फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 2 March, 2014 - 01:12

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर लोकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. फलज्योतिषावर आपले मत काय? हे अजमावण्याचा प्रयत्न हा नेहमीच असतो. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे.कारण तो चाचणीशी संबंधीत नाही. तो स्वतंत्र विषय आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्यासाठी हा धागा नाही. . या पुर्वी २००८ मधे प्रो.जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या मतिमंद व हुशार मुलांच्या बाबतची फलज्योतिषाची चाचणीचा अहवाल खालील दुव्यावर उपलब्ध आहेत
http://faljyotishachikitsa.blogspot.in/2008/10/blog-post_09.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहीत असलेल्या हजारो "अचूक" कुंडल्यामधला विदा (data) एकत्रित गोळा करून त्यावरून मशीन लर्निंग करून चाचणी करता येईल.>>>> अतुलजी म्हणजे नेमके काय? समजा हजारो कुंडल्यांचा डेटा विश्लेषण अगदी मशीन लर्निंग वगैरे पद्धतीने केले तर त्यात संबंधित व्यक्तिच्या भविष्यातील नि:संदिग्ध महत्वाच्या घटना सांगता येणे शक्य होईल का? याची चाचणी घेता येईल असे आपल्याला म्हणायचे आहे का? असल्यास कशा पद्धतीने आपल्याला अभिप्रेत आहे.

शांत माणूस तुमची चाचणी म्हणजे योगासनाची परिक्षेत शवासनाची परिक्षा घेताना भुकेल्या वाघाला सोडायचे. शव असेल तर हुंगुन पुढे जाईल व खाल्ल तर शवासनात नापास. Lol

अन्य एका धाग्यात लिहिलेला प्रतिसाद या धाग्याला सुद्धा लागू पडतोय म्हणून जसाच्या तसा डकवत आहे:

"व्यक्तीच्या जन्मावेळची सर्व ग्रहांची स्थिती ठराविक असेल तर त्या व्यक्ती बाबतची भाकिते ठराविक असतात" असे हे गृहीतक असू शकेल काय?

थेटपणे संबंधित नसलेल्या दोन गोष्टी योगायोगाने जुळत राहतात असे जर वारंवार आढळले, तेंव्हा कालांतराने, त्यातली एक गोष्ट घडली तर दुसरी सुद्धा घडली असे मानायला हरकत नसते. याला वैज्ञानिक परिभाषेत काहीतरी शब्दप्रयोग आहे पण आता आठवत नाही. पण भौतिकशास्त्राच्या सरांनी आम्हाला याचे एक छान उदाहरण दिले होते. समजा तुम्ही लेडीज होस्टेलला भेट द्यायला गेलात, तेंव्हा तिथे येरझाऱ्या घालणारा वॉचमन तुम्हाला नेमका गेटवर आलेला दिसेल. जेंव्हा जेंव्हा तुम्ही जाल तेंव्हा तो गेटवर दिसेल. याचा अर्थ तो नेहमीच गेटवर असतो असे नाही. तो तर अधूनमधून त्याला वाटेल तेंव्हा येरझाऱ्या घालत असतो. पण तुम्ही जेंव्हाकेंव्हा तुम्हाला वाटेल तेंव्हा जाता तेंव्हा योगायोगाने तो गेटपाशीच असतो. आता जेंव्हा तिसरी व्यक्ती (हॉस्टेलमधली मुलगी) खिडकीतून हे पाहते व सातत्याने तिच्या लक्षात हा योगायोग येतो, तेंव्हा काय होईल? पुढच्या वेळी जेंव्हा तुम्ही जाल तेंव्हा खिडकीतून तुमच्याकडे पाहून "वॉचमन आता गेटवर असेल" असा अंदाज ती बांधू शकते कि नाही? Lol

ग्रहांच्या स्थितीचे आणि तेंव्हा जन्माला आलेल्या व्यक्तीच्या स्वभावाचे/भविष्याचे समजा तसेच काही जुळत असेलही किंवा नसेलही. पण भविष्यवेत्ते "असे काही जुळत असते" या गृहितकावर विश्वास ठेवत असावेत असा माझा अंदाज आहे.

पण वैज्ञानिक पातळीवर हे तपासावे तरी कसे हा गहन प्रश्न. त्याचे उत्तर पूर्वी कदाचित देता आले नसते. पण आता कॉम्प्युटरच्या सहायाने आणि त्यातल्या त्यात आजकाल आलेल्या मशीन लर्निंगच्या मदतीने शोधता येऊ शकेल असे वाटते. लेखक डॉ. नागेश राजोपाध्ये सर हे पदार्थविज्ञान विषयात Ph.D. केली आहे व IT क्षेत्रात उच्च पदावर काम करून म्हणून निवृत्त झाले असे उल्लेख आहेत म्हणून हे इथे मांडायचे धाडस करतोय. मशीन लर्निंगसाठी मागच्या अनेकानेक वर्षातल्या व्यक्तींच्या अचूक जन्मतारखा, तेंव्हाची ग्रहस्थिती (तारीख/वेळेवरून ती काय संगणकाला सुद्धा काढता येईल), आणि त्या व्यक्तींचे गुणविशेष, त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना, कर्तृत्व इत्यादी माहिती मशीन लर्निंगला दिली तर ते त्यातून काही आडाखे निर्माण करते का हे पहायचे.

पण हे मांडायला जितके सोपे तितके पडताळणी करायला तितके सोपे नाही.
१. मशीन लर्निंगसाठी प्रचंड विदा (डेटा) लागतो. लाखो व्यक्तींच्या जन्मतारखा/वेळा आणि त्यांच्याबाबतची वर उल्लेख केलेली माहिती पुरवावी लागेल. ही सगळी माहिती अचूक आहे याची खात्री हवी.
२. ग्रहस्थितीच्या व्यतिरिक्त अजून कशाची स्थिती विचारात घेणे आवश्यक आहे का ते पहावे लागेल. उदाहरणार्थ चंद्र. चंद्र हा ग्रह नाही तरीही त्याचा विचार सध्या केला जातो. त्याचीही स्थिती विचारात घ्यायची तर बाकीच्या ग्रहांच्या चंद्रांची पण घ्यावी का? हे ठरवावे लागेल(*)
३. बरेचसे लघुग्रह आहेत. त्यांच्या स्थितीचे काय करावे हे सुद्धा ठरवावे लागेल(*)
४. ग्रहस्थिती ठरावीक म्हणजे अगदी नेमची तंतोतत तशीच हवी का? कि सध्या बारा घरांत विभागणी करतात तेवढ्या ढोबळमानाने चालेल? हे ठरवावे लागेल(*)
५. एखादी ग्रहस्थिती जशी आहे अगदी तशीच पुन्हा यायला किती कालावधी लागेल ते मोजून कमीतकमी तितक्या कालावाधीतल्या व्यक्तींचा विदा (डेटा) लागेल. (जाता जाता: ग्रहांची एकदा असलेली स्थिती अगदी जशीच्या पुन्हा निर्माण व्हायला बिलियन वर्षे लागतात असा उल्लेख एका लेखात आढळतो. पण ढोबळमानाने जशीच्या तशी यायला कदाचित कमी कालावधी लागेल. किती लागेल ते तो ढोबळेपणा कितपत आहे त्यावर अवलंबून)

(*) वरती जिथे जिथे "ठरवावे लागेल" असा उल्लेख आहे तिथे त्या 'ठरवण्याला' कशाचा आधार आहे हे सुद्धा महत्वाचे.

या सगळ्या गोष्टींचा विचार करता असे काही आडाखे जर असतीलच तर ते शोधून काढणे अशक्य नसले तरी फार फार फार कठीण आहे असे वाटते.

<< जेंव्हा तुम्ही जाल तेंव्हा खिडकीतून तुमच्याकडे पाहून "वॉचमन आता गेटवर असेल" असा अंदाज ती बांधू शकते कि नाही? Lol >>
वरील उदाहरण थोडे चुकीचे आहे. ज्योतिषांच्या मतानुसार, त्या मुलीला वॉचमन दिसला की त्याचा अर्थ तुम्ही येणार. मुळात या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
Correlation does not imply causation. आणि अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

>>Correlation does not imply causation. <<
आय्ला, ती फेमस ३० वर्षांपुर्वि केलेली बियर-अँड-डाय्परची केसस्टडी माहित नाहि तुम्हाला? अहो, अ‍ॅनलिटिक्सचं कामंच आहे हिडन पॅटर्न शोधणे, त्याचा संबंध जोडणे आणि त्यानुसार निर्णय घ्यायला मदत करणे. इट्स ए एफिंग $१००+ बिल्यन डॉलर इंडस्ट्री; ती काय थोतांडावर अवलंबुन आहे? असो.

हे वरचं कोट केलेलं वाक्य बर्‍याचदा ऐकलंय, माबोवर. म्हटलं एकदा खुलासा करुनंच टाकावा... Proud

<< पॅटर्न शोधणे, त्याचा संबंध जोडणे आणि त्यानुसार निर्णय >> ती जोडाजोड कशी आहे, याच्यावर बरेच काही अवलंबून असते. म्हणजे correlation आणि causation वर. असो, विषयांतर झाले.

<< इट्स ए एफिंग $१००+ बिल्यन डॉलर इंडस्ट्री >> ऑफ कोर्स, इट्स द ग्रेटेस्ट थिंग सिन्स स्लाइस्ड ब्रेड.

यात काही अर्थ नाही.
जन्मतःच कोण केव्हा बिअर पिऊ लागेल, किती बिअर पिऊ लागेल, कोणता ब्रँड पिईल,कितीवेळा पिईल, किती डायपर वापरेल, त्या व्यक्तीचा डायपर साईझ काय असेल हे सगळं ग्रहस्तिथीवरुन प्रेडिक्ट करता येणार आहे. त्यानुसार बिअर कंपन्या, डायपर कंपन्या आपले प्रोडक्शन प्लॅन करणार. फक्त डेटा कलेक्शन आणि मशीन लर्निंग तेवढं होऊ द्या.

एकदा एका ज्योतिषाने माझी पत्रिका पाहिली. माझा हातही पाहिला. माझ्याबद्दल, दैनंदिनीबद्दल, कामाबद्दल, सहकार्‍यांबद्दल अनेक प्रश्न विचारले. मग मला एक ट्रायल भविष्य सांगितले
" उद्या सायंकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान रस्त्यावर विरूद्ध दिशेने एक लाल रंगाचे वाहन तुला क्रॉस करून निघून जाईल"
आईशप्पत ! दुसर्‍या दिवशी घरी जात असताना लाल रंगाची अनेक वाहने क्रॉस करून गेली. त्यातले एक तर नक्कीच ज्योतिषाने सांगितलेले असणार. माझा त्यांच्यावर विश्वास बसला आहे. आता मला होणार्‍या त्रासाचे कारण जाणून घेऊन त्याप्रमाणे विधी केले की आयडी उडण्याचे बंद होईल.

Pages