निसर्गाच्या गप्पा (भाग १७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2014 - 01:57

निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने

सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक,

ओळखा पाहू .... (दिनेशदा, जागू, साधना, जिप्सी यांनी पटकन उत्तर सांगून पेपर फोडू नये स्मित ) ===

दिपमाळ ?????

कित्ती दिवसांनी फोटो देता येताहेत इथे... Happy

हे फोटो डिसेंबरात वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये काढलेत. झाडे कुठली ती सांगा आतामला लवकर.. Happy

ह्या लांबच लांब लागलेल्या शेंगा

आणि त्याची ही फुले .. म्हणजे फुले गळल्यावर उरलेला भाग असावा. फुले शिवण झाडासारखी वाटली. पण शिवणीला अशा शेंगा येतात का? राणीबागेत कधी दिसल्या नाहीट.

हे कसले झाड? डोम थिएअटर समोर आहे

ही त्याची पाने..... मला ओक आठवला पण त्याची पाने वेगळी आहेत.

हा बाबा कोण? फळे वडासारखी दिसत होती पण वड किंवा ती फॅमिली नाही.

ही पाने भेंडीच्या झाडासारखी दिसतात पण हा वृक्ष जवळजवळ सहामजली इमारतीएवढ्जा उंच होता. भेंड इतके वाढणे शक्य नाही. आणि मुळात तो भे ंड नव्हताच.

हे माझे लाडके बुचाचे झाड. किती बहरलेय बघा...

मला आता फोटो टाकता यायला लागले. त्यामुळॅ तुम्हाला त्रस होणार . भोगा आता

हा वेल माझ्या ऑफिसच्या जंगलात -

वेल लपलाय इतर झाडांछ्या गर्दीत

फुले अशी होती. आणि त्यावर चक्क माशा बसल्या होत्या.

मग त्याला अशी फळे आली

ही फळे साधारण दिड इंच आकाराची होती.

पुण्याच्या जुन्या शाळेत सापडलेले हे झाड. मी इथे माहिती लिहिलेली आणि त्यावरुन बहुतेक शशांकने त्याचे नाव सांगितलेले. ते जुने फोटो आज सापडले Happy फोटो काढताना कडक दुपार असल्याने फोटो नीट काढता येत नव्हते. पण झाडाला असले सर लटकत होते भरपुर. फोटो तही दिसताहेत थोडे

गुगम वर सर्च केले तर पटकन दिसले हुबेहुब शशांकच्या फोटोंसारखे. मधु मस्त माहिती.
साधना धन्यवाद. Happy
सी गल्स मस्तच. हेमा बदाम आहेत का? सगळेच फोटो छान.

फोटो बघुन पक्षी, झाड, फुले पाने यांची नाव ओळखायला कुठले अ‍ॅप वापरता का तुम्ही? गुगल मदत करतेच पण वेळ खुप जातो कधीकधी.

साधना ती जोडफळे कावळीची ना ? शांकलीने लेख लिहिला होता यावर. अजिबात हाताळू नकोस. विषारी असतात.

वर्षू, माझ्यासारख्या मूठभर लोकामूळेच... जग बूडायचे राहिलेय अजून Happy

शिवण, गंभारीच्या झाडाला बोराएवढी फळे येतात. पिकल्यावर पिवळी होतात. खाता येतात.
राणीच्या बागेत, हत्तीखान्यासमोर झाड आहे. ( हत्ती नाहीत पण झाड आहे. )

बापरे मला काही ओळखता येत नाही. एकदम 'ढ' विद्यार्थिनी आहे मी. ह्या धाग्यावर आल्यामुळे खरंच खूप माहिती मिळते. माहिती देणाऱ्या सर्वांना धन्यवाद.

वॉव..साधना... गुड जॉब!!!!! सुपर फोटो टाकलेस!!!!!!!!! मस्त!!

दिनेश, कुछ भी क्या .. मेरा दावा उलटा है बिलकुल.. Wink

रा बागेत हत्ती होते..२..खूप लांबवर ठेवले होते लोकांपासून.. का ते नंतर दोन दिवसांनी कळलं..

दोन दिवसानंतरच्या पेपरात ३,४ लोकं मगरींना दगड मारून छळत होते.. त्यांचे निर्लज्जपणे हसतानाचे कोणीतरी काढलेले फोटो छापून आले होते.. Angry

सर्व प्रथम १७ व्या भागा बद्दल जागूचं अभिनंदन!!

सगळ्यांचेच फोटो आणि माहिती मस्त!

साधना, तू दिलेली वेल... साधरण हिरवट फुलं आहेत... ती हरणदोडी आहे. Wattakaka volubilis (वट्टाकाका व्हॉल्यूबिलिस) या नावाने गूगल सर्च कर. खालची पांढरी फुलं सीतारंजनाची Citharexylum spinosum आहेत.
स्थितप्रज्ञ फु पा आणि अर्धवट मिटलेल्या पाकळ्यांची फुलं मस्तच!!

रच्याक ने, वर्षूतै, कोलाज फार मस्त आहे हं!! Happy

साधना,
सुंदर फोटो!
शशांक,
उत्तर लवकर सांगा ना.त्यासाठी कॉपीपण केली(गुगल ) पण अभ्यास न करणार्‍याच्या हाती गाईड पडलं तरी काय उपयोग!

दोन दिवसानंतरच्या पेपरात ३,४ लोकं मगरींना दगड मारून छळत होते.. ...... हा नालायक प्रकार कित्येक वर्षे चालूच आहे. वाघ-सिंहाच्या पिंजर्‍यापुढे,प्राण्यांनी ओरडावे म्हणून मोठी माणसे खडे मारायची.त्यामुळे तर जाळ्या डबल केल्या आहेत.त्यातही यू.पी., बिहारीच असायची.खूप उद्वेगजनक वाटायचे.आहेत.

मागच्या पानावरचा शेवटचा फोटो -> ओले बदाम नाहीत का हे?
साधना,
हे कसले झाड? डोम थिएअटर समोर आहे>>> चिकूचे झाड आहे ते असे वाटतंय. बारिक चिकू आलेत त्याला.

त्या गाडीवाल्यानी ते ओपन करुन आम्हाला दिले. ते आतुन असे दिसत होते. त्यांनी ते ओले पिस्ते असे सांगितले. वरच कवचं काढून आम्ही ते खाल्ले. चव पिस्त्यासारखी लागत होती. आणि आकार ही पिस्त्यासारखा होता. पूर्ण जूनागढ मध्ये एकच झाड आहे असे म्हणत होता. आत पूर्ण भरलेले होते पण थोडे खाऊन झाल्यावर फोटो काढला. From mayboli

हेमा जंगली बदाम आहेत हे. मुम्बैत खुप आहे झाडे पण कोणी खात नाही ईथे त्याना

सावली चीकू नाहित हे. मी चिकू चे झाड झोपेतही ओळखेन ग.

मला आता फोटो टाकता यायला लागले. त्यामुळॅ तुम्हाला त्रस होणार . भोगा आता>>>>> साधना Happy

प्र चिना नं. दिलेस तर मागे जाउन कुठल्या झाडाविषयी कोणी माहिती दिली आहे ते कळायला सोपे जाइल असे वाटते..

वर्षूतैच्या प्र चि तली फुले कदाचित पूर्ण उमलून पाकळ्या गळण्यापूर्वीच्या स्थितीतली असावीत बहुधा. जाणकार सांगतीलच

शशांकच्या कोडयाचे उत्तर देणे अपनी बस की बात नही.. जांभळी अबोली?

शशांकच्या कोडयाचे उत्तर >>>> तालिमखाना/कोळशिंदा

http://www.maayboli.com/node/29535 - यात आहे ते -जागूने काढलेला फोटु.... Happy

Hygrophila schulli http://www.flowersofindia.net/ या साईटनुसार, बाकी स्पेसिजबद्दल थोडे मतभेद आहेत .. Happy
काहींच्या मते Hygrophila spinosa आहे. फॅमिली/कूळ - Acanthaceae

आज काहीही वाचण्यापूर्वी आधी लिहायचंय. Happy
सतराव्या भागाबद्दल सर्व निसर्गगप्पिष्टांचं अभिनंदन! सद्ध्या माझी आणि कॅमेर्‍याची गाठ पडणं दुर्मीळ झालंय. त्यामुळे एक जुनाच फोटो:

ही मला बर्लीनला भेटलेली फुलं. याला 'बटरफ्लाय बुश' असंच नाव आहे. खरोखरच त्या झाडांवर शेकड्यांनी फुलपाखरं होती!

मागे मी इथे सांगितलं होतं - माझ्याकडच्या कुंडीतल्या लिंबाच्या झाडाला लिंबं फारच कमी लागली म्हणून - मधे जरा ग्रील बसवायचं काम होतं म्हणून ते झाड दुसर्‍या गॅलरीत ठेवलं. इथे खरं तर ऊन अजून कमी येतं. पण लिंबाला नवं घर आवडलंय. आता चांगली फुलं येताहेत.
काही दिवसांपूर्वी हुबळीला कावळीचा एक अजस्त्र वाढलेला वेल बघितला, आणि शांकलीच्या पोस्टची आठवण झाली.

पाकळ्या अर्धवट मिटून घेतलेल्या या फुलांचं नाव कळलं नाही.. >>>> वर्षूदी -
dahlia flower किंवा zinnia flower या प्रकारातले आहे ते - आपण त्याला डेलिया, झेनिया म्हणतो बघ ...

हेमा, ते खरे पिस्ते नसावेत. विकीपिडियावर खर्‍या पिस्त्याचे फोटो पहा:
http://en.wikipedia.org/wiki/Pistachio

शशांक, मला फारच आवडलं ते झाड. पण मी तेंव्हा नि ग कर नव्हते ना, त्यामुळे फक्त फुलाचाच फोटो काढलाय. पायवाटेवर एका ठिकाणी ही झाडं होती, तिथे सगळं फुलपाखरांचंच साम्राज्य होतं. सगळीकडे भिरभिरणारी फुलपाखरं, आणि जमिनीवर सुरवंट !

सगळ्यांचे फोटो अगदी अफाट आहेत. मस्तच.

वर्षूताई त्या अर्धवट मिटलेल्या फुलांना आम्ही गाजरा म्हणतो. ही फुले पावसाळ्यात म्हणजे गौरी-गणपतींच्या दिवसांत जास्त येतात. ही सिंगलची दिसत आहेत. ह्यात डबलची पण असतात भरगच्च. रंगही वेगवेगळे आणि जरा हटकेच असतात.

साधना ती मुंग्यालागलेली वेल आहे ना त्याच्यावरची फुले आम्ही शाळेतून जाताना रस्त्यातून काढायचो. त्याचा गजरा करायचा तो किडीच्या आकाराप्रमाणे होतो. मी बरेच दिवस ती फुले शोधतेय पण जास्त प्रमाणात दिसत नाहीत. आता माझ्या घरीच उगवलेय. फुले पावसाळ्यात येतात जास्त. ती आली की मी किडीचा गजरा करणार. आम्ही त्याला किडीचीच फुले म्हणायचो. रंगही फुलांचा हिरवाच किडीसारखा असतो. Happy

शांकली माझे कसले अभिनंदन. आपण सगळ्यांचे म्हण. Happy आणि आता आमच्या ज्ञानात तुझ्याकडच्या ज्ञानाची जास्त भर पाडायला नियमीत येत जा. Happy

मला आता फोटो टाकता यायला लागले.त्यामुळॅ तुम्हाला त्रस होणार . भोगा आता >> आवडेल असा त्रास Happy

पुण्याच्या जुन्या शाळेत सापडलेले हे झाड. मी इथे माहिती लिहिलेली आणि त्यावरुन बहुतेक शशांकने त्याचे नाव सांगितलेले. ते जुने फोटो आज सापडले फोटो काढताना कडक दुपार असल्याने फोटो नीट काढता येत नव्हते. पण झाडाला असले सर लटकत होते भरपुर. फोटो तही दिसताहेत थोडे >>> साधनातै जुन्या शाळेतले झाड आणि लटकणारे सर भारी आहेत Happy रच्याकने मी शाळेतले सर शोधत होतो Wink

वर्षूदी ,गौरी - सुंदर प्रचि

>>साधना, तू दिलेली वेल... साधरण हिरवट फुलं आहेत... ती हरणदोडी आहे. Wattakaka volubilis (वट्टाकाका व्हॉल्यूबिलिस)

मला याचं नाव हिरणदवडा असं सांगण्यात आलं होतं मी मागे एक येऊर नेचर ट्रेल केला होता तेव्हा. खखोदेजा.
माझ्याकडे पण याचा फोटो आहे.

Pages