झटपट रवा डोसा

Submitted by प्रमोद् ताम्बे on 7 April, 2014 - 20:20

झटपट रवा डोसा
 मसाला डोसा,चटणी,सांबार  xxx.jpg
साहित्य : एक वाटी बारीक रवा , एक वाटी तांदळाची पिठी , एक वाटी मैदा , एक वाटी आंबट दही,चवीपुरते मीठ व डोश्यासाठी तेल.
पूर्वतयारी : डोसे कराण्यासाठी ते करायला घेण्यापूर्वी काहीतकमी दोन तास आगोदर एका पातेल्यात वर दिलेले सर्व साहित्य म्हणजेच एक वाटी बारीक रवा , एक वाटी तांदळाची पिठी , एक वाटी मैदा , एक वाटी आंबट दही,चवीपुरते मीठ व पाणी घालून सरसरीत भिजवून ठेवावे लागते ,त्यात मोहन म्हणून दोन टेबलस्पून कडकडीत तेलसुद्धा घालावे व झाकून ठेवावे.
कृती : डोश्याकरता मिठाचे पाणी लावून तयार केलेल्या खास दोषयाच्या नॉन-स्टिक (निर्लेप) तव्यावर डावाने पातळ धिरड्याप्रमाणे डोसा घालावा व वरुन सर्व बाजूंनी पाव चमचा तेल सोडून हलकेच काढून कोथिंबीर व नारळाची हिरवी चटणी व सांबार बरोबर खायला द्यावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी फोटो तांबे काकांनी केलेल्या डोश्याचा आहे असे समजून प्रतिसाद दिला होता .
तांबे काका , हा तुम्ही स्वत: केलेल्या डोशाचा फोटो नाहीये का ?

ताम्बे काकानी बहुतेक खरवसावरची चर्चा वाचलेली दिसतीय, त्यामुळे ते फोटो बाबत स्पष्टीकरण द्यायला बिचकत असावेत.:अओ::फिदी:

Pages