पुण्यात फ्लॅटमध्ये गुंतवणुक फायदेशीर ठरेल का ?

Submitted by श्री on 5 April, 2014 - 10:00

पुण्यात फ्लॅटसचे रेट्स बर्‍यापैकी वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत पुण्यात ८०-९० लाखाला फ्लॅट घेऊन तो भाड्याने देणे गुंतवणुकीच्या दृष्टीने कितपत किफायतशीर ठरेल ?
आज फिक्स्ड डिपॉझिटला चांगला रेट आहे पण तो काही काळाने नक्कीच कमी होईल. अगदी ६ टक्के इंटरेस्ट रेटने पुढील १० वर्षांत होणारी फिक्स्ड डिपॉझीटवरील बचत ही फ्लॅटच्या १० वर्षांत वाढलेल्या किमंतीपेक्षा कमी असु शकते.
तुम्हाला काय वाटत ? पुण्यात फ्लॅटमध्ये गुंतवणुक फायदेशीर ठरेल का ? आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने कुठल्या एरियात फ्लॅट घेणं योग्य ठरेल ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री तुम्ही पाहिलेली स्कीमही बायपासच्या अतीशय जवळ आहे. त्या रोडला दिवस रात्र ( २४ तास) हेवी ट्राफिक असते. उत्तरोत्तर ते वाढतच जाणार आहे. त्यात बसेस व ट्रकचे प्रमाण सर्वात जास्त असते. त्यान्च्या ब्रेक्सचे व हॉर्नचे आवाज रात्रीच्या शान्त वेळी त्रासदायक ठरु शकतात.
"आख्या पुण्यात" अशी परिस्थिती नक्कीच नाही.
आणि समजा माझे म्हणणे पटत नसेल तर

" पैसे तुम्ही लावणार आहात, अनुभव घेऊन पहा! स्वानुभवा इतका चान्गला
गुरु नाही!"

श्री,

ट्रस्ट मी, पुण्यात आत्ता फ्लॅट घेऊ नका. कारणे:

१. रिअल इस्टेटचे भाव आत्ता जास्त आहेत पण ते अधिक वाढण्याची शक्यता कमी आहे. कमी होण्याची शक्यताही नसली तरीही आता त्या गुंतवणूकीवर फार काही मिळणार नाही. (माझी पत्नी कल्पतरू डेव्हलपर्समध्ये एक वरिष्ठ अधिकारी असून तिचा दररोज ह्या सर्व गोष्टींशी जवळून संबंध येत असल्याने ही माहिती मी देऊ शकत आहे).

२. पुण्यात भाडे समाधानकारक मिळत नाही.

३ एक फ्लॅट घेतला की त्याचे सतरा नखरे असतात जे पाळण्यात आपला वेळ जातो.

४. फ्लॅट, सोने, प्लॉट, शेअर्स आणि विमा ह्यापैकी सोने आणि विमा तूर्त सेफ वाटत आहे. प्लॉट सर्वाधिक घातक.

५. गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेणे हा विचार ठरलेलाच असला तर कोल्हापूरमध्ये घ्या. (पुणे कोल्हापूर २४२ किमी, चार तासांचा ड्राईव्ह, रस्ता चांगला, बर्‍यापैकी कनेक्टेड, हवा पाणी उत्तम आणि रिअल इस्टेटचे भाव वेगाने वाढणारे). (मी तेथे दोन फ्लॅट्स गुंतवणूक म्हणून घेतलेले आहेत व त्यातील एक आता विकेन).

एकुण, पुण्यात जर फ्लॅट घ्यायचा असेल तर तो फक्त स्वतः राहण्यासाठी घ्यावा, अन्यथा घेऊ नये.

मुंबईतील एक डील पाहण्यात आले आहे..

मुलुंड इथे निर्मल ऑलिंपिआ (मुलुंड - सिर्फ नाम ही काफी है Happy )
१ बी एच के - ६५ लाख (६०० स्क्वे फुट) - ७२ लाख(७०० स्क्वे फुट)
२ बी एच के - ८५ लाख (८५० स्क्वे फुट)

संपर्क - ०२२-३३५७८९३६
(हा रेट आता उरलेल्या ५४ फ्लॅट्स साठी आहे. रेट मला तरी अतिशय उत्तम वाटत आहे)

उरलेल्या ५४ फ्लॅट्स >>>>> kiti flats cha prakalp aahe?
te mahatwacha aahe
nahitar asayacha 60 flats cha
ani shillak 54....hahaha ...ugeech gammat bara ka....
dive ghya....

बेफी बर्यापैकी पटले. म्हणुन आता पुण्याचा विचार रद्द करतो. येथेच yamuna expressway near F1 track घेतो. रेट कमी आहेत. नाहीतरी आता इथली सवय झाली आहे. कायमचे इथेच रहावे आता.:-)

बेफि, mandard...............काहि डिटेल्स देता येतील का?

wait!!!
When Mr Modi becomes PM, inflation index is going to come down to 1% resulting in 50% reducion in all location flat prices. Cement/steel/raw material/labour everything will go down once NaMo comes to power.Dont do wrong investments .

बेफी चांगली माहिती दिलीत. सोन्यात पण काही अर्थ राहिला नाहीये.
arc मोदी आले तरी ५०% भाव कमी होणं अगदीच अशक्य वाटतयं.
मनस्मी, निर्मलचं पझेशन मिळायला ५+ वर्ष जाऊ द्यावी लागतील. >>> सायो / मनस्मी , ५+ वर्ष आपले पैसे गुंतुन राहतील की कामाच्या प्रोग्रेस प्रमाणे पैसे भरावे लागतील ?
Solpaur real estate baddal koni sangu shakel kay.. >>> दिपक सोलापुर रियल इस्टेट म्हणजे फुगा वाटतोय. फक्त एका पॉवर प्रोजेक्ट आणि एअरपोर्टच्या जीवावर रेट वाढलेत.

श्री, आम्ही तरी कामाच्या प्रगतीनुसार पैसे भरत होतो. पण जानेवारी २००८ ला बुक केलेला फ्लॅट हाती यायला जून, जुलै २०१३ उजाडावं लागलं.

सोलापुर रियल इस्टेट म्हणजे फुगा वाटतो

hmmm barober aahe...pan rate kami astil tar punyachya kimtiti 2 ghare / bunglow milel.

nanter 1 vikun fayada milavata yeil....

(sagale evhade fast aahe ki ghetale ki mahag vatae..nahin ghetale tar mahag honyachi bhiti)

अरे का नाही होणार किमती कमी ?
भ्रष्टचार आणि महागाइ कमी झाली की सर्वच किमती आपोआप उतरतात हा साधा अर्थशस्त्रीय सिध्तांत माहीत नाही वातत? आणि सगळ्या किमती उतरल्या की input cost कमी झाल्याने घरे पण स्वस्त होतात की.

जेम्स्जी मला तर वाटायचे buildersचा भ्रश्त अशा कोग्रेसला पाठिंबा आहे.

xrbia चा proj कसा वाट्तो? घेण्याचा विचार आहे. long term साठी.>>

हा प्रोजेक्ट लिज बेस वर आहे. ओनरशिप नाही.

असे कसे इतके विकास करणार आहे ते... मग भाव तर उतरणारच ना...

अमेरिकन डॉलर चे मुल्य प्रधानमंत्री बनताच खाली घसरण्यास सुरुवात होणार आहे... १ वर्षात १ $ बरोबर १ रुपया असेल...सगळ्या बाहेरच्या देशात राहणार्या नागरीकांनी आता पासुनच भारतात ६० रुपये च्या हिशोबाने पैसे पाठवायला सुरुवात करा .. एक वर्षानंतर $ ची काहीच किंमत राहणार नाही आहे Biggrin

मोदी चे सरकार आले तर ५ वर्षात भाव खाली येतिल. ५०% नाही आले तरी १०-१५% तरी नक्किच येतिल ( bank interest जमेत धरले तर ४०-५०% नुकसान असेल) वाजपेयी च्या काळात सुध्धा असेच झाले होते. (1999-2005)

मुळ कारण म्हणजे सध्या वित्तिय तुट सकल उतपन्नच्या (GDP) ५% टक्के आहे. चिदम्बरमजी काही खचर्‍ पुढिल वर्षी घालुन ४.५% दाखवतात, गुज्जु accounting method वापरुन Happy . GDP = $1700 billion, तुट = $८५ billion (5,00,000 कोटी). हे पैसे फिरुन फिरुन property & gold investment मध्ये येतात व जागेचे भाव वाढण्यास सुरवात होते. तसेच रुपयाची पत घसरल्यामुळे $ चा भाव वाढ्तो. NRI लोकाना घर स्वस्त वाटायला लागतात. & chain of price increase starts. ह्या घडीला ५०% पेक्षा जास्त जागा investment म्हणुन घेतल्या जातात.

मोदीचे सरकार आले तर वित्तिय तुट कमी राहिल ( वाजपेयी च्या काळत पण तुट कमी होती). बाजारात पैसे कमी राहतिल, रुपयाची पत वाढेल. NRI will have less Rs. ज्यामुळे जागा फक्त ज्याना गरज आहे तेच घेतिल. जसे २००४ साली होते.

However this is slow process & it will not happen immediately. In fact price will stay high for little time (6 month to year) due to sentiment.

>> ४. फ्लॅट, सोने, प्लॉट, शेअर्स आणि विमा ह्यापैकी सोने आणि विमा तूर्त सेफ वाटत आहे.

गुंतवणुकीसाठी विमा खरेदी करणे हा एक अतिशय चुकीचा निर्णय आहे. विमा हा फक्त "रिस्क कव्हर" करण्या साठीच वापरावा गुंतवणुकीसाठी नव्हे.

फेब्रुवरी २०१३ मध्ये मी चाकण येथे एक 1बीएचके फ्लॅट बूक केला.
हेतु - गूंतवणूक.
संपूर्ण कींमत साधारण रू. १४,५०,०००/-
सध्याचा रेट रू. १८,५०,०००/-
५४० स्क्वेर फूट.
ताबा फेब्रुवरी २०१५.
सध्या तेथील परिसरातील घरभाडे रू. ६,०००/-
लोन हफ्ता १०,५००/-

माझ्या मते पुण्यात मोठ्या फ्लॅट्स ची किंमत प्रचंड आहे आणि त्या अनुषंगाने येणारे घरभाडे याचा मेळ बसत नाही.

विक्रमजी, मी xrbia मध्ये फ्लॅट बूक करून रद्द केला. खूप रिसर्च केल्यावर काही तथ्य समोर आलीत.
डोंगराच्या मध्यावर बांधकाम आहे. अगदी डोंगर फोडून.
कारपेट एरिया खूप कमी आहे.
रूम साइज आणि लेआऊट एकदा चेक करा. डब्ल्यू/सी मधून बाल्कनी चा दरवाजा आहे. Sad Sad Sad
रेंट वर देणार तर बिल्डर पण तुमच्याबरोबर आहे स्पर्धेत. कारण टोटल 10000 फ्लॅट्स विकणे आहे. क्रॉसवॉल च बांधकाम मला तरी comfortable वाटलं नाही.

xrbia.JPG (37.59 KB)xrbia.JPG

ही लिंक पण चेक करा

http://ravikarandeekarsblog.blogspot.in/2012/08/XRBIA-Hinjewadi-Pune-Rev...

माझे भावोजी हिंजवडी आयटी पार्क फेस १ ला लागून असलेली परांजपे बिल्डरची 'ब्लू रिज' मध्ये इन्वेस्टमेंट म्हणून १ बीएचके ड्युप्लेक्स फ्लॅट घेण्याचा विचार करतायत. दर जरा जास्त आहे. ७५०० रु. स्क्वे. फुट. पण बर्याच मोठ्या आय टी कंपन्या ५-१० मिनिटे चालत जाण्याच्या अंतरावर आहेत. १६८ एकरची टाउनशिप आहे. तर हि इन्वेस्टमेंट करावी का?

सध्या थांबा... ये बजेट आनि पुढचे बजेट या मुळॅ भाव पडतील असे वाटते .. कारण पैसा सोडवायचा असल्याने मोदी .. रिअल इस्टेट चा फुगा आधी फोडणार

ये बजेट आनि पुढचे बजेट या मुळॅ भाव पडतील असे वाटते .. कारण पैसा सोडवायचा असल्याने मोदी .. रिअल इस्टेट चा फुगा आधी फोडणार >>>>>>> ह्या मागचे लॉजिक काही कळले नाही.
रियल इस्टेट चा फुगा फोडुन पैसा कसा सोडवायचा ( कुणाचा पैसा? )

Pages