left handed children - येणारे अव्हान आणि उपाय

Submitted by गोपिका on 20 February, 2014 - 13:27

आपल्या घरात,आप्तेष्टां मध्ये, आपण बर्याचदा लाहन मुले पाहतो जे डावरे असतात.अर्थातच त्याना खुप गोष्टिंना सामोरे जावे लागते.
१. आपला समाज.लगेच न विचारलेला फुकट्चा सल्ला,उजव्या हाताचि सवय करवा हान.त्यात मुलगि असेल तर विचारयलाच नको (माझा स्वानुभव).मि मात्र जिथल्या तिथे ठाम पणे सांगते, ति जशि आहे तशि आहे.अर्थात माझा नवरा नेहमिच माझि बाजु घेतो.
२.त्याना लिहिताना येणार्या समस्या.माझि मुलगि आता साडेतीन वर्षांचि आहे.जेव्हा आम्हि तिला लेखन शिकवु लागलो तेव्हा आम्हाला हि समस्या प्रकर्शाने जाणवलि.ति लिहिते पण वेडे वाकडे.बाकि सगळ्यात काहि कमि नाहि हो.

मग अर्थातच थोडि चिड चिड आणि तणाव पुर्ण वातावरण.जेव्हा इंटरनेट वर पाहिले तर असंख्य रेसल्ट्स मिळाले पण आपल्याला नेमक जे हव ते आपल्या माणसांकडुन्च मिळत.कारण अनुभवापेक्षा इंटरनेट वरचे रेजल्ट्स महान नहियेत हे लक्शात आले.
मुद्दामच हा धागा सुरु केला.आपण आपलि मते, अनुभव्,उपाय योजना, उपयुक्त असे माहितिंचे स्त्रोत,काय करु शकतो ह्या वर अवश्य चर्चा करुया.आपलि लेकर हुषार आहेतच फक्त त्यांचा कलेने (त्यांचा डावरेपणा) आपण घेतले पाहिजे हे येवढे मला अवश्य इंटर्नेट वर काहि लेख वाचल्यावर समजले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी देखील डावरा आहे आणि माझ्या आईने मी उजव्या हाताने जेवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. कित्येकवेळी ती डावा हात बांधून ठेवत असे. पण त्याने मला काही मानसिक ताण किंवा कसले दुष्परिणाम झालेले आठवत नाहीत. उलट डावरी मुले जेवताना शाळेत जे चिडवणे चालते त्याने जो ताण येतो तो खूप जास्त असतो असे मला वाटते. मला आत्ता बरे वाटते की मी बरीचशी कामे उजव्या किंवा डाव्या दोन्ही हातांनी व्यवस्थितरित्या करू शकतो.
त्यामुळे फार थिरॉटीकल जाऊ नका, काही वेळेस प्रॅक्टिकल उपाय हे अपाय करत नाहीत.

maajhee lek Daavaree aahe. lahaanapaNee tilaahee ujavyaa haataane sagaLe karaayachee savay laavaNyaache prayatn jhaalech. paN aataa tee donhee haataane lihu shakate. jevatehee.

ulaT tichyaa DaavarepaNaache malaa kaahi faayadech disataat.
maajhyaa Daavyaa haataane tichaa ujavaa haat pakaDun aamhee
firaayalaa jaato tyaaveLee doghaanchaa naisargik kaaryaxam haat mokaLaach raahato. tyaa haataane aamhaalaa ice cream vagaire khaataa ye =te.

एवढं बिग डील आहे का डावरं असणं? जर मुलांचा नैसर्गिक कलच डावरं असण्याकडे असेल तर त्यांना आव्हान वाटत नसावं कारण जसं उजव्या हाताने लिहिणं तसंच डाव्या हाताने. आपण डाव्या हाताने जेवत नाही (कारण काही असेल) म्हणून फक्त तेवढं एक सांगावं लागत असेल. बाकी लोकं काय काही वेगळं केल्यावर बोलतातच तेव्हा त्यांना फाट्यावर मारावं.

सायो - हे मोठ्यांसाठी नाही होत बिग डील...पण शाळेत तिसरी चौथीमधल्या मुलांना तुम्ही काय डोंबल समजावणार हे किती नैसर्गिक आहे ते. आणि आपल्या मुलांना एकवेळ समजावाल..पण शाळेत आणखी ५० मुले असतात. किती जणांना आणि कसे समजावणार. आणि मी बाकीच्या मुलांना पाहिले आहे. खुद्द माझा सख्खा चुलतभाऊ पण डावरा आहे आणि त्याला शाळेत डाव्या हातानी जेवल्यामुळे मुले किती चिडवायची हे अनुभवले आहे.
आणि त्या वयात आपण सगळ्या गोष्टी फाट्यावर नाही मारू शकत. एखाद्याने मारल्या असतीलही पण सगळ्यांनाच ते जमते असे नाही.

जेवण्याचे एक झालेच...लिहीतानापण...शाळेत बाक अपुरे असायचे आणि मग डावरा आला शेजारी की झालेच...हात धडकायचे मग भांडणे....

>>जेवण्याचे एक झालेच...लिहीतानापण...शाळेत बाक अपुरे असायचे आणि मग डावरा आला शेजारी की झालेच...हात धडकायचे मग भांडणे....>> हा प्रॉब्लेम लक्षात आला नाही.

एकूणच डावरेपणा, आव्हानं वगैरे वाचून डावरं असणं म्हणजे काही व्यंग असल्यासारखं ट्रिट केलं जातंय असं वाटलं.

ति लिहिते पण वेडे वाकडे.बाकि सगळ्यात काहि कमि नाहि हो.>> डावरं असण्याचा आणि वेडंवाकडं लिहिण्याचा काही संबध असावा असं मला तरी वाटत नाही. अवघे साडेतीन वर्ष वय तिचे. हि मुळात समस्याच नाही आणि त्यामुळे ती प्रकर्षाने जाणवू देवूच नका.

माझा भाऊ पण डावरा आहे पण त्याने वर्गात त्याचा कधी त्रास होतो हे सांगितल्याचे आठवत नाही. तो जेवतो उजव्या हाताने पण लिहिने तसेच बरीच इतर कामे तो डाव्या हातानेच करतो. त्याचे हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे.

एकूणच डावरेपणा, आव्हानं वगैरे वाचून डावरं असणं म्हणजे काही व्यंग असल्यासारखं ट्रिट केलं जातंय असं वाटलं.>> +१

ते आहे...डावरेपणा म्हणजे काय आव्हान नाही आणि व्यंग तर मुळीच नाही...
आणि त्याचा फार बाऊ करण्याचीही काही गरज नाही....
सगळे जग उजव्यांसाठी बनलेले असते पण डावरे छानपैकी त्याला अॅडजस्ट होतात...
काही गोष्टी मात्र त्रासदायक होतात आणि त्या बदलण्याची खरेच गरज आहे...
कात्री, शर्टाची बटणे, हूक्स
आता इतक्या वर्षांच्या सवयीने ते जमून जाते पण लहान मुलांना सुरुवातीला ते खरेच खूप जड जाते.
अजून एक मह्तवाचे - प्रसाद, पैसे आदी देताना तुमच्या मुलांनी डावा हात पुढे केला तर त्याला मारू नका, ओरडू नका...

आशूचँप ते बाकावरचे लिहीणे एकदम पर्फेक्ट! मीही डावरीच आहे.
शाळेत तरी बरे, ते आडवे बाक असायचे. कॉलेजमध्ये चेअर असायची रायटींग बोर्ड असलेली. तो बोर्ड कायम उजव्या हाताला. Sad भयंकर वैताग यायचा. अजिबात लिहीणे जमत नाही अशा परिस्थितीत.

रोजच्या जीवनात थोडेफार वेगळेपण जाणवते, पण इतकं काही बिग डील नाहीये. माझ्या लहानपणी बाकीच्या लोकांनी जरा टोकले असेल पण आईबाबा व शाळेतील शिक्षिका एकदम ठाम होत्या. जो कल आहे तोच मेंटेन करावा नाहीतर काही अर्थ नाही. पण आत्ताच्या इतक्या सुधारलेल्या जमान्यात मुलं हसतात व उजव्या हाताचा अजुनही आग्रह केला जातो हे वाचून आश्चर्य वाटले. (मला उलटाच अनुभव आहे. माझ्या मैत्रिणींना प्रचंड हेवा वाटायचा लेफ्ट हँडेड असणे म्हणजे. Happy )

गोपिका, उपाययोजना कशावर करायच्या? जे आहे ते आहे. हा धागा काढून तुम्हाला मनोरंजक किस्से लिहायचे असतील तर मी लिहीन. मला स्क्रू फिरवताना भयंकर गोंधळ होतो डाअवीकडे उजवीकडेचा. इत्यादी. पण उपाययोजना, चर्चा, सल्ले? nope..

तो जेवतो उजव्या हाताने पण लिहिने तसेच बरीच इतर कामे तो डाव्या हातानेच करतो. त्याचे हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे. + १
सेम हिअर

पण होते काय ते सांगतो...आपण उजवीकडून डावीकडे असे लिहीत जातो. आणि जसेजसे वहीत वाक्य डावीकडे सरकत जाते तसे तसे डावऱ्यांना हात अंगाशी चिकटून घेत लिहावे लागते. अंगाला लगत हात ठेऊन बाहेर बाहेर जात लिहीणे जेवढे सोपे आहे तितकेच हे उलटे प्रकरण अवघड आहे...
प्रयत्न करून पहा उजव्या हाताने उलटे (उर्दू पद्धतीने) लिहण्याचा म्हणजे मी काय म्हणतोय ते लक्षात येईल...त्यामुळे सुरुवातीला हस्ताक्षरावर जास्त मेहनत घ्यावी लागते

नलिनी - मीही कधीही शाळेत असताना घरच्यांकडे तक्रार केली नाही. आजतागायत केलेली नाही. याचा अर्थ मला त्रास झालाच नाही असे नव्हे.

आशूचँप , बस्के ..... किती छोट्या छोट्या गोष्टी त्रासदायक असतात सुरवातीला तुमच्या साठी. मला कधीच लक्शात नाही आले.
मला स्क्रू फिरवताना भयंकर गोंधळ होतो डाअवीकडे उजवीकडेचा. इत्यादी. >>> बस्के Happy
माझी चुलत बहिण आहे डावरी पण घरात कधी कोणी इश्यु नाही केला .

मी डावखूरा आहे. माझे वडिल आणि काका देखील डावखूरे. कुठे फारशी अडचण जाणवली नाही.

लहानपणी सत्यनारायण पु़जेला प्रसाद वाढायला बसलो की काही लोक उजव्या हाताने तीर्थ-प्रसाद दे असे सांगायची. मी म्हणायचो, उजव्या हाताने जमत नाही. अंगावर पडले तर कपडे खराब होतील. देउ का? Lol

डावर्‍या लोकांना कर्सिव्ह लिहिताना फार कष्ट पडतात असा माझा अनूभव आहे. कर्सिव्ह करिता हाताची जी स्थिती आणि लय लागते ती जमत नाही. उर्दु/फार्सी/अबरी कर्सिव्ह उत्तम जमू शकेल असे वाटते. Wink

आपण उजवीकडून डावीकडे असे लिहीत जातो. आणि जसेजसे वहीत वाक्य डावीकडे सरकत जाते तसे तसे डावऱ्यांना हात अंगाशी चिकटून घेत लिहावे लागते. अंगाला लगत हात ठेऊन बाहेर बाहेर जात लिहीणे जेवढे सोपे आहे तितकेच हे उलटे प्रकरण अवघड आहे...>>> +१

त्यामुळेच माझी वही कायम प्रचंड तिरकी असायची. लोकं त्यालाही हसायची. Happy
अमेरिकेत डावर्‍या लोकांची वेगळीच तर्हा! मनगटातून हात पूर्ण आतल्यासाईडला वळावून लिहीतात ही लोकं! फार विचित्र. त्यामुळेचकी काय त्यांची अक्षरंही अगदीच काहीतरी येतात. मला सगळीकडे काँप्लिमेंट्स मिळतात अक्षराच्या. Proud

प्रसाद मी उजव्या हातात घेऊ शकायचे. त्यामुळे ते एक (लोकांच्या दृष्टीने) बरे झाले. पण मला अजुनही उजव्या हाताला काही ग्रिप नाहीये, त्यामुळे स्वयपाक करताना डाव, उलथणी डाव्याच हातात असतात, रांगोळी काढताना डावाच हात पुढे येतो(त्यामुळे मी रांगोळी काढतच नाही!) Happy मात्र, कोणाला फटका मारायचा असल्यास उजवा हात पुढे येतो. Happy

डावरं असणं काही अपराध नाहीये.
इकडे डावर्या मुलांसाठी / लोकांसाठी पेन्सिल्स, कात्र्या, स्केल्स एव्हढंच नाही तर गिटार सुद्धा वेगळं मिळतं.

मि काहि हे व्यंग्य अहे नाहि म्हणत.आणि जगात खुप जण डावरे आहेत ह्याहि कल्पना हि आहे मला.आणि सर्व सामन्य जीवन जगता येते हि.

माझि मुलगि सुद्धा बर्याच गोष्टि दोन्हि हाताने करते.लिहिणे सुद्धा.पण जेव्हा डाव्या हाताने लिहिते तेव्हा तिला होणारि जि अडचण मला जाणवलि त्या बद्दल मि म्हणत आहे.बरेच जण ह्या अवस्थेतुन गेले असतिल अणि बरेच जणा>चि मुले आता लेफ्टि असतिल,आहेत.तर कस निभावल जात हे जाणुन घेण्याचि उत्सुकता आहे.
नेट वर लाखो रेसल्ट्स आले त्यातलि एक लिंक इथे टाकते.कदाचित माझा हेतु लक्शात येइल.

http://handedness.org/action/leftwrite.html

दिनेश्दा -- जो फायदा तुम्हाला होतो अहे,आम्हि हि त्या फायद्यात आहोत.सो तुम्हाला सेम पिन्च

गोपिका, ती लिंक चांगली आहे. मी जे अमेरिकन्स विचित्र लिहीतात म्हटले तेच चित्र आहे तिथे."Hooked" writing.. आणि माझी वही तिरकी असायची जे म्हटले आहे तेच तिकडे म्हणतायत. Happy

मलाही लहानपणी होमवर्क राहीला असेल तर जेवता जेवता लिहीता यायचे. Proud

गोपिका मला सहज एक किस्सा आठवला, माझ्या शाळेत एक मुलगी होती, तिला डाव्या आणि उजव्या हाताने लिहीता यायचे (दोन्ही हाताचे अक्षर पण सारखेच होते) तिचा खुप हेवा वाटायचा वर्गात सगळ्यांनाच, कारण पेपरच्या वेळेस किंवा बरच काही लिहुन घ्यायच असेल तर ती एक हात भरुन आला की दुसर्‍या हाताने लिहायची. Happy

मलाही लहानपणी होमवर्क राहीला असेल तर जेवता जेवता लिहीता यायचे. फिदीफिदी >> हे भारिये.
माझि मुलगि ते करु शकेल असे वाटते.फक्त डाव्या हातानि लिहिताना काय गोष्टी ध्यानात घेतल्या पहिजेत का इतकेच

आता ह्या सोई आहेत.आपल्याला बराच स्चोपे आहे ह्या बद्दल जाणुन घेण्यासाठि,आपल्या मुलाना जास्त उपयोगि होइल म्हणुन हा धागा उघडला.
बाकि बाऊ करण्याचा माझा कोणताच हेतु नाहिये.

एखाद्या मुलाने/मुलीने डावरे असणे ही एक नैसर्गिक घडण आहे जिचा त्या व्यक्तीच्या पुढच्या कर्तबगारीशी कसलाही संबंध नाही...तो उजव्याइतकाच समर्थ असतो. उजव्यांची संख्या जास्त म्हणून कदाचित सुरुवातीच्या काळात डाव्या हाताच्या मुलामुलीकडे वेगळे म्हणून पाहिले जात असेल, पण जसजसे वय वाढत जाईल तसतसा तो वेगळेपणाचा प्रकार नाहीसा होतो.

माझ्या मुलाच्या लग्नाच्यावेळी जी मुलगी पाहिली ती पाहताक्षणीच पसंत पडली होती....त्यानाही मुलगा आवडला होता....आणि मग पुढील बोलणी रितसर सुरू झाली. मुलीने कांदापोहे देताना मला दिसले की ती डाव्या हाताने आम्हाला प्लेट देत आहे....ती तिच्या डावरेपणाची खूण होती. पण त्याचे मला वा आमच्याकडील कुणालाच काही वाटले नाही....सारे काही हसतखेळत पार पडले. लग्न होऊन ती घरी आली....मुलाचा संसार सुरू झाला. जेवण करताना ना आमच्याकडील स्त्रियांना वेगळे वाटले ना तिला अवघडल्यासारखे....कुणीही तिच्या डावरेपणाकडे लक्ष दिले नाही. आज तिचे कर्तृत्व पाहिले तर मी मुलाकडील असूनही म्हणू शकतो की ती त्याच्यापेक्षाही गुणात कांकणभर सरस आहे.

एका सुंदर मुलीची ती आता आई झाली आहे. ही मुलगी डावी होवो वा उजवी....आम्हाला काही फरक पडणार नाही.

अवांतर: डावखुर्यांना इतर बाबतीत डावला, पण लेफ्टी बॅट्समनच्या स्क्वेर कट मध्ये जो एलिगंस आहे तो वादातीत! Happy

जेवण्याचे एक झालेच...लिहीतानापण...शाळेत बाक अपुरे असायचे आणि मग डावरा आला शेजारी की झालेच...हात धडकायचे मग भांडणे....>> हा प्रॉब्लेम लक्षात आला नाही.

>>>> डावरं मूल बेंचच्या डाव्या बाजूला आणि उजवं मूल उजव्या बाजूला बसवल्यास प्रॉब्लेम येणार नाही.

मी लहान असताना कुठुनतरी ( बहुतेक अमेरीकेतून असणार) एक कातर आमच्या घरी आली होती. ती काही केल्या आम्हाला वापरता येईना कारण नविन असूनही तिच्यानं काही कापलंच जात नसे. मग नंतर शोध लागला की ती डाव्या हाताची कातर होती. मग आम्ही आंगठ्याच्या जागेत दोन बोटं कशीबशी खुपसून आणि आंगठ्याला पटांगणाएवढ्या जागेत खेळायला मोकळं सोडून ती वापरायला सुरुवात केली.

डावर्‍या लोकांना किती छोट्या छोट्या बाबतीत त्रास होत असेल हे त्यावेळी प्रकर्षानं जाणवलेलं आठवतंय.

त्या वयात आपण सगळ्या गोष्टी फाट्यावर नाही मारू शकत. एखाद्याने मारल्या असतीलही पण सगळ्यांनाच ते जमते असे नाही. <<<<<<< +१

गोपिका मला सहज एक किस्सा आठवला, माझ्या शाळेत एक मुलगी होती, तिला डाव्या आणि उजव्या हाताने लिहीता यायचे (दोन्ही हाताचे अक्षर पण सारखेच होते) तिचा खुप हेवा वाटायचा वर्गात सगळ्यांनाच, कारण पेपरच्या वेळेस किंवा बरच काही लिहुन घ्यायच असेल तर ती एक हात भरुन आला की दुसर्‍या हाताने लिहायची. स्मित >>>>> मि ही ऐकलय अशा लोकांबद्दल

अशोक मामा - तुम्हि लिहिलेल वाचुन छान वाटले हो.

डावर्‍या लोकांना वापरायला त्रास होतो अशी अजुन एक गोष्टं. - कॅमेरा.
शटर बटन आणि ग्रीप उजवीकडे असते.वादातीत! स्मित>>> आगदि आगदि.....खरच कि

मुद्दा हा आहे आणि अशोक मामा म्हणतात त्या प्रमाणे,गोष्टि तयार करताना डावखुर्यांद्दल नाहि विचार केला जात(काहि अपवाद वगळता).भाषांचि लिपि तयार होत असताना हि तेच झाले आहे.आता त्यातुन मार्ग काय,हे पाहणे.पुन्हा एकदा सांगु इच्छिते कि डावरेपणाला मि काहि व्यन्ग्य म्हणत नाहि,माझा द्रुष्टिने तो इश्शु हि नाहि आणि बाऊ करण्याचा हेतु हि नाहि,

वरचे काहि किस्से वाचुन मला थोडेसे बरेच वाटले.एक प्रकारचा 'पॉसिटिव्ह अप्प्रोच' मिळल्यासारख वाटत.

माझी मामी आणि तिचा भाऊ हे दोघेही डावखुरे पण लेखन मात्र ते दोन्ही हातांनी व्यवस्थीत करतात. शाळेत वह्या भरवताना बाकीची मुले लिहून दमायची पण हे दोघे एक हात दुखायला लागला की दुसर्‍या हाताने लिखाण चालू करायचे हा फार मोठा फायदा वाटतो मला.

माझा एक भाचा डावरा आहे, डाव्या हातानेच जेवतो वगैरे.
माझा एक मेव्हणा डावरा आहे, मात्र त्याने प्रयत्नपूर्वक "दोन्ही" हात वापरण्याचे कौशल्य आत्मसात केले. तबला/पेटी डाव्या-उजव्या हाताने वाजवू शकतो, हार्मोनियम मधे "मास्टर" आहे. जेवतो / लिहीतो मात्र उजव्या हातानेच, तरीही तो डावराच आहे.
पहिल्या पोस्ट मधे आशुच्याम्प म्हणतात तसे शाळकरि जीवनातील चिडवणेवगिअरे भोग मात्र ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार असतात, अन ते वाईट असतात.
आईबापान्नीच ठाम रहावे लागते.

माझे वडील डावखुरे आहेत. लहान्पणी त्यांनी उजव्या हाताने लिहावं आणि जेवावं म्हणून त्यांचा डावा हात बांधून ठेवायचे. त्यामुळे ते उजव्या हाताने जेवतात. लिहिणं मात्र डाव्या हातानेच.

एक मैत्रीण डावखुरी होती. ती बेंचवर बाजूला बसली की आमची कोपर ढोसाढोसी चालू!!!
तिचं दहावीपर्यंतच शिक्षण उर्दू माध्यमातून झालेलं होतं. अकरावीला वर्गात नोट्स घेताना तिला लिहायला जमायचे नाही. मग ती उर्दू स्क्रीप्ट वापरून इंग्लिश लिहायची. ते मात्र भराभरा लिहायची. नंतर बारावी चालू होण्याआधी तिने इंग्रजी लिहायची सवय म्हणून दोन तीन सिडने शेल्डनच्या कादंबर्‍या (माझ्याच घरून घेऊन गेली होती) हाती लिहून काढल्या होत्या. तिला बारावी सायन्सला ८९ टक्के वगैरे पडले आणि ती मेडीकलला गेली. मागे एकदा तिने लिहिलेलं प्रीस्क्रीप्शन वाचलं होतं. अगदी मोत्यासारखं टपोरं वगैरे इंग्रजी अक्षर!!!!

मी होते डावरी. म्हणजे डावा हात जास्त चालायचा, पण तर कधी डाव्या हाताने, कधी उजव्या हाताने असं करायचे. पण मग शाळेत प्रचंड गोंधळ व्हायचा सुरुवातीला. डाव्या हाताने 'b' लिहायला शिकलं, की उजव्याने लिहितांना हमखास 'd' लिहायचे. शाळेत, घरी बोलणी ऐकून डाव्या हाताने लिहायचं थांबलं. अजूनही मी शिवणं, कात्री वापरणं अश्या गोष्टी डाव्या हातानेच करते, बर्‍याच वेळा कधी डावा, कधी उजवा हात वापरते (उदा. खेळतांना). पण लिहिणं आणि खाणं डाव्याने आता सहज जमत नाही.
कर्सिव्ह लिहिणं फार अवघड जातं डाव्या हाताने.

Pages