प्रथम तुज पाह्ता , जीव वेडावला अर्थात टू स्टेट्स

Submitted by अश्विनीमामी on 20 April, 2014 - 08:20

एक पे एक फ्री ही मार्केटिंग मधली हमखास यशस्वी होणारी युक्ती आहे. चित्रपटाच्या रंगीत दुनियेतही ती वापरली जाते पण नेहमी यशस्वी होईलच असे नाही. असं बघा पहिले फरहा आली दोन चार चित्रपट करून विंदू कुमार बरोबर लग्न करून स्थिरावली. पण तिच्या पावलावर पाउल टाकून तब्बू आली. आणि पहिला प्रेम सोडा,( पहिला डाव भुताच असतो ना... ) पण प्रत्येक चित्रपटाद्वारे उत्तम काम करून तिने आपला असा क्लास निर्माण केला. सनी देवलच्याच घरातून बॉबी आला. तो बेताब आम्ही थेटरात जाउन बघितला होता हे कबूल करणे ही आता तरुणपणी केलेली एंबरासिन्ग कामे ह्या फोल्डर मध्ये टाकून डिलीट करायची बाब झाली. पुढे बॉबी इज सो सो क्यूट म्हणणार्‍या युवतींचा स्क्रू ढिला आहे कि काय असे उगीचच वाटायचे. पण त्यांच्या मागून आलेला अभय देवल मात्र अगदी खास आव्डीचा झाला. दिसणे तर टोन्ड डाउन आहेच पण कामे ही छान करतो आणि भूमिकांचे सिलेक्षनही वेगळे. सोचा न था, देव डी, ओय लक्की, अन जिंदगी मिले ना दोबारा! ब्लू आइड बेबी बेबी बेबी करिश्मा नंतर आली करीना जिने ओंकारा, जब वी मेट आणि इतर चित्रपटांतून आपले असे खास स्थान निर्माण केले आहे. खरी स्टार क्वालिटी तिच्यात दिसते जी करिश्मा कधी व्यक्त करू शकली नाही झुबेदा वगळता.तिच्या नशिबात गोविंदा अन सलमान तद्दन कमर्शिअल सिनेमे! भयानक कपडे आणि भिकार मेकप. गल्यान साखली सोन्याची मध्ये नाच करत पुढे आलेली पूजा भटट आठवते का? दिल है कि मानता नहीं मध्ये कलिंगड खाणारी, सर सर म्हणून गाणे गाणारी, डॅडी काँप्लेक्स असलेली लिस्प आणि चकणे डोळे असूनही धकवून नेणारी.पुढे प्रोड्यूसर बनली. जिस्म वगैरे सिनेमे काढले, राहुल रॉय विवेक मुशरन ची नायिका! आणि आलिया भट्टची मोठी बहीण!

ऐंशी आणि नव्वद च्या दशकात महेश भट्टचे नाव कायमच कोणत्या तरी बाबतीत चर्चेत असायचे. आंतरजाल नसतानाही तो कायम हेडलाइन्स ग्रॅब करायचा. स्टारडस्ट, सोसायटी, मूव्ही, स्टार अँड स्टाइल
अन तत्सम मासिकात मुलाखती देणे. अती वैयक्तिक बाबी( परवीनच नव्हे तर इतरही) उगीचच बोलून सनसनाटी प्रसिद्धी मिळविणे. एकावेळी तीन तीन चित्रपट दिग्दर्शित करणे अश्या गमती हा करत असे.
पण अर्थ ह्या आद्य स्त्रीवादी सिनेमाचा दिग्दर्शक असल्याने व कसेही असले तरी प्रांजलपणे मनात येइल ते बोलत असल्याने , स्वतः च्या मानसिक जखमा उकलून दाखविणारा त्याकाळात हा एक ऑड बॉल
कॅरेक्टर आमच्या सहानुभूतीला पात्र होता.

तेव्हा एकूणच करमणुकीची साधने कमी होती. ट्विटर, फेसबुकद्वारे तारे तारका सतत संपर्कात नसत २४/७ चॅनेल्स वरून आज ह्याने काय केले, त्याने काय खाल्ल्ले अशी बातमी पत्रे मिनिटो-मिनटी मिळत नसत. इन्स्टाग्राम पण नव्हते फोटो बघायला. त्यामुळे त्यांच्या जीवना बद्दल एक प्रकारचे कुतुहल मध्यमवर्गी मनात असे. लायब्ररीतून आणलेल्या स्टारडस्टमध्ये महेशने सोनी राझदान ( सारांश मधली - प्रिया राजवंश ची अपग्रेड! ) बरोबर चक्क दुसरे लग्न केले अशी एक खबर चवीने वाचली होती. ते लग्न, त्यासाठी धर्मबदल ते प्रेम इत्यादी ह्याने अगदी सविस्तर मुलाखत दिली होती. आज हे सर्व आठवण्याचे कारण आलिया!

टू स्टेटस मध्ये आलिया जेव्हाही पडद्यावर येते , तिच्या प्रेझेन्स ने स्क्रीन झळाळून जातो. अतिशय फ्रेश, सुरेख आणि गोड दिसली आहे. कामही छान केले आहे. अ‍ॅज द रोल डिमांडस. स्टुडंट ऑफ द इअर मध्ये ती फारच नवखी होती पण आता तिला कॅमेर्‍यापुढे सहज वावरायचे जमून गेले आहे. क्वीनची मोहिनी अजून टिकून आहे ; परंतू करीना, कट्रिना, प्रियांका अनुष्क,, दीपिका ब्रिगेडला तिने झपाट्याने मागे टाकले आहे. ती तमिळ दिसत नाही असे अनेक प्रतिसाद येतील. पण दीपिकाच्या मीनाम्मा पेक्षा तरी मला आवडली ती. चित्रपटात कोणी तिचा कपडेपट सांभाळला आहे त्याला हॅटस ऑफ. अति शय योग्य लुक दिला आहे आणि शॉर्ट्स, स्कर्ट्स, चुडीदार, साडी, लहेंगा सर्व प्रकारचे कपडे उत्तम डिझाइन करून दिले आहेत.

एक बॉलीवुड प्रेक्षक म्हणून माझ्या मागण्या फार नसतात. थोडे इंटेलिजंट मनोरंजन व्हावे , कथा संगीत चांगले असावे. इतकेच. पण सध्या येणारे बरेच चित्रपट एक तर दबंगची सवंग कॉपी, अक्षय-सोनाक्षी धरपकड पट, बेबी डॉल एम एम एस/ डर अ‍ॅट मॉल असले काहीतरी असतात मग काय बघावे समजत नाही. त्या मुळे टू स्टेट्स हे एक प्लेजंट सरप्राइज मिळाले. कर्मभूमी चेन्नाई आणि दिलवालोंकी दिल्ली ह्यांचा
अनईझी संगम!

चेतन भगतच्या लेखनाची भाषिक क्वालिटी मला फारशी आव्डत नाही पण हा चित्रपट पुस्तकापेक्षा चांगला जमला आहे. दिग्दर्शकाने ओवर द टॉप न जाता काम केले आहे व सर्व कास्ट नीट रोलला न्याय देते.
समथिंग पीपल लाइक अस कॅन रिलेट टू असे वाट्ते. तमिळीअन आईबाबा - शिव आणि रेवती( रामुच्या रात मधली हिरवीण आता मम्मी झाली आहे चक्क.) आणि अमृता - पंजाबी आई - ह्यांचे रोल्स तर खूपच रिअल लाइफ वाटतात.

सैफची पहिली बायको, बेताब, मर्दची हिरॉइन असलेली अमृता ! ओरिजिनल सिखनी. जीवनातील आघातांनी आतून पिचून गेलेली, भरपूर नव्हे इतरांना, मुलाला देखील असह्य होईल असे इमोशनल बॅगेज घेउन वावरणारी. गरम गरम पराठे घेउन येणारी पण फिल्मी मा वाटत नाही. निरूपा रॉयने अमर केलेया व्यक्तिरेखे पासून बॉलिवूडच नव्हे तर समाज देखिल किती पुढे आला आहे असे जाणवते. व्हिकी डोनरमधील सासूबरोबर हुसकीचा पॅग लगावणारी पार्लरवाली आई आठवते का? मां बदल रही है.

रोनित रॉयचा रोल ही अवघड नाही त्याच्यासाठी. कसोटी जिंदगी की मधला ऐटबाज मि. बजाज, ते उडान मधला बाप आणि हा विझलेला आर्मी ऑफिसर. शेवटी बाप आणि मुलगा एका इश्यू वर रिलेट होतात ते अगदी खरे वाट्ते.

चित्रपटाचा पहिला भाग अगदी रीतसर रोमान्स आहे. तो ही आय आय एम मधला. तो बघताना अनेकांना आपल्या कॉलेजातील मैत्रीणीची नक्की आठवण येईल. ग्रॅज्युएशन, आणि मग प्लेसमेंट त्यातले सर्प्राइज
प्रसंग बघताना आपण ह्या माइल स्टोनची एक पालक म्हणून किती आसुसून वाट बघत आहोत ते फार प्रकर्षाने जाणवले. पण मुले मोठी होत असताना कधीतरी एका क्षणापासून ती आपली गोष्ट न राहता त्यांची बनली आहे आणि आपण फक्त एक मेन कथेतले सपोर्टिंग पात्र बनलो आहोत ही जाणीव देखील होते.
काहीतरी सुटल्यासारखे पण वाट्ते आणि एक सल राहून जातो. ह्या कथेतली मुले चांगली वाढवली आहेत.
आपल्या लग्नात आईबाबा जास्त आनंदी असा वेत अशी इच्छा कर्णारी गोड मुलगी आहे आणि आई वर प्रेम करणारा पण सुवर्ण मध्य न गाठू शकल्याने थकून गेलेला एम बी ए मुलगा आहे.

अर्जून कपूर पण मला पहिल्या पासून आवडतो. सत्ते शौरी ह्या त्याच्या आजी चित्रपट फायनान्स करत असत. मोना कपूर ची पूर्ण कहाणी पण सॅव्ही मासिकात वाचली होती. लग्न मोडल्यावर त्यांनी परिस्थितीशी झु़ंज दिली. लाइम लाइट पासून दूर जगल्या व काही काळापूर्वी त्यांचे कॅन्सरने निधन झाले.
मुलाचे यश बघता आले नाही. ह्या सिनेमात त्याने अतिशय बारीकीने व्यक्तिरेखेच्या सर्व छटा रंगवल्या आहेत. त्याच्या वयाची बॅक पॅक लाउन कामाला येणारी मुले आता माझ्या बरोबर काम करतात. त्याने क्रिश चे पात्र अगदी बिलीव्हेबल, रिलेटेबल केले आहे. सासुरवाडीत फिट होताना त्याची होणारी धावपळ,
माझ्याशी लग्न करा असे म्हणणे हा सीन खूपच मजेशीर आहे. एकीकडे खोल गेलेल्या जखमेसारखे चिरत
गेलेले लग्न जपणारी आई, अब्युझिव वडिलांबद्दलची घृणा आणि दुसरीकडे अनन्याबद्दलचे हळुवार प्रेम, ब्रेकप नंतरचे दु:ख ह्यात दबले जाणारे स्वत्व त्याने व्यक्त केले आहे. रणबीर कपूरसारखा हा फ्लॅम बॉयंट नाही . रनवीर सिंग सारखा चिल्लर चिंधी?/ टू फिजिकल नाही वरूण धवन सारखा ऑल अ‍ॅब्ज नो ब्रेन्स नाही. सिध्दार्थ सारखा टू पंजाबी नाही. ह्याच्याकडून चांगल्या कामाच्या खूप अपेक्षा आहेत.

सिनेमा बघताना जाणवणार नाही कदाचित पण गाणी चांगली आहेत. भारतातली जीवन पद्धती किती बदलली आहे त्याची जाणीव क्वीन आणि हा सिनेमा बघताना पदोपदी होते. कलाकारांची नवी पीढी आली आहे आणि प्रेक्षकांची देखील. पण संपताना पुढील रांगेतल्या युवतीने कोणाला तरी एस एम एस केलेला वाचता आला जस्ट अ‍ॅज शी वॉज टायपिंग इट, फँटॅस्टिक मुव्ही.. आय क्राइड अँड आय लाफ्ड. ......... सो ट्रू डीअर ... सो ट्रू!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Review आवडला. तुम्ही असेच चित्रपट बघत राहा आणि त्याबद्दल लिहित राहा Happy

मला पुस्तक आवडलं होतं. त्यामुळे चित्रपट कितपत आवडेल माहीत नाही. (म्हणजे नवीन काहीच नाहीये ना, स्टोरी आधीच माहीत आहे!)
त्यात अर्जुन कपूर आणि आलिया या अल्पशिक्षित बालकांना आय आय एम ए चे हुश्शार विदयार्थी म्हणून बघणं मला पचनी पडण्यासारखं नाही Happy

पण आता मिस्टरांना बघायचा असल्यास जावं लागेल पुढच्या विकान्ताला..तेव्हा फार बोअर होणार नाही, एकदा बघायला ठीक आहे..इतकी तरी खातरजमा झाली Happy

Review आवडला. तुम्ही असेच चित्रपट बघत राहा आणि त्याबद्दल लिहित राहा स्मित

मला पुस्तक आवडलं होतं. त्यामुळे चित्रपट कितपत आवडेल माहीत नाही. (म्हणजे नवीन काहीच नाहीये ना, स्टोरी आधीच माहीत आहे!)

त्यात अर्जुन कपूर आणि आलिया या अल्पशिक्षित बालकांना आय आय एम ए चे हुश्शार विदयार्थी म्हणून बघणं मला पचनी पडण्यासारखं नाही स्मित +१

कमॉन , अल्पशिक्षित असून इफ दे कॅन फेक/ अ‍ॅक्ट बिइंग एज्युकेटेड , इट्स परफेक्ट्ली फाइन :).
दे आर अ‍ॅक्टर्स !

छान लिहिलयं. पण अर्जुन कपूरला क्रिश म्हणुन इमॅजिन पण करु शकत नाही.क्रिश म्हणजे हॅन्डसम मुलगाच हवा तिथे मलातरी.

पुस्तक वाचलय. चित्रपट नाही पहिलाय.
वैयक्तिक मत - चेतन भगतच्या कादंबऱ्यांचे प्लॉट ग्रेट नसतात. पण लेखनशैली बऱ्यापैकी खुसखुशीत असते. म्हणून वाचावसं वाटते. विषयांतराबद्दल क्षमस्व.

पेट थेरपी काका>> I am absolutely mortifled Happy something to tell the kids this evening. two furry kids and one human. Happy
Also that Jeev Vedawala is not for me. it is between the hero and the heroine.

रिव्ह्यू मस्त. पुस्तक वाचलं नाहीये आणि सिनेमा एवढ्यात बघायला वेळ मिळणार नाहीये. पण बघावासा वाटावा असा रिव्ह्यू आहे.
ते काही शब्द उगाचच तोडलेत ते जोडा ना पण. दाताखाली खडा येतो उगाच इतक्या मस्त प्रवाही लेखात. (उदा. फ्लॅम बॉयंट वगैरे)

पुस्तक आणि मुव्ही दोन्ही आवडले पण पुस्तकात अनन्या एकदम इंडीपेंडन्ट वाटते.
पण दोघंही शोभलेत माझ्यामते तरी! ४ स्टार्स नक्की!!! Lol आणि गाणी, खूपच आवडली Happy

पेट थेरपी काका.. ?? अनिश्का त्या काकू रादर मामी आहेत..>>>>>>>>>. चैत्रगंधा....मी विपौड्या मारत नाही...म्हणुन लक्षात नाही आले.. पेट थेरपी ...मामी... Happy

विपौड्याचा काय संबंध इथे ?? Uhoh
त्यांचा आधीचा आयडी होता तो.
सॉरी अमा.. तुमच्या धाग्यावर अवांतर होतय..

त्यात अर्जुन कपूर आणि आलिया या अल्पशिक्षित बालकांना आय आय एम ए चे हुश्शार विदयार्थी म्हणून बघणं मला पचनी पडण्यासारखं नाही >>>>>>> + १.
अल्पशिक्षित तर आहेतच पण अभिनयातहि ढ आहेत.

कमॉन , अल्पशिक्षित असून इफ दे कॅन फेक/ अ‍ॅक्ट बिइंग एज्युकेटेड , इट्स परफेक्ट्ली फाइन .
दे आर अ‍ॅक्टर्स !>>>>>>>> ज्यो.ऑ.डे. Happy

लेख खुपच सुंदर लिहिलाय. आवडला.

चित्रपट ठिकठाक आहे. प्रत्येक फ्रेममध्ये आलिया सुंदर दिसेल याची काळजी घेण्यात आलीय. अन्यथा ती इतकी सुंदर नाहीय Happy लग्नाच्या लाल साडीत अप्रतिम दिसलीय. पण त्या दृश्यात मला तिच्यापेक्षा तिच्या गळ्यातला दागिना जास्त आवडला Happy तिचे केस अतिशय सुंदर आहेत. हल्लीच्या हिरविनींसारखे केमिकलयुक्त वाटत नाहीत. हिरो ठिकठाक.

तिचा कपडेपट मनिष मल्होत्राने सांभाळलाय त्यामुळे कपडेपट सुंदर आहे यात काहीच आश्चर्य नाही. केरळी ऑफव्हाईट आणि सोनेरी साडीला शॉकिंग पिंक रंगाच्या नि-या सॉल्लीड सुंदर दिसतात. आणि त्यावर रंगीबेरंगी योकचा ब्लाऊज तर खुपच सुंदर दिसतो. तिने तो ब्लॉऊज दोन- तिनदा वापरलाय वेगवेगळ्या केरळी साड्यांवर. अप्रतिम.....

खरेतर हिरो हिरविनीपेक्षा इतर मंडळींची कामे जास्त सुंदर झालीय. दोन्ही आयांची कामे आवडली. अमृताचे जास्त आवडले.

मुळ पुस्तक मात्र जास्त एंटरटेनिंग आहे. चित्रपटात तेवढी मजा आली नाही.

रच्याकने वरचे वाचुन बेताब बॉबी देवलचा आहे असे वाटते असे मला वाटले. तो सनीचा पहिला चित्रपट. बॉबीच्या पहिल्या चित्रपटाचे तर नावही आठवत नाही. सनी ही धर्मेंद्रची नक्कल असली तरी बरी नक्कल होती. बॉबी मात्र धर्मेद्रच्या नावावरचा धब्बा आहे, हिंदी चित्रपटातल्या मोस्ट हँडसम हिरोचा पाप्याचे पितर पोरगा.... हेमावैम... असो.

Bobby Deol first movie is Barsant I think. The ad used to be Dharam ka beta, Bobby ki beti. ( bobby twinkle)

बॉबीच्या पहिल्या चित्रपटाचे तर नावही आठवत नाही.>>> बरसात.
हमको सिर्फ तुमसे प्यार है... हमको सिर्फ तुमसे प्यार है.. Happy

लेख आवडला.

चित्रपट सोसो च आहे. अगदी पहिल्याच दृष्यात सिनेमाची पूर्ण स्टोरीलाईन समजून जाते आणि आपल्याला जे वाटतय अगदी त्याच वळणाने चित्रपट जातो. हिंदी चित्रपटात कथेचे नाविन्य बहुतेक नसतेच म्हणा. पण त्याला वेगळा ठरवतो तो त्याचा दिग्दर्शक आणि त्याने केलेली कथेची मांडणी. या चित्रपटात त्यात कसलेच नाविन्य नाहीये. अगदी सरधोपट मार्गाने जातो चित्रपट.

आलिया चांगली दिसली आहे. STOY पेक्षा खूपच चांगली. पण तिच्या दिसण्यात तिच्या आईचा आणि आशा पारेखचा भास होत रहातो.

अर्जुन कपूरने इतकी अंडर-अ‍ॅक्टींग का केली आहे ते नाही समजले. सगळ्या चित्रपटभर तो झोपाळलेल्या डोळ्यांनी वावरला आहे. कधी कधी तर तो चक्क बावळट वाटतो.

सगळ्या चित्रपटात एकच गोष्ट आवडली - अमृता सिंगची पंजाबी आई. अप्रतिम भूमिका झाली आहे ती. शेवटच्या प्रसंगात " सार्‍या आयुष्यात ह्या माणसाने मला त्रास दिला आता मी त्याला का स्विकारू" हे भाव चेहर्‍यावर अगदी सहीसही दाखवले आहेत. शब्दांचे कामच नाहीये त्या प्रसंगात.

चित्रपट सोसो च आहे. अगदी पहिल्याच दृष्यात सिनेमाची पूर्ण स्टोरीलाईन समजून जाते आणि आपल्याला जे वाटतय अगदी त्याच वळणाने चित्रपट जातो. हिंदी चित्रपटात कथेचे नाविन्य बहुतेक नसतेच म्हणा. पण त्याला वेगळा ठरवतो तो त्याचा दिग्दर्शक आणि त्याने केलेली कथेची मांडणी. या चित्रपटात त्यात कसलेच नाविन्य नाहीये. अगदी सरधोपट मार्गाने जातो चित्रपट.

+१०००० ज्यांनी पुस्तक वाचलेय त्यांना तर संवादातही काहीच नाविन्य आढळत नाही. ज्यांनी पुस्तक वाचले नाही त्यांनाही एकाही दृश्यात नाविन्य वाटणार नाही. तरीही पाहताना कंटाळा येत नाही कारण प्रेझेंटेशन एकदम चकाचक केलेय आणि फोकस कायम आलियावर ठेवलाय.

सगळ्या चित्रपटात एकच गोष्ट आवडली - अमृता सिंगची पंजाबी आई. अप्रतिम भूमिका झाली आहे ती. शेवटच्या प्रसंगात " सार्‍या आयुष्यात ह्या माणसाने मला त्रास दिला आता मी त्याला का स्विकारू" हे भाव चेहर्‍यावर अगदी सहीसही दाखवले आहेत. शब्दांचे कामच नाहीये त्या प्रसंगात.
+ १००००

मलाही सगळ्यात जास्त तीच आवडली.

...

अ मा.. मला खूप आवडला टू स्टेट्स...... अर्जुन कपूर आणी आलिया चं काम ही फार आवडलं.. आलिया चे छोटे छोटे जेश्चर्स अतिशय नॅचरल आहेत.. ती कॅमेर्‍यासमोर खूप्पच कंफर्टेबल आहे..

हाय वे पासून तिचा अभिनय स्किल हाय होतंय...

आईवडिलांच्या दोन्ही जोड्या मस्त फिट झाल्यात रोल्स मधे..

माझं वैयक्तीक मतः

अर्थातच पुस्तकापेक्षा लहान आहे. खूप काटछाट आहे. तरीही जवळपास ३ तासांचा आहे.
मी पुस्तक आधी वाचल्याने असेल किंवा अजून काही कारणाने.. प्रेडीक्टेबल वाटला.
आलीया भट नुसतीच छान "दिसलीये". नट कोण होता त्याची हेअरस्टाईल एकदम विचित्र आहे. तिच्या कुटुंबीयांचा अभिनय मात्र आवडला.
हिरोचे वडील असे का वागत होते हे अजूनही अनुत्तरीत आहे. आणि अचानक कसेकाय सुधरले हेही.
आलीयाने इतक्या सहजपणे त्या ड्युमला डॉमिनेट करून त्याला छोट्या गाडीसाठी पटवणे तद्दन खोटे वाटले. खरंच हुंड्यासाठी अडलेलं लग्न असेल तर मुलाकडचे मोठे लोक इतरांची (विशेषत: समजावायला गेलेल्या मुलीकडच्या कोणत्याही मुलीची) कशी अक्कल, अब्रू आणि संस्कार काढतात हे लेखकाला माहित नसावे.
अजून एक.. पुस्तकात खूप हसवणारा तो फ़ेमस बॉक्सर अंडरवेअर सीन चित्रपटात नाहीये.
किसिंग सिन्सचं आता अप्रूप वाटत नाही.
मला तरी पैसे देऊन बघण्याइतका वर्थ वाटला नाही.

<<प्रत्येक फ्रेममध्ये आलिया सुंदर दिसेल याची काळजी घेण्यात आलीय. अन्यथा ती इतकी सुंदर नाहीय >> +१
मी सिनेमा बघितला नाहीये पण यु ट्यूब वर तिचे इंटरव्ह्यू बघितले आहेत . जितकी तिच्या सौदर्याची तारीफ केली जातेय इतकी ती सुंदर नाहीये हे माझं वै म Happy थोडीशी ती चकणी पण वाटते .अगदी थोडीशी Happy

अजुन पुस्तक नाही वाचले (आता वाचणार देखिल नाही) पण मुव्ही काल बघीतला, ..... चांगला आहे Happy हिरोच्या लुकप्रमाणे कंटाळवाणा तर बिलकूल नाही...
आलीयाने इतक्या सहजपणे त्या ड्युमला डॉमिनेट करून त्याला छोट्या गाडीसाठी पटवणे तद्दन खोटे वाटले. खरंच हुंड्यासाठी अडलेलं लग्न असेल तर मुलाकडचे मोठे लोक इतरांची (विशेषत: समजावायला गेलेल्या मुलीकडच्या कोणत्याही मुलीची) कशी अक्कल, अब्रू आणि संस्कार काढतात हे लेखकाला माहित नसावे. >>>>>>>>>>मलापण हाच प्रश्न पडला होता, बाकी सर्व ठिकच होता

Pages