झटपट रवा डोसा

Submitted by प्रमोद् ताम्बे on 7 April, 2014 - 20:20

झटपट रवा डोसा
 मसाला डोसा,चटणी,सांबार  xxx.jpg
साहित्य : एक वाटी बारीक रवा , एक वाटी तांदळाची पिठी , एक वाटी मैदा , एक वाटी आंबट दही,चवीपुरते मीठ व डोश्यासाठी तेल.
पूर्वतयारी : डोसे कराण्यासाठी ते करायला घेण्यापूर्वी काहीतकमी दोन तास आगोदर एका पातेल्यात वर दिलेले सर्व साहित्य म्हणजेच एक वाटी बारीक रवा , एक वाटी तांदळाची पिठी , एक वाटी मैदा , एक वाटी आंबट दही,चवीपुरते मीठ व पाणी घालून सरसरीत भिजवून ठेवावे लागते ,त्यात मोहन म्हणून दोन टेबलस्पून कडकडीत तेलसुद्धा घालावे व झाकून ठेवावे.
कृती : डोश्याकरता मिठाचे पाणी लावून तयार केलेल्या खास दोषयाच्या नॉन-स्टिक (निर्लेप) तव्यावर डावाने पातळ धिरड्याप्रमाणे डोसा घालावा व वरुन सर्व बाजूंनी पाव चमचा तेल सोडून हलकेच काढून कोथिंबीर व नारळाची हिरवी चटणी व सांबार बरोबर खायला द्यावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा. मस्त फोटो . अन्विता जाळी अगदी बारीक आहे बहुदा.
तांबे काका तुमचा प्रोफाईल वाचला. कित्ती गोष्टी करत असता तुम्ही. खुप कौतुक वाटल तुमचं.

Anvita , सीमा , मंजूडी , दिनेश, जाई, सृष्टी व रावी तुम्हा सर्वाना अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! असे अभिप्राय मिळाल्यावर माझा हुरूप खूपच वाढतो.

नाही कसे ? एरव्ही एक दिवस आगोदारपासून डाळ , तांदूळ भिजत घालावे लागतात. असे सकाळी चहाच्या वेळी ठरवले की आज डोसे करावेत तर नाही जमात नेहमीच्या पद्धतीत.

फोटो वेबसाईटवरुन घेतलेला आहे का?
इतर धाग्यांवर तुम्ही स्वतः रांधलेल्या पदार्थांचे फोटो बघितले. हाही तसाच असेल असं वाटून फोटोला प्रतिक्रिया दिली आहे !

फोटोवर यांचा वॉटरमाऱ आहे म्हणजे यांनीच काढला असावा फोटो Happy

मस्त यम्मी दिसतोय डोसा Happy
असे डोसे करुन कोणी खायला घातले तर 'मी' अगदी 'रोज' पण डोसा खाईन

पुढच्या वेळी पाककृती लिहीतांना आहारशास्त्र ग्रूपमधे जा व "नवीन पाककॄती" हा पर्याय निवडा त्याने ठराविक फॉर्मॅट मधे कृती लिहीली जाते व नीट वर्गिकरण होते.

मागे एक एक-दोन नव्या रेसिपी देतांना मी आहारशास्त्र ग्रूपमधे जाऊन व "नवीन पाककॄती" हा पर्याय निवडला होता पण तेथे पाककृतीचा फोटो टाकण्यासाठी " मजकूरात image किंवा link द्या " हा पर्यायच नाही त्यामुळेच नाइलाजाने " नवीन लेखनाचा धागा " घेतो.
तुम्हाकडे यावर काही उपाय असेल तर मला मार्गदर्शन कराल का ?

प्रमोद् ताम्बे,
<img src="तुमचा पिकासामधील फोटोचा पत्ता" width="60%" />
हे वापरा.
तुम्ही फोटो तुमचा आहे की नाही, रवा दोस्याचा आहे की नाही, ह्याची उत्तरं टाळली आहेत..म्हणजे काय समजावे? Proud

एका वाटीचा त्यांचा आहे. डोश्याचा 'रवा डोसा' नामक व्यक्तीचा आहे. दुसर्‍या वाटीचा कोणाचा आहे माहीत नाही Happy

फा Lol

फोटो बहुधा त्यांचाच (म्हणजे त्यांनीच काढलेला) असावा, पण डोसा (आणि ताटवाट्या, चटणी, सांबार इ. सरंजाम) हॉटेलचा असावा.

.

विनीता अजुन झटपट हवं असेल तर १ वाटी रव्याला १ चमचा मैदा किंवा १ चमचा तांदळाची पिठी असं मिश्रण ताकामधे १५ मिनीट भिजवुनही चान जाळीदार दोसे होतात Happy

हो गं अदिति, मी तसे डोसे करते नेहमी, पण झटपट हा शब्द वाचल्यावर इन्स्टन्ट असे येते ना डोक्यात, म्हणून म्हटले

फा Proud

Pages