प्रथम तुज पाह्ता , जीव वेडावला अर्थात टू स्टेट्स

Submitted by अश्विनीमामी on 20 April, 2014 - 08:20

एक पे एक फ्री ही मार्केटिंग मधली हमखास यशस्वी होणारी युक्ती आहे. चित्रपटाच्या रंगीत दुनियेतही ती वापरली जाते पण नेहमी यशस्वी होईलच असे नाही. असं बघा पहिले फरहा आली दोन चार चित्रपट करून विंदू कुमार बरोबर लग्न करून स्थिरावली. पण तिच्या पावलावर पाउल टाकून तब्बू आली. आणि पहिला प्रेम सोडा,( पहिला डाव भुताच असतो ना... ) पण प्रत्येक चित्रपटाद्वारे उत्तम काम करून तिने आपला असा क्लास निर्माण केला. सनी देवलच्याच घरातून बॉबी आला. तो बेताब आम्ही थेटरात जाउन बघितला होता हे कबूल करणे ही आता तरुणपणी केलेली एंबरासिन्ग कामे ह्या फोल्डर मध्ये टाकून डिलीट करायची बाब झाली. पुढे बॉबी इज सो सो क्यूट म्हणणार्‍या युवतींचा स्क्रू ढिला आहे कि काय असे उगीचच वाटायचे. पण त्यांच्या मागून आलेला अभय देवल मात्र अगदी खास आव्डीचा झाला. दिसणे तर टोन्ड डाउन आहेच पण कामे ही छान करतो आणि भूमिकांचे सिलेक्षनही वेगळे. सोचा न था, देव डी, ओय लक्की, अन जिंदगी मिले ना दोबारा! ब्लू आइड बेबी बेबी बेबी करिश्मा नंतर आली करीना जिने ओंकारा, जब वी मेट आणि इतर चित्रपटांतून आपले असे खास स्थान निर्माण केले आहे. खरी स्टार क्वालिटी तिच्यात दिसते जी करिश्मा कधी व्यक्त करू शकली नाही झुबेदा वगळता.तिच्या नशिबात गोविंदा अन सलमान तद्दन कमर्शिअल सिनेमे! भयानक कपडे आणि भिकार मेकप. गल्यान साखली सोन्याची मध्ये नाच करत पुढे आलेली पूजा भटट आठवते का? दिल है कि मानता नहीं मध्ये कलिंगड खाणारी, सर सर म्हणून गाणे गाणारी, डॅडी काँप्लेक्स असलेली लिस्प आणि चकणे डोळे असूनही धकवून नेणारी.पुढे प्रोड्यूसर बनली. जिस्म वगैरे सिनेमे काढले, राहुल रॉय विवेक मुशरन ची नायिका! आणि आलिया भट्टची मोठी बहीण!

ऐंशी आणि नव्वद च्या दशकात महेश भट्टचे नाव कायमच कोणत्या तरी बाबतीत चर्चेत असायचे. आंतरजाल नसतानाही तो कायम हेडलाइन्स ग्रॅब करायचा. स्टारडस्ट, सोसायटी, मूव्ही, स्टार अँड स्टाइल
अन तत्सम मासिकात मुलाखती देणे. अती वैयक्तिक बाबी( परवीनच नव्हे तर इतरही) उगीचच बोलून सनसनाटी प्रसिद्धी मिळविणे. एकावेळी तीन तीन चित्रपट दिग्दर्शित करणे अश्या गमती हा करत असे.
पण अर्थ ह्या आद्य स्त्रीवादी सिनेमाचा दिग्दर्शक असल्याने व कसेही असले तरी प्रांजलपणे मनात येइल ते बोलत असल्याने , स्वतः च्या मानसिक जखमा उकलून दाखविणारा त्याकाळात हा एक ऑड बॉल
कॅरेक्टर आमच्या सहानुभूतीला पात्र होता.

तेव्हा एकूणच करमणुकीची साधने कमी होती. ट्विटर, फेसबुकद्वारे तारे तारका सतत संपर्कात नसत २४/७ चॅनेल्स वरून आज ह्याने काय केले, त्याने काय खाल्ल्ले अशी बातमी पत्रे मिनिटो-मिनटी मिळत नसत. इन्स्टाग्राम पण नव्हते फोटो बघायला. त्यामुळे त्यांच्या जीवना बद्दल एक प्रकारचे कुतुहल मध्यमवर्गी मनात असे. लायब्ररीतून आणलेल्या स्टारडस्टमध्ये महेशने सोनी राझदान ( सारांश मधली - प्रिया राजवंश ची अपग्रेड! ) बरोबर चक्क दुसरे लग्न केले अशी एक खबर चवीने वाचली होती. ते लग्न, त्यासाठी धर्मबदल ते प्रेम इत्यादी ह्याने अगदी सविस्तर मुलाखत दिली होती. आज हे सर्व आठवण्याचे कारण आलिया!

टू स्टेटस मध्ये आलिया जेव्हाही पडद्यावर येते , तिच्या प्रेझेन्स ने स्क्रीन झळाळून जातो. अतिशय फ्रेश, सुरेख आणि गोड दिसली आहे. कामही छान केले आहे. अ‍ॅज द रोल डिमांडस. स्टुडंट ऑफ द इअर मध्ये ती फारच नवखी होती पण आता तिला कॅमेर्‍यापुढे सहज वावरायचे जमून गेले आहे. क्वीनची मोहिनी अजून टिकून आहे ; परंतू करीना, कट्रिना, प्रियांका अनुष्क,, दीपिका ब्रिगेडला तिने झपाट्याने मागे टाकले आहे. ती तमिळ दिसत नाही असे अनेक प्रतिसाद येतील. पण दीपिकाच्या मीनाम्मा पेक्षा तरी मला आवडली ती. चित्रपटात कोणी तिचा कपडेपट सांभाळला आहे त्याला हॅटस ऑफ. अति शय योग्य लुक दिला आहे आणि शॉर्ट्स, स्कर्ट्स, चुडीदार, साडी, लहेंगा सर्व प्रकारचे कपडे उत्तम डिझाइन करून दिले आहेत.

एक बॉलीवुड प्रेक्षक म्हणून माझ्या मागण्या फार नसतात. थोडे इंटेलिजंट मनोरंजन व्हावे , कथा संगीत चांगले असावे. इतकेच. पण सध्या येणारे बरेच चित्रपट एक तर दबंगची सवंग कॉपी, अक्षय-सोनाक्षी धरपकड पट, बेबी डॉल एम एम एस/ डर अ‍ॅट मॉल असले काहीतरी असतात मग काय बघावे समजत नाही. त्या मुळे टू स्टेट्स हे एक प्लेजंट सरप्राइज मिळाले. कर्मभूमी चेन्नाई आणि दिलवालोंकी दिल्ली ह्यांचा
अनईझी संगम!

चेतन भगतच्या लेखनाची भाषिक क्वालिटी मला फारशी आव्डत नाही पण हा चित्रपट पुस्तकापेक्षा चांगला जमला आहे. दिग्दर्शकाने ओवर द टॉप न जाता काम केले आहे व सर्व कास्ट नीट रोलला न्याय देते.
समथिंग पीपल लाइक अस कॅन रिलेट टू असे वाट्ते. तमिळीअन आईबाबा - शिव आणि रेवती( रामुच्या रात मधली हिरवीण आता मम्मी झाली आहे चक्क.) आणि अमृता - पंजाबी आई - ह्यांचे रोल्स तर खूपच रिअल लाइफ वाटतात.

सैफची पहिली बायको, बेताब, मर्दची हिरॉइन असलेली अमृता ! ओरिजिनल सिखनी. जीवनातील आघातांनी आतून पिचून गेलेली, भरपूर नव्हे इतरांना, मुलाला देखील असह्य होईल असे इमोशनल बॅगेज घेउन वावरणारी. गरम गरम पराठे घेउन येणारी पण फिल्मी मा वाटत नाही. निरूपा रॉयने अमर केलेया व्यक्तिरेखे पासून बॉलिवूडच नव्हे तर समाज देखिल किती पुढे आला आहे असे जाणवते. व्हिकी डोनरमधील सासूबरोबर हुसकीचा पॅग लगावणारी पार्लरवाली आई आठवते का? मां बदल रही है.

रोनित रॉयचा रोल ही अवघड नाही त्याच्यासाठी. कसोटी जिंदगी की मधला ऐटबाज मि. बजाज, ते उडान मधला बाप आणि हा विझलेला आर्मी ऑफिसर. शेवटी बाप आणि मुलगा एका इश्यू वर रिलेट होतात ते अगदी खरे वाट्ते.

चित्रपटाचा पहिला भाग अगदी रीतसर रोमान्स आहे. तो ही आय आय एम मधला. तो बघताना अनेकांना आपल्या कॉलेजातील मैत्रीणीची नक्की आठवण येईल. ग्रॅज्युएशन, आणि मग प्लेसमेंट त्यातले सर्प्राइज
प्रसंग बघताना आपण ह्या माइल स्टोनची एक पालक म्हणून किती आसुसून वाट बघत आहोत ते फार प्रकर्षाने जाणवले. पण मुले मोठी होत असताना कधीतरी एका क्षणापासून ती आपली गोष्ट न राहता त्यांची बनली आहे आणि आपण फक्त एक मेन कथेतले सपोर्टिंग पात्र बनलो आहोत ही जाणीव देखील होते.
काहीतरी सुटल्यासारखे पण वाट्ते आणि एक सल राहून जातो. ह्या कथेतली मुले चांगली वाढवली आहेत.
आपल्या लग्नात आईबाबा जास्त आनंदी असा वेत अशी इच्छा कर्णारी गोड मुलगी आहे आणि आई वर प्रेम करणारा पण सुवर्ण मध्य न गाठू शकल्याने थकून गेलेला एम बी ए मुलगा आहे.

अर्जून कपूर पण मला पहिल्या पासून आवडतो. सत्ते शौरी ह्या त्याच्या आजी चित्रपट फायनान्स करत असत. मोना कपूर ची पूर्ण कहाणी पण सॅव्ही मासिकात वाचली होती. लग्न मोडल्यावर त्यांनी परिस्थितीशी झु़ंज दिली. लाइम लाइट पासून दूर जगल्या व काही काळापूर्वी त्यांचे कॅन्सरने निधन झाले.
मुलाचे यश बघता आले नाही. ह्या सिनेमात त्याने अतिशय बारीकीने व्यक्तिरेखेच्या सर्व छटा रंगवल्या आहेत. त्याच्या वयाची बॅक पॅक लाउन कामाला येणारी मुले आता माझ्या बरोबर काम करतात. त्याने क्रिश चे पात्र अगदी बिलीव्हेबल, रिलेटेबल केले आहे. सासुरवाडीत फिट होताना त्याची होणारी धावपळ,
माझ्याशी लग्न करा असे म्हणणे हा सीन खूपच मजेशीर आहे. एकीकडे खोल गेलेल्या जखमेसारखे चिरत
गेलेले लग्न जपणारी आई, अब्युझिव वडिलांबद्दलची घृणा आणि दुसरीकडे अनन्याबद्दलचे हळुवार प्रेम, ब्रेकप नंतरचे दु:ख ह्यात दबले जाणारे स्वत्व त्याने व्यक्त केले आहे. रणबीर कपूरसारखा हा फ्लॅम बॉयंट नाही . रनवीर सिंग सारखा चिल्लर चिंधी?/ टू फिजिकल नाही वरूण धवन सारखा ऑल अ‍ॅब्ज नो ब्रेन्स नाही. सिध्दार्थ सारखा टू पंजाबी नाही. ह्याच्याकडून चांगल्या कामाच्या खूप अपेक्षा आहेत.

सिनेमा बघताना जाणवणार नाही कदाचित पण गाणी चांगली आहेत. भारतातली जीवन पद्धती किती बदलली आहे त्याची जाणीव क्वीन आणि हा सिनेमा बघताना पदोपदी होते. कलाकारांची नवी पीढी आली आहे आणि प्रेक्षकांची देखील. पण संपताना पुढील रांगेतल्या युवतीने कोणाला तरी एस एम एस केलेला वाचता आला जस्ट अ‍ॅज शी वॉज टायपिंग इट, फँटॅस्टिक मुव्ही.. आय क्राइड अँड आय लाफ्ड. ......... सो ट्रू डीअर ... सो ट्रू!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि इतक्या प्रगत विचारांच्या मुलामुलींना संस्थेतील पहिल्या दोन चार आठवड्यातच त्यांच्या प्रगत वृत्तीनुसार सगळे काही उरकून झाल्यानंतर दोन अडीच वर्षांनी विभक्त होताना लाईफलाँग कमिटमेंटची इतकी भयंकर आवश्यकता का भासते? बरं तीही भासू शकेल, पण ती कमिटमेंट कुटुंबियांनीही द्यावी म्हणून सगळ्यांची एकत्र कोशिंबीर करून ती एकजिनसी बनवण्याचा द्राविडी प्राणायाम करण्याची 'टिप्पीकल भारतीय मागास' इच्छा का होते? नवरा येस बँकेत कामाला, बायको सनसिल्कमध्ये! करा की स्वतंत्रपणे लग्न? चौथ्या पाचव्या भेटीत शेजारी झोपताना आई वडील आणि संस्कार आठवले नाहीत तर लग्न करताना का म्हणे घरच्यांच्या मताचा इतका विचार?

सॉरीच! पण अत्यंत गंडलेले कथानक आहे.

प्रेक्षक बहुधा आय आय एम मध्ये जाण्याच्या पात्रतेचे नसल्याचे माहीत असल्याने इतक्या 'प्रगत' कथानकावर चित्रपट तयार केलेला असावा.

Don't waste your time with explanations. People only hear what they want to hear... Paulo Colho
(So true for both sides of the arguments...:-))

चित्रपट अजून पाहिला नाही, पण टु स्टेटस वाचली आणि खूप आवडली होती.
चेतन भगत चा प्रेम विवाह, त्यातले काही प्रसंग पुस्तकासाठी नाट्यमय केले असतीलच. मुख्य वाचण्याची गोष्ट ही की भारतात अजून किती राज्यवाद/प्रांतवाद/जातवाद/शहरवाद आहे. इथे पंजाबी-तमिळ घेतले आहेत पण हे नक्की की अगदी ठरवून पत्रिका जात पोटजात पाहून केलेल्या लग्नातही दोन्ही बाजू हे विचार बोलून दाखवतात,

कोल्हापूरी-गैर कोल्हापूरी , नगरी-गैर नगरी, नागपूरी/गैर नागपूरी लग्न झाल्यास 'काय म्हणतात कल्लापूरी पैलवान/<बाकी शहरे आणि कुत्सित विशेषणे आपल्या ज्ञानानुसार टाकून घ्यावी>' इ.इ., किंवा 'मुंबई पुण्याकडल्या लोकांना माणूसकी नाही, संस्कार नाहीत आपल्या <इथे आपल्या जिल्ह्याचे नाव टाकणे> इथल्यासारखी' असे वारंवार म्हणणे, देशस्थ कोकणस्थ अशा केलेल्या लग्नात एक्मेकांवर मागे 'शेवटी बोलून चालून <द./को./क./एनीथिंग अदर दॅन युवर ओन जात>' ही वाक्ये.

स्वतः ऋग्वेदी असताना सून यजुर्वेदी केल्याची खंत एक सासू/तिच्या बहीणी अजूनही खाजगीत बोलून दाखवतात.(कुठेतरी पत्रिकेवर आयुष्यात एकदा लिहीण्यापलिकडे या पोटजातीचा संबंध कुठेही येत नाही.)

मूळ पुस्तकातले क्रिश चे अनन्या ला प्रपोज करतानाचे संवाद खूप आवडले होते. 'तुम्हाला मी अगदी आदर्श जावई वाटलो नाही तरी हरकत नाही पण तुम्ही एका न्युट्रल दृष्टीकोनातून मला स्वीकारावे' अशा काहीतरी अर्थाचे.
शेवटचा मिकी अंतर्वस्त्र आणि क्रिश चे ब्रेक अप नंतरचे आईशी संवाद इ. पण वाचताना आवडले होते.

चेतन भगत आवडता लेखक आहे (थ्री मिस्टेक्स चा अपवाद), त्याची लेखनशैली आवडते. चित्रपट अवश्य पाहणार.

हा उगीचच दाखवलेला 'मद्रासन / पंजाबन' अतिरेकी विरोध मी तरी आयुष्यात इतक्या बटबटीतपणे व उघडपणे कुठे पाहिलेला नाही.
>>>
thode diwas south India madhye rahun bagh dada.

mi keral madhye asatana mala saral tondawar tithalya muli wicharayachya 'how many boyfriends do you have? no I mean your are north indian no? its very common over there. even your parents supports it. we people are not like you. we have 'sanskars' on us' :-O

adhi adhi mi bhandayache nantar nantar mi 'whatever' look dyayala suruwat keli.

don't know about north India but manyyyyyyyy (not all) south Indians hates north Indians

chetan bhagat avadat nahi, tyach ekahi pustak avadalel nahi. two state pustak hi avadal navhat tenvha movie kadun apeksha shunya ahet. khas jaun pahin ki nhi mahit nahi Happy

बेफी, मला तुमचा मुद्दा कळला नाही. आधी तुम्हाला असं घडणं विश्वासार्ह वाटलं नाही, मग ही सत्यकथा आहे म्हटल्यावर ते स्तुत्य नाही म्हणताहात. मग स्तुत्य नसलं तर मूव्हीत दाखवायचं नाही का?

आणि इतक्या प्रगत विचारांच्या मुलामुलींना संस्थेतील पहिल्या दोन चार आठवड्यातच त्यांच्या प्रगत वृत्तीनुसार सगळे काही उरकून झाल्यानंतर दोन अडीच वर्षांनी विभक्त होताना लाईफलाँग कमिटमेंटची इतकी भयंकर आवश्यकता का भासते? बरं तीही भासू शकेल, पण ती कमिटमेंट कुटुंबियांनीही द्यावी म्हणून सगळ्यांची एकत्र कोशिंबीर करून ती एकजिनसी बनवण्याचा द्राविडी प्राणायाम करण्याची 'टिप्पीकल भारतीय मागास' इच्छा का होते? नवरा येस बँकेत कामाला, बायको सनसिल्कमध्ये! करा की स्वतंत्रपणे लग्न? चौथ्या पाचव्या भेटीत शेजारी झोपताना आई वडील आणि संस्कार आठवले नाहीत तर लग्न करताना का म्हणे घरच्यांच्या मताचा इतका विचार?

सॉरीच! पण अत्यंत गंडलेले कथानक आहे.

<< Biggrin
बेसिक मे राडा है बॉस!
Physically compatible partner फक्त एकाच गोष्टीसाठी हवाय असं तरी का गृहित धरलय आणि दोन वर्षं एकत्रं राहिले म्हणजे इंटरेस्ट संपला हे तरी कुठलं इक्वेशन ?
उलट दोन वर्षं एकत्रं राहिल्याने , सगळ्या लेव्हल वर पारखून घेतल्यानीच त्यांना लग्नं करायचा कॉन्फिडन्स आलाय Proud
After spending good amount of time , they find each other a complete package , what's so strange about it ?
Again just because you like someone and ready for marriage doesn't mean you stop caring for your parents !
Relationships aren't one on one Proud

चौथ्या पाचव्या भेटीत शेजारी झोपताना आई वडील आणि संस्कार आठवले नाहीत तर लग्न करताना का म्हणे घरच्यांच्या मताचा इतका विचार?

सॉरीच! पण अत्यंत गंडलेले कथानक आहे.>> चित्रविचित्र, आणि कधी कधी बॉर्डरिंग ऑन अ‍ॅबनॉर्मल असे संबंध रंगविताना तुम्ही जे नैस र्गिक आणि खूप नॉर्मल आहे ते का नजर अंदाज करत आहात? हीरो व हिरॉइन ज्या वयात आहे त्यात प्रेमात पड्णे, एकत्र राहू वाटणे अगदीच नैसर्गिक आहे. बरे ते एकमेकांशी एकनिष्ठ आहेत म्हणून पुढे जाउन लग्न करायचे आहे व त्यात आपल्या आईबाबांना पण सुखी पाहायचे आहे.

मुले मोठी झाली व त्यांची स्वतःची व्यक्तिगत आयु श्ये झाली - जसे प्रेम असणे, कोणी तरी खास असणे - तरी
ती आईवडिलांना विसरत नाही आहेत. उलट जाणीव ठेवऊन त्यांना आपल्या आ यु श्यात सहभागी करून घेत आहेत. भाग जाते हैं हा पर्याय डिस्कस करूनही बाजूला ठेवत आहेत. हे तुम्ही पाहिलेत का?

त्यांची दोन वर्षांची स्टेडी रिलेशन शिप असते हे ही दाखवले आहे.

मला विवाहपूर्व संबंधांचं समर्थन करायचं नाहीये. पण casanova, promiscuous नायक आणि त्याला सुधरवणारी शालीन, व्रतस्थ, सोज्वळ नायिका हेच किती दिवस बघायचं? हिरो करे तो रासलीला है, हिरोईन करे तो कॅरेक्टर ढिला है?
त्यापेक्षा क्रिश-अनन्याचं नातं जास्ती बॅलन्स्ड वाटतं. दोघांचे फक्त एकमेकांशीच संबंध आहेत. लग्नाआधीही आणि लग्नानंतरही दोघं एकमेकांशी एकनिष्ठ आहेत. एकमेकांशी लग्न करताना दोघांना घरच्यांनाही दुखवायचं नाहीये. आदर्श नवरा-बायको होतानाच आदर्श मुलगा/मुलगी, आदर्श जावई/सूनही व्हायचंय.
अगदी हम आपकेचा आयडियल हजबंड मटेरियल प्रेम नसला तरी नायिका भेटेपर्यंत दिसेल त्या मुलीशी संबंध ठेवणाऱ्या नायकापेक्षा एकाच मुलीशी (जिच्यावर प्रेम आहे) संबंध ठेवणारा, तिच्याशी निष्ठावान असलेला, तिच्याशी लग्न करण्यासाठी जगाशी लढणारा, केवळ चांगला नवराच नव्हे तर चांगला मुलगा आणि चांगला जावईसुध्दा होण्यासाठी कमिटेड असलेला क्रिश नक्कीच जास्त morally correct वाटतो.

तीच गोष्ट अनन्याची. Promiscuous नायकाशी त्याची एच.आय.व्ही.टेस्टही न करवता लग्न करणाऱ्या बावळट सोज्वळ नायिकेपेक्षा अनन्या नक्कीच जास्त नॉर्मल वाटते. नवरा, आईवडील, सासूसासरे सगळ्यांना एकत्र आणू इच्छिणारी, स्वत:च्या करीयरबद्दल गंभीर असणारी, ’मी चालवेन संसार,तू नोकरी सोडून लिखाण करु शकतोस’ असा पवित्रा घेऊन क्रिशमधल्या लेखकाला साथ देणारी अनन्या कोणालाही आवडण्यासारखीच आहे!

बेफिकिर, तुमच्या सगळ्या पोस्टी खरं स्पष्ट मराठीत लिहिलेल्या असल्या तरी वाचताना मात्र खुप अडखळल्यासारखे होते. तुमचं एक वेगळं मत असू शकतं ही समजतं पण बर्‍याच वेळा बळच एक एकदम बाळबोध अँगल धरुन तुम्ही एकानंतर एक वाचकांना बुचकळ्यात पाडणार्‍या पोस्टी टाकायचा जो सतत द्राविडी प्राणायाम तुम्ही करता त्यामागे तुमच्या डोक्यात नेमकी काय कोशिंबिर आहे हे तुम्हीच जाणो!

अहो ज्यांना स्वतंत्रपणे लग्न करायचे आहे तशी सुद्धा जोडपी आहेतच की? कित्येक पिकचरांमध्ये पळून जाऊन लग्न करतात हे दाखवतात. पण हा सिनेमा तो पर्याय निवडणार्‍या मुलांबद्दल नाहीये.
पुढे घरच्यांना इन्वॉल्व करण्याबाबत सुद्धा इतकं आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? कित्येक मुलमुली करतातच की विचार घरच्यांचा. आय आय एम मध्ये गेलं म्हणजे लगेच इतके स्वतंत्र विचाराची होतात मुलं की थेट आई वडिलांना आजिबातच इन्वॉल्व न करता लग्न करतात हे तुम्हाला कोणी सांगितलं?

मी सिनेमा पाहिला आणि मला आवडला ( पुन्हा बघू शकेन Happy ) . मी पुस्तक वाचलेले नाही पण आलिया आणि अर्जुन कपूर ह्या रोल्ससाठी बेस्ट वाटले. अमृता सिंग , रेवती, रोनित रॉय , शिवा सुब्रमण्यम बेस्ट !!!

ह्या चित्रपटभर अर्जुनला उद्देशून एकच गाणे कळकळीने म्हणावेसे वाटते:

'किस'लिये तू इतना उदास?
सुखे सुखे होठ, आखियोंमे प्यास??
'किस'लिये???
'किस'लिये????

कालच बघितला. नाही आवडला...
आलिया सुंदर दिसली आहे. पण तरीही नाही आवडला

२ स्टेट्स आवडला..खास करुन आलिया साठी! अ‍ॅक्टींग आणि लुक्स दोन्ही परफेक्ट आहे तिच यशस्वी अभिनेत्री होण्यासाठी!

फायनली शनिवारी पाहिला.चक्क आवडला.पुस्तक आवडलं नव्हतं.
मला पुस्तकातली अनन्या आवडली नव्हती.... ही अनन्या आवडली Happy

दोन्ही पालक बेस्ट Happy

अमांच्या प्रत्येक वाक्याला नुमोदन Happy

फक्त किसिंग सिन्स थोडे कमी असते तर बरं झालं असतं कारण काहीही झालं तरी आईबाबांसोबत असले सिन्स पहाण्याची हिंम्मत माझ्यात तरी नाही किंवा आम्ही अजुन इतके पुढारलेलो नाही त्यामुळे इच्छा असुनही आई बाबांना घेऊन जाता येणार नाही मूव्हीला Happy
तसही त्या सिन्सची प्रत्येक वेळेला गरज होतीच असं नाही Happy

ते पुस्तकच मुळात इतके बॉलीवूडीश फिल्मी आहे की त्यावर सिनेमा निघायला इतका उशीर का लागला याचेच आश्चर्य वाटले.
आलिया-अर्जुनपेक्षा जरा बरी जोडी असती तर मजा आली असती. रोनित-अमृता मात्र बेश्ट.
अतीअवांतर - चर्चा वाचून धौती योग चूर्णाची जाहिरात आठवली, जळजळतेय्नीमळमळतेयनीतळमळतेयनी!!!

शेवटी एकदम जुळी मुले दाखवून काय साधले तेही समजले नाही.>>> कारण चेतन भगत ला जुळे मुलगे आहेत खरया आयुश्यात, टू स्टेट्स मधे त्याचे रियल लाईफ मधले प्रेम, लग्न दाखवले आहे मुवि व पुस्तकातहि त्याचमुळे अर्जुन मठठ् व झोपाळ्या दाखवला आहे चेतन भगत सारखा व अलिया अनुशा भगत प्रमाणे स्मार्ट सुन्दर.पन अनुशा भगत खरच स्मार्ट सुन्दर आहे हे तुम्हालाहि पटेल type anusha bhagat with parents व तिचे प्रोफाईल गुगलुन पहा.मुवि सत्य कथेच्या आसपास जावा यासाठि असे बेअरिग अर्जुन ला घ्यावे लागले आहे.

मला मुवि आवड्ला .दोन्ही पालक बेस्ट.बाकि मुविच्या ट्रिट्मेन्ट साठि करन जोहर अपेक्शा पुर्न करतो.मस्त मगन गाण छान आहे

चित्रपट थोडा संथ, ठिकठाकच वाटला. वर साधना म्हणते त्याप्रमाणे इतर लोकांचीच कामं जास्त चांगली झाली आहेत. पुस्तक अजून वाचलेलं नाही.

काल मूव्ही ऑन डिमांड मधे पाहिला हा सिनेमा...
ठीकठाक वाटला.

दोन्ही पालकांच्या भूमिका उत्तम! रेवतीला कमी फूटेज मिळालं असं वाटलं.

'टू स्टेट्स' या नावावरून पंजाबी-दाक्षिणात्य घरांमधले एकमेकांबद्दलचे गैरसमज, त्यांतल्या गंमतीजंमती आणि त्यात नायक-नायिकेची होणारी फरफट आणि शेवट गोड - असा काहीतरी प्लॉट असेल असं वाटलं होतं. (मी पुस्तक वाचलेलं नाही.) पण हुंडा आणि नॉन्व्हेज - या दोन मुद्द्यांमधेच याची बोळवण केली आहे.

आलिया भट मला आवडत नाही. कितीही ठरवलं तरी तिच्या जागी सोनी राझदान आणि अधूनमधून पूजा भट दिसतच राहतात. पण 'स्टुडण्ट ऑफ द इअर'पेक्षा यात तिचा वावर सफाईदार आहे. तिचे केस फार छान आहेत.
पण तिला साडी नीट कॅरी करता येत नाही हे यात फार जाणवलं.
तिला सनसिल्कमधे मार्केटिंगची नोकरी मिळते म्हणून तिच्या ऑफिस-डेस्कवर शॅम्पू आणि हॅण्डवॉशच्या बाटल्या ठेवलेल्या दाखवल्या आहेत. Lol (खरंच असं असतं का? :अओ:)
तिचं चेन्नईतलं म्हणून घर दाखवलंय तसं घर आता प्रॉपर चेन्नईत असेल का? इतकं राहण्यायोग्य वगैरे? अशा घरांची अवस्था पुण्यातल्या वाड्यांसारखी झाली असेल असं वाटतं.

अर्जुन कपूर मला आवडतो खरंतर, पण यात नाही आवडला.
तो काऊन्सेलरला आपली सगळी कहाणी सांगत असतो असं दाखवलंय. पण शेवटच्या दृष्यात तिथे स्वतःच्या जुळ्या मुलांना का घेऊन जातो?

प्रत्यक्ष पुस्तकात बरंच काही आहे पण इथे चित्रपटात विस्तार भय आणि (पंजाबी फायनान्सर भय असेल) मुळे बर्‍याच गोष्टी आवरत्या घेतल्या आहेत. अनन्या साउथ इंडीयन लग्न झाल्यावर शरारा घालून रिसेप्शनमधे आणि क्रिश मिकी माऊस अंतरवस्त्रे सीन(थोडा सोबर करुन) चित्रपटात हवे होते . धमाल आली असती.

तिच्या ऑफिस-डेस्कवर शॅम्पू आणि हॅण्डवॉशच्या बाटल्या ठेवलेल्या दाखवल्या आहेत. >> हो, मार्केटिंगवाल्यांच्या केबिनमध्ये असतात. शोसाठी.

तिचं चेन्नईतलं म्हणून घर दाखवलंय तसं घर आता प्रॉपर चेन्नईत असेल का? इतकं राहण्यायोग्य वगैरे? >>> अशी घरं इकडे सर्रास दिसतात. कधी आलीस तर तुला घेऊन फिरवेन.

अनन्याचे वडील आणि अमृता सिंग हे कास्टिंग ज्याने केले त्याला शंभर पैकी दोनशे मार्क.
रेवती पण बरी वाटली. अनन्या ला चपखल अशी हिरॉइन मला आठवत नाही. आलिया सुंदर दिसते पण अनन्या वाटत नाही. त्यातल्या त्यात असिन किंवा दिपीका वाटली असती असे वाटते.
क्रिश चे पात्र जास्त देखणे,स्मार्ट इ.इ. नसलेले पुस्तकात आहे. त्याच्या बोलण्यात पुस्तकात 'यु आर वे आउट ऑफ माय लीग' असे बरेचदा येते पुस्तकात. त्या संदर्भात अर्जुन कपूर ठीक आहे.
चित्रपटात फ्लॅशबॅक च्या आत फ्लॅशबॅक असे काहीतरी केल्याने मधे मधे गोंधळल्यासारखे होते. क्रिश च्या कहाणी आधी त्याची भरकटलेली अवस्था, अनन्याला चेन्नईला भेटायला गेल्यावर तिने झिडकारल्यावर सैरभैर होणे आणि मग मानसोपचार बाई कडे जाणे इ. सुरुवातीला दाखवले असते तर जास्त परीणामकारक वाटले असते. पण चित्रपट लांबला असताच.
पुस्तकाचा चित्रपट करणे हे कठीण आव्हान आहे हे यावरुन आणि दुनियादारीवरुन परत सिद्ध होते.

मी पहिल्यांदा जेंव्हा ह्या पुस्तकाचे नाव ऐकले तेंव्हा २ states=२ राज्य ह्या अर्थाने न घेता २ states=२ अवस्था असं काहीतरी असेल असं वाटलं होतं. त्यामुळे मानवी मनाच्या २ अवस्था त्यातील द्वंद्व वगैरे बद्दलचे कथानक असेल अशी अपेक्षा होती. पण हे मात्र फारच typical आणि predictable निघालं.

पुस्तकाचा चित्रपट करणे हे कठीण आव्हान आहे हे यावरुन आणि दुनियादारीवरुन परत सिद्ध होते.

>> पुन्हा अनु_मोदन. Happy

Pages