एक पे एक फ्री ही मार्केटिंग मधली हमखास यशस्वी होणारी युक्ती आहे. चित्रपटाच्या रंगीत दुनियेतही ती वापरली जाते पण नेहमी यशस्वी होईलच असे नाही. असं बघा पहिले फरहा आली दोन चार चित्रपट करून विंदू कुमार बरोबर लग्न करून स्थिरावली. पण तिच्या पावलावर पाउल टाकून तब्बू आली. आणि पहिला प्रेम सोडा,( पहिला डाव भुताच असतो ना... ) पण प्रत्येक चित्रपटाद्वारे उत्तम काम करून तिने आपला असा क्लास निर्माण केला. सनी देवलच्याच घरातून बॉबी आला. तो बेताब आम्ही थेटरात जाउन बघितला होता हे कबूल करणे ही आता तरुणपणी केलेली एंबरासिन्ग कामे ह्या फोल्डर मध्ये टाकून डिलीट करायची बाब झाली. पुढे बॉबी इज सो सो क्यूट म्हणणार्या युवतींचा स्क्रू ढिला आहे कि काय असे उगीचच वाटायचे. पण त्यांच्या मागून आलेला अभय देवल मात्र अगदी खास आव्डीचा झाला. दिसणे तर टोन्ड डाउन आहेच पण कामे ही छान करतो आणि भूमिकांचे सिलेक्षनही वेगळे. सोचा न था, देव डी, ओय लक्की, अन जिंदगी मिले ना दोबारा! ब्लू आइड बेबी बेबी बेबी करिश्मा नंतर आली करीना जिने ओंकारा, जब वी मेट आणि इतर चित्रपटांतून आपले असे खास स्थान निर्माण केले आहे. खरी स्टार क्वालिटी तिच्यात दिसते जी करिश्मा कधी व्यक्त करू शकली नाही झुबेदा वगळता.तिच्या नशिबात गोविंदा अन सलमान तद्दन कमर्शिअल सिनेमे! भयानक कपडे आणि भिकार मेकप. गल्यान साखली सोन्याची मध्ये नाच करत पुढे आलेली पूजा भटट आठवते का? दिल है कि मानता नहीं मध्ये कलिंगड खाणारी, सर सर म्हणून गाणे गाणारी, डॅडी काँप्लेक्स असलेली लिस्प आणि चकणे डोळे असूनही धकवून नेणारी.पुढे प्रोड्यूसर बनली. जिस्म वगैरे सिनेमे काढले, राहुल रॉय विवेक मुशरन ची नायिका! आणि आलिया भट्टची मोठी बहीण!
ऐंशी आणि नव्वद च्या दशकात महेश भट्टचे नाव कायमच कोणत्या तरी बाबतीत चर्चेत असायचे. आंतरजाल नसतानाही तो कायम हेडलाइन्स ग्रॅब करायचा. स्टारडस्ट, सोसायटी, मूव्ही, स्टार अँड स्टाइल
अन तत्सम मासिकात मुलाखती देणे. अती वैयक्तिक बाबी( परवीनच नव्हे तर इतरही) उगीचच बोलून सनसनाटी प्रसिद्धी मिळविणे. एकावेळी तीन तीन चित्रपट दिग्दर्शित करणे अश्या गमती हा करत असे.
पण अर्थ ह्या आद्य स्त्रीवादी सिनेमाचा दिग्दर्शक असल्याने व कसेही असले तरी प्रांजलपणे मनात येइल ते बोलत असल्याने , स्वतः च्या मानसिक जखमा उकलून दाखविणारा त्याकाळात हा एक ऑड बॉल
कॅरेक्टर आमच्या सहानुभूतीला पात्र होता.
तेव्हा एकूणच करमणुकीची साधने कमी होती. ट्विटर, फेसबुकद्वारे तारे तारका सतत संपर्कात नसत २४/७ चॅनेल्स वरून आज ह्याने काय केले, त्याने काय खाल्ल्ले अशी बातमी पत्रे मिनिटो-मिनटी मिळत नसत. इन्स्टाग्राम पण नव्हते फोटो बघायला. त्यामुळे त्यांच्या जीवना बद्दल एक प्रकारचे कुतुहल मध्यमवर्गी मनात असे. लायब्ररीतून आणलेल्या स्टारडस्टमध्ये महेशने सोनी राझदान ( सारांश मधली - प्रिया राजवंश ची अपग्रेड! ) बरोबर चक्क दुसरे लग्न केले अशी एक खबर चवीने वाचली होती. ते लग्न, त्यासाठी धर्मबदल ते प्रेम इत्यादी ह्याने अगदी सविस्तर मुलाखत दिली होती. आज हे सर्व आठवण्याचे कारण आलिया!
टू स्टेटस मध्ये आलिया जेव्हाही पडद्यावर येते , तिच्या प्रेझेन्स ने स्क्रीन झळाळून जातो. अतिशय फ्रेश, सुरेख आणि गोड दिसली आहे. कामही छान केले आहे. अॅज द रोल डिमांडस. स्टुडंट ऑफ द इअर मध्ये ती फारच नवखी होती पण आता तिला कॅमेर्यापुढे सहज वावरायचे जमून गेले आहे. क्वीनची मोहिनी अजून टिकून आहे ; परंतू करीना, कट्रिना, प्रियांका अनुष्क,, दीपिका ब्रिगेडला तिने झपाट्याने मागे टाकले आहे. ती तमिळ दिसत नाही असे अनेक प्रतिसाद येतील. पण दीपिकाच्या मीनाम्मा पेक्षा तरी मला आवडली ती. चित्रपटात कोणी तिचा कपडेपट सांभाळला आहे त्याला हॅटस ऑफ. अति शय योग्य लुक दिला आहे आणि शॉर्ट्स, स्कर्ट्स, चुडीदार, साडी, लहेंगा सर्व प्रकारचे कपडे उत्तम डिझाइन करून दिले आहेत.
एक बॉलीवुड प्रेक्षक म्हणून माझ्या मागण्या फार नसतात. थोडे इंटेलिजंट मनोरंजन व्हावे , कथा संगीत चांगले असावे. इतकेच. पण सध्या येणारे बरेच चित्रपट एक तर दबंगची सवंग कॉपी, अक्षय-सोनाक्षी धरपकड पट, बेबी डॉल एम एम एस/ डर अॅट मॉल असले काहीतरी असतात मग काय बघावे समजत नाही. त्या मुळे टू स्टेट्स हे एक प्लेजंट सरप्राइज मिळाले. कर्मभूमी चेन्नाई आणि दिलवालोंकी दिल्ली ह्यांचा
अनईझी संगम!
चेतन भगतच्या लेखनाची भाषिक क्वालिटी मला फारशी आव्डत नाही पण हा चित्रपट पुस्तकापेक्षा चांगला जमला आहे. दिग्दर्शकाने ओवर द टॉप न जाता काम केले आहे व सर्व कास्ट नीट रोलला न्याय देते.
समथिंग पीपल लाइक अस कॅन रिलेट टू असे वाट्ते. तमिळीअन आईबाबा - शिव आणि रेवती( रामुच्या रात मधली हिरवीण आता मम्मी झाली आहे चक्क.) आणि अमृता - पंजाबी आई - ह्यांचे रोल्स तर खूपच रिअल लाइफ वाटतात.
सैफची पहिली बायको, बेताब, मर्दची हिरॉइन असलेली अमृता ! ओरिजिनल सिखनी. जीवनातील आघातांनी आतून पिचून गेलेली, भरपूर नव्हे इतरांना, मुलाला देखील असह्य होईल असे इमोशनल बॅगेज घेउन वावरणारी. गरम गरम पराठे घेउन येणारी पण फिल्मी मा वाटत नाही. निरूपा रॉयने अमर केलेया व्यक्तिरेखे पासून बॉलिवूडच नव्हे तर समाज देखिल किती पुढे आला आहे असे जाणवते. व्हिकी डोनरमधील सासूबरोबर हुसकीचा पॅग लगावणारी पार्लरवाली आई आठवते का? मां बदल रही है.
रोनित रॉयचा रोल ही अवघड नाही त्याच्यासाठी. कसोटी जिंदगी की मधला ऐटबाज मि. बजाज, ते उडान मधला बाप आणि हा विझलेला आर्मी ऑफिसर. शेवटी बाप आणि मुलगा एका इश्यू वर रिलेट होतात ते अगदी खरे वाट्ते.
चित्रपटाचा पहिला भाग अगदी रीतसर रोमान्स आहे. तो ही आय आय एम मधला. तो बघताना अनेकांना आपल्या कॉलेजातील मैत्रीणीची नक्की आठवण येईल. ग्रॅज्युएशन, आणि मग प्लेसमेंट त्यातले सर्प्राइज
प्रसंग बघताना आपण ह्या माइल स्टोनची एक पालक म्हणून किती आसुसून वाट बघत आहोत ते फार प्रकर्षाने जाणवले. पण मुले मोठी होत असताना कधीतरी एका क्षणापासून ती आपली गोष्ट न राहता त्यांची बनली आहे आणि आपण फक्त एक मेन कथेतले सपोर्टिंग पात्र बनलो आहोत ही जाणीव देखील होते.
काहीतरी सुटल्यासारखे पण वाट्ते आणि एक सल राहून जातो. ह्या कथेतली मुले चांगली वाढवली आहेत.
आपल्या लग्नात आईबाबा जास्त आनंदी असा वेत अशी इच्छा कर्णारी गोड मुलगी आहे आणि आई वर प्रेम करणारा पण सुवर्ण मध्य न गाठू शकल्याने थकून गेलेला एम बी ए मुलगा आहे.
अर्जून कपूर पण मला पहिल्या पासून आवडतो. सत्ते शौरी ह्या त्याच्या आजी चित्रपट फायनान्स करत असत. मोना कपूर ची पूर्ण कहाणी पण सॅव्ही मासिकात वाचली होती. लग्न मोडल्यावर त्यांनी परिस्थितीशी झु़ंज दिली. लाइम लाइट पासून दूर जगल्या व काही काळापूर्वी त्यांचे कॅन्सरने निधन झाले.
मुलाचे यश बघता आले नाही. ह्या सिनेमात त्याने अतिशय बारीकीने व्यक्तिरेखेच्या सर्व छटा रंगवल्या आहेत. त्याच्या वयाची बॅक पॅक लाउन कामाला येणारी मुले आता माझ्या बरोबर काम करतात. त्याने क्रिश चे पात्र अगदी बिलीव्हेबल, रिलेटेबल केले आहे. सासुरवाडीत फिट होताना त्याची होणारी धावपळ,
माझ्याशी लग्न करा असे म्हणणे हा सीन खूपच मजेशीर आहे. एकीकडे खोल गेलेल्या जखमेसारखे चिरत
गेलेले लग्न जपणारी आई, अब्युझिव वडिलांबद्दलची घृणा आणि दुसरीकडे अनन्याबद्दलचे हळुवार प्रेम, ब्रेकप नंतरचे दु:ख ह्यात दबले जाणारे स्वत्व त्याने व्यक्त केले आहे. रणबीर कपूरसारखा हा फ्लॅम बॉयंट नाही . रनवीर सिंग सारखा चिल्लर चिंधी?/ टू फिजिकल नाही वरूण धवन सारखा ऑल अॅब्ज नो ब्रेन्स नाही. सिध्दार्थ सारखा टू पंजाबी नाही. ह्याच्याकडून चांगल्या कामाच्या खूप अपेक्षा आहेत.
सिनेमा बघताना जाणवणार नाही कदाचित पण गाणी चांगली आहेत. भारतातली जीवन पद्धती किती बदलली आहे त्याची जाणीव क्वीन आणि हा सिनेमा बघताना पदोपदी होते. कलाकारांची नवी पीढी आली आहे आणि प्रेक्षकांची देखील. पण संपताना पुढील रांगेतल्या युवतीने कोणाला तरी एस एम एस केलेला वाचता आला जस्ट अॅज शी वॉज टायपिंग इट, फँटॅस्टिक मुव्ही.. आय क्राइड अँड आय लाफ्ड. ......... सो ट्रू डीअर ... सो ट्रू!
As always , beautifully
As always , beautifully written Ashwini Mami.
अमा मस्तच लिहीलं आहेस... टू
अमा मस्तच लिहीलं आहेस... टू स्टेट्स वाचायचं राहीलंच आहे अजून
पण चित्रपट नक्की पाहणार. आलीया साऊथ इंडियन मुळीच वाटत नाही पण तिचे ड्रेसेस मात्र अप्रतिम आहेत. ती खरंच फ्रेश वाटलीये. रेवती आणि अमृता च्या जुगलबंदीसाठी नक्की पाहणार. अर्जून खरं तर चांगला अॅक्टर आहे. औरंगजेब मध्ये कस्ला दिसलेला!! यात का असा ग्लूमी लूक केलाय कोणास ठाऊक. डान्सही जीवावर आल्यासारखा केलाय. उलट त्याचा गेट अप मला साऊथ इंडियन वाटला. पंजाबी गबरू कोणी वेगळा हिरो छान वाटला असता.
अर्जुनचा रोल चेतन भगतचा आहे
अर्जुनचा रोल चेतन भगतचा आहे ना? तो तेरी कुठे दिसतो पंजाबी गबरू जवान.
फँटॅस्टिक मुव्ही.. आय क्राइड
फँटॅस्टिक मुव्ही.. आय क्राइड अँड आय लाफ्ड. ......... सो ट्रू डीअर ... सो ट्रू! >>>>+++++११११
फायनली बघितला- आणि आता
फायनली बघितला- आणि आता मामींशी पूर्ण सहमत- फारच छान बनवलाय.
मी पुस्तक वाचलं असल्यामुळे तीच स्टोरी बघायला बोअर होईल असा विचार करत होते पण तसं झालं नाही. प्रेझेन्टेशन चांगलं केलंय. चित्रपट पटापट पुढे सरकत राहातो. सारखं काहीतरी घडत राहतं. आलिया तर फारच सुंदर दिसली आहे आणि तिचे कपडे तर खूपच छान आहेत. अर्जुन तिच्या मानाने कमी पडतो पण तरी एखादया शाहरुखसारख्या थोराड नटाला आलियासोबत बघण्यापेक्षा हा देखणा तरुण नक्कीच आवडला.
पण या दोघांपेक्षा खरी बाजी मारली आहे ती यांच्या पालकांनी. रोनित रॉय मला अगदी जान तेरे नाम, कसौटी झिंदगी कीपासून आवडतो आणि इथेही त्याने अफलातून अभिनय केलाय. रेवतीही तितकीच भारी. तिने तिच्या लव्ह चित्रपटातलं गाणं म्हणणं हा टच आवडला. तिचा नवरा आणि अमृता सिंग हेही सुपर्ब.
बघितला. आलियामुळे फ्रेशनेस
बघितला. आलियामुळे फ्रेशनेस आहे. तिचे ड्रेसेस मस्त आहेत. अर्जुन कपूर ठिक आहे. IIM मधलं दाखवलेलं वातावरण कैच्याकै वाटलं. इथल्या साध्या ग्रॅज्युएशनसाठीचं वातावरण देखिल सिरियस असेल.
सगळ्यात जिंकलं ते दोघांच्या पालकांनी. जमा आणि वजा बाजू बघता सिनेमा बरा वाटला.
मला सिनेमा अजिबात आवडला नाही.
मला सिनेमा अजिबात आवडला नाही. कंटाळा आला. झोप लागली.
अमृता सिंगने फार छान भूमिका वठवली आहे.
अर्जून कपूर मठ्ठाड दिसतो. आलिया शोभेची बाहुली.
तिचे कपडे मात्र सुंदर आहेत.
डिजे, सिनेम्यात कुठेही त्या दोघांनी IIM मध्ये शिकत असल्याची अॅक्टिंग केलेली नाहीये बरं का
हा चित्रपट काल पाहिला. अनेक
हा चित्रपट काल पाहिला. अनेक आघाड्यांवर चित्रपट गंडल्यासारखा वाटतो.
गीते (मला तरी) सुमार वाटली. आलिया भट फ्रेश दिसते हे काही क्वॉलिफिकेशन असू शकत नाही. त्यात तिचे दिसणे मला आवडत नाही हा वैयक्तीक आवडीनिवडीचा भाग अलाहिदा! हलकेफुलके कथानक निवडतात तेव्हा त्यात विनोदाला खूप अधिक वाव ठेवावा लागतो. ह्या उलट चित्रपट कित्येकवेळा फारच गंभीर वळणे घेतो. दोघांचे वडील, अर्जुन कपूरच्या चेहर्यावरील हावभाव हे प्रेक्षकाला गंभीर बनवतात. अतर्क्य घटना टाळायला हव्यात त्या तश्याच आहेत. जसे आय आय एम मध्ये गेल्यापासून थेट प्रेमकथाच सुरू होते. (ह्याचा अर्थ मुले अभ्यास करत नसतीलच असा कसा घेता असा प्रश्न असल्यास तसे निदान एकदोनदा तरी दाखवायला हवे होते असे उत्तर आहे). आलियाला इकॉनॉमी शिकवायला अर्जुन थेट लेडिज हॉस्टेलमध्ये तिच्या रूममध्ये कसा जाऊ शकतो ह्याचे स्पष्टीकरण मिळाले नाही. अजूनही बहुतेक लेडिज हॉस्टेल्सना पुरेशी सुरक्षाव्यवस्था असते व मुलांना मुलींना भेटायचे असल्यास हॉस्टेलच्या बाहेर भेटावे लागते. येथे साहेब आत जातात आणि इकॉनॉमी बाजूला ठेवून थेट सांगतात की मला तुला किस करावेसे वाटते म्हणून आपण येथेच थांबलेले बरे! त्यावर एखाद्या मुलीने मुलाला हाकलून दिले असते. त्याऐवजी आलिया आपल्या ओठांनी त्याचे तोंड बंद करून टाकते. त्यानंतर त्या आलियाला कसलीही भीडभाड न बाळगता जमेल त्या एरियात जमेल त्या वेळी अर्जुनला किस करण्याचे काम दिलेले आहे. ज्या विद्यर्थीदशेमध्ये पेपर्स, सबमिशनचे टेन्शन असते त्या दशेत हे सेक्सॉलॉजीची प्रॅक्टिकल्स करून मोकळे झालेले दाखवलेले आहेत जे तर अज्जिबातच पटू शकत नाही. कँपस इन्टरव्ह्यूला त्याचे अचानक तिची मुलाखत चाललेली असताना तेथे जाणे वगैरे काहीच्या काही आहे. अर्जुनचे वडील असे का असतात वगैरे सांगणे ह्यात कथालेखकाला कमीपणा वाटत असावा. आलियाने अर्जुनच्या बहिणीचे हुंड्यामुळे अडलेले लग्न निव्वळ चार पाच अडचणीत आणणारे प्रश्न (व तेही वय, त्या लग्नातील तिचे स्थान वगैरे लक्षातच न घेता) विचारून पुन्हा जुळवून देणे हे अशक्य कोटीतले! ती व तिचे ड्रेसेस चांगले दिसतात हे निरर्थक वाटते.
पंजाबी व तमिळीयन्स एकमेकांचा पराकोटीचा तिरस्कार करतात / करू शकतात हे प्रथमच उमगले. असे का बुवा? जग कुठल्याकुठे पोचलेले आहे. शेवटी एकदम जुळी मुले दाखवून काय साधले तेही समजले नाही.
आय आय एम सारख्या संस्थेत असे प्रकार होत असतील अशी शंका यायला वाव आहे हे त्या संस्थेला हरकतीस पात्र का वाटले नसावे हेही समजले नाही.
एकुण 'काहीही' पिक्चर आहे. एक जुना टाईपरायटर का दाखवला आहे लक्षात आले नाही. अत्यंत कर्कश्श पार्श्वसंगीतामुळे विचका होतो ते वेगळेच.
एक अवांतर निरिक्षण - भावनिक कल्लोळ, कोणत्याही एखाद्या भावनेची प्रचंड तीव्रता दाखवण्याचे काम पूर्वी अभिनेते / अभिनेत्री हे अभिनयामार्फत करत असत. हल्ली हे काम चक्क पार्श्वसंगीताकडे सोपवलेले आहे. अभिनेत्यांचे चेहरे तसेच ठोकळेबाज राहतात आणि पार्श्वसंगीतावरून प्रेक्षकाला समजते की त्याच्या / तिच्या मनात आत्ता कोणत्या भावनेची किती तीव्रता आहे. हे मारक आहे.
धन्यवाद व चु भु द्या घ्या
-'बेफिकीर'!
ग्रेट अमा, काय मस्स्स्त
ग्रेट अमा, काय मस्स्स्त लिहिलंयत.. तुमच्या या रिव्ह्युसाठी तरी नक्की बघणार..
खरंच नेहमी लिहीत जा...
नाहीतर यादीत नव्हता. पुस्तकही वाचलेलं नाही.
तुमची कितीतरी मतं तंतोतंत पटलेली आहेत
अश्विनीमामी, माफ करा! मला
अश्विनीमामी,
माफ करा! मला कोठेही असे म्हणायचे नाही की तुमचे परिक्षण चुकलेले आहे वगैरे! वरील माझी मते निव्वळ वैयक्तीक आवडीनिवडीतून आलेली आहेत. तुमचे लेखन उत्तमच आहे, हे लिहायचे राहून गेले.
अमा, मी पिक्चर पाहिलेला नाही.
अमा, मी पिक्चर पाहिलेला नाही. पण तुमचा रिव्ह्यू वाचायला मजा आली.
भावनिक कल्लोळ, कोणत्याही
भावनिक कल्लोळ, कोणत्याही एखाद्या भावनेची प्रचंड तीव्रता दाखवण्याचे काम पूर्वी अभिनेते / अभिनेत्री हे अभिनयामार्फत करत असत. हल्ली हे काम चक्क पार्श्वसंगीताकडे सोपवलेले आहे. अभिनेत्यांचे चेहरे तसेच ठोकळेबाज राहतात आणि पार्श्वसंगीतावरून प्रेक्षकाला समजते की त्याच्या / तिच्या मनात आत्ता कोणत्या भावनेची किती तीव्रता आहे.
>>> हे आवडलं !!
चित्रपट अजून पाहिलाच नाहीये,
चित्रपट अजून पाहिलाच नाहीये, पण बेफिकीर यांच्या लेडीज हॉस्टेलमध्ये रुममध्ये अर्जुन कसा काय जाताना दाखवलाय य शंकेला उत्तर. आयआयएम अहमदाबादमध्ये लेडीज हॉस्टेलमध्ये रुममध्ये मुलांनी जाणे किंवा बॉइज हॉस्टेलमध्ये रुममध्ये मुलींनी जाणे याला बंदी नाहीये. आयआयएमचे हॉस्टेल्स, अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीची ३-४ हॉस्टेल्स (सेप्ट, इन्स्टिट्युट ऑफ प्लाझ्मा रिसर्च यांचे विद्यार्थी रहात असलेली) यामध्ये किमान १० वर्षांपूर्वी तरी अशी काही बंदी नव्हती येण्या-जाण्याला, रहाण्याला.
किमान १० वर्षांपूर्वी तरी अशी
किमान १० वर्षांपूर्वी तरी अशी काही बंदी नव्हती येण्या-जाण्याला, रहाण्याला<<<
चमत्कारीक आहे.
१. एक वेळ आजघडीला अशी बंदी नसली तर समजण्यासारखे आहे की बुवा आता काळ बदललेला आहे. पण १० वर्षांपूर्वी?
२. आणि दुसरे म्हणजे हा चित्रपट तर आत्ता काढलेला आहे, बाकीचे सर्व काही सध्याच्या जमान्यातील दाखवलेले आहे. मग तेवढेच का १० वर्षांपूर्वीचे?
कदाचीत अजूनही नसेल हो बंदी.
कदाचीत अजूनही नसेल हो बंदी. मला सध्याची परिस्थिती माहित नाहीये, मी अहमदाबादला शिकायला असताना अशी काही बंदी नव्हती किंवा हॉस्टेलवर येण्या-जाण्याच्या वेळेवर काहीही बंधन नव्हतं.
अल्पना ९३-९४ मधेही नव्हती
अल्पना ९३-९४ मधेही नव्हती बंदी.
अल्पना धन्यवाद. मला पुस्तक
अल्पना धन्यवाद. मला पुस्तक वाचताना ही शंका आलेली. पुस्तकात तर हिरोईन त्याच्याच रुमवर राहायला जाते, फक्त सकाळी आंघोळीसाठी ती स्वतःच्या रुममध्ये परतत असे असे आहे
बेफिकीर, तुम्हीही छान लिहिलेय. मलाही ह्या सगळ्या शंका आणि प्रश्न प्रडलेले, पण एकदा फिक्शन म्हटले की मग त्यात काहीही होऊ शकते.
तुम्ही आजच्या जमान्यातले लेखक असल्याने तुम्ही थेट काँप्युटरवर कथा लिहिता. १० वर्षांपुर्वी टाइपरायटर बडवत असतील. अर्थात मला ही माहिती नवीन होती, मला वाटलेले लेखक हाताने लिहितात, पण मग एकदा फिक्शन म्हटले की.......
साधना, अनेक मोठ्या
साधना,
अनेक मोठ्या संस्थांमध्ये होस्टेलमध्ये मुलामुलींच्या एकत्र वावराला हरकत घेतली जात नाही. पुण्यातही काही संस्थांमध्ये एकाच इमारतीत मुलामुलींच्या खोल्या आहेत. मजले वेगळे फक्त.
मला माहित नव्हते ना.. मी
मला माहित नव्हते ना.. मी हॉस्टेल्स फक्त चित्रपटात पाहिलेत जिथे मुलींचे हॉस्टेल हे मुलांसाठी म्हणजेच हिरोसाठी वर्जीत स्थान असते आणि तिथे रात्री गुपचुप जाण्यासाठी तो जिवाची बाजी वगैरे लावतो.
चित्रपट पाहुन तद्दन चुकीचे ज्ञानार्जन होते हेच खरे.
Seriously, these students
Seriously, these students are grown up adults with better IQ and EQ . They have proved this by getting in to these premium institutions. ( no debate about this pl. ) they are sure to go and think beyond only basic instincts. I toh thought it was a natural progression of a relationship. If you fall in love with some one, you are bound to feel like sharing space. and go to the next level.
the typewriter is a gift from his father with whom he has had serious issues. but when all else is closing for him he types out his own story. using writing as an escape route. I think Arjun has shown the post break up phase very well. havent you seen young people like that. He has portrayed a normal boy with parent issues, his personality is subdued. I kind of loved it that even the
IIM types feel like dancing when they fall in love. and he has done silly steps which I found quite funny and endearing.
Seriously, these students are
Seriously, these students are grown up adults with better IQ and EQ . They have proved this by getting in to these premium institutions. ( no debate about this pl. ) they are sure to go and think beyond only basic instincts. I thought it was a natural progression of a relationship. If you fall in love with some one, you are bound to feel like sharing space. and go to the next level
<<
Totally agree Mami !!
Characters are adults , matured people !.. They are cream level IIM Ahmedabad students and already responsible enough !
Just because they are IIM students doesn't mean they can't have personal life !
Two grown up -matured individuals falling in love , having 'live in' relationship or physical relationship with someone doesn't mean they are irresponsible towards career !
Anyways , whether audience /book readers like it or not , agree or disagree , the book actually is based on author's true love story and wedding story , that's the fact !
the book actually is based on
the book actually is based on author's true love story and wedding story , that's the fact !<<<
हे येथे विशेष सुसंबद्ध नाही. जगात एखाद्याच्या बाबतीत काहीतरी प्रत्यक्ष घडलेले आहे इतकेच कारण ते स्तुत्य ठरण्यास पुरेसे आहे असे काही नाही.
>>>They are cream level IIM Ahmedabad students and already responsible enough !
Just because they are IIM students doesn't mean they can't have personal life !
Two grown up -matured individuals falling in love , having 'live in' relationship or physical relationship with someone doesn't mean they are irresponsible towards career ! <<<
ह्या मतप्रदर्शनावरून कोणाशी कोणाचा वाद व्हावा इतका तो चित्रपट महत्वाचा नाहीच. मात्र ही विधाने 'नुसतीच' संदर्भरहीतपणे वाचली तरच पटण्यासारखी आहेत. चित्रपटाच्या कथानकाच्या अनुषंगाने ही उपकथानके कशी दाखवली गेली आहेत हे आठवल्यावर असे वाटते की अनेक अतर्क्य बाबी अगदी सहज होताना दाखवलेल्या आहेत. अतिशय जबाबदार, उच्चविद्याविभूषित, आय आय एम ला प्रवेश मिळण्याच्या पात्रतेची मुलगी दुसर्या तिसर्या भेटीत एका मुलाला स्वतःच्या खोलीवर (तेही हॉस्टेलमधील) बोलावून स्वतः त्याचे चुंबन घेईल हे 'होऊच शकत नाही' असे नसले तरीही (आजसुद्धा भारतात) खूपच अवघड आहे. चौथ्या पाचव्या भेटीत ते सगळे उरकून बसतील हेही तितकेच अवघड आहे. ह्या विद्यार्थ्यांना पर्सनल लाईफ नसावे असे माझ्या प्रतिसादात नेमके कुठे म्हंटले गेले आहे काही समजेना! पूर्वग्रह असल्यासारखे लिहिण्यात अर्थ नाही. पर्सनल लाईफ आणि अतर्क्य वर्तन ह्यात काहीतरी फरक असतो. त्यांचे कोणाशीतरी संबंध असल्यामुळे ते करीअरबाबत गंभीर नव्हते, असेही मी म्हंटलेले नाही. मी असे म्हंटलेले अहे की ते करीअरबाबत गंभीर असल्याचे दाखवलेलेही नाही. ते दाखवणे कथानकात आवश्यक होतेच.
ठीक आहे की आय आय एम मध्ये व इतर काही संस्थांमध्ये मुले व मुली स्पेस शेअर वगैरे करू शकत असतील व ते माहीत असण्याइतका मी व इतर काहीजण पुढारलेले नसू. पण निव्वळ कोणीतरी आय आय एम मध्ये आहे म्हणजे तो फारच परिपक्व, खूपच सखोल विचार करणारा, अत्यंत व्यवहारवादी, पुरोगामी, सर्वच क्षेत्रात अग्रेसर वगैरे असतो ही गृहीतके मनोरंजक आहेत.
माफी असावी.
पंजाबी व तमिळीयन्स एकमेकांचा
पंजाबी व तमिळीयन्स एकमेकांचा पराकोटीचा तिरस्कार करतात / करू शकतात हे प्रथमच उमगले. असे का बुवा? जग कुठल्याकुठे पोचलेले आहे.>>> असे का? तुम्ही कुठल्या जगात आहात. भारतात सगळे एकमेकांचा द्वेष करतात. पंजाबी व तमिळीयन्स तर खुपच.. तसेच मराठी लोकं भैयांचा. बंगाली लोक पंजाब्यांचा इ भरपुर आहे. सिनेमा / पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे.
सिनेमा / पुस्तक सत्य घटनेवर
सिनेमा / पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे.<<<
कृपयाच बरं का? पुस्तक सत्य घटनेवर आहे ह्याचा अर्थ ते स्तुत्य आहे असा मुळीच होत नाही. फक्त ते सत्य आहे इतकेच.
आज कित्येक इन्टरकास्ट मॅरेजेस, आंतर प्रांतीय नातेसंबंध अतिशय व्यवस्थित आहेत.
हा उगीचच दाखवलेला 'मद्रासन / पंजाबन' अतिरेकी विरोध मी तरी आयुष्यात इतक्या बटबटीतपणे व उघडपणे कुठे पाहिलेला नाही.
अतिशय जबाबदार,
अतिशय जबाबदार, उच्चविद्याविभूषित, आय आय एम ला प्रवेश मिळण्याच्या पात्रतेची मुलगी दुसर्या तिसर्या भेटीत एका मुलाला स्वतःच्या खोलीवर (तेही हॉस्टेलमधील) बोलावून स्वतः त्याचे चुंबन घेईल हे 'होऊच शकत नाही' असे नसले तरीही (आजसुद्धा भारतात) खूपच अवघड आहे. चौथ्या पाचव्या भेटीत ते सगळे उरकून बसतील हेही तितकेच अवघड आहे. >> no dear. it isnt. deal with it.
अतिशय जबाबदार,
अतिशय जबाबदार, उच्चविद्याविभूषित, आय आय एम ला प्रवेश मिळण्याच्या पात्रतेची मुलगी दुसर्या तिसर्या भेटीत एका मुलाला स्वतःच्या खोलीवर (तेही हॉस्टेलमधील) बोलावून स्वतः त्याचे चुंबन घेईल हे 'होऊच शकत नाही' असे नसले तरीही (आजसुद्धा भारतात) खूपच अवघड आहे. चौथ्या पाचव्या भेटीत ते सगळे उरकून बसतील हेही तितकेच अवघड आहे. >> no dear. it isnt. deal with it.
<<<
Once again , mami +1.
What's so difficult about it ?
Oh c'mon , She really likes the guys and finds him physically compatible and his feelings are same , simple !
तुम्ही पाहिले नाही म्हणजे तसे
तुम्ही पाहिले नाही म्हणजे तसे काही नसतेच असे का? असो जास्त वाद घालण्यात अर्थ नाही..:-)
आपल्या स्वतःकडून, आपल्या
आपल्या स्वतःकडून, आपल्या पुढच्या पिढीकडून वगैरे ज्या अपेक्षा असतात त्या इतरांच्या बाबतीत अचानकच किती औदार्ययुक्त होतात ह्याचे नवल वाटते.
There are no restrictions on
There are no restrictions on girls entering boys' rooms at any time. Boys may enter girls rooms only till 9pm in many campuses..not only in iims but at most of the tier 1 campuses..
befikír, as usual, is unnecessarily going tangent to the simple story.. If d girl kisses d boy in her 17th meeting, does he expect that all d earlier 16 meetings should be shown in d film?:D
खूपच मजेशीर प्रतिसाद नताशा,
खूपच मजेशीर प्रतिसाद नताशा, नेहमीसारखाच!
तुम्ही चित्रपट पाहिलात की नाही हे माहीत नाही, वरचे सर्व प्रतिसाद वाचलेले नाहीत. तसेही, असे म्हणायला सगळे मोकळे असतीलच की 'हा चित्रपट पाहिला तरच ह्या प्रसंगाबद्दल बोलावे की कॉय' वगैरे!
म्हणूनच पुन्हा म्हणतो, की दीपंजलींची विधाने स्वतंत्ररीत्या वाचली तर नक्कीच पटण्यासारखी आहेत, चित्रपट पाहून चित्रपटाबाबतची विधाने आहेत हे डोक्यात ठेवून वाचल्यावर ती पटत नाहीत हे समजेल.
Pages