left handed children - येणारे अव्हान आणि उपाय

Submitted by गोपिका on 20 February, 2014 - 13:27

आपल्या घरात,आप्तेष्टां मध्ये, आपण बर्याचदा लाहन मुले पाहतो जे डावरे असतात.अर्थातच त्याना खुप गोष्टिंना सामोरे जावे लागते.
१. आपला समाज.लगेच न विचारलेला फुकट्चा सल्ला,उजव्या हाताचि सवय करवा हान.त्यात मुलगि असेल तर विचारयलाच नको (माझा स्वानुभव).मि मात्र जिथल्या तिथे ठाम पणे सांगते, ति जशि आहे तशि आहे.अर्थात माझा नवरा नेहमिच माझि बाजु घेतो.
२.त्याना लिहिताना येणार्या समस्या.माझि मुलगि आता साडेतीन वर्षांचि आहे.जेव्हा आम्हि तिला लेखन शिकवु लागलो तेव्हा आम्हाला हि समस्या प्रकर्शाने जाणवलि.ति लिहिते पण वेडे वाकडे.बाकि सगळ्यात काहि कमि नाहि हो.

मग अर्थातच थोडि चिड चिड आणि तणाव पुर्ण वातावरण.जेव्हा इंटरनेट वर पाहिले तर असंख्य रेसल्ट्स मिळाले पण आपल्याला नेमक जे हव ते आपल्या माणसांकडुन्च मिळत.कारण अनुभवापेक्षा इंटरनेट वरचे रेजल्ट्स महान नहियेत हे लक्शात आले.
मुद्दामच हा धागा सुरु केला.आपण आपलि मते, अनुभव्,उपाय योजना, उपयुक्त असे माहितिंचे स्त्रोत,काय करु शकतो ह्या वर अवश्य चर्चा करुया.आपलि लेकर हुषार आहेतच फक्त त्यांचा कलेने (त्यांचा डावरेपणा) आपण घेतले पाहिजे हे येवढे मला अवश्य इंटर्नेट वर काहि लेख वाचल्यावर समजले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी लहान होतो त्यावेळी डाव्या हातात एक पेन्सिल, उजव्या हातात एक पेन्सिल,तोंडात एक पेन्सिल, डाव्या पायात एक पेन्सिल, उजव्या पायात एक पेन्सिल अश्या पाच पाच पेन्सिलीने एकाचवेळी लिहायचो.

खरं तर अजून एक सहावी पेन्सिलपण घ्यायचो मी पण मग ती घेतली की एकतर तोंडातल्या पेन्सिलीने लिहिता यायचं नायतर त्या सहाव्या पेन्सिलने तरी.

Pages