अननसाचा मुरांबा हा काही तसा नवीन पदार्थ नाही पण मी जी रेसीपी शेअर करत आहे ती खूप झटपट आहे आणि पाक वैगेरे काही करायचा नसल्याने सक्सेस रेट १००%
From mayboli
अननस बाजारातुन सोलुन आणावा. हेच खरे वेळखाऊ आणि हायजिनिक कसोट्या पणाला लावणारे काम आहे. मी फार कसोशीने फळवाल्याचा हात सोललेल्या भागाला लागणार नाही हे बघते.
सहित्यः
१) अननसाच्या मध्यम आकाराच्या फोडी चार वाट्या( फोडी करताना अननसाचा मधला भाग आणि डोळे असल्यास काढावे)
२) साखर चार वाट्या.
३) लिंबाचा रस २ टे. स्पु.
वरील तिन्ही जिन्नस एका पातेल्यात एकत्र करुन मॅरिनेट करत साधारण तासभर ठेवावे. नंतर ते पातेले कुकरमध्ये प्रेशर लावून ठेवावे. नेहमी सारख्या तीन शिट्ट्या झाल्या की गॅस सिमवर दहा ते बारा मिनिट ठेवावा.
गॅस बंद करुन कुकर साधारण दोन तीन तासानी उघडावा. मस्त नैसर्गिक सोनेरी रंगाचा मुरांबा तयार. ( जर कुकर मधुन काढल्यावर साखर पूर्ण विरघळली नसल्यास मंद गॅसवर ठेवून साखर पूर्ण विरघळवावी. जास्त उकळू नये. घट्ट होईल. )
टीप: हा मुरंबा इतर काम करत असतानाच करावा कधी झाला ते कळत ही नाही.
फ्रीज मध्ये ठेवावा.
माहीत नाही. करून बघा आणि
माहीत नाही. करून बघा आणि आम्हाला पण सांगा.
http://www.misalpav.com/node/
http://www.misalpav.com/node/27932
हे नुकतेच वाचले आहे. दोन्ही एकत्र करुन बघायला हवे असे वाटते.
सोपा वाटतोय.. प्रयोग करायला
सोपा वाटतोय.. प्रयोग करायला पाहिजे..
मस्त झाला धन्यवाद
मस्त झाला धन्यवाद
नविन व सोप्पी क्रुती आहे.
नविन व सोप्पी क्रुती आहे. ईन्स्टंट एनर्जीसाठी कधितरी खाण्यासाठीच ठिक आहे!
धन्यवाद.
सातू , मस्त झालाय मुरांबा .
सातू , मस्त झालाय मुरांबा . फोडी अगदी मस्त मऊ झाल्या आहेत.
मी आजच अगदी आत्ताच केला
मी आजच अगदी आत्ताच केला अननसाचा मुराननस पण नेहेमीच्या पद्धतीने
ही रेसिपी जरा उशीरा वाचली.. पुढच्या वेळेस ह्या पद्धतीने करून बघेन.
हेमा ताई, हा काल केलेला, घरी
हेमा ताई, हा काल केलेला, घरी खुपच आवडला...
पा.क्रु. वाचल्यावर एका अननसाचा केला होता... तो जमला आणि सगळ्यांना आवडला देखिल
तेव्हा फोटो टाकायचा राहुन गेला... अत्ता चांगला कीलो भराचा केलाय....:)
भाऊ, बहिण सगळ्याना हवाय.... खुप खुप धन्यवाद....
रंग, चव सगळच छान... लिंबामुळे तो पाक सुधारसा सारखा लगतोय...
सायली, धन्यवाद मुरांबा
सायली, धन्यवाद मुरांबा आवडल्याबद्दल. फोटो मस्त आलाय.
हल्ली जे नीलम ( तोतापुरी) आंबे बाजारात येतायत ना त्या आंब्यांचा मोरांबा ही याच पद्धतीने उत्कृष्ट होतो. रंग, चव अप्रतिम. आंबे व्यवस्थित पिकलेले घ्यावेत. कच्चट नकोत आणि चांगली जाड साल काढून फोडी कराव्यात कारण साल राहीली तर तो भाग नीट मऊ होत नाही. मुंबईच्या पावसाळी दमट हवेत बाहेर टिकत नाही म्हणुन फ्रीज मध्ये ठेवावा.
हो तोतापुरी आंबे आणले आहेतच.
हो तोतापुरी आंबे आणले आहेतच. मी वेगळ्या पद्धतीने करते. पण आता ह्या वेळेला तुमच्या पद्धतीने करुन बघील...:) धन्यवाद.... दर श्रावण सोमवारी गोड करण होतच अस नाही त्यामुळे हा बरा पडतो..
Pages