आमटीचे प्रकार :- बटाट्याची आमटी

Submitted by _हर्षा_ on 25 April, 2014 - 02:38

अनेक वेळेस साधं वरणं, त्याची मसालेदार आमटी, फोडणीचं वरणं अस खाऊन खुप कंटाळा येतो. मग कधीतरी बदल म्हणुन ही आमटी जेवणात बहार आणते. अगदी भाजी आणि आमटी दोन्हीची इतिकर्तव्यता ही बजावते. उन्हाळ्यात / किंवा इतर कधीही त्याच त्याच जेवणाचा कंटाळा आला तर किमान पोटभर भात तरी खावाचं म्हणुन आई खास ही आमटी करायची. Happy
खुप दिवसांपासुन एक हटके आमटीची कृती इथे लिहिण्याची इच्छा होती. बहुदा तुमच्यासाठी वेगळी असेल. ;)नसल्यास ज्यांना माहित नाही त्यांच्या ज्ञानात भर समजा.

साहित्य :
२ उकडलेले बटाटे, मीठ, गुळं, आमसुलं २/३, फोडणी साठी मोहरी, जिरे, हिंग, हळद वै., सुकं खोबरं आणि जिरे वाटुन त्याची भरड, काळा मसाला (बिना कांदा लसणाचा), दोन चमचे डाळीचं पीठ कडिपत्ता, कोथिंबिर, पाणी

कृती : उकडलेले बटाटे हातानेच कुस्करुन घ्या. मग तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद, कडिपत्ता घालुन त्यावर उकडलेले बटाटे घालुन परता. परतत असतानाच त्यावर डाळीचं पीठ घालुन घ्या. डाळीचं पीठ बटाट्याला नीट लागलं की जरूरीनुसार पाणी घाला (खुप जास्त नको). मग त्यात लाल तिखट, काळा मसाला, कुटलेलं जिरं खोबरं, गुळ, आणि आमसुल, मीठ घालुन एक उकळी येऊ द्या मग चिरलेली कोथिंबिर घालुन अजुन एक उकळी येऊ द्या.
झालं की , गरमागरम वाफाळत्या आमटी बरोबर मस्तपैकी भात घ्या. अगदीच वाटलं तर एखादा उडदाचा पापड भाजुन (च) घ्या.... वाट कसली बघताय...ओरपा मस्त आमटी भात!!!

तळटीपा : शक्यतो काहीही टीपा द्यायला लागणार नाहीत अशीच आहे ही आमटी. करुन बघा आणि सांगा Proud

माहितीचा स्त्रोत : माझी आई

(आता केली की नक्की प्रचि टाकणार)
बाकीच्यांनी ही आमट्यांचे विविध प्रकार / आपल्या पद्धती इथे लिहिण्यास हरकत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स दिपु, दिनेशदा!!!
(इतक्या लग्गेच हा वेगळा प्रकार आहे अशा अर्थी दिनेशदांची प्रतिक्रिया येणे म्हणजे माझ्या सारख्या नवख्या सुगरणीला शाब्बासकी / प्रोत्साहन वै. आहे!!! दा तुम्हाला स्पेशल धन्स Happy )

वेगळाच प्रकार! नक्की करून पाहीन...
मी थोडं डाळीचं पीठ लावलेली बटाट्याची भाजी खाल्ली आहे, पण आमटी प्रकरण नवीन!

हर्षा.. असे दुसर्‍याच्या हातचे खायची संधी मला सठीसामाशीच मिळते.. पण दुसर्‍याच्या कृतीने मात्र करायला नेहमीच आवडते. बेसन बटाट्याबरोबरच परतणे हा वेगळेपणा आहे यातला. नक्की करेन मी.

धन्स सगळ्यांना!!!
मुकु, ही भाजी नाहीच मुळी! Wink मलातरी भाताबरोबरच जास्त आवडते, पोळीबरोबर या आमटीची मज्जा भातखाऊ लोकांना नक्कीच येणार नाही!
येस्स दिनेशदा, वेगळी म्हणुन नक्की करुन बघाच! Happy

हा दिनेशदांचा वरणाच्या प्रकाराचा बाफ. इथे आमट्या पण आहेत.

http://www.maayboli.com/node/14872

इथे पण तुमची रेसिपी (किंवा लिंक) टाका म्हणजे सगळ्यांबरोबर सापडायला सोपी जाईल.