मिक्स दाल (पंजाबी पद्ध्तीने)

Submitted by अल्पना on 17 December, 2008 - 05:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव वाटी मूगाची डाळ (छिलकेवाली), पाव वाटी (मून्ग धुली ) डाळ, पाव वाटी मसुर डाळ, तुरीची डाळ पाव वाटी पेक्षा थोडी कमी, हरबरा डाळ पाव वाटी, मां की दाल ( काळ्या उडदाची डाळ)पाव वाटी, असतिल तर थोडे आख्खे मसुर
एक कांदा उभा चिरुन, बारिक चिरलेले आले १-२ चमचे, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धण्याची पावडर, अर्धा चमचा जीररेपुड, १ चमचा हळ्द, दोन हिरव्या मिरच्या, मेथ्या, (एक बडी विलायची, दालचीनी, मीरे भरडुन), मीठ चवीप्रमाणे
जीरे, साजुक तुप, ८-१० लसणच्या पाकळ्या चिरुन

क्रमवार पाककृती: 

सगळ्या डाळी धुवुन कुकरमध्ये शिजायला ठेवाव्या. सगळ्या मिळुन अंदाजे दीड वाटी डाळी असतिल, त्यात ५-साडेपाच वाट्या पाणी घालावे. शिजतानाच कांदा, आले, हळ्द व बाकीचा मसाला टाकावा. माझ्या कुकरमध्ये ५ शिट्ट्यात ही डाळ शिजते.नंतर फोडणीच्या कढईमध्ये तुप घेवुन त्यात जीरे व लसुण घालुन फोडणी करावी व ती कुकरमधल्या डाळीत घालावी. एक शीट्टी झाल्यावर डाळ तयार....

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांना पुरेल..( आमच्या घरी ३ जण संपवतात)
अधिक टिपा: 

दाताखाली येणारे आले व लसणाचे तुकडे ह्याची चव वाढवतात. पंजाबात थंडीमध्ये हि डाळ नेहेमी केली जाते. त्यामुळेच ह्यात आले व लसुण मुबलक प्रमाणात घालतात...

माहितीचा स्रोत: 
नवरा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना, छान वाटतेय रेसिपी.
मून्ग धुली डाळ म्हणजे काय?

म्हणजे साधी मूगाची डाळ बिना सालीची.... ह्यात आम्ही सालीची आणि बिना सालीची अश्या दोन्ही डाळी घालतो.. कधी कधी तर थोडे अख्खे मूग, राजमा (थोडावेळ) भिजवुन, शाबुत मा ( आख्खे काळे उडिद) घालुन थोडे अजुन वेगळा प्रकार करतो.. पण मग शिजायला जास्त वेळ लागतो..
आणि हो, ह्यात कान्द्याबरोबरच टोमॅटो पण घालता येतो, पण मला बिना टोमॅटोची चव जास्त आवडते...

ओके...वाटलंच मला बिनासालाची असावी पण म्हटलं कन्फर्म करु. थॅक्स ग Happy

अल्पना, मी बिग बझार ची मिक्स डाळ वापरते..त्यात अख्खे मसूर सोडून बाकी सगळं असतं.. मी तर काहिपण ढकलते ह्या डाळीत..आमसुल काय.अन चिंच, टोमॅटो काय..

सगळ्या डाळी अख्ख्या दिसणार नाहीत. मुग लवकर शिजते, त्यामूळे ती गाळच होते. हरबर्‍याची डाळ, अख्खे मसूर किंवा अख्खी कडधान्य दिसतात मध्ये मध्ये. Happy