प्रथम तुज पाह्ता , जीव वेडावला अर्थात टू स्टेट्स

Submitted by अश्विनीमामी on 20 April, 2014 - 08:20

एक पे एक फ्री ही मार्केटिंग मधली हमखास यशस्वी होणारी युक्ती आहे. चित्रपटाच्या रंगीत दुनियेतही ती वापरली जाते पण नेहमी यशस्वी होईलच असे नाही. असं बघा पहिले फरहा आली दोन चार चित्रपट करून विंदू कुमार बरोबर लग्न करून स्थिरावली. पण तिच्या पावलावर पाउल टाकून तब्बू आली. आणि पहिला प्रेम सोडा,( पहिला डाव भुताच असतो ना... ) पण प्रत्येक चित्रपटाद्वारे उत्तम काम करून तिने आपला असा क्लास निर्माण केला. सनी देवलच्याच घरातून बॉबी आला. तो बेताब आम्ही थेटरात जाउन बघितला होता हे कबूल करणे ही आता तरुणपणी केलेली एंबरासिन्ग कामे ह्या फोल्डर मध्ये टाकून डिलीट करायची बाब झाली. पुढे बॉबी इज सो सो क्यूट म्हणणार्‍या युवतींचा स्क्रू ढिला आहे कि काय असे उगीचच वाटायचे. पण त्यांच्या मागून आलेला अभय देवल मात्र अगदी खास आव्डीचा झाला. दिसणे तर टोन्ड डाउन आहेच पण कामे ही छान करतो आणि भूमिकांचे सिलेक्षनही वेगळे. सोचा न था, देव डी, ओय लक्की, अन जिंदगी मिले ना दोबारा! ब्लू आइड बेबी बेबी बेबी करिश्मा नंतर आली करीना जिने ओंकारा, जब वी मेट आणि इतर चित्रपटांतून आपले असे खास स्थान निर्माण केले आहे. खरी स्टार क्वालिटी तिच्यात दिसते जी करिश्मा कधी व्यक्त करू शकली नाही झुबेदा वगळता.तिच्या नशिबात गोविंदा अन सलमान तद्दन कमर्शिअल सिनेमे! भयानक कपडे आणि भिकार मेकप. गल्यान साखली सोन्याची मध्ये नाच करत पुढे आलेली पूजा भटट आठवते का? दिल है कि मानता नहीं मध्ये कलिंगड खाणारी, सर सर म्हणून गाणे गाणारी, डॅडी काँप्लेक्स असलेली लिस्प आणि चकणे डोळे असूनही धकवून नेणारी.पुढे प्रोड्यूसर बनली. जिस्म वगैरे सिनेमे काढले, राहुल रॉय विवेक मुशरन ची नायिका! आणि आलिया भट्टची मोठी बहीण!

ऐंशी आणि नव्वद च्या दशकात महेश भट्टचे नाव कायमच कोणत्या तरी बाबतीत चर्चेत असायचे. आंतरजाल नसतानाही तो कायम हेडलाइन्स ग्रॅब करायचा. स्टारडस्ट, सोसायटी, मूव्ही, स्टार अँड स्टाइल
अन तत्सम मासिकात मुलाखती देणे. अती वैयक्तिक बाबी( परवीनच नव्हे तर इतरही) उगीचच बोलून सनसनाटी प्रसिद्धी मिळविणे. एकावेळी तीन तीन चित्रपट दिग्दर्शित करणे अश्या गमती हा करत असे.
पण अर्थ ह्या आद्य स्त्रीवादी सिनेमाचा दिग्दर्शक असल्याने व कसेही असले तरी प्रांजलपणे मनात येइल ते बोलत असल्याने , स्वतः च्या मानसिक जखमा उकलून दाखविणारा त्याकाळात हा एक ऑड बॉल
कॅरेक्टर आमच्या सहानुभूतीला पात्र होता.

तेव्हा एकूणच करमणुकीची साधने कमी होती. ट्विटर, फेसबुकद्वारे तारे तारका सतत संपर्कात नसत २४/७ चॅनेल्स वरून आज ह्याने काय केले, त्याने काय खाल्ल्ले अशी बातमी पत्रे मिनिटो-मिनटी मिळत नसत. इन्स्टाग्राम पण नव्हते फोटो बघायला. त्यामुळे त्यांच्या जीवना बद्दल एक प्रकारचे कुतुहल मध्यमवर्गी मनात असे. लायब्ररीतून आणलेल्या स्टारडस्टमध्ये महेशने सोनी राझदान ( सारांश मधली - प्रिया राजवंश ची अपग्रेड! ) बरोबर चक्क दुसरे लग्न केले अशी एक खबर चवीने वाचली होती. ते लग्न, त्यासाठी धर्मबदल ते प्रेम इत्यादी ह्याने अगदी सविस्तर मुलाखत दिली होती. आज हे सर्व आठवण्याचे कारण आलिया!

टू स्टेटस मध्ये आलिया जेव्हाही पडद्यावर येते , तिच्या प्रेझेन्स ने स्क्रीन झळाळून जातो. अतिशय फ्रेश, सुरेख आणि गोड दिसली आहे. कामही छान केले आहे. अ‍ॅज द रोल डिमांडस. स्टुडंट ऑफ द इअर मध्ये ती फारच नवखी होती पण आता तिला कॅमेर्‍यापुढे सहज वावरायचे जमून गेले आहे. क्वीनची मोहिनी अजून टिकून आहे ; परंतू करीना, कट्रिना, प्रियांका अनुष्क,, दीपिका ब्रिगेडला तिने झपाट्याने मागे टाकले आहे. ती तमिळ दिसत नाही असे अनेक प्रतिसाद येतील. पण दीपिकाच्या मीनाम्मा पेक्षा तरी मला आवडली ती. चित्रपटात कोणी तिचा कपडेपट सांभाळला आहे त्याला हॅटस ऑफ. अति शय योग्य लुक दिला आहे आणि शॉर्ट्स, स्कर्ट्स, चुडीदार, साडी, लहेंगा सर्व प्रकारचे कपडे उत्तम डिझाइन करून दिले आहेत.

एक बॉलीवुड प्रेक्षक म्हणून माझ्या मागण्या फार नसतात. थोडे इंटेलिजंट मनोरंजन व्हावे , कथा संगीत चांगले असावे. इतकेच. पण सध्या येणारे बरेच चित्रपट एक तर दबंगची सवंग कॉपी, अक्षय-सोनाक्षी धरपकड पट, बेबी डॉल एम एम एस/ डर अ‍ॅट मॉल असले काहीतरी असतात मग काय बघावे समजत नाही. त्या मुळे टू स्टेट्स हे एक प्लेजंट सरप्राइज मिळाले. कर्मभूमी चेन्नाई आणि दिलवालोंकी दिल्ली ह्यांचा
अनईझी संगम!

चेतन भगतच्या लेखनाची भाषिक क्वालिटी मला फारशी आव्डत नाही पण हा चित्रपट पुस्तकापेक्षा चांगला जमला आहे. दिग्दर्शकाने ओवर द टॉप न जाता काम केले आहे व सर्व कास्ट नीट रोलला न्याय देते.
समथिंग पीपल लाइक अस कॅन रिलेट टू असे वाट्ते. तमिळीअन आईबाबा - शिव आणि रेवती( रामुच्या रात मधली हिरवीण आता मम्मी झाली आहे चक्क.) आणि अमृता - पंजाबी आई - ह्यांचे रोल्स तर खूपच रिअल लाइफ वाटतात.

सैफची पहिली बायको, बेताब, मर्दची हिरॉइन असलेली अमृता ! ओरिजिनल सिखनी. जीवनातील आघातांनी आतून पिचून गेलेली, भरपूर नव्हे इतरांना, मुलाला देखील असह्य होईल असे इमोशनल बॅगेज घेउन वावरणारी. गरम गरम पराठे घेउन येणारी पण फिल्मी मा वाटत नाही. निरूपा रॉयने अमर केलेया व्यक्तिरेखे पासून बॉलिवूडच नव्हे तर समाज देखिल किती पुढे आला आहे असे जाणवते. व्हिकी डोनरमधील सासूबरोबर हुसकीचा पॅग लगावणारी पार्लरवाली आई आठवते का? मां बदल रही है.

रोनित रॉयचा रोल ही अवघड नाही त्याच्यासाठी. कसोटी जिंदगी की मधला ऐटबाज मि. बजाज, ते उडान मधला बाप आणि हा विझलेला आर्मी ऑफिसर. शेवटी बाप आणि मुलगा एका इश्यू वर रिलेट होतात ते अगदी खरे वाट्ते.

चित्रपटाचा पहिला भाग अगदी रीतसर रोमान्स आहे. तो ही आय आय एम मधला. तो बघताना अनेकांना आपल्या कॉलेजातील मैत्रीणीची नक्की आठवण येईल. ग्रॅज्युएशन, आणि मग प्लेसमेंट त्यातले सर्प्राइज
प्रसंग बघताना आपण ह्या माइल स्टोनची एक पालक म्हणून किती आसुसून वाट बघत आहोत ते फार प्रकर्षाने जाणवले. पण मुले मोठी होत असताना कधीतरी एका क्षणापासून ती आपली गोष्ट न राहता त्यांची बनली आहे आणि आपण फक्त एक मेन कथेतले सपोर्टिंग पात्र बनलो आहोत ही जाणीव देखील होते.
काहीतरी सुटल्यासारखे पण वाट्ते आणि एक सल राहून जातो. ह्या कथेतली मुले चांगली वाढवली आहेत.
आपल्या लग्नात आईबाबा जास्त आनंदी असा वेत अशी इच्छा कर्णारी गोड मुलगी आहे आणि आई वर प्रेम करणारा पण सुवर्ण मध्य न गाठू शकल्याने थकून गेलेला एम बी ए मुलगा आहे.

अर्जून कपूर पण मला पहिल्या पासून आवडतो. सत्ते शौरी ह्या त्याच्या आजी चित्रपट फायनान्स करत असत. मोना कपूर ची पूर्ण कहाणी पण सॅव्ही मासिकात वाचली होती. लग्न मोडल्यावर त्यांनी परिस्थितीशी झु़ंज दिली. लाइम लाइट पासून दूर जगल्या व काही काळापूर्वी त्यांचे कॅन्सरने निधन झाले.
मुलाचे यश बघता आले नाही. ह्या सिनेमात त्याने अतिशय बारीकीने व्यक्तिरेखेच्या सर्व छटा रंगवल्या आहेत. त्याच्या वयाची बॅक पॅक लाउन कामाला येणारी मुले आता माझ्या बरोबर काम करतात. त्याने क्रिश चे पात्र अगदी बिलीव्हेबल, रिलेटेबल केले आहे. सासुरवाडीत फिट होताना त्याची होणारी धावपळ,
माझ्याशी लग्न करा असे म्हणणे हा सीन खूपच मजेशीर आहे. एकीकडे खोल गेलेल्या जखमेसारखे चिरत
गेलेले लग्न जपणारी आई, अब्युझिव वडिलांबद्दलची घृणा आणि दुसरीकडे अनन्याबद्दलचे हळुवार प्रेम, ब्रेकप नंतरचे दु:ख ह्यात दबले जाणारे स्वत्व त्याने व्यक्त केले आहे. रणबीर कपूरसारखा हा फ्लॅम बॉयंट नाही . रनवीर सिंग सारखा चिल्लर चिंधी?/ टू फिजिकल नाही वरूण धवन सारखा ऑल अ‍ॅब्ज नो ब्रेन्स नाही. सिध्दार्थ सारखा टू पंजाबी नाही. ह्याच्याकडून चांगल्या कामाच्या खूप अपेक्षा आहेत.

सिनेमा बघताना जाणवणार नाही कदाचित पण गाणी चांगली आहेत. भारतातली जीवन पद्धती किती बदलली आहे त्याची जाणीव क्वीन आणि हा सिनेमा बघताना पदोपदी होते. कलाकारांची नवी पीढी आली आहे आणि प्रेक्षकांची देखील. पण संपताना पुढील रांगेतल्या युवतीने कोणाला तरी एस एम एस केलेला वाचता आला जस्ट अ‍ॅज शी वॉज टायपिंग इट, फँटॅस्टिक मुव्ही.. आय क्राइड अँड आय लाफ्ड. ......... सो ट्रू डीअर ... सो ट्रू!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहलयं .. मी अर्धाच बघितलाय अजुन ..
अमृता , रेवती .. दोघी छान वाटल्या..

सध्या मला सौंदीन्डियन लोकांनी घेरलेले असल्यामुळे आलिया अजिबात तशी वाटत नाहीयं .. तिचे ड्रेसेस मस्त आहेत..

मद्रास मधील गुड शेपर्ड शाळेत शिकलेल्या मुलीचे इंग्रजी तुम्ही कधी ऐकले आहे का? एकदा ऐकले तर कधीच विसरणार नाही. पॉलिश्ड वेगळेच बोलतात त्यामुली. ( नैतर आम्ही ... सेंट विमली Happy )

मस्त लिहिलय मामी! सहज म्हणून वाचायला सुरवात केली ह्या सिनेमाबद्दल बरच ऐकलय त्यामुळे पण अगदी शेवट पर्यंत वाचतच गेलो नॉन स्टॉप. मस्त फ्लो जमलाय it almost feels like you just kept writing as you were thinking...
ओवरऑल पर्स्पेक्टिव आवडला लेखाचा. मस्त!
Happy

पे.थे. - मस्त लिहीले आहे. समोर बसून गप्पा माराव्यात तसे. सुरूवातीला हे चित्रपटाबद्दल आहे की आणखी कशाबद्दल असा प्रश्न पडला, पण ओळख लांबली असली तरी एकदम धमाल आहे. माँ बदल रही है वगैरे सगळे जबरी आवडले.

एक बॉलीवुड प्रेक्षक म्हणून माझ्या मागण्या फार नसतात. थोडे इंटेलिजंट मनोरंजन व्हावे , कथा संगीत चांगले असावे. इतकेच. >>> एकदम सहमत.

पण संपताना पुढील रांगेतल्या युवतीने कोणाला तरी एस एम एस केलेला वाचता आला जस्ट अ‍ॅज शी वॉज टायपिंग इट, फँटॅस्टिक मुव्ही.. आय क्राइड अँड आय लाफ्ड. ......... सो ट्रू डीअर ... सो ट्रू!
>>>>>>>

सहीच ... या एका वाक्याने चित्रपट बघावासा वाटतोय.. स्वतादेखील याच तरुणाईशी रिलेट करतो असे वाटत असल्याने..

बाकी परीक्षण कम लेख छानच लिहिलेय, अगदी उत्स्फुर्त भाषण व्हावे तसे जमले आहे Happy

आलिया आय आय एम मध्ये असते हे आधी कळले मग ती तमिळ असते हे कळले. क्रियेटीव्ह लिबर्टी मेहेरबान तो गधा पेहेलवान.

मामी
छान लिहिलय , टुस्टेट्स आणि आलीया आवडले !

एक बॉलीवुड प्रेक्षक म्हणून माझ्या मागण्या फार नसतात. थोडे इंटेलिजंट मनोरंजन व्हावे , कथा संगीत चांगले असावे. इतकेच. >>> +१

छान लिहीले आहे.
मला सिनेमा बरा वाटला.
अमृता,रोनित बेस्ट. मस्त केले आहे काम.
आलिया सुंदर दिसली आहे, कामपण चांगले केले आहे. वावर सुखावून जातो तिचा.
पण ती अज्जिबात तमिळ मुलगी वाटत नाही.
अर्जुन कपूर बोरिंग, आळशी, गब्बू वाटतो. जरा स्मार्ट दाखवला असता तर बरे झाले असते. पंजाबी मुंडा वाटत नाही तो.
एकदंर कथा चांगली असूनही मुख्य पात्रेच जरा कमी पडल्याने सिनेमा आवडला नाही.
एकदा बघण्यासारखा आहे.
सिनेमापेक्षा पुस्तक जास्त एंजॉय केले होते मी.

मस्त परिक्षण. पण मला पुस्तक जास्त आवडलं.
अजून सिनेमा छान होऊ शकला असता असे वाटले बघताना, कदाचीत थोडा वेळ वाढवता आला असता.
आलिया आणि अर्जून टू गूड. आलिया खूप गोड दिसली आहे. तिच्या जागी अजुन कोणाचा विचार करूच शकत नाही.
शेवटच्या लग्नाच्या सीन मधे कसली सुंदर दिसली आहे. Happy

सिनेमा अजून बघितला नाहीये. पण तुम्ही मस्त लिहिलंय मामी.

तुम्ही चित्रपटांबद्दल लिहित रहा हो (थोडं नियमितपणे) . छान लिहिता. मागे पण खूप सुरेख लिहिलं होतं तुम्ही.

पुस्तक वाचलं आहे, सिनेमा बघायची घाई नाहीये मुळीच.

पण अमा तुम्ही लिहिलंय एक्दम मस्त! Happy लिहित जा. अल्पना +१!

ऐंशी आणि नव्वद च्या दशकात महेश भट्टचे नाव कायमच कोणत्या तरी बाबतीत चर्चेत असायचे. आंतरजाल नसतानाही तो कायम हेडलाइन्स ग्रॅब करायचा. स्टारडस्ट, सोसायटी, मूव्ही, स्टार अँड स्टाइल "पापा ने कहा है कुछ भी करना लेकीन प्रेग्नंट मत रहना " हे वाक्य उच्चारुन पुजा भटने प्रसिध्दी मिळवली होती.

बाकी लक्षात राहील असे सिनेमे ना महेश भट ने बनवले ना पुजा भटची कारकिर्द कुठल्या सिनेमामुळे लक्षात राहिली.

डॅडी, सडक , फिर तेरी कहानी ...., तमन्ना, दिल है के मानता नही, हम है राही प्यार के, आशिकी....
महेश भट च्या सिनेमातील गाणी बहुतेक सगळीच हिट आहेत.

>>>>> चित्रपटात कोणी तिचा कपडेपट सांभाळला आहे त्याला हॅटस ऑफ. अति शय योग्य लुक दिला आहे आणि शॉर्ट्स, स्कर्ट्स, चुडीदार, साडी, लहेंगा सर्व प्रकारचे कपडे उत्तम डिझाइन करून दिले आहेत. <<<<<
+९९९००००००००

मला सर्वच कपडे प्रतेक स्टेजनुसार आवडले. कॉलेजात वेगळे, नोकरीच्या ठीकाणी. मद्रासी साड्या.

मूवी टाईमपास आहे. सतत वाद असलेल्या घरातला मुलगा म्हणून जमलीय अर्जुनला अ‍ॅक्टींग. मध्ये मध्ये तो थल्यासारखा दिसतो. मुळात जाड्या असलेल्या मुलाचे वजन अचानक कमी झाले की त्यांचा वावर कसा असतो तसे वाटते मध्ये मध्ये. पण बाकी ठिक आहे.

आल्या आता रुळलीय... ह्यात छान दिसतेय. ते हाय्वे पेक्षा बरीच बरी. मध्ये मध्ये बोलताना पूजा भट सारखी जरा उच्चार बोबडे वाटतात. पण बरीय.

पण पुस्तक मजा आहे ज्यास्त.

सिनेमा खूप काही ग्रेट वाटला नाही. तशी स्टोरीही टिपीकल आहे. जीव वेडावण्याएवढा नक्कीच नाही. तरी आवडला. रेवतीला स्पष्ट हिंदी बोलणारी तमिळीयन का केली आहे का माहीत.

अमृता,रोनित बेस्ट. मस्त केले आहे काम.
आलिया सुंदर दिसली आहे, कामपण चांगले केले आहे. वावर सुखावून जातो तिचा.
अर्जुन कपूर बोरिंग, आळशी, गब्बू वाटतो. जरा स्मार्ट दाखवला असता तर बरे झाले असते. पंजाबी मुंडा वाटत नाही तो.>>>> +१

Pages