पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी, पण गूळ किती प्रमाणात घालायचा? गार झाल्यावर चालतो का गूळ घालून? पिठीसाखर घालून मी आधी करायचे पण मी एका ठिकाणी असं वाचलं की साखर ही कॅल्शिअम रॉबर आहे, ती शरीरात कॅल्शिअमचं शोषण होउ देत नाही. म्हणून गुळाचा प्रपंच. प्लीज गुळाचं प्रमाण सांग.

वावे नाचणीचे पीठ समजा एक वाटी असेल तर गुळ साधारण अर्धा ते पाऊण वाटी पुरतो. जास्त गोडमिट्ट नको असेल तर एका वाटीला अर्धा चालेल. मी नेहेमी वाटी चे प्रमाण घेते. मला अन्दाजाने जमत नाही.

गव्हाच्या शेवया गुळ आणि दूध घालून कश्या करतात? पहिला शिजवतात मग थंड पाण्यात टाकतात असे काहीतरी ऐकीवात आहे. नक्की कशा करतात? ओले खोबरेही घालतात त्यात.

खरच लवकर द्या. आम्ही मुरुड वरून येताना नवर्‍याने हौशेने शेवया घेतल्यात. कालच करायची फर्माईश केली होती. पण माझा ह्या रेसिपी बाबतचा अनाडीपणा आडवा आला. Lol आज करायची आहे संध्याकाळी.

नाचणीच्या सत्त्वाचे / पीठाच्या डोसे करता येतील का? माझ्या घरी नाचणीचं सत्त्व आहे खूप.

वेल मी बरेचदा करते नाचणीच्या पिठाचे डोसे. सत्वाचे नाही करुन पाहीले पण होतील.

मी त्यात कांदा, सिमला मिरची, कोबी, कोथिंबीर, थोडा लसुण बारीक चिरुन घालते थोडा टोमॅटोही घालते. आणि डोसे करुन मुलिंना चायचीज डोसे ह्या नावाने खायला घालते त्यामुळे त्या आवडीने खातात. Happy नवर्‍यालाही हे खुप आवडतात.

जागू, हातावरच्या शेवया आहेत का त्या? त्या वेळून करतात. म्हणजे उकळत्या पाण्यात उकडून चाळणीवर घ्यायच्या अन मग दुधात उकळायच्या. यात आम्ही साखर घालतो. ( म्हणजे घालायचो घरी हातावरच्या शेवया होत असत लहानपणी )गुळाचे माहित नाही. कोमट दुधात गुळ चालू शकेल.

जागू - दोन प्रकारे उकडून किंवा तळून उकडून जरा गिळगिळीत लागतात पध्दत अनघाने सांगितलीच आहे. मी शेवया बारीक करुन तुपावर परतते गुलाबी झाल्या कीसाखर/गूळ (दूध आटवलेले) मग साखर घालते कालच अक्षय त्रतीया म्हणून खीर केली होती. विदर्भात गूळाचा वापर कमी असतो.

जागू,
तांदळाच्या पिठाची उकड काढायची.उकड मळून नंतर शेवेच्या सोर्‍यातून छोटी छोटी शेवेची चाके तयार करून मोदकाप्रमाणे वाफवून घ्यावी.नारळाचा दाटसर रस (दूध) काढावा.त्यात गूळ मिसळून ,वेलची घालून मंद गॅसवर
गरम करावे.उकळी येऊ देऊ नये तसेच रस कच्चा ठेवू नये .उकळी आल्यास रस फाटतो.डिशमधे नारळाचा रस व शेवया घालून खायला द्यावे.

असाच नारळाचा रस करून तो थंड झाल्यावर त्यात केळी कापून घालावी. रसातील शिकरण मस्त लागते.

एगलेस पिझ्झा मफिन्स कसे करायचे माहित आहे का कोणाला? एगलेस हव्यात वेगन नको! नेट वर वेगन आणि आलमंड मिल्क वगैरे घालून केलेल्या रेसिपीज आहेत,तश्या नको.पुण्यात मिळतील असे घटक पदार्थ वापरून मफिन्स करण्याची रेसिपी हवीये.

मी ईडलीच्या पीठात आंब्याचा गर टाकते आणि नेहमीप्रमाणे ईडल्या वाफावते.
पहिल्यांदा केल्या तेव्हा साखर न घातलेला हापुस गर घेतला होता, पण त्यामुळे थोड्या अगोड वाटत होत्या, म्हणुन थोडी साखर सुद्धा टाकावी. आणि साजुक तुपासोबत खाव्यात.

त्या लिंकवरच्या रेसिपीत अंड्याचे नंतर काय करायचे ( ताकात मिसळल्यावर ) ते लिहिलेलेच नाही. ( एकत्र करा असे थेट लिहिलेले नाही. )
मला वाटतं त्या शिवायही होऊ शकेल. मामीच्या रेसिपीतले पावाचे प्रमाण वापरता येईल.

Pages