आपल्या घरात,आप्तेष्टां मध्ये, आपण बर्याचदा लाहन मुले पाहतो जे डावरे असतात.अर्थातच त्याना खुप गोष्टिंना सामोरे जावे लागते.
१. आपला समाज.लगेच न विचारलेला फुकट्चा सल्ला,उजव्या हाताचि सवय करवा हान.त्यात मुलगि असेल तर विचारयलाच नको (माझा स्वानुभव).मि मात्र जिथल्या तिथे ठाम पणे सांगते, ति जशि आहे तशि आहे.अर्थात माझा नवरा नेहमिच माझि बाजु घेतो.
२.त्याना लिहिताना येणार्या समस्या.माझि मुलगि आता साडेतीन वर्षांचि आहे.जेव्हा आम्हि तिला लेखन शिकवु लागलो तेव्हा आम्हाला हि समस्या प्रकर्शाने जाणवलि.ति लिहिते पण वेडे वाकडे.बाकि सगळ्यात काहि कमि नाहि हो.
मग अर्थातच थोडि चिड चिड आणि तणाव पुर्ण वातावरण.जेव्हा इंटरनेट वर पाहिले तर असंख्य रेसल्ट्स मिळाले पण आपल्याला नेमक जे हव ते आपल्या माणसांकडुन्च मिळत.कारण अनुभवापेक्षा इंटरनेट वरचे रेजल्ट्स महान नहियेत हे लक्शात आले.
मुद्दामच हा धागा सुरु केला.आपण आपलि मते, अनुभव्,उपाय योजना, उपयुक्त असे माहितिंचे स्त्रोत,काय करु शकतो ह्या वर अवश्य चर्चा करुया.आपलि लेकर हुषार आहेतच फक्त त्यांचा कलेने (त्यांचा डावरेपणा) आपण घेतले पाहिजे हे येवढे मला अवश्य इंटर्नेट वर काहि लेख वाचल्यावर समजले
माझी आई पण ओरडायची उजव्या
माझी आई पण ओरडायची उजव्या हातानी लिही / जेव. त्याचा एक फायदा झाला की मी दोन्ही हातानी लिहु शकतो.
मी पण डावरी आहे. लहानपणी आईचा
मी पण डावरी आहे. लहानपणी आईचा खुप मार खाल्ला आहे त्याबाबतीत. शिक्षिका पण मी डाव्या हाताने लिहायला घेतलं की हातावर फटकन मारायची. त्यामुळे मी लिहिते, जेवते उजव्या हाताने. मात्र घरातली कामं करतांना तर डावाच हात पुढे येतो. उजव्या हाताने जोर कमी लागतो.
माऊस, कात्री, पकडतांना फार प्रॉब्लेम यायचा. कार्यानुभवच्या वर्गात सर कात्रीने कागदांचे आकार कापतांना दाखवायचे तसं आपण करुन बघतांना गोंधळ उडायचा.
लग्नानंतर सासरच्या लोकांना विचित्र वाटायचं. बोलणी बसली नाहीत पण स्वयंपाक करतांना ते टक लावुन बघायचे, आधी... बघु डाव्या हाताने ही मीठ, तिखट बरोबर टाकते का नाही असं बघत.
सशा, म्हणजे थ्री इडियट्स मधला
सशा, म्हणजे थ्री इडियट्स मधला दोन्ही हातान्नी लिहीणारा प्रिन्सिपल प्रत्यक्षात असणे अगदीच "अशक्य" असेही नाही , नै का?
लहानपणी मी प्रयत्नपूर्वक
लहानपणी मी प्रयत्नपूर्वक डाव्या हातानेही लिहायचा प्रयत्न केला होता, फारसा जमला नाही, पण मोडकेतोडके लिहीता येते. आई म्हणायची की हाताला वळण देणे हा इच्छाशक्तिचा भाग आहे, हात हातासारखाच , दोन्ही सारखेच, एकच बाब दोन्ही हातान्नी करता आली पाहिजे.
डावरेपणा म्हणजे काय आव्हान
डावरेपणा म्हणजे काय आव्हान नाही आणि व्यंग तर मुळीच नाही...
आणि त्याचा फार बाऊ करण्याचीही काही गरज नाही....>>
माझ्या माहीतीतल्या डाव्र्या लोकांची अक्षरे सुरेख आहेत. त्यामुळे मला असे वाटते की सग्ळ्याच डावर्यांचे अक्षर सुबक अस्ते की काय. (जसे राजु नावाची माणसे बुटकी असतात व कानडी लोकांमधे रघु/मंजुनाथ हे नावच ठेवले जाते असा माझा समज आहे तसेच)
माझ्या मैत्रिणींना प्रचंड हेवा वाटायचा लेफ्ट हँडेड असणे म्हणजे>> मला पण वाटायचा. कसलं भारी असते.
बरेच डावरे आहेत की. आमच्या
बरेच डावरे आहेत की.
आमच्या घरी डावरे लोकांचा भरणा आहे.वडील डावरे (मुख्यत्वे) पन दोन्ही हातांनी लिहितात. आजोबा (बाबांचे बाबा)डावरे आणि मी हि डावरी( प्रेफरबली). पण आईच्या हट्टाने उजव्या हातने जेवते, लिहिते देखिल.
आणि हो, माझं अक्षरही सुंदर आहे; बरीच बक्षिसे मिळवलीत. (गर्वाने सांगतेय).
उजव्या हातासाठी बर्याच पाट्या आईने गिरवून घेतल्या. खरे तर आईला तिच्या माहेरची इतर नातेवाईक चिडवत... काय तुझी सासरची माणसं डावरीच आहेत सर्व बाबतीत( म्हणजे स्वभावाने... वगैरे असे टोमणे).
आमह्च्या घरातील डावर्यांची संख्या पाहता कोणालाहि गंमत वाटेल कारण सगळे डावरे उजव्या हाताने सुद्धा बरी कामं करतात.
मी धपाटे उजव्या हाताने सुद्धा मारते, पण डाव्याचा जोरात बसतो(इति मुलं).
कोण सांगतं की कर्सिव अक्षर डावर्यांना जमत नाही? काहीही. ..
डावर्यांना सगळं जमतं... फक्त सवय जरा ज्यास्त करावी लागते.
माझा मुलगा डावरा आहे, त्याचे
माझा मुलगा डावरा आहे, त्याचे हस्ताक्षर पूर्ण वर्गात सुरेख असल्याचे दरवर्षी शिक्षिका सांगतात; ऱोमन, देवनागरी दोन्ही. आमच्या घरांत त्याचा फेवरिट हँड आहे आणि आमचा फेवरिट हँड आहे. त्याच्या वर्गात ४०% तरी पट डावरा असल्याचे शिक्षिका सांगते. त्याच्याकडून अजून तरी बेंच फाईट इ. ऐकायला आलेले नाही. तो जेवण, लिखाण आणि सर्व गोष्टी त्याच्या प्राथमिक हाताने करतो. सुरुवातीला त्याचा मिरर इमेज काढायचा problem होता. मला सगळ्यात अडचण वाटली ती Hand faucet चा वापर. Hand faucets सहसा उजव्या हाताशी फिट केलेले असतात, त्यांची लांबी पण पुरेशी नसते, डाव्या हाताने वापरण्याइतकी. तेव्हा त्यानेपण जरा त्रास दिला. त्याच्या सख्ख्या (डावर्या) मावशीने आम्हांला झापले. तुम्ही त्याला डावरा-डावरा करून फार लाडावून ठेवलय. त्याला तंबी द्या एकतर त्रास काढून डाव्या हाताने फॉसेट वापर नाहीतर उजव्या हाताने जेवण कंपलसरी कर. ऐकत नसला तर बिनधास्त मार त्याला काही मानसिक आघात वै. होत नाहीये. ह्या मावशीला लहानपणी शिक्षा करून जेवण, लिखाण उजव्या हाताने कंपलसरी केले होते
अरे वा!! माझा डावरे लोक =
अरे वा!! माझा डावरे लोक = सुंदर अक्षर या निष्कर्षाला बरीच पुष्टी मिळते आहे.
शाळेत बाक अपुरे असायचे आणि मग
शाळेत बाक अपुरे असायचे आणि मग डावरा आला शेजारी की झालेच...हात धडकायचे मग भांडणे >> +१
सुरेख चित्रकला. 

माझी शाळा मैत्रीण डावरी ,बाकामुळे रोजच भांडण ठरलेल. पण तीच हस्ताक्षर म्हणजे मोती
म माझ्या मनात समज पक्का झाला कि आपण डावरे नाही त्यामुळे आपल हस्ताक्षर हि सुंदर नाही नि चित्रकला हि सुरेख नाहि
अरे माझा मुलगाही "डावरा" आहे.
अरे माझा मुलगाही "डावरा" आहे. आणि सगळी उजव्या हाताने करायची कामे तो डाव्या हाताने करतो ---- आणि डाव्या हातचे महत्वाचे काम उजव्या हाताने
जेव्हा आमच्या लक्षात आले की हा डावरा आहे आम्ही पहील्यांदा डावर्या लोकांना येणार्या problem विषयी जाणुन घेतले. शाळेतील सर्व शिक्षकांना वर्षाच्या सुरवातीलाच ह्या गोष्टीची कल्पना द्यायला लागलो. त्यामुळे बरेचसे प्रश्न लवकर सुटले.
सुरुवातीला त्याचा मिरर इमेज काढायचा problem होता तो ही शिक्षकांच्या मदतीने सोडवला. आजकाल सर्व शिक्षक हे सर्व प्रश्न सोडवण्यास समर्थ आहेत.
लेफ्ट हँडेड साठी बरेच प्रॉडक्ट ऑनलाईन उपलब्ध आहेत त्यातील काही आम्ही मागवली. (कात्री) त्यामुळेही फार मदत झाली.
सेनापती --- प्रसाद देताना / वाटताना ह्यालाही सर्वजण सुरवातीला टोकायचे --- पण पहिल्यांदा हा सभ्यपणे डावरा असल्याचे सांगायचा पण आता सरळ सांगतो की मी न .......... उजव्या हाताने धुतो, त्या हाताने कसा प्रसाद देऊ
आता सर्वच प्रश्न असे परस्पर सुटतात
तंतुवाद्य वाजवणे ह्या लोकांना सोपे जाते हे एकले आणि आता हा गिटार वाजवायला शिकतोय प्रगती चांगली दाखवतोय.
माझी मुलगी डावरी आहे. जेवते
माझी मुलगी डावरी आहे. जेवते उजव्या हाताने. पण लिखाण डाव्या हाताने. लिखाणाबाबतीत वर दिलेल्या समस्या तिलाही येतात, त्यामुळे कर्सिव अजुन तिला जमत नाही. पण त्याचा बाऊ आम्ही नाही करत.
बस्के अगदी अगदी! आय एम जेलस
बस्के अगदी अगदी!
आय एम जेलस ऑफ लेफ्टीज!
मलाही डावरं असणं आवडलं असतं
अरे कर्सिव्ह जमतं की. इतकं
अरे कर्सिव्ह जमतं की. इतकं काय अवघड नाही जात.. [पण मी कर्सिव्ह लिहायला शाळेत नाही शिकले, कधीतरी कॉलेजात लिहू लागले.. आजकाल मुलांना शाळेतच शिकवत असतील तर मग अवघड जात असेल कदाचित..]
अजुन एक रोजच्या दिवसाची मजा.
रेस्टॉरंटमध्ये चेक(बिल) दिल्यावर किंवा दुकानात खरेदी केल्यावर, कार्ड स्वाईप केल्यावर समोरचा माणूस कागद साईन करायला देतात ना, तो कायम उजव्या लोकांच्या दृश्टीने वळवलेला असतो. मी कायम कागद उजवीकडून डावीकडे वळवून घेते..
मी स्वतः डावखुरा आहे अन
मी स्वतः डावखुरा आहे अन त्याचे अनेक फायदेही अनुभवतो
You don't get quality leg spinners and left arm offspin is practically legspin . भारंभार वाईड अन लेग साईडला बॉल मिळतात ते वेगळे .
पहिला म्हणजे अगदी शाळेपासूनच आत्ता ऑफिसमध्येही केवळ डावखुरा फलंदाज्/गोलंदाज असल्यामुळे क्रिकेट टीम मधे आहे
कुठल्याही खेळात तुम्ही डावखुरे असणे हा सरप्राईज एलेमेंट असतो किमान पहिल्या वेळी तरी
मी पण १००% डावरी.. म्हणजे
मी पण १००% डावरी.. म्हणजे लिहिणे, जेवणे वगैरे पुर्ण डाव्या हाताने.. आणि हो अक्षर ही सुंदर आहे माझे
प्रोब्लेम येतो तो मुख्य म्हणजे कात्री आणि अजुन एक म्हणजे मी लहानपणी पेटी शिकायला जायचे तेव्हा भाता मारायला उजव्या हाताने त्रास व्हायचा.. पण तसे मेजर तोटे असे काही नाहीत..
माझा नवरा / मुलगा डावरा
माझा नवरा / मुलगा डावरा आहे.. पण लिहिने/ क्रिकेट.. डाव्या हाताने. जेवतो उजव्या हाताने...
आय एम जेलस ऑफ लेफ्टीज! << नका
आय एम जेलस ऑफ लेफ्टीज!
<<
नका हो. फार त्रास देतात लोक लेफ्ट वाल्यांना. ते लिंबू टिंबू तर सारखे घालून पाडून बोलतात. थोऽडा डावा विचार मांडला, की लगेच कम्युनिष्ट म्हणून मोकळे
(लेफ्टीस्ट) इ
.
.
<शिक्षिका पण मी डाव्या हाताने
<शिक्षिका पण मी डाव्या हाताने लिहायला घेतलं की हातावर फटकन मारायची. >
शिक्षकांनाही डावरेपणात काही चूक नाही हे कळू नये?
तुम्हा सगळ्यांचे प्रतिस्साद
तुम्हा सगळ्यांचे प्रतिस्साद वाचुन, मनाचि समजूत निघालि
इथे मला खात्रि होति,शंकांच निरसन होणार याचि.
शाळेत असताना माझ्या वर्गात
शाळेत असताना माझ्या वर्गात दोन डावखुर्या मुली होत्या
दोघींची चित्रकला सुरेख होती
हेवा वाटायचा तेव्हा
डावखुरी लोक कला विषयात फार पारंगत असतात अस एका ठिकाणी वाचलेल आठवत
आय एम अल्सो अ लेफ्टी.. अॅन्ड
आय एम अल्सो अ लेफ्टी.. अॅन्ड आय अम प्राऊड ऑफ ईट...


मला लग्नाआधी कधी तसा त्रास, दडपण, नव्हत वाटल पण लग्नानंतर डाव्या हाताने वाढु नको, जेवु नको असा आग्रह व्ह्यायला लागला थोडे दिवस मीही नवीन म्हणुन जमवुन घ्यायचा प्रयत्न केला. पण डाव्या हाताची सवय असल्याने जेवायला वेळ लागु लागला परिणामी लवकर जेवण्याच्या नादात अर्धवट पोट भरुन उठु लागले..
खुप चिड चिड होउ लागली. शेवटी न राहवुन डावरेपणा यावर ठाम राहिले. आता मी जेवते पण डाव्या हाताने, वाढते पण डाव्या हाताने.. चालत असेल घ्या नाहीतर स्वतः वाढुन घ्या.
आणि हो माझही अक्षर छान आहे बरं का
अक्षर छान बद्दल मात्र माझी
अक्षर छान बद्दल मात्र माझी १००% खात्री आहे. मी जितकी डावरी पाहिलीयेत सगळ्यांची अक्षर सुंदर आहेतच!
इब्लिसदा
मी जितकी डावरी पाहिलीयेत
मी जितकी डावरी पाहिलीयेत सगळ्यांची अक्षर सुंदर आहेतच!
>>>> बरं झालं तू अजून मला भेटलेली नाहियेस.
शेवटी न राहवुन डावरेपणा यावर
शेवटी न राहवुन डावरेपणा यावर ठाम राहिले>>>> हे आगदि पटल मला.जशि आहे तशि स्वीकाराना.काय त्यात एवढ.
मी डावरा होतो (काही बाबतीत
मी डावरा होतो (काही बाबतीत अजून ही आहे.) आईनं मारून उजव्या हातानं लिहायची सवय लावली. पण अजूनही पत्ते खेळताना, पैसे देताना आपसूक डावा हातच पुढं येतो.
माझा नवरा डावरा आहे. दोन्ही
माझा नवरा डावरा आहे. दोन्ही हातांचा वापर करतो. लिहिताना मात्र डावा हात.
माझी लेक पण बाबावरच गेलीय. लिहीणं, खाणं अजूनतरी दोन्ही हातांनी. ( वय-- पावणेतीन वर्षे ) पण प्राधान्य डाव्या हातालाच. तिचं लिखाण म्हणजे कागदावर रेघोट्या मारणेच. पण कधीतरी तिचा हात धरून काही गिरवायला शिकवताना माझाच गोंधळ होतो. माझा उजवा आणि तिचा डावा हात असलातरी किंवा दोघींचा डावा असलातरी...
त्यामुळे हे काम बाबावर सोपवायचं ठरलंय. पण नियमाला अपवाद म्हणून डावरा असला तरी त्याचं हस्ताक्षर सुंदर नाही.
चित्रकला छान आहे.
मी देखील डावरा आहे आणि माझ्या
मी देखील डावरा आहे आणि माझ्या आईने मी उजव्या हाताने जेवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. कित्येकवेळी ती डावा हात बांधून ठेवत असे>>>
आपण कुठल्या हाताने काय करतो हे मेंटल कंडिशनिंगचा भाग आहे असे मला वाटले होते. त्यामुळे डावर्यांचा डावा हात जरी आपसूक पुढे झाला तरी त्यांना उजव्या हाताने जेव म्हटले तर ते आरामात जमेल असे मला वाटले होते. पण हे इतके सोपे नाही असे वरील प्रतिसाद वाचून वाटतेय.
अरे वा, छान धागा
अरे वा, छान धागा
आमचे धाकटे कन्यारत्न डावरे आहे, वय 3.5
अजून तरी दोन्ही हातांनी जेवते,
पण लिखाण चित्र रंगवणे या साठी डावा हात पुढे येतो.
पण डाव्या हाताने चांगले रंगकाम करू शकते.
आम्ही ही कोणता हात वापरावा या बद्दल इनसिस्ट करत नाही,
मी डावरी आहे. चित्रकला आणि
.
Pages