी होते.

जागू,

सर्वात शेवटचा फोटो सर्वाधिक सुंदर!!! मधोमध सुर्यबिंब आणि आकाश तेजःपुंज झालेले. अहाहा!!!

कोकीळेला कसला रियाज लागतो. तिने कधीही गावे.

१५ व्या फोटोत नाव 'पर्जन्यवृक्ष' असे हवे.

वा. सुरेखच...
रानमेवा - करवन्दे विसरली की हो. जांभळे दाखविली आनी करवन्दे नाहीत म्हणून तुमची आमची गट्टी फू.

वा जागू, शब्दच नाहीत. अतिसुंदर. शेवटचा फोटो अप्रतिम.

करवंदाची आठवण मलापण आली.

मस्तच!!!!

जामचा फोटो एकदम tempting Happy

किंगफिशर जागूला मासा आणून देणार आणि मग ती काहीतरी मस्त पाक्रु करून माबोवर टाकणार Proud

तो किंगफिशर माश्याला हसुन म्हणतोय. अब कहा जाएगा बच्चू हाहा>>>> नाही नाही.

तो विचार करत असेल जागूच्या आधी तो मासा कसा बरे पकडावा Wink

मस्त ग जागू Happy

मला एकही फोटो दिसत नाही. भ्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य Sad

दिसले. दिसले. जागू मस्त आलेत फोटो. Happy
४ नंबरच्या फोटोत एक मज्जा झालेय. तुझ्या लक्षात आलीच असेल ना?(फोटोचं शिर्षक आणि फोटो बघीतला की लक्षात येतेय.) Proud

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

बी ती फुले आहेत म्हणून मी माझ्यामनाने पर्जन्य फुले नाव दिले Lol झाडासकट फोटो आला असता तर वृक्ष लिहीले असते. धन्स. पण लक्षात आणुन दिल्याबद्दल.

करवंदांचा फोटो सापडला नाही. शोधते अजुन मिळाला तर.

शोभे काय ग ४ नंबरचे तुझ्या नजरेत?

Pages