मराठी भाषेचं भवितव्य काय?

Submitted by बोबो निलेश on 15 February, 2014 - 23:01

मराठी भाषेचं भवितव्य काय?

कदाचित हा चावून चावून चोथा झालेंला विषय असेलही. पण मी हा प्रश्न आतापर्यंत माझ्या अनेक मित्रमंडळींना विचारला. पण अजून तरी मला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कुणी देऊ शकलेलं नाही.
सगळे जण जीव तोडून आजच्या स्पर्धेत धावताहेत. या प्रश्नावर विचार करायलासुद्धा कुणाला फुरसत नाही.
मराठी शाळा बंद पडताहेत. पडेनात का?
जवळ जवळ सर्वांची मुलं आज इंग्रजी माध्यमातून शिकताहेत. कदाचित काळाची गरज आहे किंवा थोडी फार हाईपसुद्धा म्हणता येईल किंवा मनातली एक असुरक्षिततेची भावना ही असेल कदाचित. किंवा हर्ड मेंटॅलिटी(कळपातली मानसिकता?)सुद्धा असेल कदाचित.
कधी कधी वाटतं, असंच चालू राहिलं, तर आणखी काही वर्षांनी मराठी भाषा केवळ बोली भाषा म्हणूनच नाही ना उरणार?
किंवा आणखी निराशाजनक विचार म्हणजे ती काही काळाने पूर्णच काळाच्या पडद्याआड तर नाही ना जाणार?
सध्याची पिढी मराठी वाचतेय, बोलतेय. पण पुढच्या पिढीला मराठी वाचता तरी येईल का?
दुर्दैवाने सध्याचं चित्र तितकंसं आश्वासक वाटत नाही.

अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या भाषेची दुर्दैवाने दमछाक होऊ लागल्याची चिन्हं दिसताहेत.
मायबोलीवरील एका धाग्यावर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी काय करता येईल याची मनापासून चर्चा होताना पहिली. वाटलं, त्याचवेळी मनापासून मराठी जगवण्यासाठी एवढंच नाही तर ताठ मानेने आजच्या जगात मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी काय करता येईल याची पण चर्चा व्हायला हवी. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. पण मला वाटतं थोडा विचार मराठीचासुद्धा करायला हवा आपण. तिचा तेवढा अधिकार नक्कीच आहे आपल्यावर.

कदाचित सारंच निराशाजनक नाही. निदान चित्रपटांच्या क्षेत्रात तरी मराठीला काहीसे चांगले दिवस आले आहेत. नवनवीन दिग्दर्शक उत्तमोत्तम चित्रपट काढत आहेत. मराठी प्रेक्षक ते पाहत आहेत, हे नक्कीच समाधानाची गोष्ट आहे. अगदी जागतिक पातळीवर काही प्रमाणात मराठी सिनेमाची दखल घेतले जात आहे ही चांगली गोष्ट आहे.
पण हीच कामगिरी बाकीच्या आघाड्यांवर परिवर्तित करण्यासाठी काय करता येईल?
मराठीत वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधीत लिखाण व्हायला हवं. (म्हणजे आता अजिबात होत नाही असं नाही). डॉक्टर सुरेश शिंदे यांच्या कथा वाचताना मेडिकल थ्रिलर वाचत असल्याचा भास होतो. मी रॉबिन कुक वाचला नाहीय, पण तो एवढा प्रसिद्ध झाला म्हणजे तोसुद्धा अशाच धाटणीचं लिहित असणार Happy

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात मागे मी काही आयांना त्यांच्या लहान मुलांना घेऊन येताना पाहिलं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आपल्या या मुलांसाठी त्या मराठी पुस्तकं घेऊन जात होत्या. त्यातल्या काही जणी मुलांना मराठी पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवतात असं ऐकलं. ऐकून काहीसं बरं वाटलं.
ग्रंथ संग्रहालयातल्या कर्मचारी वर्गाकडून कळलं की इंग्रजी माध्यमात मराठी पहिलीपासून अनिवार्य करण्यात आलं आहे, त्यामुळे आजकाल मराठी ग्रंथ संग्रहालयात सभासद म्हणून लहान मुलांची संख्या काहीशी वाढली आहे.
मला वाटतं हा एक चांगला मुद्दा आहे. सर्वांनी आपापल्या मुलांना (ज्यांना सध्या नसतील त्यांच्या भविष्यकालीन मुलांना) मराठी वाचनाची गोडी लावायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
मराठीची काळजी राजकारण्यांवर टाकून उपयोग नाही.
तेव्हा माझी माबोकरांना कळकळीची विनंती आहे की साऱ्यांनी मराठी संवर्धनासाठी काही ठोस आणि प्रत्येकाला आचरणात आणता येण्यासारखे काही उपाय सुचवावेत.

धन्यवाद मंडळी..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परदेशात आल्यावर आपली मातृभाषा बोलायचा आणि जपायचा उत्साह येतो हे अगदी खरं (स्वानुभवातून). आपल्या आजुबाजुला सतत वेगळी भाषा बोलली जात आहे हे जाणवल्यावर जमेल तेव्हा आणि जमेल तशी आपली भाषा बोलावीशी वाटते

माझ्या बाबतीत तर अगदी खरे. २५-३० वर्षे मायबोलीशी संबंध तुटल्यावर जेंव्हा मायबोली सापडले तेंव्हा माझा आनंद गगनात मावेना. सतत मराठीत लिहायला मिळावे म्हणून मी अगदी वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते लिहीत असे. नि जे कुणि इथे मराठी लिहीणार नाहीत त्यांचा निषेध करत असे.

पण वर कुणि लिहील्याप्रमाणे मी चुकीच्या वेळी इथे आलो. आजकालची मराठी म्हणजे इंग्रजी, हिंदी, गुजराती या सर्व भाषा इन्क्ल्युड करून प्रोग्रेसिव्ह व मोअर अलाइन्ड विथ ग्लोबलायझेशन अशी झालेली आहे. बिघडले कुठे?

जी काय मराठी असेल ती असो, आनंद एव्हढाच की सर्वांचे भले होते आहे. उत्तम प्रकृति, भरपूर संपत्ति नि उत्कृष्ठ रहाणीमान!!

माझ्या ओळखीची काही मराठी कुटुंबं सिंगापूर येथे राहतात. त्यांनी आपल्या मुलांना युकेच्या मराठी शा़ळेत घातलं आहे. रोज येऊन जाऊन करतात. सिंगापूरहून जो रस्ता युकेला जातो त्याच्या उलट रस्त्याला युएसएला एक शाळा होती. पण उत्तम मराठी शिकण्यासाठी खडतर प्रवासाची जोखीम पत्करून त्यांनी युकेलाच प्राधान्य दिले आहे.

ए अरे काय सगळे मिळून एकट्या लिंबूला छळताय ? लगो डॉक्टर म्हणजे अन्य कोणा डॉक्टरांचा डुआयडी तर नव्हे ?
सद्ध्या फार वेळ मिळत नाहीये त्यामुळे येऊन फार काही लिहू शकत नाहीये.
असो जर हा बाफ मी येईपर्यंत जिवंत राहिला तर नंतर लिहिण्याचा प्रयत्न करू शकेन.

झक्की | 20 February, 2014 - 19:49 नवीन

परदेशात आल्यावर आपली मातृभाषा बोलायचा आणि जपायचा उत्साह येतो हे अगदी खरं (स्वानुभवातून). आपल्या आजुबाजुला सतत वेगळी भाषा बोलली जात आहे हे जाणवल्यावर जमेल तेव्हा आणि जमेल तशी आपली भाषा बोलावीशी वाटते

माझ्या बाबतीत तर अगदी खरे. २५-३० वर्षे मायबोलीशी संबंध तुटल्यावर जेंव्हा मायबोली सापडले तेंव्हा माझा आनंद गगनात मावेना. सतत मराठीत लिहायला मिळावे म्हणून मी अगदी वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते लिहीत असे. नि जे कुणि इथे मराठी लिहीणार नाहीत त्यांचा निषेध करत असे.

पण वर कुणि लिहील्याप्रमाणे मी चुकीच्या वेळी इथे आलो. आजकालची मराठी म्हणजे इंग्रजी, हिंदी, गुजराती या सर्व भाषा इन्क्ल्युड करून प्रोग्रेसिव्ह व मोअर अलाइन्ड विथ ग्लोबलायझेशन अशी झालेली आहे. बिघडले कुठे?

जी काय मराठी असेल ती असो, आनंद एव्हढाच की सर्वांचे भले होते आहे. उत्तम प्रकृति, भरपूर संपत्ति नि उत्कृष्ठ रहाणीमान!!
<<
झक्कीकाका,
आजच एका 'पॅलिएटिव्ह नर्स' कडून आलेले 'पेट रिग्रेट्स इन लाईफ' असे व्हॉट्सॅप फॉर्वर्ड वाचले, त्यात तुमचे हे कन्फेशन फिट्ट बसते.
पण मस्त ऑब्जर्वेशन आहे हे नक्की.

>>लगो मंजै जामोप्या मंजै संजीव पिल्ले मंजै पिसाललेला हत्ती मंजै वाल्याकोली <<
व्हॉट अ लॉयल्टी (टु मायबोली), सरजी!! [सातों जन्मोंका साथ] Happy

पण मस्त ऑब्जर्वेशन आहे हे नक्की.

धन्यवाद.
नुसतेच मायबोलीचे प्रेम नव्हे तर मायभूमीचे प्रेम पण. पहिली काही वर्षे वाटते इथे कित्ती चांगले नि तिथे कित्ती वाईट.
पण एकदा नक्की झाले की आपल्याला तिथले जे काय वाईट आहे त्याचा त्रास होणार नाही तेंव्हा पासून आपल्या मायभूमीतल्या लोकांनी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींचा सानंद अभिमान वाटतो.

मागे एकाला लिहीलेल्या पत्रात मी लिहीले होते की आमच्या वेळी आम्हाला भारतीय परिस्थिती अत्यंत निराशाजनक का वाटत होती, पळून जाण्याची इच्छा का होत होती वगैरे. आता कुणाला भारत सोडून जाण्याला काही कारण नाही. तसेच अर्थात इथल्या लोकांनाहि तिकडे जायची गरज नाही, आपले दुरून डाँगर सा़जरे म्हणावे.

>>>>> लिंबू ओवाळून टाका. <<<<<< अन्निसवाले हाणतील तुला....
अन इथे लिम्बू ओवाळून टाकले तर धागा बन्द पडतो असा माबोकरान्चा अनुभव आहे! Proud
बोल, तुला धागा बन्द पडायला हवाय का?

लिंबुभाऊ, तुम्ही जी उदाहरणे दिलेली आहेत, त्यातून जे तुम्ही निष्कर्ष काढले आहेत, ते सगळेच एकांगी आहेत.

१. मनुष्य भाषेचा वापर बोलणे, लिहिणे आणि वाचणे या तीन कामांसाठी करतो. भाषा समजणे/ ऐकणे हाही एक ऑप्शन आहे.

२. तुमच्या त्या तथाकथित उच्चविद्याविभूषितांची जी उदाहरणे आहेत, ती अशीच तकलादू मंडळी आहेत. या लोकांनी त्यांच्या शिक्षणासाठी आणि अर्थार्जनासाठी इंग्रजीचाच वापर ( बोलणे, वाचणे, लिहिणे ) या तीन कामांसाठी केलेला असणार हे नक्की.

आता घरात सत्यनारायण सांगायला लिंबुभट्ट आले की हे लोक सावरकरी डिक्शनरी वापरुन दोन चार ओळी / शब्द मराठी बोलले की ते तुम्हाला महान वाटले.

३. याच्याउलट , ज्याला इंग्रजी येत नाही, तोच मनुष्य इंग्रजी शिकण्यासाठी येणार्‍याजाणार्‍यांशी जुजबी इंग्रजी बोलून शिकण्याचा प्रयत्न करत असणार.

हा मनुष्य फळविक्या, भाजीवाला, कँटीनवाला, .... तत्सम कुणीही असेल जो त्याचा व्यवसाय दिवसभर मराठी भाषा वापरुन करत असणार.

पण तुम्ही आणि तुमचा तो उदा. १ वाला या उदा. २ वाल्याने इंग्रजी शब्द वापरले की त्याला बेअक्कल आणि भाषाद्रोही ठरवणार, हो ना? Proud असेच एक महान भाषाप्रभू या मायबोलीवर होते, त्यान्नी याच विषयावर एक अतीविशाल धागाही काढला होता. इतरांना मराठीच वापरा म्हणून सांगणारे हे महोदय, जेंव्हा यांच्या स्वतःच्या सगळ्या लेखांचे, शिक्षणाचे इतरांनी वाभाडे काढले, तेंव्हा ते गायब झाले. Proud आठवते का?

४. या महान धरतीवर महान देवांची भाषा एकच होती. देववाणी, चार श्लोक म्हणणे, सोयरासुतकाचे चार मंत्र, कालिदासाची दोन चार नाटकं आणि पंचतंत्राच्या कुत्र्या मांजराच्या चार कहाण्या.... यापलीकडे आज ही भाषा कुठेही शिल्लक नाही. आयुर्वेद वगैरे आहे, पण आजकाल त्यांच्या श्लोकांच्या खाली हिंदी, इंग्रजी भाषांतर असते, लोक तेच वाचतात. म्हणजे देवभाषेतील ज्ञान कदाचित अगाध/ असीम असेलही, पण भाषा म्हणून तिला काडीचीही किंमत / वापर राहिलेली / राहिलेला नाही.

कारण ही भाषा सामान्य लोकांना ईझिली अ‍ॅवलेबल नव्हती .. या भाषेला ठेकेदार होते. याउअलट , मराठी वा इतर लोकल भाषा, उर्दू, हिंदी, इंग्रजी ... इथे कुणाचीही ठेकेदारी नाही. त्यामुळे लोक आपोआपच या भाषांकडे वळले. मग भले, तुमची ती देववाणी सात्विक का असेना, चूक ठेकेदारांची आहे, परकीय भाषांची नाही.

त्यामुळे देवांची भाषा तशीही मेलेलीच आहे. आता ज्या काही भाषा या धरतीवर आहेत, त्या सगळ्या मर्त्य मानवांनीच निर्माण केलेल्या आहेत , त्यामुळे मानवांनी मानवांची कोणतीही भाषा आनंदाने वापरावी, नै का?

Proud

--

लगो उर्फ बरेच काही.

त्या आय डी चे भवितव्य काय असा प्रश्न ज्यांच्याबाबत कधीही विचारला जाऊ शकत नाही असे कोणीतरी!

Light 1

ह्म्म्म, दुर्दैव म्हणजे अजुन काय असणार ?

बिचारे देव बिचारी संस्कृत भाषा कपाळ करंट्या भारत देशात आणि ते सुद्धा त्याहुन करंट्या हिंदू धर्मात आणि त्याहून त्याहून अती अती अती करंट्या ठेकेदारांच्या ताब्यात देऊन गेले. Sad
त्यांनी ती इंग्रज, युरोप, किमान आखाती प्रदेशात तरी द्यायची होती. तेव्हा ही सारी मंडळी नशिबाची चाळणी घेऊन कुठे गेली होती काय की ?

यावद् गंगा च यमुना च यावद् विंध्यो महिधरः |
यावद् भारतवर्षस्याद तावदेव हि संस्कृतम ||

हे लिहिणार्‍या महाभागाला शोधून काढावे लागेल आणि त्याला सांगावे लागेल की रोज एक थोबाडीत मारून घे स्वतःच्या करशील पुन्हा अशी चूक असले काही दळभद्री सुभाषित लिहिण्याची.
या भारत वर्षात हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा उत्तमोत्तम भाषा उदयाला येणार याची माहिती करून घेतली असतीस,
तर अरे कर्मदरिद्री माणसा असली भंगार सुभाषिते लिहायला धजावला नसतास. चल आता तातडीने जेवढे काही लिहिले आहेस ते सगळे अतिशय सुंदर आणि चांगल्या अशा इंग्रजी भाषेत लिहायला घे.
असे न करशील तर तुझ्याच डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील.

अ‍ॅडमिनला एक नम्र विनंती, हहगलो प्रमाणे ढसाढसा रडणारी एक बाहुली उपलब्ध करून द्यावी. Sad

वि.सू. : हे वाचणार्‍यांनी संस्कृतच्या जागी अन्य स्थानिक भाषा ठेवून आणि सुभाषिताच्या जागी त्या त्या भाषेतले प्रसिद्ध वचन, इ. ठेवून वाचून पहावे. अर्थात हे वैकल्पिक आहे, सक्तीचे नाही.

अ‍ॅडमिनला एक नम्र विनंती, हहगलो प्रमाणे ढसाढसा रडणारी एक बाहुली उपलब्ध करून द्यावी<<<

Lol

(हे हासणे हे वरील विधान वाचून आलेले हासणे आहे, ह्या हासण्याचा अर्थ कोणाशी सहमती अथवा विरोध असा लावला जाऊ नये ही विनंती)

>>
यावद गंगा च यमुना च यावद विंध्यो महिधरः
यावद भारत वर्षस्याद तावदेव हि संस्कृतम
<<

पण यात आणखी भाषा भारतवर्षात बोलल्या जाणारच नाहीत असं कुठे म्हटलंय?
लोक संवाद साधत आहेत ना? मग त्यात ढसाढसा रडण्यासारखं काय आहे?!

त्या 'यावद्'मधल्या 'द'चा आणि 'संस्कृतम्'मधल्या 'म'चा पाय मोडा आणि भारतवर्ष हा एक शब्द लिहा पाहू. तुम्हीच नीट लिहिली नाहीत तर सुभाषितांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं?

स्वातीताई, मघाशी भावनेच्या भरात भराभर लिहित होतो, तुम्ही ज्या सुचना केल्या आहेत ते माहित नव्हते असे नाही, पण पाय मोडून (अक्षराचा) कसे लिहायचे ते आधी माहित नव्हते. आता बदल केले आहेत. अजुन जर काही सुचना असतील तर सांगा.

(अक्षराचा)<<< Lol

लिहीत
माहीत
अजून
सूचना<<< Lol

(मला खरंच 'अजुन' हे बरोबर वाटत होतं, अजून हे बरोबर आहे हे माहीत नव्हते)

ही चालेल का?<<< Lol

झक्की | 20 February, 2014 - 09:19
आमच्या वेळी आम्हाला भारतीय परिस्थिती अत्यंत निराशाजनक का वाटत होती, पळून जाण्याची इच्छा का होत होती वगैरे. आता कुणाला भारत सोडून जाण्याला काही कारण नाही. >>>

तुमच्या वेळी तुम्हाला भारतीय परिस्थिती अत्यंत निराशाजनक का वाटत होती? ही साधारण किती सालची गोष्ट? त्या वेळी भारतात तुम्हाला असं निराशाजनक काय वाटलं ? त्या मानाने आज भारतातल्या परिस्थितीत काय फरक जाणवतो आहे तुम्हाला? आता कुणाला भारत सोडून जाण्याला काही कारण नाही. असं तुम्हाला का वाटतं?

या प्रामाणिक शंका आहेत, तुमचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. कृपया याला उलट तपासणी किंवा उपरोध समजू नका.

या प्रामाणिक शंका आहेत, तुमचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. कृपया याला उलट तपासणी किंवा उपरोध समजू नका.>> नया है वह.

>>>> 'संस्कृत देवापासून झाली तर मराठी काय चोरापासून झाली <<<<<<
कुणापासून झाली ते जाऊद्या, कुणाच्या हाती (खरतर तोन्डी) सापडली आहे ते बघा! अन हे सगळे "साव" लोकं येत्या एखाददोन पिढ्यात तिला "तोन्डी लावण्यापुरती" तरी वापरणार आहेत का याची भ्रान्त आहे ते बघा!

महेश, ढसाढसा रडणारी बाहुली हवीच हवी हो! शिवाय कपाळावर हाताने बडवुन घेणारी बाहुली पण "मायबोली" वरच उपलब्ध करुन देणे अत्यावश्यक ठरले आहे.
अन तुमचा मुद्दा, संस्कृत वाटताना युरोपिअन्/अमेरिकन कुठे होते ते माहित नाही, पण सद्ध्यामात्र मला अमेरिकन्/युरोपिअन साईट्स्वरुनच संस्कृतचे धडे मिळताहेत! Happy

Pages